डॉ.मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या संपूर्ण माहिती Mokshagundam Visvesvaraya

डॉ.मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या

बालपण आणि शिक्षण

               डॉ. मोक्षगुण्डम विश्वेश्वरैया यांचा जन्म १५ सप्टेंबर १८६० रोजी म्हैसूरमधील कोलार जिल्ह्याच्या चिक्वल्लपूर नगराजवळील मुद्दनहल्ली नावाच्या एका लहानशा गावात एका गरीब ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांचे वडील श्रीनिवास शास्त्री एक उत्तम ज्योतिषी आणि वैद्य होते. धार्मिक वृत्तीचे होते. बालक विश्वेश्वरैया यांच्या खेळण्या-बागडण्याच्या वयात त्यांना खूपच कष्टाचा सामना करावा लागला.

Table of Contents

             डॉ.मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचे सुरुवातीचे शिक्षण गावातच झाले. त्यांच्या वयाच्या पंधराव्या वर्षी वडिलांचा मृत्यू झाला, तेव्हा आपल्या आईबरोबर ते मामाकडे बंगलोरला राहायला गेले. तेथे हायस्कूलचे शिक्षण पूर्ण करून सेंट्रल कॉलेजमध्ये अभ्यास सुरू केला. (स्वतः विश्वेश्वरैया खूप मेहनती आणि वेळेचे अगदी पक्के होते. स्वतःची गुजराण करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या शिकवण्याही घ्यायचे.

               कॉलेजचे प्राचार्य मिस्टर वॉट्स त्यांची बुद्धिमत्ता आणि गुणांवर खूश होते. ते त्यांना अनेक प्रकारची मदत करायचे. त्यांनीच विश्वेश्वरैयांना सोन्याची बटणेही (कफ लिंक्स) दिली होती. इ. स. १८८० मध्ये बी.एस.सी. ची परीक्षा विशेष श्रेणीने त्यांनी उत्तीर्ण केली.

           यानंतर मि. वॉट्स यांच्याच शिफारशीने पुण्याच्या सायन्स कॉलेजमधील इंजिनिअरिंग विभागात त्यांना प्रवेश मिळाला. हा तीन वर्षांचा कोर्स अडीच वर्षांतच प्रथम श्रेणीत विशेष गुणांनी उत्तीर्ण केल्यामुळे त्यांना ‘जेम्स वर्कले’ पुरस्कार मिळाला होता. 

mokshagundam visvesvaraya education

'साहाय्यक अभियंता'

              इ. स. १८८४ मध्ये मुंबईच्या लोकनिर्माण विभागात ‘साहाय्यक अभियंता’ पदावर ते नियुक्त झाले, ते केवळ वयाच्या तेवीसाव्या वर्षी. या ठिकाणी त्यांनी खूप मेहनतीने व अत्यंत हुशारीने काम केल्यामुळे इंग्रज इंजिनिअरनासुद्धा त्यांची योग्यता मान्य करावी लागली. पिण्याचे पाणी व सांडपाणी या दोन्ही योजनांविषयी ते प्रसिद्ध झाले.

आधुनिक भारताचे भगीरथ

                ‘मी वेळेवर काम करतो, नियमित व्यायाम करतो, हिंडतो-फिरतो, क्रोधापासून शेकडो योजने दूर राहतो. म्हातारपण जेव्हा मला भेटायला येते, तेव्हा स्वच्छ सांगतो की, आता घरी नाही, पुन्हा कधी तरी ये’ किंवा ‘कष्ट करा, काम करा. कष्ट केल्याशिवाय भाकरी खाण्याचा आम्हाला काय अधिकार आहे? मेहनत करून काम करण्यातच देशाचे हित आहे, सगळ्यांचे कल्याण आहे.

              आम्ही आळशी आहोत, म्हणून आमचा देश मागासलेला आहे. अमेरिका आणि जपानसारखे देश किती झपाट्याने पुढे निघून गेले, कारण तिथले लोक आमच्यापेक्षा जास्त मेहनती आहेत,’ अशा प्रेरणादायी जीवनोपयोगी मंत्रांनी जनतेच्या मनात कर्तव्यासंबंधी जागृती निर्माण करणारे डॉ. विश्वेश्वरैया आधुनिक भारताचे भगीरथ होते.

 Mokshagundam Visvesvaraya

mokshagundam-visvesvaraya-information-in-marathi-डॉ.-मोक्षगुंडम-विश्वेश्वरय्या-संपूर्ण-माहिती

mokshagundam visvesvaraya hd images

योजना आणि पाणीप्रश्न

         रेगिस्तानच्या कारणाने पाण्याचा दुष्काळ असणाऱ्या सिंध प्रांतातील सक्खर नामक शहरात पाणीप्रश्न सोडविण्यासाठी त्यांना इ. स. १८९३ मध्ये बोलाविले गेले, कारण सिंध त्या काळात मुंबई प्रांतातच एक भाग होता. हे ओव्हान स्वीकारून विश्वेश्वरैयांनी एक वर्षातच ‘सक्खर बराज’ आणि ‘वॉटर वर्क्स’ बनवून त्या मरुस्थळाचा स्वर्ग बनविला.

         त्यांच्या या कामाची स्तुती करताना तत्कालीन राज्यपाल म्हणाले होते की, ‘आमच्या देशातील योजना ज्या अभियंत्यांच्या हातून फलद्रूप होत आहेत, विश्वेश्वरैया हे त्यांच्यातील एक महान शिल्पकार आहेत.’

        त्यानंतर त्यांना सूरतला पाणीपुरवठ्याच्या योजनेचे काम पूर्ण करण्यासाठी पाठविले गेले व तेथून नंतर पुणे क्षेत्राच्या सिंचन विकासासाठी पाठविले. त्या वेळी ते सुपरिंटेंडिंग इंजिनिअर होते. पुण्यात पाणी सिंचनाची जी योजना कार्यान्वित होती, त्याद्वारे बरेचसे पाणी वाया जात होते. म्हणून विश्वश्वरैयांनी नवीन योजना बनवली.

      या योजनेद्वारे प्रत्येक शेतकऱ्याला दर दहा दिवसांनी पाणी मिळणार होते; पण सुरुवातीला शेतकऱ्यांच्या नेत्यांसह सर्वांनीच योजनेला विरोध केला. लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांना शेतकऱ्यांनी आपला नेता बनवले होते. जेव्हानवीन सिंचन योजना समजावली तेव्हा सर्वांचाच विरोध मावळून विश्वेश्वरैयांच्या या योजनेला दाद मिळाली.

डॉ.मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या संपूर्ण माहिती

'सुपरिंटेंडिंग इंजिनिअर'

                 पुणे व किरकी येथील पाणी योजना पूर्ण केल्यावर त्यांना मुंबईच्या सॅनिटरी इंजिनिअर पदावर नियुक्त केले गेले. एका भारतीयासाठी हे पद मोठ्या सन्मानाचे होते. सांडपाण्याबरोबरच मुंबई प्रांतातील अनेक लहान-मोठ्या नगरांत पाणी उपलब्ध करून देण्याचे दायित्वसुद्धा त्यांच्यावरच होते.

           पुण्याच्या जवळील खडकवासल्याच्या बंधाऱ्याचे ऑटोमॅटिक दरवाजे सर्वांत प्रथम यशस्वीरीत्या बनविण्याचे श्रेयही डॉ. विश्वेश्वरैया यांनाच आहे. इ. स. १९०८ मध्ये ते ‘सुपरिंटेंडिंग इंजिनिअर’ झाले. त्या काळात भारतीय अभियंत्यांसाठी तेच सर्वांत उच्च पद होते.

 Mokshagundam Visvesvaraya

उच्चतम अधिकाऱ्यांन कडून प्रशंसा

               त्या काळात अरबी समुद्रात इंग्रजांचा स्वतःचा एक उपनिवेश होता. ते एक चांगले बंदर होते व ब्रिटिश छावणीही होती. तेथे सांडपाण्याची योजना व पिण्याच्या पाण्याचा पुरवठा ही दोन्ही कामे विश्वेश्वरैयांकडे सोपवली. कामे खरोखरच खूप कठीण होती; पण त्यांनी ती अशाप्रकारे पार पाडली, की विदेशी सरकारी उच्चतम अधिकाऱ्यांनीसुद्धा त्यांची प्रशंसा केली.

              अदनहून परतल्यावर विश्वेश्वरैयांनी महाराष्ट्रातील विजापूर, कोल्हापूर इत्यादी अनेक शहरांत पाणी योजना राबविल्या. यामुळे त्यांचे नाव सर्वदूर पसरले होते. ब्रिटिश सरकार, देशातील नेतेमंडळी, उच्च अधिकारी हे सर्वच त्यांना सर्वश्रेष्ठ इंजिनिअर मानत होते. कामात झोकून देण्याची वृत्ती व निष्ठा या गुणांमुळे अनेक व्यक्तींना त्यांनी मागे टाकले होते.

.

सरकारी नोकरीवर पाणी सोडले

            सरकारी नोकरीत ते २५ वर्षे होते. त्यातला जास्त काळ पुण्यात होते. तेव्हा तेथील गोपाळकृष्ण गोखले, रानडे, लोकमान्य टिळक अशा श्रेष्ठतम भारतीय नेत्यांच्या सहवासामुळे त्यांना हे स्वच्छ दिसत होते की ‘काही झाले तरी इंग्रज सरकार त्यांना विभागाध्यक्ष पदापर्यंत देणार नाही. 

         उलट इंग्रज त्यांच्याविषयी ईर्ष्या बाळगून होते. या सगळ्यांचा विचार करून शेवटी त्यांनी सरकारी नोकरीवर पाणी सोडले. सगळ्यांना याचे आश्चर्य वाटले; पण आता तर त्यांच्यापुढे फार मोठे व्यापक क्षेत्र खुले होते.

डॉ.मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या संपूर्ण माहिती

हैदराबाद शहर

          सरकारी नोकरीतून सुटका करून घेतल्यावर जेव्हा ते इटलीच्या मिलान नगरात होते, तेव्हा त्यांना तिथे हैदराबादच्या निजामाने बोलावणे धाडले. शहरांमधूनवाहणाऱ्या मुसी नदीला प्रचंड पूर आल्यामुळे दोन हजारांहून अधिक माणसे व घरे वाहून गेली होती.

        ही आपत्ती कायमची दूर करण्यासाठी विश्वेश्वरैयांनी अत्यंत कुशलतेने सहा-सात महिन्यांतच उत्तम योजना बनविली आणि हैदराबाद शहरासाठी पाण्याची व्यवस्था मार्गी लावली.

 Mokshagundam Visvesvaraya

डॉ. मोक्षगुण्डम् विश्वेश्वरैयांचे जीवन म्हणजे

           डॉ. मोक्षगुण्डम् विश्वेश्वरैयांनी किती तरी बंधारे बांधले, सिंचन योजना राबविल्या, अनेक नगरांत पिण्याचे स्वच्छ पाणी पुरविले, नद्यांच्या रौद्र रूपाला मयदित आणले, कारखाने उघडले व त्यांच्या योजना बनविल्या, शिक्षण प्रसारात योगदान दिले. या सर्वांचा जिवंत आरसा म्हणजे विश्वेश्वरैयांचे जीवन होय.

डॉ. मोक्षगुण्डम विश्वेश्वरैया चीफ इंजिनिअर

         म्हैसूर ही विश्वेश्वरैयांची जन्मभूमी. तिथल्या महाराज कृष्णराजांनी इ. स. १९१२ मध्ये यांना बोलावून आपल्या रियासतीमध्ये चीफ इंजिनिअर बनविले. त्या वेळी ते आपल्या आईचा आशीर्वाद घ्यायला गेले. त्यावेळी त्यांनी आईला सांगितले की, ‘जोपर्यंत मी इथे दिवाण म्हणून काम करतो आहे,

       तोपर्यंत कोणाचीही शिफारस माझ्याकडे करू नको.’ आणि खरोखरच त्यांनी आपल्या लांबच्या नात्यातीलसुद्धा कोणालाही नोकरीवर ठेवले नाही. नऊ वर्षे दिवाण पदावर राहून त्यांनी म्हैसूरचा कायापालट करून टाकला. सर्वांत प्रथम रेल्वे मार्ग लांब व प्रशस्त केला.

कृष्णराज सागर योजना

        ‘कृष्णराज सागर योजना‘ बनविली, ज्याचा प्रारंभिक खर्च अडीच-तीन कोटींचा होता. आजसुद्धा या बंधाऱ्याचे महत्त्व आहे.

      याच्याबरोबर बांधलेल्या पॉवर हाऊस व इतर कामांमुळे कोलार सोन्याची खाण बंगलोर, म्हैसूर येथील लहान मोठी गावे, नगरे, तसेचकारखाने वगैरेंना वीजपुरवठा होऊ शकला.

 Mokshagundam Visvesvaraya

शिक्षणाशिवाय प्रगती नाही'

       ‘शिक्षणाशिवाय प्रगती नाही’ हे विश्वेश्वरैयांचे मत होते. त्यांना म्हैसूरला एक विद्यापीठ स्थापन करायचे होते; पण मद्रास सरकार त्यामध्ये खो घालत होते. म्हैसूरच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी एक तर मद्रासला, नाही तर मुंबईला जावे लागे.

        डॉ.मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांनी यासाठी प्रचंड प्रयत्न केले. त्या वेळचे व्हॉइसरॉय व म्हैसूरच्या ब्रिटिश रेसिडेंटशी त्यांचे चांगले संबंध होते. त्यामुळे म्हैसूर विद्यापीठ अतिशय यशस्वीरीत्या आकाराला आले. त्या काळातल्या देशी रियासतींमधील म्हैसूर हेच पहिले राज्य होते, की ज्याचे स्वतःचे विद्यापीठ होते व देशात त्याचा सहावा क्रमांक होता.

डॉ.मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या संपूर्ण माहिती

मॅनेजिंग डायरेक्टर

            डॉ. डॉ.मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या एक असे व्यासंगी विद्वान होते, ज्यांना इंजिनिअरिंगबरोबरच राजनीती, शिक्षण आणि औद्योगिक क्षेत्रामध्येसुद्धा तितकेच गम्य होते. त्यांनी बांधलेल्या कृष्णराज सागर बंधाऱ्यामुळे सिंचन प्रकल्प मार्गी लागला होता.

           शेतकऱ्यांना शेतातून भरपूर उत्पादन मिळू लागले होते. उसाचे उत्पादन वाढल्यामुळे साखरही मिळू लागली होती; पण त्यांचा विश्वास होता, की जर राज्यात मोठे उद्योगधंदे चालू झाले तरच राज्याचा खरा विकास होईल. म्हणून त्यांनी भद्रावती इस्पात कारखान्याची योजना आखली. मध्ये काही काळ ही योजना डबघाईला आली.

      नुकसानीत गेल्यामुळे कारखाना चालवणे अशक्यप्राय होऊन बसले; पण जेव्हा त्यांना पुन्हा मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून नेमले, तेव्हा हा तोट्यात चालणारा कारखाना लाभात जाऊन परदेशात निर्यात करू लागला.

डॉ.मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या केलेली कामे

             म्हैसूरमध्ये त्यांनी बंधारा योजना, रेल्वे, विद्यापीठ यांच्याबरोबरच चंदनाचे तेल, साबण यांचा उद्योग, इतर लहान व ग्रामीण उद्योगधंदे यांना कर्ज देण्याची व्यवस्था केली. नवीन घरगुती उद्योगधंदे, कुटिरोद्योग, छापखाने, हॉटेल अशा उद्योगांच्या विकासाचा प्रबंध केला.

             इ. स. १९१८ मध्ये त्यांनी म्हैसूरच्या दिवाण पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर ते विदेश भ्रमणाला गेले. इटलीतील मिलान नगराच्या सांडपाणी व पाण्याची योजना स्वतः तिथल्या चीफ इंजिनिअरबरोबर फिरून त्यांनी पाहिली.

         त्यांना विश्वास होता, की भारतीय अधिकारीही मोठ्यात मोठी कामे करू शकतात. अदनमध्ये त्यांनी केलेले काम असेच यशस्वी होते.

डॉ.मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या पुस्तके

          ‘रिकन्स्ट्रक्टिंग इंडिया‘ व ‘प्लांड इकॉनॉमी फॉर इंडिया’ या त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांवरून समजते, की त्यांच्या हृदयात एका संपूर्ण प्रगतिशील भारताचीच प्रतिमा कायमची वास करीत होती.

नावप्रकाशन वर्ष (इ.स.)
Village Industries Handbook Vol. I & II१९५७-५८
Reconstructing of Postwar India१९४४
Building of Modern India१९५६
Automobile Factory in Bombay (Vols.1 to 4)१९३३,३६,३८,४०

mokshagundam visvesvaraya books

'आधुनिक म्हैसूरचे निर्माता'

             डॉ. विश्वेश्वरैयांना ‘आधुनिक म्हैसूरचे निर्माता’ म्हटले जात असे. म्हैसूरपासून १२ मैल दूर असलेल्या कावेरी नदीवर कृष्णराज सागर धरण त्यांनी बांधले, जे देशातले पहिले धरण होते. म्हणजेच ते भारताचे आधुनिक भगीरथ ठरले.

       त्याच काळात ते टाटांच्या जमशेदपूरच्या कारखान्यात डायरेक्टर पदावर होते

mokshagundam visvesvaraya information in marathi

चेअरमन व सदस्य


              इ. स. १९२१ नंतर अनेक समित्यांचे विश्वेश्वरैया चेअरमन व सदस्य होते. या समित्यांच्या बैठका ब्रिटिश संसद भवनातही होत असत.

'डॉक्टर' व ' डॉक्टर ऑफ लॉ' आणि 'सर' पदवी

             डॉ. विश्वेश्वरैयांचे  आजपर्यंत केलेले कार्य बघून इ. स. १९३० मध्ये मुंबई विद्यापीठाने ‘डॉक्टर’, कलकत्ता विद्यापीठाने ‘डॉक्टर ऑफ लॉ’ आणि इतर विद्यापीठांनीही आपली आपली मानद पदवी देऊन त्यांना गौरविले.

           इंग्रज सरकारनेही विश्वेश्वरैयांना नाइटहुड ‘सर’ किताब देऊन गौरविले.

'भारतरत्न'

        भारताच्या आधुनिक युगाचा पाया घालणारे हे विश्वकर्मा, कोलारच्या स्वर्णिम घाटीचे रत्न, भारत सरकारने यांची बूज राखली. जाण ठेवून यांना १९५५ मध्ये भारताचा सर्वोच्च नागरी किताब ‘भारतरत्न’ देऊन भूषविले.

       त्यांचे सर्वच आयुष्य हे निःस्वार्थ सेवेचे ज्वलंत उदाहरण आहे. विश्वेश्वरैयांनी न जाणो डझनावारी धरणे, जलाशय, बंधारे बांधले, अनेक कारखाने, विद्यापीठे, शाळा, महाविद्यालये उभारली; पण स्वतःसाठी मात्र एक खणी घरही उभारले नाही, की एक विटेचे बांधकाम केले नाही.

mokshagundam visvesv a awards

डॉ. मोक्षगुण्डम विश्वेश्वरैया परलोकवासी झाले.

               त्यांच्या हस्ते केली गेलेली कार्ये नेहमीच त्यांची यशोगाथा गातील. आधुनिक युग त्यांचे ऋणी आहे. उन्नतीच्या मार्गावर चालणाऱ्या प्रत्येक भारतीयाला देशाच्या औद्योगिक विकासासाठी डॉ. विश्वेश्वरैयांप्रमाणे निःस्वार्थी, अथक परिश्रमांची आवश्यकता आहे, जे त्यांनी वयाची शंभरी पूर्ण होईपर्यंत केले.

            सप्टेंबर १९६१ मध्ये देशभर त्यांची जन्मशताब्दी मोठ्या धूमधडाक्याने साजरी केली गेली. विकसनशील भारताच्या निर्माण कार्यामधील हे भीष्म पितामह डॉ. मोक्षगुण्डम विश्वेश्वरैया १४ एप्रिल १९६२ रोजी आपली इहलीला संपवून परलोकवासी झाले.

mokshagundam visvesvaraya information in marathi

FAQ

 विश्वेश्वरैया  यांना  १९५५ मध्ये भारताचा सर्वोच्च नागरी किताब ‘भारतरत्न’ देऊन भूषविले.

       डॉ. विश्वेश्वरैयांचे  आजपर्यंत केलेले कार्य बघून इ. स. १९३० मध्ये मुंबई विद्यापीठाने ‘डॉक्टर’, कलकत्ता विद्यापीठाने ‘डॉक्टर ऑफ लॉ’ आणि इतर विद्यापीठांनीही आपली आपली मानद पदवी देऊन त्यांना गौरविले.

 इंग्रज सरकारनेही विश्वेश्वरैयांना नाइटहुड ‘सर’ किताब देऊन गौरविले.

    डॉ. मोक्षगुण्डम विश्वेश्वरैया यांचा जन्म १५ सप्टेंबर १८६० रोजी म्हैसूरमधील कोलार जिल्ह्याच्या चिक्वल्लपूर नगराजवळील मुद्दनहल्ली नावाच्या एका लहानशा गावात झाला .

 डॉ. विश्वेश्वरैयांना ‘आधुनिक म्हैसूरचे निर्माता’ म्हटले जात असे. म्हैसूरपासून १२ मैल दूर असलेल्या कावेरी नदीवर कृष्णराज सागर धरण त्यांनी बांधले, जे देशातले पहिले धरण होते. म्हणजेच ते भारताचे आधुनिक भगीरथ ठरले.

   म्हैसूरमध्ये त्यांनी बंधारा योजना, रेल्वे, विद्यापीठ यांच्याबरोबरच चंदनाचे तेल, साबण यांचा उद्योग, इतर लहान व ग्रामीण उद्योगधंदे यांना कर्ज देण्याची व्यवस्था केली. नवीन घरगुती उद्योगधंदे, कुटिरोद्योग, छापखाने, हॉटेल अशा उद्योगांच्या विकासाचा प्रबंध केला.

डॉ. मोक्षगुण्डम विश्वेश्वरैया शिक्षण  बी.एस.सी. ची आणि पुण्याच्या सायन्स कॉलेजमधील इंजिनिअरिंग विभागात त्यांना प्रवेश मिळाला. हा तीन वर्षांचा कोर्स अडीच वर्षांतच प्रथम श्रेणीत विशेष गुणांनी उत्तीर्ण केल्यामुळे त्यांना ‘जेम्स वर्कले’ पुरस्कार मिळाला होता. 

सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त 15 सप्टेंबर 1968 रोजी भारतात प्रथमच अभियंता दिन साजरा केला जातो .

जागतिक अभियांत्रिकी दिवस 15 सप्टेंबर ला साजरा केला जातो.

बंधारा योजना, रेल्वे, विद्यापीठ यांच्याबरोबरच चंदनाचे तेल, साबण यांचा उद्योग, इतर लहान व ग्रामीण उद्योगधंदे यांना कर्ज देण्याची व्यवस्था केली. नवीन घरगुती उद्योगधंदे, कुटिरोद्योग, छापखाने, हॉटेल अशा उद्योगांच्या विकासाचा प्रबंध केला त्यांना विश्वास होता, की भारतीय अधिकारीही मोठ्यात मोठी कामे करू शकतात. अदनमध्ये त्यांनी केलेले काम असेच यशस्वी होते.

Leave a Comment