बिधन चंद्र रॉय bidhan chandra roy biography

बालपण आणि शिक्षण

            भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात वकील, राजनीतिज्ञ, राजकारणी यांच्या बरोबरीने डॉक्टर वैद्य आदींचा सहभागही महत्त्वपूर्ण होता. त्यांच्यातील डॉ. बिधन चंद्र रॉय हे प्रमुख होते.

           मोगलांशी आयुष्यभर लढून शेवटी पकडल्यानंतर आत्महत्या करणाऱ्या प्रतापादित्य राजाचे डॉक्टर विधानचंद्र राय हे वंशज होते. डॉ. विधानचंद्रांचे वडील प्रकाशचंद्र राय. त्यांचे वैभव गेलेले. अशा वेळी गरिबीमुळे कसेबसे शिक्षण झाले. सामान्य नोकरी. कामिनी देवीशी लग्न झाले.

      दोन मुली, तीन मुलगे. त्यातील सर्वांत लहान डॉ. बिधन चंद्र रॉय यांचा जन्म १ जुलै १८८२ रोजी पाटण्यातील बाँकीपूर गावामध्ये झाला. आदर्श माता-पित्यांकडून त्यांना त्याग, परिश्रम व सेवेचे शिक्षण मिळाले होते.

            लहानपणी इतर सामान्य मुलांसारखे बालक विधानचंद्र शाळा चुकविण्यात आनंद मानत असत. बाँकीपूर कॉलेज, पाटणा येथे बी. ए. झाल्यावर इ. स. १९०१ मध्ये मेडिकल कॉलेजमध्ये गेले.

          गरिबीमुळे शिष्यवृत्ती व हॉस्पिटलमध्ये वॉर्डबॉयचे काम करून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. मेडिकल कॉलेजचे व्हाइस प्रिंसिपल कर्नल ल्यूकिसनी स्वाभिमान, महत्त्वाकांक्षा, त्याग, परिश्रम हे त्यांना शिकविले.

डॉक्टर

             इ. स. १९०६ मध्ये डॉक्टर झाल्यावर प्रांतीय चिकित्सा सेवेमध्ये कर्नल ल्यूकिसचे साहाय्यक म्हणून डॉ.बिधन चंद्र रॉय यांची नेमणूक झाली. त्या नोकरीत अनेक इंग्रज अधिकाऱ्यांशी नियमाप्रमाणे कडक वागावे लागले. त्यांची स्वतःची योग्यता, धैर्य व कर्नल ल्यूकिसचे सहकार्य यामुळे ते यशस्वी झाले.

          मेडिकल कॉलेजमध्ये असतानाच त्यांच्याच कॉलेजमधले प्राध्यापक कर्नल पैक यांच्या विनंतीवरून एका अपघातप्रसंगी खोटी साक्ष द्यायला त्यांनी नकार दिला. कर्नल पेकनी त्याचा बदला परीक्षेत मार्क कमी देऊन घेतला. पण नंतर त्यांची योग्यता, प्रामाणिकपणा व खरेपणामुळे स्वतः कर्नल पेकनी त्यांची क्षमा मागितली.

'सेंट बर्थो लोम्यूज' हॉस्पिटल

               १९०८ मध्ये डॉ बिधन चंद्र रॉय पुढील अभ्यासासाठी ‘सेंट बर्थो लोम्यूज’ हॉस्पिटलमध्ये गेले. तेथील डीनने यांना प्रवेश नाकारला. यांच्या अनेक चकरा झाल्यावर नाइलाजाने डीनने त्यांना प्रवेश दिला. तिथे संपूर्ण दिवसभर मृत शरीरांच्या शस्त्रक्रिया करण्याचा अभ्यास प्रामाणिकपणे करून अतिशय मेहनतीने विशेष स्थान मिळविले आणि त्यांना प्रवेश नाकारलेल्या डीननेच त्यांना शुभेच्छा दिल्या.

bidhan-chandra-roy-photo

प्रांतीय सेवा चिकित्सेच्या नोकरीत

             भारतात परत येऊन पुन्हा ते प्रांतीय सेवा चिकित्सेच्या नोकरीत लागले. एक चांगले चिकित्सक डॉक्टर म्हणून त्यांची कीर्ती सर्वदूर पसरली. या कार्यात ते मनापासून मानवतेची सेवा करीत होते. अचानक एकदा त्यांना सांगितले की, कलकत्ता विद्यापीठाच्या कारमाइकेल मेडिकल कॉलेजला (के. आर. जी. मेडिकल कॉलेज) तेव्हाच मान्यता मिळेल, जेव्हा डॉ.बिधन चंद्र रॉय तिथे प्राध्यापक पद स्वीकारतील.

          हे मेडिकल कॉलेज राष्ट्रीय विचारांच्या लोकांनी स्थापन केलेले होते. डॉक्टरांनी मागचा पुढचा काहीएक विचार न करता ताबडतोब सरकारी नोकरीचा राजीनामा दिला व इ. स. १९१९ मध्ये या नव्या कॉलेजात दाखल झाले. ते जीवनभर इथेच सेवेत राहिले.

कलकत्त्याचे मेयर

             त्या काळात स्वातंत्र्याच्या लढाईचा जोर वाढत होता. तेव्हा डॉ. बिधन चंद्र रॉय इ. स. १९२३ मध्ये काँग्रेसतर्फे कलकत्ता नगर (उत्तर) भागातून सर सुरेंद्रनाथ बानर्जी यांच्याविरुद्ध निवडणुकीला उभे राहिले आणि ३५०० वाढीव मतांनी विजयी झाले.

           १९३१-३२ मध्ये ते कलकत्त्याचे मेयर झाले. ते नेहमीच इंग्रज सरकारला कलकत्ता कॉर्पोरेशनच्या कारभारापासून दूर ठेवत असत. नगर सुधारण्याचा त्यांनी जास्तीतजास्त प्रयत्न केला आणि कॉर्पोरेशन सदस्यांना कायद्याने मिळालेले अधिकार सुरक्षित राखण्याची हिम्मत दिली.

बंगाल काँग्रेसचे अध्यक्ष

            देशबंधू दास यांच्या मृत्यूनंतर ते बंगालचे प्रतीक झाले. १९२६ मधल्या कलकत्ता काँग्रेस अधिवेशनाच्या वेळी स्वागत समितीचे डॉ. विधानचंद्र मंत्री होते. बंगालच्या सत्याग्रहाच्या आंदोलनाचे ते संचालक होते. त्यासाठी त्यांना ६ महिन्यांची कैद झाली होती. इ. स. १९३४ मध्ये बंगाल काँग्रेसचे ते अध्यक्ष होते.

बंगालचे मुख्यमंत्री

            बंगाल नेहमीच संकटांना तोंड देत होता. मुस्लीम लीगच्या जातीय दंगलीनंतर दोन दिवसांत दीड-दोन हजार मृत शरीरांचे अग्निसंस्कार तेथे करण्यात आले. देशाच्या फाळणीनंतर इ. स. १९४८ मध्ये ते बंगालचे मुख्यमंत्री झाले.

        त्यांच्या काळात बंगालच्या विकासाची अनेक कार्ये त्यांनी केली. दुर्गापूरचा लोखंड व इस्पातचा कारखाना, काच कारखाना, अॅसिडचा कारखाना, दामोदर घाटी प्रकल्प, मयूराक्षी जलाशय, गंगा बांध प्रकल्प, कलकत्ता महानगर दुग्ध वितरण योजना इ. कार्ये त्यांच्या यशस्वी काळाची साक्ष आहेत.

           मुख्यमंत्री असूनही आपला डॉक्टरी पेशा ते अत्यंत निष्ठेने करीत असत. या देशात सर्वांत पहिला मृत्युंजय औषधी बनविण्याचा कारखाना त्यांनी चालू केला. त्यांनी आपले निवासस्थानही देशसेवेला दान केले होते. कधी विश्रांती घेतली नाही. त्यांचा मंत्रच होता की, ‘मी त्याच दिवशी विश्रांती घेईन, ज्या दिवशी मृत्यू माझ्या दारी येईल.’

बिधन-चंद्र-रॉय-bidhan-chandra-roy-biography

'डी. एस. डी.'ची पदवी

              आयुष्याची सतत चाळीस वर्षे ते देशसेवा करत होते. अनेक हॉस्पिटल्सशी ते जोडले गेले होते. हे कार्य पाहून इ. स. १९४४ मध्ये कलकत्ता विद्यापीठात त्यांना ‘डी. एस. डी.’ची पदवी दिली.

बिधन चंद्र रॉय विचारधारा

           डॉ. बिधन चंद्र रॉय हे आयुष्यभर काँग्रेसवादी आणि विचारधारेने गांधीवादी राहिले. डॉ. रॉय 1925 मध्ये दार्जिलिंगमध्ये गांधीजींना भेटले तेव्हा ते दोघेही लगेच मित्र बनले. गांधीजींकडून त्यांना जे आध्यात्मिक मार्गदर्शन त्यांच्या पालकांकडून मिळाले होते. 1933 मध्ये पुण्यातील पर्णकुटी येथे गांधीजी उपोषण करत होते तेव्हा त्यांच्यासोबत डॉ. पुढे, 1943 मध्ये ‘भारत छोडो’ चळवळीत गांधीजींना तुरुंगात टाकल्यानंतर, त्यांनी पुण्यात 21 दिवस ‘त्यांच्या क्षमतेनुसार’ उपोषण केले आणि डॉ. राय यांना त्यांची काळजी घेण्यास सांगितले.

          पुढच्या वर्षी डॉ. राय गांधीजींचे जवळचे मित्र आणि वैयक्तिक वैद्य बनले पण त्यांनी कधीच आंधळेपणाने त्यांचे अनुसरण केले नाही. जेव्हा जेव्हा ते त्याच्या सिद्धांताशी किंवा तत्त्वज्ञानाशी असहमत असत तेव्हा तो त्याच्याशी वाद घालायचा. 1925 मध्ये राजकारणात प्रवेश केला आणि वयाच्या 42 व्या वर्षी बंगालच्या राजकीय मंचावर एक महत्त्वाची व्यक्ती बनली. सुरुवातीला त्यांनी कोणत्याही राजकीय चर्चेत भाग घेतला नाही. त्यांना शिक्षण आणि वैद्यकविषयक समस्यांमध्ये सर्वाधिक रस होता. त्यांनी हुगळीच्या प्रदूषणाची कारणे आणि भविष्यात ते रोखण्याचे मार्ग शोधण्यासाठी समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव दिला. 

           24 फेब्रुवारी 1926 रोजी त्यांनी विधानसभेत पहिले राजकीय भाषण केले. हळुहळू पण स्थिरपणे ते एक उत्कृष्ट आमदार आणि संसदपटू बनले. 1927 मध्ये देशबंधूंच्या निधनानंतर त्यांना पक्षाचे उपनेते बनवण्यात आले. त्यांची नेतृत्व क्षमता सिद्ध केल्यानंतर त्यांची महापौरपदी निवड होणार हे निश्चित असल्याने 1931 मध्ये त्यांची एकमताने निवड झाली. त्यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेने मोफत शिक्षण, मोफत वैद्यकीय उपचार, रस्ते व दिवाबत्तीची सुधारणा आणि पाणी वाटपाच्या सुविधा वाढविण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न केले. रुग्णालये आणि धर्मादाय दवाखान्यांना आर्थिक मदत देण्यासाठी नियम बनवण्याचे श्रेय त्यांना जाते. देशबंधूंच्या मानवतावादी तत्त्वज्ञानाला अनुसरून त्यांनी विशेष वैयक्तिक योगदानही दिले.

             डॉ. राय यांची 1928 मध्ये अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य म्हणून निवड झाली. विरोध आणि संघर्षापासून स्वत:ला दूर ठेवून त्यांनी आपल्या गांभीर्य, चातुर्य आणि पक्षनिष्ठेने सर्व नेत्यांना मनापासून प्रभावित केले. 1929 मध्ये बंगालमध्ये सविनय कायदेभंग चळवळ आयोजित केली. ऑक्टोबर 1934 मध्ये त्यांची बंगाल काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी निवड झाली. एप्रिल १९३९ मध्ये सुभाषबाबूंनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर डॉ. रॉय यांनी कार्यकारी समितीत सामील व्हावे अशी गांधीजींची इच्छा होती. मात्र अंतर्गत गटबाजीमुळे ते शक्य झाले नाही. दुसरे महायुद्ध सुरू झाले तेव्हा डॉ.राय यांचे काँग्रेसशी मतभेद होते. 

             त्यांनी स्वतः 1940-41 मध्ये कार्यकारिणीतून बाहेर राहण्याची विनंती केली. वास्तविक, राजकीय क्षेत्रात उतरण्याऐवजी त्यांना औषधोपचारासाठी वेळ घालवायचा होता. 18 जानेवारी 1948 रोजी गांधीजींचे दुसरे उपोषण संपले, तेव्हा त्यांनी बंगाल लेजिस्लेटिव्ह पार्टीचा निर्णय गांधीजींना कळविला आणि मंत्रिमंडळ स्थापनेबाबत संकोचही व्यक्त केला. गांधीजींनी असा सल्ला दिला की जर विधानसभेतील काँग्रेस सदस्यांना त्यांची गरज असेल तर ती स्वीकारणे त्यांचे कर्तव्य आहे. 

              पक्षाचा हस्तक्षेप नसेल तरच मी हे काम करेन, असे डॉ. राय यांनी ठणकावून सांगितले. मला पक्षाच्या सदस्यत्वाच्या आधारे नव्हे तर क्षमता आणि कौशल्याच्या आधारावर मंत्रिपदाची निवड करण्यास मोकळे असावे.” काँग्रेस विधीमंडळ पक्ष आणि काँग्रेस समितीने याला सहमती दिल्यावर त्यांनी मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारली. 23 जानेवारी 1948 रोजी राज्यपाल सी गोपालाचारी यांनी त्यांना पदाची शपथ दिली. 

              पद स्वीकारल्यानंतर, डोरई यांनी संकटे आणि विरोधकांना घाबरले नाही, तर ते स्थिर राहिले आणि धैर्याने सामोरे गेले. शांत आणि गंभीर राहून प्रत्येक संकटाला सामोरे जाण्याची जिद्द बाळगून त्यांनी अवघ्या तीन वर्षांत अराजकता नष्ट करण्यात यश मिळवले आणि आपल्या प्रशासनाची प्रतिष्ठा आणि सन्मानही अबाधित ठेवला.    

भारतरत्न

             इ. स. १९६१ मध्ये भारताच्या राष्ट्रपतींनी डॉ. बिधन चंद्र रॉय यांना ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी पुरस्कार अर्पण केला.

मृत्यू

          ८० वर्षांच्या आयुष्यानंतर १ जुलै १९६२ रोजी त्यांच्या जन्म दिवशीच मृत्यूने त्यांना अनंतात विलीन केले.

FAQ

डॉ.बिधन चंद्र रॉय यांचा जन्म कधी झाला ?

डॉ.बिधन चंद्र रॉय यांचा १ जुलै १८८२ रोजी पाटण्यातील बाँकीपूर गावामध्ये झाला.

डॉ.बिधन चंद्र रॉय यांचा मृत्यू  रोजीकधी झाला ? 

डॉ.बिधन चंद्र रॉय यांचा मृत्यू १ जुलै १९६२ रोजीकधी झाला ? 

डॉ.बिधन चंद्र रॉय यांना भारतरत्न कधी मिळाला ?

डॉ.बिधन चंद्र रॉय यांना भारतरत्न १९६१  कधी मिळाला.

डॉ.बिधन चंद्र रॉय बायकोचे नाव काय ?

डॉ.बिधन चंद्र रॉय बायकोचे नाव कल्याणी आहे .

बिधानचंद्र रॉय कोणत्या वर्षी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री झाले?

बिधानचंद्र रॉय देशाच्या फाळणीनंतर इ. स. १९४८ मध्ये ते बंगालचे मुख्यमंत्री झाले.

Leave a Comment