डॉ राजेंद्र प्रसाद माहिती मराठीdr.rajendra prasad information in marathi

डॉ राजेंद्र प्रसाद जन्मापासून ते मृत्यु पर्यन्त सर्व माहिती दिली आहे .

Table of Contents

बालपण आणि शिक्षण

            मूळ उत्तर प्रदेशातील महादेव सहाम याचा सर्वांत लहान मुलगा डॉ राजेंद्र प्रसाद यांचा जन्म दि. ३ डिसेंबर १८८४ ला बिहार प्रांतामधील सारन जिल्ह्यातील जीरादेई गावात एका कायस्थ कुटुंबात झाला. त्यांच्या मोठ्या भावाचे नाव महेंद्र प्रसाद होते व त्यांना ३ बहिणी होत्या.

            लहानपणापासून राजेंद्र  हुशार विद्यार्थी होता. प्राथमिक शिक्षण घरी पूर्ण केल्यावर वयाच्या नवव्या वर्षी त्यांना छपराच्या जिल्हा शाळेत घातले. इ. स. १९०२ मध्ये कलकत्ता विद्यापीठात मॅट्रिक परीक्षेत सर्वांत प्रथम येऊन उत्तीर्ण झाले. एफ. ए. परीक्षाही प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले म्हणून त्यांना महिना ५० रु. स्कॉलरशिप मिळू लागली.

               इ. स. १९०६ मध्ये कलकत्त्याच्या प्रेसिडेन्सी कॉलेजमधून दोन विषयांत बी. ए. ऑनर्स केले म्हणून दोन शिष्यवृत्ती मिळाल्या. इ. स. १९०७ मध्ये एम. ए. व १९१५ मध्ये एम. एल. परीक्षाही प्रथम श्रेणीत पास केली. या शिक्षणकाळात त्यांना अनेक शिष्यवृत्ती व पदके मिळाली.

कलकत्त्यात बिहारी क्लबची स्थापना

             राजेंद्र बाबूंना समाज व देशसेवेची प्रेरणा पजाब केसरी लाला लजपतराय, क्रांतिकारी अरविंद घोष, गोपाळ कृष्ण गोखले, सुरेंद्रनाथ बानर्जी, पडित मदन मोहन मालवीय, सतीशचंद्र मुखर्जी, सिस्टर निवेदिता, सर गुरुदास बॅनर्जी आदी थोर स्वतंत्रता सेनानींकडून मिळाली. त्याच्या विचारांनी प्रेरित होऊन राजेंद्र बाबूंनी कलकत्त्यात बिहारी क्लबची स्थापना केली.

लॉ कॉलेजमध्ये प्रोफेसर

            कलकत्त्याला वकिली करीत असताना इ. स. १९०९ मध्ये ते गोपाळ कृष्ण गोखले यांच्या ‘सर्व्हट्स् ऑफ इंडिया सोसायटीत’ सामील झाले.इ. स. १९११ मध्ये ते कलकत्ता हायकोर्टात वकिली करू लागले,

           त्याची निपुणता पाहून मुख्य न्यायाधीश आशुतोष मुखजींनी त्यांना लॉ कॉलेजमध्ये प्रोफेसर पदावर नियुक्त केले. येथे ते १९१४ पर्यंत कार्यरत होते.

dr-rajendra-prasad-photo-hd

बिहारचे गांधी

             चंपारण्याच्या दौऱ्यासंदर्भात १९१६ पासून ते गांधीजींबरोबर होते, हिंदी, हरिजनोद्धार व बिहारच्या भूकंपाच्या संकटात डॉ राजेंद्र यांनी केलेले कार्य हे स्पृहणीय होते. त्यामुळे ते बिहारचे गांधी झाले. काँग्रेसचे अध्यक्षही झाले. तेव्हा त्यांनी भारताचा दौरा केला.

गांधीजींचा त्यांच्या जीवनावर प्रभाव

           डॉ राजेंद्र यांच्या जीवनावर गांधीजींचा खोलवर प्रभाव पडला. त्यांनी गांधीजींच्या अस्पृश्यता आणि जातीबद्दलच्या वृत्तीचे पूर्ण समर्थन केले. डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या जीवनावर गांधीजींचा इतका खोल प्रभाव पडला की त्यांनी त्यांच्यासाठी काम करणाऱ्या लोकांची संख्या कमी केली.

        एवढेच नाही तर डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी त्यांची घरातील कामे स्वतः करायला सुरुवात केली, ज्यामध्ये मॉपिंगचा समावेश होता. गांधीजींमुळेच डॉ.राजेंद्र प्रसाद यांनी स्वातंत्र्य चळवळीत उडी घेतली.

dr-rajendra-prasad-image-hd

दम्याचा त्रास

            सततचे दौरे, भाषणे व कैद यामुळे त्यांना दम्याने घेरले. प्रकृती खूप नाजूक झाली. नंतर काळजी घेऊनही शेवटपर्यंत दम्याने साथ सोडली नाही. राजेंद्रबाबूंची स्वतःची उन्नती, देशसेवेची तळमळ, समजदारी व विनम्र स्वभाव यामुळे त्यांनी गांधीजींसकट सगळ्या जनतेचा विश्वास जिंकला,

पाटणा विद्यापीठाची स्थापना

                  इ. स. १९१८ मध्ये जेव्हा पाटण्याला हायकोर्ट सुरू झाले, तेव्हा त्यांनी तेथे वकिली सुरू केली ती इ. स. १९२० पर्यंत. त्याच वेळी देशसेवेचे कार्य व भारतीय हिंदी साहित्य संमेलनात सहकार्य देत राहिले. त्याच सुमारास पाटणा विद्यापीठाची स्थापना झाली.

              डॉ राजेंद्र प्रसाद यांनी त्याच्या विधेयकात काही सुधारणा केल्या, ते सिनेटचे सदस्य झाले. इ. स. १९२० मध्ये त्यांनी वकिली सोडली. देशाच्या असहकार आंदोलनात, चंपारण्याच्या सत्याग्रहात भाग घेऊन, त्याचे अत्यंत कुशल नेतृत्व करून, विद्यार्थ्यांच्या सहभागासह, फार मोठ्या प्रमाणावर आंदोलन यशस्वी करून दाखविले. सगळे तुरुंग सत्याग्रहींनी भरून गेले.

इंग्रजी पत्र व हिंदी साप्ताहिक

          हिंदीप्रेमासाठीही डॉ राजेंद्र प्रसाद प्रसिद्ध आहेत. इ. स. १९१८ मध्ये बिहारमधून त्यांनी ‘सर्च लाइट’ नावाचे इंग्रजी पत्र व ‘देश नावाचे हिंदी साप्ताहिक सुरू केले.

            इ. स. १९२६ मध्ये बिहार प्रांतीय हिंदी साहित्य संमेलन, दरभंगा, इ. स. १९२७ मध्ये संयुक्त प्रांताचे हिंदी साहित्य संमेलन, कांगडी अधिवेशन, इ. स. १९३६ मध्ये अखिल भारतीय हिंदी साहित्य संमेलन, नागपूर अधिवेशन या सर्व अधिवेशनांचे ते सभापती होते. ‘बिहार विद्यापीठ’ नावाचे एक राष्ट्रीय विद्यापीठ त्यांनी स्थापन केले होते.

'बिहार अर्थक्वेक रिलीफ सोसायटी स्थापन

            दि. ६ एप्रिल १९३० च्या देशव्यापी सत्याग्रहात बिहारचे नेतृत्व केले. हा सत्याग्रह जूनपर्यंत चालला होता. दि. १५ जानेवारी १९३४ रोजी

       बिहारमध्येझालेल्या भयंकर भूकंपात मदतकार्यासाठी त्यांनी ‘बिहार अर्थक्वेक रिलीफ सोसायटी स्थापन करून त्याद्वारे प्रचड मदतकार्य केले.

मिठाच्या सत्याग्रहात योगदान

          1930 मध्ये सुरू झालेल्या मिठाच्या सत्याग्रह चळवळीतील एक गतिशील कार्यकर्ते म्हणून डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्याकडे पाहिले जात होते.

          या आंदोलनादरम्यान डॉ. राजेंद्र प्रसाद यांना बिहार राज्याचे प्रमुख बनवण्यात आले आणि या काळात त्यांनी मीठ विकून पैशाची व्यवस्था केली. मात्र, या आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा भंग केल्याप्रकरणी त्यांना ६ महिन्यांची शिक्षाही भोगावी लागली.

चंपारण चळवळीत योगदान

              डॉ. राजेंद्र हे महात्मा गांधींपासून खूप प्रभावित होते आणि त्यांचे समर्थकही होते. जेव्हा त्यांनी गांधीजींना चंपारण चळवळीत काम करताना पाहिले तेव्हा ते गांधीजींसोबत चंपारण चळवळीचा भाग होण्यापासून स्वतःला रोखू शकले नाहीत. या आंदोलनादरम्यान डॉ.राजेंद्र प्रसाद यांनी गांधीजींचे भक्कम समर्थन केले.

'संविधान समिती'चे अध्यक्ष

           इ. स. १९४२ च्या ‘भारत छोडो’ आंदोलनात त्यांना कैद झाली. ते इ. स. १९४५ पर्यंत कैदेतच होते. दि. २ सप्टेंबर १९४६ मध्ये बनलेल्या अंतरिम सरकारमध्ये राजेंद्रबाबू कृषी व खाद्य मंत्री होते. स्वतंत्र भारताचे संविधान बनविणाऱ्या ‘संविधान समिती’चे अध्यक्ष होते.

भारताचे पहिले राष्ट्रपती

           दि. २४ जानेवारी १९५० रोजी स्वतंत्र भारताच्या लोकसभेने एकमताने राजेंद्र प्रसादांना भारतीय गणराज्याचे पहिले राष्ट्रपती म्हणून निवडले. इ. स. १९५७ मध्ये पुन्हा दुसऱ्यांदा ते राष्ट्रपतिपदावर निवडले गेले. सलग १० वर्षे ते या देशाच्या सर्वोच्च पदावर होते.

डॉ राजेंद्र प्रसाद राहणीमान

             अत्यंत साधे, विनम्र असे त्यांचे व्यक्तिमत्व होते. धोतर, कुडता, टोपी असा त्यांचा साधा वेश असे. खादी त्यांना प्रिय होती. त्यांचे कपडे खादीचे असत. जेव्हा ते राष्ट्रपती भवनात राहायला आले तेव्हा त्यांनी इंग्रजाच्या वेळचा साज-सज्जा, गादीचा पलंग सर्व बाजूला केले व ती जागा खादीच्या वस्तूनी घेतली.

             विशाल भवनातल्या २-३ खोल्या राखल्या. चटई-चरखा अशा गोष्टी ठेवल्या. यावरून त्यांची ‘साधी राहणी, उच्च विचारसरणी’ दिसून येते. इ. स. १९६२ मध्ये त्यांनी राष्ट्रपतिपदावरून स्वेच्छा निवृत्ती घेतली व पाटण्यातील सदाकत आश्रमात राहू लागले.

डॉ-राजेंद्र-प्रसाद-माहिती-मराठी-dr.-rajendra-prasad-information-in-marathi

भारतरत्न

          डॉ राजेंद्र प्रसादच्या या आयुष्यभराच्या देशसेवेसाठी भारत सरकारने त्यांना सर्वोच्च ‘भारतरत्न’ हा किताब १६६२ देऊन गौरविले.

पत्नी राजवंशी देवी

           सप्टेंबर 1962 मध्ये निवृत्त झाल्यानंतर त्यांची पत्नी राजवंशी देवी यांचे निधन झाले. आपल्या मृत्यूच्या एक महिना आधी आपल्या पतीला उद्देशून लिहिलेल्या पत्रात राजवंशी देवी यांनी लिहिले होते – “मला वाटते की माझा अंत जवळ आला आहे, माझ्या काहीही करण्याची शक्ती संपली आहे, माझ्या संपूर्ण अस्तित्वाचा अंत आहे.” राम!राम !   शब्दांच्या उच्चारामुळे 28 फेब्रुवारी 1963 रोजी पाटणा येथील सदाकत आश्रमात त्यांचे निधन झाले.

निधन

       डॉ राजेंद्र प्रसाद दि. २८ फेब्रुवारी १९६३ रोजी त्यांचे निधन झाले.

FAQ

डॉ राजेंद्र प्रसाद जन्म कधी झाला ?

डॉ राजेंद्र  यांचा जन्म दि. ३ डिसेंबर १८८४ ला बिहार प्रांतामधील सारन जिल्ह्यातील जीरादेई गावात एका कायस्थ कुटुंबात झाला.

स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते?

   दि. २४ जानेवारी १९५० रोजी स्वतंत्र भारताच्या लोकसभेने एकमताने राजेंद्र प्रसादांना भारतीय गणराज्याचे पहिले राष्ट्रपती म्हणून निवडले.

राजेंद्र प्रसाद किती वेळा राष्ट्रपती झाले?

राजेंद्र प्रसाद २ वेळा राष्ट्रपती झाले.

डॉ. राजेंद्र प्रसाद यांची स्थायी अध्यक्ष म्हणून कधी निवड झाली?

डॉराजेंद्र  यांची 11 डिसेंबर 1946 रोजी संविधान सभेचे स्थायी अध्यक्ष म्हणून निवड झाली.

डॉ राजेंद्र प्रसाद मृत्यु कधी झाला ?

   डॉ राजेंद्र दि. २८ फेब्रुवारी १९६३ रोजी त्यांचे निधन झाले.

डॉ राजेंद्र प्रसाद यांना भारतरत्न कधी मिळाला ?

          डॉ राजेंद्र प्रसादच्या या आयुष्यभराच्या देशसेवेसाठी भारत सरकारने त्यांना सर्वोच्च ‘भारतरत्न’ हा किताब १६६२ देऊन गौरविले.

डॉ राजेंद्र प्रसाद पत्नी चे नाव काय ?

डॉ राजेंद्र प्रसाद पत्नी चे नाव राजवंशी देवी आहे .

Leave a Comment