भगवत गीता अध्याय पहिला
अर्जुनविषादयोग
धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः । मामका पाण्डवाश्चैव किमकुर्वत सञ्जय ।।११।।
भगवत गीता अध्याय पहिला आणि श्लोक पहिला याचा अर्थ
Table of Contents
Toggleधृतराष्ट्र म्हणाला, हे सजया। धर्मभूमी असलेल्या कुरुक्षेत्रात युद्धाच्या इच्छेने एकत्र जमलेल्या माझ्या आणि पाडूच्या मुलानीही काय केले?
पाडवाना बारा वर्षे वनवास व एक वर्ष अज्ञातवास भोगावा लागला परत आल्यावर पूर्वी ठरल्याप्रमाणे पाडवानी दुर्योधनाकडे अर्धे राज्य मागितले, पण दुर्योधनाने अर्धे राज्यच काय, पण सुईच्या टोकावर मावेल एवढीदेखील जमीन देण्यास नकार दिला म्हणून पाडवानी कुतीमातेच्या आज्ञेनुसार युद्ध करण्याचे ठरविले दोन्हीही बाजूनी युद्धाची तयारी सुरू झाली महर्षी व्यास धृतराष्ट्राला म्हणाले की, युद्ध होणार यात शका नाही, कारण कुरुक्षेत्रावर कौरव पाडवाचे सैन्य युद्धासाठी सज्ज आहे. तुला जर घरात बसून युद्ध पाहण्याची इच्छा असेल तर मी तुला दिव्य दृष्टी देतो तेव्हा धृतराष्ट्र म्हणाला की, मी जन्मभर आधळा आहे मला आता माझ्या कुळाचा सहार दिव्य दृष्टीने पाहण्याची इच्छा नाही, पण युद्धाचे वर्णन जरूर ऐकू इच्छितो तेव्हा व्यासांनी सजयास दिव्य दृष्टी दिली या दिव्य दृष्टीद्वारे सजय कुरुक्षेत्रावरील सर्व घटना पाहू शकत होता, बारीकसारीक तपशील सागू शकत होता.
भगवत गीता अध्याय पहिला आणि श्लोक व अर्थ
संजय म्हणाला, त्यावेळी व्यूहरचना केलेले पाडवाचे सैन्य पाहून राजा दुर्योधन द्रोणाचार्यांजवळ जाऊन म्हणाला- अहो आचार्य! तुमच्या बुद्धिमान शिष्याने- द्रुपदपुत्र धृष्टद्युम्नाने व्यूहरचना करून उभी केलेली ही पाडुपुत्राची प्रचंड सेना पाहा सजयला मिळालेल्या दिव्य दृष्टीनुसार सजय धृतराष्ट्रास युद्धभूमीवरील सर्व घटना, माहिती, सैन्याच्या मनातील गोष्टी पाहू, ऐकू व सागू शकत होता. पाडवाच्या सैन्याची धृष्टद्युम्नाने केलेली व्यूहरचना दुर्योधनाने पाहिली द्रोणाचार्यांनी शिक्षण दिलेला धृष्टद्युम्न पाडवाच्या पक्षात होता द्रोणाचार्यांना डिवचण्यासाठी दुर्योधनाने द्रुपदपुत्राचे नाव घेतले. पाडवाच्या सैन्याची व्यूहरचना धृष्टद्युम्नाने केली आहे, असे सागितले कौरवाचे सैन्य पाडवाच्या सैन्यापेक्षा खूप मोठे होते शिवाय भीष्म, कर्ण, द्रोण हे कौरवाचे आशास्थान होते.
भगवत गीता अध्याय पहिला आणि श्लोक व अर्थ
या सैन्यात मोठीमोठी धनुष्ये घेतलेले भीम, अर्जुन यासारखे शूरवीर, सात्यकी, विराट, महारथी द्रुपद, धृष्टकेतू, चेकितान, बलवान काशिराज, पुरुजित, कुतिभोज, नरश्रेष्ठ शैब्य, पराक्रमी युधामन्यू, शक्तिमान उत्तमौजा, सुभद्रापुत्र अभिमन्यू आणि द्रौपदीचे पाच पुत्र हे सर्वच महारथी आहेत
पाडवाच्या सैन्यात अनेक रथी, अतिरथी, महारथी होते शिवाय पाच पाडवाची एकत्र ताकद दुर्योधनाला ठाऊक होती मुद्दामच त्याने द्रोणाचार्यांना पाडवाच्या महारथींची यादी ऐकवली ही एक चिथावणीच होती युद्धकलेत दुर्योधनही कुशल होता त्याच्याही सैन्यात अनेक रथी-महारथी होते सैन्यही महाबलाढ्य होते दुर्योधनाने पाडवाच्या व कौरवांच्या सैन्यातील महारथींची थोडक्यात यादीच द्रोणाचार्यांना वाचून दाखविली हे सर्व नरश्रेष्ठ होते पराक्रमी होते शक्तिमान होते, पण ते सर्व अर्जुनाचे सगेसोयरे, मित्र, नातलग, काका, मामा, बधू, गुरू, आजे, हितचिंतक असेच होते
भगवत गीता अध्याय पहिला
भगवत गीता अध्याय पहिला आणि श्लोक व अर्थ
हे ब्राह्मणश्रेष्ठ! आपल्यातील जे महत्त्वाचे आहेत, ते जाणून घ्या. आपल्या माहितीसाठी आपल्या सैन्याचे जे जे सेनापती आहेत ते मी आपल्याला सांगतो. आपण-द्रोणाचार्य, पितामह भीष्म, कर्ण, युद्धात विजयी होणारे कृपाचार्य, अश्वत्थामा, विकर्ण तसेच सोमदत्ताचा मुलगा भूरिश्रवा, इतरही माझ्यासाठी जीवावर उदार झालेले पुष्कळ शूरवीर आहेत. ते सब अण निरनिराळ्या शस्त्रास्त्रांनी सुसज्ज असून युद्धात पारंगत आहेत.
विकर्ण हा दुर्योधनाचा भाऊ आहे. अश्वत्थामा हा द्रोणाचार्यांचा पुत्र आहे. आणि सोमदत्ति किंवा भूरिश्रवा हा बाहुक राजाचा पुत्र आहे. कर्ण हा अर्जुनाचा सावत्र भाऊ तर दुर्योधनाचा मित्र आहे. द्रोणाचार्यांचा विवाह कृपाचार्यांच्या जुळ्या बहिर्णीशी झाला होता. जयद्रथ, कृतवर्मा, शल्य यासारखे शूरवीर तर दुर्योधनासाठी प्राण दयायला सुद्धातयार झाले होते. दुर्योधनाने पितामह महापराक्रमी भीष्मांचे रक्षण करण्यास सर्व शूरवीरांना सांगितले.
भगवत गीता अध्याय पहिला आणि श्लोक व अर्थ
भीष्म पितामहांनी रक्षण केलेले आपले ते सैन्य सर्व दृष्टींनी अजिंक्य आहे, तर भीमाने रक्षण केलेले यांचे हे सैन्य जिंकायला सोपे आहे. म्हणून सर्व व्यूहांच्या प्रवेशद्वारात आपापल्या जागेवर राहून आपण सर्वांनीच निःसंदेह भीष्म पितामहांचेच सर्व बाजूंनी रक्षण करावे. कौरवांतील वृद्ध, महापराक्रमी, पितामह भीष्मांनी त्या दुर्योधनाच्या अंतःकरणात आनंद निर्माण करीत मोठ्याने सिंहासारखी गर्जना करून शंख वाजवला.
दुर्योधनाने स्तुती करताच कौरवातील सर्वात वयोवृद्ध भीष्म पितामह आनंदित झाले व त्यांनी मोठ्याने शंखगर्जना केली. त्यामुळे दुर्योधनही आनंदित झाला. दुसऱ्या बाजूस साक्षात श्रीकृष्ण असल्यामुळे दुर्योधनाने धीर सोडू नये म्हणूनच त्यांनी हे केले. दुर्योधनाला मात्र भीमाने वाढविलेले पांडवांचे सैन्य जिंकायला सोपे आहे, असे वाटत होते. कौरवांचे पारडे जड आहे, अशी त्याची खात्री होती. फाजिल आत्मविश्वास त्याच्यात निर्माण झाला होता.
भगवत गीता अध्याय पहिला आणि श्लोक व अर्थ
त्यानंतर शंख, नगारे, ढोल, मृदंग, शिंगे इत्यादी रणवाद्ये एकदम वाजू लागली. त्याचा प्रचंड आवाज झाला. यानंतर पांढरे घोडे जोडलेल्या उत्तम रथात बसलेल्या श्रीकृष्णानी आणि अर्जुनानेही दिव्य शख वाजवले. श्रीकृष्णांनी पाचजन्य नावाचा, अर्जुनान देवदत्त नावाचा आणि भयानक कृत्ये करणाऱ्या भीमाने पौण्डू नावाचा मोठा शंख फुक्ला अर्जुनाकडे जो रथ होता, तो अग्निदेवाने दिलेला दिव्य रथ होता. स्वत श्रीकृष्ण अर्जुनाच्च्या रथाचे सारथ्य करीत होते. शिवाय श्रीकृष्ण व पांडव यांचे शंखसुद्धा दिव्य होते.
श्रीकृष्णाचा पांचजन्य, अर्जुनाचा देवदत्त, हिडिंब राक्षसाचा वध करणाऱ्या भीमाचा पौंड्र अशी त्या शखाची नावे होती. सर्वांनी आपापले शंख वाजविले. अर्जुनाच्या रथाना पांढरेशुभ्र घोडे जोडले होते. आता युद्ध सुरू होण्यास थोडाच अवकाश होता, ढोल, ताशे, नगारे, मृदंग, शिगेइ रणवाद्येवाजू लागली. कौरवाना शह देण्यासाठी पांडवानी शंख फुकले.
भगवत गीता अध्याय पहिला आणि श्लोक व अर्थ
कुंतीपुत्र राजा युधिष्ठिराने अनंतविजय नावाचा आणि नकुल व सहदेव यांनी सुघोष च मणिपुष्पक नावाचे शंख वाजवले. श्रेष्ठ धनुष्य धारण करणारा काशिराज, महारथी
शिखडी, धृष्टद्युम्न, राजा विराट, अजिंक्य सात्यकी, राजा द्रुपद, द्रौपदीचे पाचही पुत्र, महाबाहू सुभद्रापुत्र अभिमन्यू या सर्वांनी, हे राजा’ सर्व बाजूनी वेगवेगळे शख वाजवले.
दोन्ही बाजूच्या सैन्यानी रणवाद्ये वाजवली व आपापले शख फुकायला सुरुवात केली. दिव्य शखांची नावेही वेगवेगळी होती श्रीकृष्ण सारथ्य करीत होते युधिष्ठिराने अनतविजय, नकुलाने सुघोष, तर सहदेवाने मणिपुष्पक नावाचा शंख वाजवला धनुर्धर काशिराजा, महारथी शिखडी, धृष्टद्युम्न, राजा विराट, अजिंक्य सात्यकी, राजा द्रुपद, अभिमन्यू या सर्वांनी शखध्वनी केले हे सर्व वर्णन सजय धृतराष्ट्राला सविस्तरपणे सागत आहे धृतराष्ट्राला युद्ध लवकरात लवकर सुरू व्हावे असे वाटत होते दुर्योधनालाही विजयश्री केव्हा एकदा गळ्यात पडते याची घाई झाली होती
भगवत गीता अध्याय पहिला आणि श्लोक व अर्थ
आणि त्या भयानक आवाजाने आकाश व पृथ्वीला दुमदुमून टाकीत कौरवाची अर्थात आपल्या पक्षातील लोकांची छाती दडपून टाकली. महाराज! त्यानंतर ध्वजावर हनुमान असणाऱ्या पांडवाने -अर्जुनाने युद्धाच्या तयारीने उभ्या असलेल्या कौरवांना पाहून, शस्त्रांचा वर्षाव होण्याची वेळ आली तेव्हा धनुष्य उचलून, हृषीकेश श्रीकृष्णांना असे म्हणाला, हे अच्युता! रथ दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी उभा करा.
रणवाद्याच्या आवाजाने कौरवांच्या सैन्याची छाती दडपून गेली, कारण पृथ्वी व आकाश यांना हालवून सोडणारा महाभयंकर असा तो आवाज होता. अर्जुनाच्या रथाच्या ध्वजस्तंभावर असलेल्या ध्वजावर हनुमानाचे चित्र होते. पूर्वी रामावतार घेतलेले स्वतः श्रीकृष्ण अर्जुनाला मार्गदर्शक म्हणून लाभले होते. त्यामुळे पांडवांचा विजय निश्चित होणार यात शंका नव्हती. तेवढे मनोधैर्य पांडवांच्या सैन्यात निर्माण झाले होते. त्यामुळे पांडवांचे सैन्य घाबरले नाही.
भगवत गीता अध्याय पहिला आणि श्लोक व अर्थ
मी रणभूमीवर युद्धाच्या इच्छेने सज्ज झालेल्या या शत्रुपक्षाकडील योद्ध्याना जोवर नीट पाहून घेईन की, मला या युद्धाच्या उद्योगात कोणाकोणाशी लढणे योग्य आहे, तोवर रथ उभा करा. दुष्टबुद्धी दुर्योधनाचे युद्धात हित करू इच्छिणारे जे जे हे राजे या सैन्यात आले आहेत, त्या योद्ध्यांना मी पाहतो.
अर्जुनाने आपला रथ दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी उभा करण्यास सांगितले कारण आपणास कोणाशी लढावयाचे आहे हे त्याला पाहावयाचे होते. युद्धाचा अंदाज घ्यायचा होता. शत्रुपक्षात दुर्योधनाच्या बाजूने कोण कोण योद्धे पांडवांच्या विरुद्ध लढण्यास आले आहेत हे अर्जुनाला जाणून घ्यायचे होते.
अर्जुन हा श्रीकृष्णाचा अत्यंत लाडका भक्त होता. भक्तासाठी स्वतः श्रीकृष्ण सारथी झाला. सेवक झाला.
अर्जुनाचे आज्ञापालन तो करणार होता. म्हणूनच अर्जुनाने श्रीकृष्णास रथ दोन्ही सैन्यांमध्ये घेण्याची आज्ञा केली.
भगवत गीता अध्याय पहिला आणि श्लोक व अर्थ
संजय म्हणाला, धृतराष्ट्र महाराज! अर्जुनाने असे सांगितल्यावर श्रीकृष्णांनी दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी भीष्म, द्रोणाचार्य व इतर सर्व राजांच्या समोर तो उत्तम स्थ उभा करून म्हटले, हे पार्था! युद्धासाठी जमलेल्या या कौरवांना पाहा. त्यानंतर पृथापुत्र अर्जुनाने त्या दोन्ही सैन्यांमध्ये असलेल्या काका, आजे-पणजे, गुरू, मामा, भाऊ, मुलगे, नातू, मित्र, सासरे आणि हितचिंतक यांना पाहिले.
भगवंतांनी रथ दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी उभा केला व भगवंत अर्जुनास म्हणाले की, कौरवांचे हितकर्ते पाहा. अर्जुनाने पाहिले तर भूरीश्रवासारखे पित्यासमान, भीष्म व सोमदत्त यासारखे आजे, द्रोणाचार्य व कृपाचार्य यासारखे गुरू, शल्य व शकुनी यासारखे मामा, दुर्योधन व विकणं यासारखे बंधू, लक्ष्मणासारखे मुलगे, अश्वत्थामासारखे मित्र, कृतवर्मासारखे हितचिंतक, सासरे इ. अनेक योद्धे होते.
भगवत गीता अध्याय पहिला आणि श्लोक व अर्थ
तेथे असलेल्या त्या सर्व बाधवाना पाहून अत्यत करुणेने व्याप्त झालेला कुतीपुत्र अर्जुन शोकाकुल होऊन असे म्हणाला हे कृष्णा’ युद्धाच्या इच्छेने रणांगणावर उपस्थित असणाऱ्या या स्वजनाना पाहून माझे अवयव गळून जात आहेत. तोंडाला कोरड पडली आहे. शरीराला कंप सुटला आहे आणि अगावर रोमांच उभे राहत आहेत.
अर्जुनाने रणांगणावर सगेसोयरे, गुरुजन, नातलग, मित्र, हितचिंतक याना आपल्याविरुध्द लढण्यास उभे राहिलेले पाहिले आणि त्यास धक्काच बसला सर्वांविषयी त्याच्या मनात करुणा निर्माण झाली. तो युध्दाला भ्यायला नाही; पण ज्यांनी आपल्यावर उपकार केले अशा स्वजनांविरुद्ध लढण्याविषयी त्याच्या मनात विषाद निर्माण झाला. त्याच्या अंगावर रोमांच उभे राहिले. तोंडाला कोरड पडली. सर्व अवयव गळून जात आहेत, असे वाटू लागले.
गाण्डीवं संसते हस्तात्व्क्चैव परिदह्यते। न च शक्नोम्यवस्थातुं भ्रमतीव च मे मनः ।।१. ३०।। निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव। न च श्रेयोऽनुपश्यामि हत्वा स्वजनमाहवे ।।१. ३१।।
भगवत गीता अध्याय पहिला आणि श्लोक व अर्थ
हातातून गांडीव धनुष्य गळून पडत आहे, अंगाचा दाह होत आहे. तसेच माझे मन भ्रमिष्टासारखे झाले आहे. त्यामुळे मी उभादेखील राहू शकत नाही. हे केशवा! मला विपरीत चिन्हे दिसत आहेत. युद्धात आप्तांना मारून कल्याण होईल, असे मला वाटत नाही.
शत्रू पक्षात उभे असलेले स्वजन पाहून अर्जुन मोहवश झाला. त्याच्या अंगाचा दाह होत आहे. तोंडाला कोरड पडली आहे. मन भ्रमिष्ट झाले आहे. त्याचे पाय लटपटत आहेत. हातून धनुष्य गळून पडत आहे. मनात विषाद निर्माण झाला आहे. करुणेने तो व्याकूळ झाला आहे. तो भगवंताला म्हणतो की, युद्धात स्वजनांना मारून माझे कल्याण होईल, असे मला वाटत नाही. मला तर अपशकून दिसत आहेत. अर्जुनाचे धैर्य नाहीसे झाले होते. त्याचा स्वतःवरचा विश्वास उडाला होता. मोहापायी तो क्षात्रधर्म विसरला. सर्व सोडून देऊन वनात जाण्याची भाषा करू लागला
भगवत गीता अध्याय पहिला आणि श्लोक व अर्थ
भगवत गीता अध्याय पहिला आणि श्लोक व अर्थ
हे कृष्णा! मला विजयाची इच्छा नाही, राज्याची नाही, सुखाचीही नाही. आम्हाला असे राज्य काय करायचे? अशा भोगांनी आणि जगण्याने तरी काय लाभ होणार आहे? आम्हाला ज्यांच्यासाठी राज्य, भोग आणि सुखादी अपेक्षित आहेत, तेच हे सर्व जण संपत्तीची आणि जीविताची आशा सोडून युद्धात उभे ठाकले आहेत. गुरुजन, काका, मुलगे, आजे, मामा, सासरे, नातू, मेहुणे, त्याचप्रमाणे इतर आप्त आहेत. हे मला मारण्यास तयार झाले तरी किंवा त्रैलोक्याच्या राज्यासाठीही मी या सर्वांना मारू शकत नाही. या पृथ्वीची काय कथा?
अर्जुन म्हणतो की, सर्व स्वजनांना मारून जे राज्य मिळेल, जे वैभव प्राप्त होईल, जी कीर्ती मिळेल, जे सुख प्राप्त होईल, त्या सर्वांचा उपभोग घेऊन मी काय करू? त्यामुळे माझे कल्याण होईल का? पृथ्वीचेच काय, पण त्रैलोक्याचे राज्यही मला नको.
भगवत गीता अध्याय पहिला आणि श्लोक व अर्थ
हे जनार्दना ! धृतराष्ट्राच्या मुलांना मारून आम्हाला कोणते सुख मिळणार? या आततायींना मारून आम्हाला पापच लागणार. म्हणूनच आपल्या बांधवांना, धृतराष्ट्रपुत्रांना आम्ही मारणे योग्य नाही, कारण आपल्याच कुटुंबियांना मारून आम्ही कसे सुखी होणार? जरी लोभामुळे बुद्धी भ्रष्ट झालेल्या यांना कुळाचा नाश झाल्यामुळे उत्पन्न होणारा दोष आणि मित्राशी वैर करण्याचे पातक दिसत नसले तरी कुळाच्या नाशाने उत्पन्न होणारा दोष स्पष्ट दिसत असतानाही आम्ही या पापापासून परावृत्त होण्याचा विचार का बरे करू नये?
अतिलोभामुळे कौरवांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे. त्यांना कुलक्षयाचा दोष दिसत नाही. मित्रवैराचे पातक दिसत नाही. याची जाणीव अर्जुनाला आहे. म्हणूनच असे पाप डोक्यावर घ्यायला अर्जुन तयार नाही. अर्जुन पूर्णपणे भावनावश झाला आहे. विवश झाला आहे. करुणेने व्याकूळ झाला आहे. त्याचे मन विषादाने पूर्णपणे भरून गेले आहे. तो हतबल झाला आहे.
भगवत गीता अध्याय पहिला आणि श्लोक व अर्थ
कुळाचा नाश झाला असता परपरागत कूळधर्म नाहीसे होतात. कूळधर्म नाहीस झाले असता त्या कुळात मोठ्या प्रमाणात पाप फैलावते. हे कृष्णा’ पाप अधिक वाढल्याने कुळातील स्त्रिया अतिशय बिघडतात आणि हे वार्णेया’ स्त्रिया बिघडल्या असता वर्णसकर उत्पन्न होतो
या अध्यायात श्रीकृष्णाची बरीच नावे आली आहेत. गोपाल व गोविंद म्हणजे गायी व इंद्रिये याचे पालन करणारा व सुख देणारा, मधुसूदन म्हणजे मधु राक्षसाचा वध करणारा, जनार्दन म्हणजे सर्व जीवाचे रक्षण करणारा, वासुदेव म्हणजे वसुदेवपुत्र, कृष्ण म्हणजे सावळ्या वर्णाचा, श्री भगवान म्हणजे बल, ऐश्वर्य, सौंदर्य, यश, ज्ञान आणि वैराग्य यानी परिपूर्ण असा पुरुषोत्तम व देवाधिदेव, हृषीकेश म्हणजे इद्रियाचा स्वामी, माधव म्हणजे लक्ष्मीपती, वाष्र्णेय म्हणजे वृष्णीचा वशज, देवकीनंदन म्हणजे देवकीचा पुत्र, यशोदानदन म्हणजे यशोदेने पालन केलेला पुत्र. पार्थसारथी म्हणजे अर्जुनाचे सारथ्य करणारा, अच्युत म्हणजे कधीही न चुकणारा.
भगवत गीता अध्याय पहिला आणि श्लोक व अर्थ
वर्णसकर हा कुळाचा नाश करणाऱ्याना आणि कुळाला नरकालाच नेतो, कारण श्राद्ध, जलतर्पण इत्यादींना मुकलेले याचे पितर अधोगतीला जातात. या वर्णसंकर करणाऱ्या दोषामुळे परंपरागत जातिधर्म व कूळधर्म उद्ध्वस्त होतात. हे जनार्दना ! ज्यांचा कूळधर्म नाहीसा झाला आहे, अशा माणसांना अनिश्चित काळापर्यंत नरकात पडावे लागते, असे आम्ही ऐकत आलो आहोत.
अर्जुनालाही अशीच खूप नावे आहेत. पांडव म्हणजे पडुपुत्र, धनजय म्हणजे युधिष्ठिराला यज्ञात धन पुरविणारा, गुडाकेश म्हणजे निद्रा व अज्ञान यांना जिंकणारा, पार्थ म्हणजे पृथापुत्र. सनातन धर्मामध्ये वर्णाश्रमव्यवस्था सांगितली आहे. याचे उल्लघन झाले की, पापास सामोरे जावे लागते वर्णसंकर असाच निषिद्ध मानला आहे. जे जाती व कूळधर्म उद्ध्वस्त करतात ते नरकात जातात.
भगवत गीता अध्याय पहिला आणि श्लोक व अर्थ
अरेरे! किती खेदाची गोष्ट आहे’ आम्ही बुद्धिमान असूनही राज्य आणि सुख यांच्या लोभाने स्वजनाना ठार मारायला तयार झालो, हे केवढे मोठे पाप करायला उद्युक्त झालो बरे! जरी शस्त्ररहित व प्रतिकार न करणाऱ्या मला हातात शस्त्र घेतलेल्या धृतराष्ट्रपुत्रानी रणात ठार मारले, तरी ते मला अधिक कल्याणकारक ठरेल. संजय म्हणाला, रणागणावर दु खाने मन उद्विग्न झालेला अर्जुन एवढे बोलून बाणासह धनुष्य टाकून देऊन रथाच्या मागील भागात बसला तो हतबल झाला होता
हे परमसत्य आहे श्रीमद्भगवद्गीतारूपी उपनिषद तथा ब्रह्मविद्या आणि योगशास्त्राविषयी अर्जुनविषादयोग हा पहिला अध्याय समाप्त झाला