A. P. J. Abdul Kalam एपीजे अब्दुल कलाम यांची माहिती मराठी

A. P. J. Abdul Kalam- बापलपण

                एका अत्यंत गरीब कुटुंबात महान वैज्ञानिक डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांबा जन्म दि. १५ ऑक्टोबर १९३१ रोजी झाला. वडील ‘जैनुल आबदीन’ होडी चालवत. प्रवाशांना या किनाऱ्यावरून त्या किनाऱ्यावर ने-आण करण्याचे काम ते करीत असत. ही होडी कलाम ६ वर्षांचे असताना वडिलांच्या मित्राने व वडील जैनुल आबदीन यांनी स्वतः बांधली होती. तांत्रिक शिक्षण मिळण्याची ही कलाम यांची पहिली वेळ.

                 आई ‘आशी अम्मा’ एक साधीसुधी, धर्म परायण, संवेदनशील गृहिणी होती. तिच्या या स्वभाव गुणांमुळेच डॉ. कलाम यांचे व्यक्तिमत्त्व निगर्वी व अत्यंत साधेसुधे झाले. त्यांच्या मते दयाळूपणा, आत्मविश्वास, प्रामाणिकपणा आणि आत्मसंयमन हे गुण त्यांना आई-वडिलांकडून परंपरागत वारशाने मिळाले आहेत. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे पूर्ण नाव ‘अबुल पाकिर जैनुल आबदीन अब्दुल कलाम’ होते. ते तमिळनाडूतील प्रसिद्ध रामेश्वरम् या तीर्थस्थानी राहणारे होते.

A. P. J. Abdul Kalam-शिक्षण

                           डॉ. कलाम पाचव्या इयत्तेमध्ये रामेश्वरम्च्या शाळेत शिकत असताना रामेश्वरम् मंदिराच्या मुख्य पुजाऱ्याचा मुलगा रामनाथशास्त्री व कलाम पुढेच एका बाकावर बसत असत. शाळेत आलेल्या नवीन शिक्षकांनी मुसलमान मुलाला पुढे पाहून उठविले व मागे बसविले. रामनाथशास्त्रीही त्यांच्याजवळ जाऊन बसला. हे जेव्हा रामनाथच्या वडिलांना (रामेश्वरम् मंदिराचे मुख्य पुजारी) समजले, तेव्हा त्यांनी त्या शिक्षकांना बोलावून, या लहान निरागस मुलांच्या मनात असे धार्मिक विषमतेचे विष पेरू नये, असे सांगितले. डॉ. कलाम यांनी आपल्या चरित्रात लिहिले आहे की, रामेश्वरम्वासियांना आपल्या धर्माबद्दल आस्था आहेच, पणत्याचबरोबर दुसऱ्या धर्माच्या व्यक्तींशी त्यांचा व्यवहार स‌द्भावनेचा असतो. एक-दुसऱ्याला कुटुंबातील व्यक्तीप्रमाणे मानतात. ‘रामेश्वरम्’ हे सांप्रदायिक सौहार्दाचे उत्तम उदाहरण आहे.

A. P. J. Abdul Kalam-श्वार्ट्ज हायस्कूलमध्ये दाखल

                     डॉ. कलाम पुढच्या विज्ञानाच्या अभ्यासासाठी रामनाथपुरम्च्या श्वार्ट्ज हायस्कूलमध्ये दाखल झाले. तेथील विज्ञानाचे शिक्षक एयादुरे सोलोमन यांच्या विचारांचा कलामवर खूपच परिणाम झाला. जीवनात यशस्वी होण्यासाठी इच्छा, विश्वास व आस्था या तीनही गोष्टी खूपच आवश्यक आहेत, असे त्यांचे मत होते.

                      त्यांच्यामुळेच आकाशात उडण्याची प्रबळ इच्छाशक्ती डॉ. कलामांमध्ये जागली व त्यांचा आत्मविश्वास वाढला. गणित शिक्षकांमुळे प्रेरणा मिळाली की, आयुष्यात आपल्या निश्चित धारणेनुसार जे हवे, ते नक्कीच मिळवता येईल

a.-p.-j.-abdul-kalam

A. P. J. Abdul Kalam-बी. एससी.ची डिग्री

                   इ. स. १९५० मध्ये डॉ. कलाम तिरुचिरापल्लीच्या सेंट जोसेफ कॉलेजमध्ये गेले. तिथल्या चार वर्षांच्या काळात दुसऱ्यांना काही देण्याची भावना त्यांच्यात ठासून भरली. कारण तिथले बहुतांश प्राध्यापक कांचीपरमाचार्यांचे भक्त होते. इथेच त्यांची इंग्रजी साहित्याची आवड वाढली.

                     टॉलस्टाय, दर्शन, आर्ट, विज्ञान यांचा अभ्यास झाला. सामान्यतः वैज्ञानिक हे नास्तिक असतात. पण डॉ. कलाम म्हणतात की, त्यांनी अत्यंत सूक्ष्म कणांनी बनलेल्या तत्त्वांचा अभ्यास केला. त्यांच्या नष्ट होण्याची प्रक्रिया जाणून घेतली. तेव्हा ईश्वरी सत्तेवरचा त्यांचा विश्वास वाढू लागला. सेंट जोसेफ कॉलेजमधून त्यांनी बी. एससी.ची डिग्री घेतली

madras institute of technology -A. P. J. Abdul Kalam

                     इंजिनिअरिंगसाठी मद्रासच्या ‘मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये गेले. त्या वेळेला तिथल्या महागड्या शिक्षणासाठी त्यांची ‘बहीण जोहकाने’ स्वतःचे दागिने विकून त्यांना मदत केली. त्या संस्थेतील एका विज्ञान विभागाने त्यांना खूपच आकर्षित केले.

                  इथल्या शेवटच्या वर्षात त्यांना मध्यम दूरीवर मार्गक्रमण करणाऱ्या विमानाचे डिझाइन बनवायचे होते. हे काम त्यांनी दिलेल्या वेळेच्या आतच पूर्ण केले. तिथल्या प्रो. श्रीनिवास यांनी डॉ. कलामना खूपच प्रोत्साहित केले. या संस्थेतून बाहेर पडल्यानंतरचे डॉ. कलामांचे जीवन हे फारच संघर्षमय राहिले.

                       मग अनेक ठिकाणे पार करत डॉ. कलाम एका महत्त्वपूर्ण स्थानी पोहोचले. तिथे त्यांनी आपली वास्तविक योग्यता सिद्ध केली. आपली मातृभूमी भारताच्या संरक्षणासंबंधी अनेक प्रश्न सोडवत आपल्या देशाचे नाव एवढे वरती नेऊन ठेवले की, ज्यासाठी प्रत्येक भारतीयाने त्यांचा अभिमानच बाळगावा

missile man - A. P. J. Abdul Kalam

                            डॉ. कलामांनी सर्वांत प्रथम ‘पृथ्वी’ नामक प्रक्षेपास्त्राच्या कार्याला सुरुवात केली. फेब्रुवारी १९९४ मध्ये ‘अग्नी-१‘चे परीक्षण झाले. मध्ये पाच वर्षांच्या प्रतिक्षेनंतर ११ एप्रिल १९९९ ला ‘अग्नी-२‘ आणखी प्रगत स्वरूपात आले. ज्याची साऱ्या विश्वात चर्चा झाली. दोन हजार कि. मी. पेक्षा अधिक दूरवर याचा मारा होता. त्याला अणुशस्त्रांनी भरून त्याची प्रहारक्षमता आणखी वाढवली जाऊ शकते. ‘पृथ्वी’ क्षेपणास्त्र जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे होते. जे सेनेकडून प्रयोगासाठी तैनात केले. ‘त्रिशूल’, ‘आकाश‘ व ‘नाग‘ ही क्षेपणास्त्रे लवकरच सेनेकडे सोपविली गेली. ‘त्रिशूल’ हे प्रक्षेपास्त्र काही दूरपर्यंत मारा करणारे, पण प्रत्येक मोसमात व दिवसा अथवा रात्रीही काम करणारे आहे. अनेक वेळा त्याची चाचणी झाली. त्याचे वैशिष्ट्य हे की, शत्रूच्या क्षेपणास्त्राला ९ कि.मी. दूरवर वाटेतच हे थांबविते व ६ सेकंदांत कार्यरत होते. ‘आकाश’ मध्यम दुरीवर मारा करणारे क्षेपणास्त्र आहे. पृथ्वीवरून सोडल्यावर त्याची प्रहारक्षमता २५ कि.मी. पर्यंत आहे. त्याला कार्यरत व्हायला १५ सेकंद लागतात. त्यानंतर दर ५ सेकंदांनी सतत या क्षेपणास्त्राचा मारा करता येतो. ‘नाग’ क्षेपणास्त्राच्या कार्यक्रमाला यशस्वी करण्यात डॉ. अब्दुल कलामांचे महत्त्वाचे स्थान आहे. त्यांच्याच देखरेखीने या सर्व मिसाइलचे परीक्षण केले गेले.

A. P. J. Abdul Kalam-स्वभाव

                  डॉ. कलाम भारत सरकारच्या संरक्षण सचिवाच्या पदावर होते. त्यांचा स्वभावही अत्यंत साधा. जेव्हा ते अजमेरच्या दर्यामध्ये नमाजासाठी गेले होते तेव्हा सरकारी गाडी नाकारून, भाड्याची टॅक्सी करून गेले व दर्यात सर्वांच्या बरोबर नमाज अदा केला. भारताच्या विकासासाठी आशीर्वाद मागितला.

A. P. J. Abdul Kalam-राष्ट्रपती

                 इ. स. २००२ ते २००७ मध्ये डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम हे भारताचे राष्ट्रपती होते. देशभक्त डॉ. कलामांचे जीवन भारतवासियांसाठी प्रेरणादायी पथदर्शकच राहील.

A. P. J. Abdul Kalam-भारतरत्न

              भारत सरकारने त्यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार इ. स. १९९७ मध्ये देऊन गौरविले.

हृदयविकाराचा तीव्र झटका

                           ‘ दि. २७ जुलै २०१५ रोजी ‘अबुल पाकिर जैनुल आबदीन अब्दुल कलाम’ (ए. पी. जे. अब्दुल कलाम) हे इंडियन इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट ऑफ शिलाँग येथे ‘क्रिएटिंग अ लिव्हेबल प्लॅनेट अर्थ’ या विषयावर भाषण देण्यास गेले होते. तेथे मंचावर भाषणास सुरुवात केल्यावर काही मिनिटांतच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला व तिथेच भारताला आधुनिक बनविणारा हा शास्त्रज्ञ अनंतात विलीन झाला.

Leave a Comment