विनोबा भावे
Table of Contents
Toggleबालपण आणि शिक्षण
वडील श्री. नरहरी शंभूराव भावे व आई सौ. रुक्मिणी याच्या पोटी एका धर्मनिष्ठ चित्पावन ब्राह्मण कुटुंबात आचार्य विनोबा भावे यांचा जन्म, दि. ११ सप्टेंबर १८९५ रोजी महाराष्ट्रातील पेण जिल्ह्यातील घगोडे गावात झाला वडील बडोदा राज्यात कपडा-तंत्रज्ञ होते. विनोबाचे पाळण्यातील नाव विनायक; पण विन्या, विनय, आचार्य विनोबा भावे, सत विनोबा भावे व ‘बाबा’ हीसुद्धा त्याची प्रचलित नावे होती. तीन भाऊ व एक बहीण होती. आजोबा शंभूराव उदारमतवादी असून स्पृश्यास्पृश्यांना न मानणारे होते. ते शिवभक्त होते. हेच विचार सुरुवातीपासून विनोबामध्ये होते.
विनोबांची आई अतिशय धार्मिक असून नेहमी संतवाणी गुणगुणत असे. तिच्याच सांगण्यावरून विनोबांनी इ. स. १९३०-३१ मध्ये संस्कृत गीतेचा मराठीमध्ये पद्यानुवाद केला. तो ‘गीताई गीता माता’ नावाने प्रसिद्ध आहे. त्यांच्या आईचे निधन १९१८ मध्ये झाले.
विनोबांचे प्राथमिक शिक्षण गावातच झाले. इ. स. १९१३ मध्ये बडिलांजवळ बडोद्याला राहून त्यांनी मॅट्रिक पास केले व इंटरमीडिएटला प्रवेश घेतला. त्यांना अत्यंत कुशाग्र बुद्धी होती, जबरदस्त स्मरणशक्ती होती. बडोदा ग्रंथालयात जाऊन धार्मिक, साहित्यिक, ऐतिहासिक पुस्तके वाचण्याचा त्यांचा नित्यनेम होता; पण या अभ्यासाने त्याचे समाधान होईना. त्यांनी सगळी प्रमाणपत्रे जाळून टाकली आणि काशीला जाऊन संस्कृतच्या अभ्यासाला लागले.
'पवनार आश्रम'
दि. ७ जून १९१६ रोजी गांधी व विनोबांची भेट झाली. इ. स. १९२० च्या शेवटी जमनालाल बजाज यांच्या उपस्थितीत नागपूरला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन झाले. त्या वेळी साबरमती आश्रमाप्रमाणे वर्धा येथे आश्रमाच्या स्थापनेची योजना तयार केली. ६ एप्रिल १९२१ पासून विनोबा वर्धा आश्रमाचे संचालन करू लागले. नागपूरच्या झेंडा सत्याग्रहात भाग घेतल्यामुळे विनोबांना १७ जून १९२३ रोजी १२ महिन्यांसाठी कारावास झाला.
वर्ध्याच्या आश्रमात ११ वर्ष, ८ महिने व १९ दिवस राहिल्यानंतर ते इ. स. १९३२ मध्ये वर्ष्यापासून २ मैल दूर असलेल्या हरिजनांच्या नलवाडीला गेले. तिथे ते स्वतः कातलेल्या सुतावर मिळणाऱ्या पैशाने पोट भरीत होते. इ. स. १९३८ मध्ये आजारी झाल्यामुळे, पवनार नदी तटावर असलेल्या पवनार गावातील टेकाडावर राहू लागले. तीच कुटी आज ‘पवनार आश्रम’ नावाने प्रसिद्ध आहे.
जेल
१७ ऑक्टोबर १९४० मध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या संदर्भातील व्यक्तिगत सत्याग्रहामुळे ३ महिन्यांचा कारावास झाला. नंतर ६ महिने व मग एक वर्षासाठी कैद झाली. इ. स. १९४२ च्या ‘चले जाव’ चळवळीमध्ये ९ ऑगस्ट १९४२ रोजी विनोबांना तीन वर्षांची कैद झाली. कैदेतून सुटका झाल्यावर त्यांनी स्वतःला राजकारणापासून बाजूला करून पवनार आश्रमात ग्राम सेवेला वाहून घेतले.
'कचन मुक्ती' व 'भूदान' चळवळ
देशाच्या फाळणीनंतर लोकांमध्ये आर्थिक समानता आणण्यासाठी विनोबांनी ‘कचन मुक्ती’ व ‘भूदान’ चळवळ सुरू केली. तेलंगणामध्ये एका श्रीमत शेतकऱ्याने सर्वप्रथम आपली १०० एकर जमीन दान केली. तिथे ते ५१ दिवस राहिले. त्या काळात १२२०० एकर जमीन विनोबांना दान रूपात भेट म्हणून मिळाली. ती सर्व जमीन त्यांनी भूमिहीनांना दान केली.
४० करोड एकर भूमी
याच भूदान यज्ञासाठी विनोबा २७ महिने बिहारमध्ये राहिले. तिथे लोकनायक जयप्रकाश नारायण यांची त्यांना खूप मदत झाली. या भूदान यज्ञात विनोबांना मार्च १९५६ पर्यंत ४० करोड एकर पेक्षा जास्त भूमी मिळाली. यासाठी चाळीस हजार मैलांची पदयात्रा त्यांनी केली. जवळजवळ २५० लाख भारतवासींची भेट त्यांनी घेतली भारतभर विनोबांची भूदान चळवळ खूपच फोफावली व प्रसिद्ध झाली.
विनोबा भावे बहिरेपण आले
या पदयात्रेच्या काळात देशातल्या परंपरावादी पाखंडी लोकांचा त्रासही त्यांना सहन करावा लागला. बिहारच्या वैद्यनाथ धाम इथे हा कटू अनुभव त्यांना आला. तिथे त्यांच्यावर लाठीहल्ला झाला. त्यात जखमी होऊन विनोबांना बहिरेपण आले. ही दुर्घटना दि. १९ सप्टेंबर १९५३ ची.
हिंसेवर अहिंसेने मिळविलेला विजय
दि. २२ मे १९६० रोजी ‘शस्त्रापासून मुक्ती’ हा एक अनोखा समारंभ त्यांनी योजला, चंबळच्या खोऱ्यातील २२ डाकू सरदारांनी आत्मसमर्पण करून आपल्या दस्यू वृत्तीचा त्याग केला. त्यांनी दरोडेखोरी सोडली. सगळ्या विश्वाला आश्चर्यचकित करणारी ही घटना होती. हा हिंसेवर अहिंसेने मिळविलेला विजय होता. विनोबांच्या आयुष्यातील ही जीत होती.
विनोबा भावे यांनी स्थापन केलेला आश्रम
विनोबाजींनी पदयात्रेच्या वेळी बोधगया ‘समन्वय आश्रम’, पठाणकोट ‘प्रस्थान आश्रम’, इंदूर ‘विसर्जन आश्रम’, बंगलोर ‘विश्व नीडम आश्रम’, आसाम ‘मैत्री आश्रम’ अशा वेगवेगळ्या भागांत अनेक आश्रमांची स्थापना केली. मृत्यूपूर्वी काही वर्षे आधी विनोबांनी जैन धर्मग्रंथांचा अभ्यास करून, त्यांतील गर्भितार्थ ‘समण सुत्तम’ नावाच्या ग्रंथात एकत्र करून लिहिला. आपल्या कारावासाच्या जीवनात विनोबांनी दक्षिण भारतातील भाषा व देशातील सर्व भाषांच्या लिप्यांचा अभ्यास केला आणि त्या नागरी लिपीमध्ये लिहिण्याचा सल्ला दिला. आपल्या देशाच्या विकासासाठी सर्वोदय, भूदान, ग्रामदान, जीवनदान इ. नवीन प्रेरणादायक प्रवृत्तींचे आजीवन संचालन आचार्य विनोबाजी करत राहिले.
ग्रामदान व जीवनदान आंदोलन
सर्वोदयाची प्रथम यात्रा ३१५ मैलांची केली गेली. ७ एप्रिल १९५१ ला आंध्र प्रदेशात सर्वोदय संमेलन झाले. त्याचबरोबर भूदान चळवळीचाही उदद्य झाला तेलंगणमध्ये. पं. नेहरूंना ‘सर्वोदय’ शब्द बदलून हवा होता; पण विनोबांना ते अमान्य होते. जानेवारी १९५९ ला राजस्थानात आल्यावर फेब्रुवारीच्या अखेरीस अजमेरला सर्वोदयचे अकरावे संमेलन विनोबांनी घेतले. त्या वेळी ‘जय जगत्’ ही नवी आरोळी विनोबांनी दिली. सर्वोदय आंदोलनातूच ग्रामदान व जीवनदान आंदोलन उभे राहिले.
मॅगसेसे पुरस्काराने
इ. स. १९५८ मध्ये या महान क्रांतिकारी अहिंसात्मक सामाजिक नेतृत्वासाठी आचार्य विनोबा भावेंना मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित केले.कैदेत असताना गीतेवरची विनोबांची प्रवचने हिंदी, इंग्रजी व अन्य चीस भारतीय भाषांमध्ये प्रकाशित झाली आहेत.
मृत्यू
भारताच्या स्वातंत्र्यानंतर, गांधींच्या हत्येनंतर आचार्य विनोबांचा उदय संतरूपी सुधारक नेत्याच्या स्वरूपात झाला. देशातील मोठमोठे नेता, पंतप्रधान वेळोवेळी आध्यात्मिक, सामाजिक व राजनैतिक विचारविमर्ष करण्यासाठी विनोबांकडे येत असत. पण आता विनोबा मात्र स्वतःला अलिप्त मानायला लागले होते. म्हणून त्यांनी खाणे-पिणे सोडून महानिर्वाणाची तयारी केली. शेवटी दि. १५ नोव्हेंबर १९८२ ला या महान आधुनिक संताची प्राणज्योत अनंतात विलीन झाली.
'भारतरत्न'
भारत सरकारला त्यांच्या मृत्यूचा राष्ट्रीय शोक मानायचा होता. पण विनोबाजींनी आपल्या आयुष्यात स्वतःला कधीच नेता किंवा कोणी अद्वितीय व्यक्ती मानले नव्हते. म्हणून पवनार आश्रमातील लोकांनी विनोबांच्या अंतिम इच्छेनुसार कोणताही शोक मानायला परवानगी नाकारली. विनोबांना सरकारने ‘भारतरत्न’ पुरस्कार देऊ केला असता तर त्यांनी तो कधीच स्वीकारला नसता. म्हणून इ. स. १९८३ च्या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी भारत सरकारने आचार्य विनोबा भावे यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ हा सन्माननीय पुरस्कार बहाल केला.
विनोबा भावे यांचे शाळेतील विद्यार्थ्यांसाठी भाषण
भूदाननेते आणि धार्मिक तत्वज्ञानाचे मोठे उपासक म्हणून भावे याचे नांव सर्वांना परिचित आहेत. त्यांचे ८७ वर्षांचे प्रदीर्घ जीवन म्हणजे एक खडतर तपस्या आहे. त्यांचे संपूर्ण नाव विनायक नरहर भावे. पवित्र अशा ज्ञानसंपन्न घराण्यात विनोबाजींचा जन्म ११ सप्टेंबर १९८५ साली झाला. पित्याचे नांव नरहरपंत तर मातोश्रींचे नाव रुक्मिणीबाई विनोबाजींवर त्यांच्या आजोबांनी व आईने केलेले बालपणीचे संस्कार फार महत्वाचे ठरले. पुढे ते मॅट्रिक झाले.
पुढे इंटरपर्यंत शिक्षण झाल्यावर काही दिवस पुण्याला त्यांनी शिक्षकाची नोकरी पत्कारली. लहानपणी त्यांच्या शाळेतील एका शिक्षकाला मुलांना छडीने मारण्याची सवय होती. त्यासाठी शिक्षकांनी चांगली छडी करुन शाळा सुटल्यावर कुलुपबंद कपाटात ठेवली. दिवसातून एकदा तरी एखाद्यातरी मुलाला ते छडीने ठोकायचे. विनोबाजींना हे वर्तन अजिबात आवडायचे नाही. त्यासाठी त्यांनी कपाटाची किल्ली मिळविल आणि छडी फेकून दिी. असा पाच-पाच वेळ प्रकार घडला.
विनेबाजींचा खोकडरपणा शिक्षकांच्य लक्षात आल्यावर ५०० बैठका काढण्याची शिक्षा शिक्षकांनी विनायकाला दिली. १२५ बैठका काढल्यावर शिक्षक थांब म्हणाले. विनायक म्हणाला, १२३ बैठका काढून झाल्या. पाचशे म्हणजे शंभर अधिक पाच या हिशोबाने १८ जास्तच झाल्या.
बडोद्याला विनोबा भावे यांचे शिक्षण झाले. मोरोपंतांच्या केकावली व आर्याभारता तील शेकडो ओव्या रिकाम्या वेळात त्यांनी पाठ केल्या इ.स. १९०५ साली त्यांनी बडोद्यामध्ये विद्यार्थी मंडळाचीस्थापना केली. १९०८ साली बडोद्यामध्ये शिक्षा झाल्यावर त्यांनी खाण्यापित्यात साखर वर्ज्य केली.
ब्रह्मजिज्ञासा, ज्ञानाची तहान व मातृभूमीसाठी काहीतरी करण्याची त्यांची प्रबल इच्छाशक्ती त्यांना बेचैन करीत होती. त्यांनी बडोदा सोडले व ते काशीला जाऊन राहिले. त्यानंतर त्यांचा महात्मा गांधींशी परिचय झाला. सेवा, निष्ठा, व श्रध्दा यामुळे ते गांधीजींचे पट्टशिष्य बनले.
बहुविध सामाजिक व आध्यात्मिक कार्य : विनोबाजींच्या काळात स्पृश्य – अस्पृश्य हा भेदभाव होता. तो दूर करण्यासाठी हरिजन – उध्दाराचे त्यांनी मोठे कार्य करुन दाखविले साफसफाई, ग्रामोद्योग, प्रौढशिक्षण, हरिजनसेवा, सर्वधर्मसमभाव, स्वाध्याय प्रवचने इत्यादीव्दारा विनोबाजींनी लोकांमध्ये सामंजस्य निर्माण केले.
वर्धा येथील लक्ष्मीनारायण मंदिर त्यांच्या प्रयत्नांमुळे हरिजनांना खुले करण्यात आले. गांधीजींच्या हृदय परिवर्तनाचा मार्ग त्यांनी स्वीकारला. १९२१ ते १९५१ हा तीस वर्षांचा कालखंड विनोबाजींच्या आयुष्यातील महत्वाचा कालखंड होता. या काळात त्यांन निर्माण केलेल्या योजनांचा संपूर्ण देशावर परिणाम झाला होता.
सत्याग्रहामुळे त्यांना अनेक वेळा तुरुंगात जाण्याचा प्रसंग आला. पण ते घाबरले नाहीत. तुरुंगात त्यांना खुप छळ झाला. धुळ्याच्या तुरुंगात त्यांनी गीता- प्रवचने दिली. ते पुस्तकरूपाने प्रसिध्द झाले आणि २२ भाषांमध्ये त्यांचा अनुवाद झाला. पवनार ही विनोबाजींची कर्मभूमी होती. १२ सप्टेंबर १९५२ रोजी त्यांनी भूदान चळवळीसाठी संपत्तीदानाची मागणी केली. स्त्री शिक्षणावर त्यांचे विचार मौलिक स्वरुपाचे आहेत, स्त्रियांनी केवळ सुशिक्षितपणे शिकू नये, तर ज्यायोगे स्त्री ही स्वावलंबी बनेल, असे शिक्षण तिने घ्यावे.
स्त्रियांनी सरस्वतीसारखे ज्ञानात अग्रेसर व्हावे. ज्ञानाबरोबर त्यांनी भक्तीही केली पाहिजे. अध्यात्म – विचारातही स्त्रिया प्रवीण व्हाव्यात. विनोबाजींनी सर्वोदय ही कल्पना राबविली. सर्वोदय म्हणजे सर्वांचा उदय- सर्वोदय तत्वज्ञानाचा एकूण विचार हा समन्वयाचा आहे. त्यांच्या मते, मी हिंदू, मी मुस्लिम, मी खिस्त ही भावना ऐक्यसाधक नाही. तर आपण सर्व मानव आहोत ही भावना निर्माण झाली पाहिजे. त्यांचा सर्वोदयाचा विचार सामाजिक होता.
विनोबाजींचे विज्ञानाबद्दलचे विचारही महत्वाचे ठरले. त्यांच्या मते, विज्ञानाचे आणि हिंसेचे सख्य होता कामा नये. विज्ञानाची शक्ती – निती- निरपेक्ष आहे. यापुढे जगात विज्ञान आणि अध्यात्म राहील.
विनोबाजींनी बारा वर्षे, तेरा महिने संपूर्ण देशभर पदयात्रा केल ५० हजार एकरांचे भूदान घडवून आणले. या काळात त्यांनी १२ हजार व्याख्याने दिली आणि वीस ते बावीस भाषांचा अभ्यास केला.
गीताई, गीता- प्रवचने, भूदानगंगा, मधुकर, विचारपोथी ह्या त्यांच्या सर्व ग्रंथांना अफाट लोकप्रियता मिळाली. अनेक अभंगांवर, संतांच्या विचारांवर त्यांनी पुस्तके लिहिली. विनोबा हे फार मोठे राष्ट्रसंत होते.
आज एकविसाव्या शतकात, केवळ भारतालच नव्हेतर संपूर्ण जगाला विनोबाजींचे विचार सतत चांगल्या विचारांची प्रेरणा देतात आणि जीवन खऱ्या अर्थाने समृध्द करण्याचा मार्ग दाखवितात.
२५ डिसेंबर १९७६ पासून ते सर्व क्षेत्रांतून मुक्त झाले. त्यांनी प्रायोपवेशन घेतले. १५ डिसेंबर १९८२ ला त्यांनी शेवटचा श्वास घेतला आणि शेवटी एक संदेश दिला.
जय जगत् जग जगत् जय जगत् पुकारे जा । सबके हितके वास्ते अपना सुख बिसराये जा ।
FAQ
विनोबा भावे यांचा जन्म कधी झाला ?
विनोबा भावे यांचा जन्म दि. ११ सप्टेंबर १८९५ रोजी झाला
विनोबा भावे यांचा मृत्यू कधी झाला ?
विनोबा भावे यांचा मृत्यू दि. १५ नोव्हेंबर १९८२ रोजी झाला
विनोबा भावे यांचे पूर्ण नाव काय?
विनोबा भावे यांचे पूर्ण नाव विनायक नरहर भावे आहे
भूदान चळवळ कोणी सुरू केली?
भूदान चळवळ विनोबा भावे यांनी सुरू केली .
आचार्य विनोबा भावे यांच्या आश्रमाचे नाव काय ?
आचार्य विनोबा भावे यांनी ‘पवनार आश्रम ,‘समन्वय आश्रम’, पठाणकोट ‘प्रस्थान आश्रम’, इंदूर ‘विसर्जन आश्रम’, बंगलोर ‘विश्व नीडम आश्रम’, आसाम ‘मैत्री आश्रम’ अशा वेगवेगळ्या भागांत अनेक आश्रमांची स्थापना केली.
विनोबांविषयीची माहीती जास्तीत-जास्त लोकांपर्यंत पोहोचली पाहीजे.देशत्याना विसरत चालला की काय? अशी आजची परिस्थिती आहे. त्यासाठी राज्यसरकारने पूढाकार घेऊन त्यांचे जीवन चरीत्र व कार्य, गोष्टी च्या रूपात प्रसारीत करावे असे वाटते.
माझा पण हाच प्रयास चालला आहे .