लता मंगेशकर
Table of Contents
Toggleलता मंगेशकर बालपण
स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा जन्म दि. २८ सप्टेंबर १९२९ रोजी गोव्यामधील मंगेशी येथे झाला. वडिलांचे नाव दीनानाथ हर्डीकर, आई शेवंती (सुधामती). मूळचे मंगेशीचे रहिवासी. म्हणून हर्डीकरऐवजी मंगेशकर आडनाव घेतले. लताजींचे मूळ पाळण्यातले नाव ‘हेमा’ होते. पण संगीत नाटकाच्या प्रेमामुळे त्यांनी ‘हेमा’ त्यागून ‘लता’ हे नाव स्वीकारले.
जागतिक प्रसिद्धीच्या अनेक मान्यवरांनी त्यांच्याविषयी विशेष मत व्यक्त केले आहे. सुनील गावस्कर, अमिताभ बच्चन, उस्ताद अजमल अली खाँ, पंडित भीमसेन जोशी, ऋषीकेश मुखर्जी इ.
लहानपणापासूनच लताजी वडील दीनानाथांबरोबर संगीताचा अभ्यास करू लागली. सकाळी लवकर उठून तंबोऱ्यावर रियाज करू लागली. सिनेमात ऐकलेली गाणी त्यांची पाठ होऊन जात.
हिला स्टेज प्रोग्रॅम
लताजींनी पहिला स्टेज प्रोग्रॅम सोलापूरमध्ये दिला होता. दीनानाथजी कार्यक्रम प्रस्तुत करण्यासाठी शहराशहरांतून फिरत असत. त्यांच्याबरोबर लताजीही जात. वडिलांच्या संगीत नाटकांतून त्यांनी कामे केली. त्यांना ईश्वरभक्तीचे संस्कार घरातूनच आई व आजीकडून मिळाले. हिंदी, मराठी भजने, लोकगीते, भगवद्गीतेचे पारायण हे सर्व लहानपणापासूनच त्यांच्या आई व आजीकडून त्यांनी ऐकले. स्वतःही सहभागी झाल्या. म्हणूनच त्या पुढे नेहमी शांत चित्ताने गात असत.
न्यूयॉर्कच्या ऑडिटोरियममध्ये बॉम्बची अफवा उठल्यानंतरही त्या जराही विचलित न होता स्वस्थ चित्ताने गात राहिल्या.
वडिलांचा मृत्यू
जीवनातल्या चढ-उतारांना खंबीरपणे तोंड देऊन एवढ्या भावंडांच्या कुटुंबाची जबाबदारी वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांनी उचलली. त्यांच्या वयाच्या १३ व्या वर्षी वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर खंबीरपणाने कुटुंबाचा आर्थिक डोलारा मोठी बहीण-कुटुंबप्रमुख म्हणून त्यांनी सांभाळला. वयाच्या १४ व्या वर्षी किर्लोस्कर संगीत मंडळ जॉईन केले. दीनानाथांचे मित्र श्रीपाद जोशी यांनी बाल-कलाकार म्हणून सिनेमात लावून दिले
लता मंगेशकर-पहिलं गाणं
मास्टर विनायक त्याचे पार्टनर होते. इ. स. १९४२ साली ‘किती हसाल’ या सिनेमात लताजींनी पहिलं गाणं गायलं. १९४३ साली पहिलं हिंदी गाणं मराठी सिनेमासाठी गायलं. त्यांचं पहिलं हिट साँग ठरलं १९४९ मधल्या ‘महल’ फिल्ममधील ‘आयेगा आनेवाला’. नंतर लताजींनी कधी मागे बघितलंच नाही. त्या सतत पार्श्वसंगीत देत राहिल्या
गाण्यांची संख्या 30-35 हजार
मल्लिका-ए-तरन्नुम नूरजहाँ यांच्याबरोबर जुगलबंदी, बडे गुलाम अली खाँ, मुकेश, हेमंतकुमार, एस. डी. बर्मन अशांसारख्या अनेकानेक गायकांबरोबर त्या गात गेल्या. लक्ष्मीकांत प्यारेलाल, राहुलदेव बर्मन, कल्याणजी-आनंदजी, नौशाद आदि अनेक संगीतकारांच्या निर्देशनानुसार असंख्य गाणी सातत्याने गाऊन त्या गीतांना अविस्मरणीय बनविले. भारतीय सिनेमाला लोकप्रिय बनविण्यात त्यांच्या कंठस्वराचे अभूतपूर्व योगदान आहे. हिंदी, बंगाली, मराठी, आसामी, तेलगू आदी अनेक भारतीय भाषांमध्ये त्यांनी गाणी गायली आहेत. त्यांच्या गाण्यांची संख्या तीस-पस्तीस हजारांच्या वर नक्कीच भरेल
पहिला सिनेमा
आनंद घन’ या नावाने संगीत दिलेला त्यांचा पहिला सिनेमा इ. स. १९६० मधला ‘राम राम पाव्हणं’. याप्रमाणे त्यांनी संगीत दिलेले सिनेमेही प्रसिद्धीस आले.
'गानकोकिळा' हा किताब
या त्यांच्या ईश्वरनिर्मित व कष्टार्जित संगीत-गायन स्वरासाठी ‘गानकोकिळा’ हा किताब त्यांना देण्यात आला. लताजींचा मूळ स्वभाव आस्तिक आहे. गायनाच्या या अत्युच्च स्थानावर पोहोचविण्याचे श्रेय त्या आपल्या मूळ मंगेशीच्या इष्ट भगवान शिवाला देतात.
film fare awards
इ. स. १९६२ मध्ये त्यांना विजयालक्ष्मी पंडित यांच्या हस्ते फिल्म फेअर अॅवॉर्ड देण्यात आले .
पद्मभूषण
लताजींना शिवाजी युनिव्हर्सिटी, कोल्हापूर व हैदराबाद युनिव्हर्सिटीने डी. लिट. ची मानद उपाधी दिली आहे. १९६९ मध्ये ‘पद्मभूषण’ अॅवॉर्ड दिले गेलेः
दादासाहेब फाळके पुरस्कार
इ. स. १९८९ मध्ये सिनेजगतामधील सर्वाधिक गौरवशाली ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ प्रदान केला
'महाराष्ट्र भूषण
१९९७ मध्ये ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार त्यांना मिळाला) १९९९ मध्ये ‘नॅशनल अॅवॉर्ड’ ही त्यांना दिले. शंकराचार्यांनी ‘स्वर-भारती’ पुरस्काराने लताजींना सन्मानित केले.
भारतरत्न
या त्यांच्या संगीत-जीवन-कार्यकालाचा आदर करताना भारत सरकारने भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारतरत्न’ पुरस्कार देऊन त्यांना गौरवांकित केले. मार्च २००१ मध्ये तत्कालीन राष्ट्रपती महोदय आर. के. नारायणन यांच्या हस्ते ‘भारतरत्न’ म्हणून त्यांना अलंकृत केले.
मृत्यू
लता मंगेशकर मृत्यू 6 February 2022 (age 92 years), Breach Candy Hospital Trust, Mumbai झाला .
FAQ
लता मंगेशकर यांना भारतरत्न कधी भेटला?
लता मंगेशकर यांना मार्च २००१ मध्ये तत्कालीन राष्ट्रपती महोदय आर. के. नारायणन यांच्या हस्ते ‘भारतरत्न’ पुरस्कार भेटला.
लता मंगेशकर यांचा आवडता रंग कोणता?
लता मंगेशकर यांचा आवडता रंग पांढरा आहे .