भगवद गीता अध्याय 13 (क्षेत्रक्षेत्रज्ञविभागयोग) bhagwat geeta adhyay 13

भगवद गीता अध्याय 13

भगवद गीता अध्याय 13 श्लोक 1,2

भगवद-गीता-अध्याय-13-श्लोक-1-2

भगवद गीता अध्याय 13 श्लोकआणि अर्थ

Table of Contents

                 भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे कौंतेया! हे शरीर क्षेत्र या नावाने संबोधिले जाते आणि याला जो जाणतो त्याला, त्याचे तत्त्व जाणणारे ज्ञानी लोक, क्षेत्रज्ञ असे म्हणतात. हे भारता! तू सर्व क्षेत्रांमध्ये क्षेत्रज्ञ अर्थात जीवात्माही मलाच समज आणि क्षेत्र व क्षेत्रज्ञ अर्थात विकारांसहित प्रकृती व पुरुष यांना जे तत्त्वतः जाणणे, ते ज्ञान आहे, असे माझे मत आहे.

                 अर्जुनाला प्रकृती, पुरुष, क्षेत्र, क्षेत्रज्ञ, ज्ञान व ज्ञेय याबद्दल जिज्ञासा होती. अर्जुनाने या सर्व गोष्टींचा खुलासा भगवंतांकडे मागितला तेव्हा भगवंत म्हणाले की, शरीराला क्षेत्र म्हणतात. या शरीराला जो जाणतो त्याला क्षेत्रज्ञ असे म्हणतात. शरीर इंद्रियांनी बनलेले असते. त्या इंद्रियांना विषयोपभोग घेण्यासाठी जीवाच्या कुवतीनुसार त्याला कार्यक्षेत्र किंवा शरीर उपलब्ध करून दिलेले असते. म्हणून त्या शरीराला क्षेत्र असे म्हणतात. प्रत्येक क्षेत्रामध्ये दोन आत्मे असतात. आत्मा आणि परमात्मा. भगवंत हे परमात्मा असून ते प्रत्येक जीवामध्ये असतात. भगवंत सर्वांना जाणतात.

भगवद गीता अध्याय 13 श्लोक 3,4

भगवद गीता अध्याय 13 श्लोक 3,4

भगवद गीता अध्याय 13 श्लोकआणि अर्थ

                     ते क्षेत्र जे आणि जसे आहे, तसेच ज्या विकारांनी युक्त आहे आणि ज्या कारणांपासून जे झाले आहे, तसेच तो क्षेत्रज्ञही जो आणि ज्या प्रभावाने युक्त आहे, ते सर्व थोडक्यात माझ्याकडून ऐक. हे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाचे तत्त्व ऋषींनी पुष्कळ प्रकारांनी सांगितले आहे आणि निरनिराळ्या वेदमंत्रांतूनही विभागपूर्वक सांगितले गेले आहे. तसेच पूर्णपणे निश्चय केलेल्या युक्तियुक्त ब्रह्मसूत्राच्या पदांनीही सांगितले आहे.

                        प्रकृती व पुरुषकिंवा क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांना विकारासहित जाणणे यालाच ज्ञान असे म्हणतात. आत्म्याला फक्त स्वतःच्या क्षेत्राचेच ज्ञान असते; पण परमात्म्याला सर्व योनीतील जीवांचे व अजीवांचे ज्ञान असते. पराशर, व्यास इ. महर्षीनी आत्मा, परमात्मा व देहामधील भेद यांचे विश्लेषण केले आहे. वेद व उपनिषदे यामधूनही हे ज्ञान सांगितले आहे. क्षेत्र हे जीवाचे कार्यक्षेत्र असते व या क्षेत्रात आत्मा व परमात्मा हे दोन क्षेत्रज्ञ असतात. अन्नमय कोषातून प्राणमय, मग ज्ञानमय, मग विज्ञानमय, मग आनंदमय या सर्वोच्च कोषात जाणे व त्याची अनुभूती घेणे हे ज्ञान होय.

भगवद गीता अध्याय 13 श्लोक 5,6

भगवद-गीता-अध्याय-13-श्लोक-5-6

भगवद गीता अध्याय 13 श्लोकआणि अर्थ

              पाच महाभूते, अहंकार, बुद्धी आणि मूळ प्रकृती तसेच दहा इंद्रिये, एक मन आणि पाच इंद्रियांचे विषय अर्थात शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध, तसेच इच्छा, द्वेष, सुख, दुःख, स्थूल देहाचा पिंड, चेतना आणि धृती अशा प्रकारे विकारांसहित हे क्षेत्र थोडक्यात सांगितले गेले आहे.

              शरीर किंवा क्षेत्र हे चोवीस तत्त्वांनी बनले आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश ही पंच महाभूते, नेत्र, कर्ण, नासिका, जिव्हा व त्वचा ही पंच ज्ञानेंद्रिये, मुख, हात, पाय, इपास्य व पाय ही पंच कर्मेंद्रिये, शब्द, स्पर्श, रूप, रस व गंध हे पंच इंद्रियविषय, मन, अहंकार, बुद्धी व गुण ही चार अव्यक्त तत्त्वे, अशा चोवीस तत्त्वांच्या समुदायाला क्षेत्र म्हणतात. इच्छा, द्वेष, सुख, दुःख हे स्थूल देहातील (पंच महाभूतांनी बनलेले) विकार आहेत.

             चेतना आणि धृती हे सूक्ष्म देहातील (अहंकार, मन, बुद्धी, यांनी बनलेले) विकार आहेत. अशारीतीने क्षेत्र हे चोवीस तत्त्वे व सहा विकार यांनी बनलेले आहे. अशा या क्षेत्रामध्ये आत्मा व परमात्मा हे दोन क्षेत्रज्ञ राहतात. क्षेत्रात (उत्पत्ती, विकास, स्थिती, प्रजनन, क्षय व विनाश) अशी स्थित्यंतरे होत असतात. म्हणून क्षेत्र हे अनित्य आहे.

भगवद गीता अध्याय 13 श्लोक 7,8,9

भगवद-गीता-अध्याय-13-श्लोक-7-8-9

भगवद गीता अध्याय 13 श्लोकआणि अर्थ

                             मोठेपणाचा अभिमान नसणे, ढोंग न करणे, कोणत्याही सजीवाला कोणत्याही प्रकारे त्रास न देणे, क्षमा करणे, मन, वाणी इत्यादींबाबत सरळपणा, श्रद्धा व भक्तीसह गुरूंची सेवा, अंतर्बाह्य शुद्धी, अंतःकरणाची स्थिरता आणि मन व इंद्रियांसह शरीराचा निग्रह, इह व परलोकातील सर्व विषयांच्या उपभोगाविषयी आसक्ती नसणे आणि

                 अहंकारही नसणे, जन्म, मृत्यू, वृद्धत्व आणि रोग इत्यादींमध्ये दुःख व दोषांचा वारंवार विचार करणे, पुत्र, स्त्री, घर आणि धन इत्यादींची आसक्ती नसणे व ममता नसणे तसेच आवडती आणि नावडती गोष्ट घडली असता नेहमीच चित्त समतोल ठेवणे, मज परमेश्वरामध्ये अनन्य योगाने अव्यभिचारिणी भक्ती, तसेच एकांतात शुद्ध ठिकाणी राहण्याचा स्वभाव आणि विषयासक्त मनुष्यांच्या सहवासाची आवड नसणे.

भगवद गीता अध्याय 13 श्लोक 11

भगवद-गीता-अध्याय-13-श्लोक-11

भगवद गीता अध्याय 13 श्लोकआणि अर्थ

             अध्यात्म ज्ञानात नित्य स्थिती आणि तत्त्वज्ञानाचा अर्थ जो परमात्मा त्यालाच पाहणे, हे सर्व ज्ञान होय आणि याउलट जे असेल, ते अज्ञान होय, असे म्हटले आहे.

              जे ज्ञान नाही ते अज्ञान होय. ज्ञान कशास म्हणावे हे सांगताना भगवंत म्हणतात की, निराभिमान, अदंभत्व, अहिंसा, आर्जवत्व, क्षमाशीलत्व, अमानित्व. सत्याचा आग्रह, मनोनिग्रह, आत्मनिग्रह, सत्यवचनी, मितभाषी, मृदू व मधुरभाषी, जीतेंन्द्रियत्व, शुची, निरहंकार, अनासक्ती, निर्माहत्व, समत्व, भगवंतावर नितांत भक्ती, श्रद्धा व दृढविश्वास, एकांतवास, आत्म्याचा अभ्यास व परमात्म्याची अनुभूती, गुरूसान्निध्य व सत्संगती, सहनशीलत्व, असंग्रह, विवेक व सावधानता, हे सर्व सद्‌गुण जाणणे व त्यांचा अंगीकार करणे यालाच ज्ञान असे म्हणतात.

                क्षेत्राला अनेक विकारांनी ग्रासलेले असते. त्यामुळे क्षेत्र मलिन होते. त्यासाठी चित्तशुद्धी होणे महत्त्वाचे असते. क्षेत्राचा अभ्यास करून एकेक अवगुण किंवा विकार हुडकून बाजूला काढणे व त्याजागी सद्गुणांची पेरणी करणे महत्त्वाचे असते. सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली जर अध्यात्माचा योग्य अभ्यास केला तर चांगले सद्‌गुण अंगी बाणतील व आध्यात्मिक प्रगतीला प्रोत्साहन मिळेल. दुर्गुण सोडणे अतिशय अवघड आहे. त्यासाठी दृढनिश्चय व चिकाटी हवी. सद्गुण अंगी बाणण्यासाठी प्रयत्न व मनोनिग्रह हवा. योग्य संस्कारांची गरज असते. आस्तिकता हवी.

भगवद गीता अध्याय 13 श्लोक 12

भगवद-गीता-अध्याय-13-श्लोक-12

भगवद गीता अध्याय 13 श्लोकआणि अर्थ

                जे जाणण्याजोगे आहे आणि जे जाणल्यामुळे मनुष्याला परम आनंद मिळतो, ते चांगल्या प्रकारे सांगतो. ते अनादी परमब्रह्म सत्ही म्हणता येत नाही आणि असत्ही म्हणता येत नाही.

                   भगवंतांनी क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांचे वर्णन केले आहे. तसेच क्षेत्रज्ञाला कसे जाणावे हेही सांगितले. आता भगवंत, क्षेत्राचे जे घटक आत्मा व परमात्मा याची माहिती देत आहेत. भगवंत हे क्षेत्रज्ञ आहेत. भगवंत हे परमात्मा आहेत. भगवंत हे आनंदब्रह्म आहेत. क्षेत्रज्ञ हे अनादी, अक्षर आहेत. प्रयत्न केल्यास परब्रह्म जाणता येते.

                       ब्रह्म जाणल्याने अमृतसेवनाचा आनंद प्राप्त होतो. परब्रह्म जाणल्यामुळे परमानंद प्राप्त होतो. असे हे ब्रह्म सत्ही नाही आणि असत्ही नाही. ब्रह्म हे भौतिक प्रकृतीच्या कार्यकारणांच्याही पलीकडे, पण भगवंताच्या अधीन आहे. क्षेत्रज्ञ हा कधीच जन्मत नाही व मृतही होत नाही. तो ज्ञानमयी आहे. भगवंत हे त्रिगुणांचे स्वामी आहेत. भगवंत क्षेत्र व क्षेत्राचा स्वामी या दोघांना जाणतात, म्हणून भगवंतांना क्षेत्रज्ञ म्हणतात.

                जीवात्मा हा शरीरापासून जरी भिन्न असला तरी त्याचा कोणत्या ना कोणत्या रूपाने देहाशी संबंध येतोच. जीवाला आपल्या शरीराचे ज्ञान असते; पण त्याला इतर शरीराचे ज्ञान असू शकत नाही. भगवंतरूपी परमात्मा मात्र सर्व जीवांमध्ये वास करीत असतो.

भगवद गीता अध्याय 13 श्लोक 13

भगवद-गीता-अध्याय-13-श्लोक-13

भगवद गीता अध्याय 13 श्लोकआणि अर्थ

                 सर्व बाजूंनी हात-पाय असलेले, सर्व बाजूंनी डोळे, डोकी व तोंडे असलेले, तसेच सर्व बाजूंनी कान असलेले आहे; कारण ते विश्वात सर्वाला व्यापून राहिले आहे.

                सूर्य सर्वव्यापी आहे. सूर्याचा प्रकाश सर्व दिशांमध्ये सारख्याच तीव्रतेने पडत असतो. त्याप्रमाणे भगवंत सर्वव्यापी आहे. भगवंत प्रत्येक सजीवामध्ये स्थित असतो. जेवढे सजीव आहेत तेवढे सर्व बाजूंनी परमात्म्याला हात व पाय असतात. सर्व बाजूंनी डोळे असतात. सर्व बाजूंनी डोकी असतात. सर्व बाजूंनी तोंडे असतात. सर्व बाजूंनी कान असतात; कारण परमात्मा विश्वव्यापी आहे.

                प्रत्येक आत्मा मात्र एकटा व स्वतंत्र असतो. तो सर्वव्यापी नसतो. तो विश्वव्यापी नसतो. जेव्हा आपल्याला ज्ञान होते तेव्हा या गोष्टी आपल्याला समजू लागतात.

           भौतिक प्रकृतीद्वारे बद्ध झालेला जीव हा परमात्मा नाही, मात्मा आपल्या हातांचा हवा तेवढा विस्तार करू शकतो.; शकत नाही. म्हणून सर्वव्यापी भगवंताचे आपण स्मरण केले पाहिजे. प्रत्येक वस्तुमात्रामध्ये परमात्मा पाहायला शिकले पाहिजे. प्राणिमात्रांवर प्रेम करायला शिकले पाहिजे. कधीही दुसऱ्याचे मन दुखवू नये. भूतदया दाखवावी.

भगवद गीता अध्याय 13 श्लोक 14

भगवद-गीता-अध्याय-13-श्लोक-14

भगवद गीता अध्याय 13 श्लोकआणि अर्थ

                    ते सर्व इंद्रियांच्या विषयांना जाणणारे आहे; परंतु वास्तविक सर्व इंद्रियांनी रहित आहे. ते आसक्तिरहित असूनही सर्वांचे धारण-पोषण करणारे आणि निर्गुण असूनही गुणांचा भोग घेणारे आहे.

                       परमात्मा सर्व इंद्रियांचे उगमस्थान आहे; पण तो स्वतः मात्र इंद्रियरहित आहे. सर्व सजीवांची इंद्रिये ही त्याचीच इंद्रिये आहेत. परमात्मा सर्व जीवांचे धारण व पोषण करणारा असला तरी तो स्वतः मात्र आसक्तिरहित आहे. परमात्मा निर्गुण असला तरी गुणांचा भोग घेणारा आहे. परमात्म्याची इंद्रिये दिव्य आणि अलौकिक असतात. म्हणून परमात्म्याला त्रिगुणी असे म्हणतात.

                  परमात्म्याचे हातदेखील दिव्य असतात. परमात्म्याला अर्पण केलेली पाने, फुले, पाणी, प्रसाद इ. उपचार तो आपल्या दिव्य इंद्रियांनी ग्रहण करतो. परमात्म्याचे डोळे दिव्य असतात. त्या दिव्य डोळ्यांनी तो सर्व प्राणिमात्रांना पाहू शकतो. एवढेच नव्हे तर सर्व जीवांच्या मनात, अंतःकरणात पाहू शकतो. परमात्मा भूत, भविष्य, वर्तमान या तीनही काळांतील घटना पाहू शकतो. परमात्मा प्रत्येक जीवाच्या हृदयात वास करतो.

                प्रत्येक जीवाच्या भूतकाळात काय घडले आहे, सध्या काय घडत आहे, आणि भविष्यात काय घडणार आहे, याचे ज्ञान परमात्म्याला असते; पण परमात्म्याला कोणी सहजासहजी जाणू शकत नाही. परमात्मा मायाधिपती आहे, मायाधीन नाही. परमात्मा जीवांच्या सर्व कर्मांचा साक्षी आहे.

भगवद गीता अध्याय 13 श्लोक 15

भगवद-गीता-अध्याय-13-श्लोक-15

भगवद गीता अध्याय 13 श्लोकआणि अर्थ

                ते चराचर सर्व प्राणिमात्रांच्या बाहेर व आत परिपूर्ण भरले आहे. तसेच चर आणि अचरही तेच आहे आणि ते सूक्ष्म असल्यामुळे कळण्याजोगे नाही. अतिशय जवळ आणि दूरही असलेले तेच आहे.परमसत्य भगवंत हे चराचरातील सर्व प्राणिमात्रांच्या देहात व देहाबाहेर सर्वत्र व्यापून राहिले आहेत.

             भौतिक आणि आध्यात्मिक जगात ते वावरत असतात. ते प्राप्त होण्यास अतिशय दुर्लभ असले व ते अतिशय दूर आहेत असे वाटत असले तरी ते प्रत्येक जीवाच्या हृदयात वास करतात. सर्व जीव हे भगवंताचेच अंश आहेत. भगवंत चरही आहेत आणि अचरही आहेत. जीवाचे मन व इंद्रिये भक्तिरसाने स्वच्छ व शुद्ध झाल्याशिवाय भगवंताचे दर्शन होत नाही.

               ज्या भक्ताने भगवंताचे प्रेम प्राप्त केले आहे, तो भगवंताला निरंतर पाहू शकतो. परमात्मा अतिशय सूक्ष्म असल्याने तो दिसतही नाही आणि कळतही नाही. भक्तीतयोग हा अत्यंत सुलभ असल्याने भक्तीयोगाद्वारेभक्ताला भगवंतापर्यंत पोहोचता येते. नवविधा भक्तीमधील सर्व भक्ती जरी शक्य झाल्या नाहीत तरी आपल्या प्रकृतीला साजेशी एखादी भक्ति अनन्यतेने केली तरी भगवंत प्रसन्न होऊ शकतो.

              प्रापंचिक माणसाला भक्तीयोगाशिवाय दुसरा सोपा व चांगला पर्याय नाही. कलियुगात नामस्मरण भक्तीचे महत्त्व सांगितले आहे. नामस्मरण जाता-येता, कार्य करताना, विश्रांती घेताना, भोजन करताना घ्यावयाचे सुलभ व सोपे साधन आहे.

भगवद गीता अध्याय 13 श्लोक 16

भगवद-गीता-अध्याय-13-श्लोक-16

भगवद गीता अध्याय 13 श्लोकआणि अर्थ

               तो परमात्मा विभागरहित एकरूप असा आकाशासारखा परिपूर्ण असूनही चराचर संपूर्ण भूतांमध्ये वेगवेगळा असल्यासारखा भासत आहे. तसाच तो जाणण्याजोगा परमात्मा विष्णुरूपाने भूतांचे धारण-पोषण करणारा, रुद्ररूपाने संहार करणारा आणि ब्रह्मदेवरूपाने सर्वांना उत्पन्न करणारा आहे.परमात्मा कसा आहे हे सांगताना भगवंत म्हणतात की, परमात्मा सर्व जीवांच्या हृदयात स्थित आहे.

                  याचा अर्थ परमात्मा सर्व जीवांत थोडा थोडा विभागला गेला आहे असे नव्हे. सूर्याचा प्रकाश सर्व चराचरात भरलेला आहे, सर्व दिशांना पसरला आहे, अनेक देशांतील लोकांना सूर्य वेगवेगळ्या ठिकाणी असल्याचे भासते म्हणून सूर्य अनेक नाहीत. तो एकच आहे व तो एकाच जागी स्थिर असतो, तसा परमात्मा सर्व चराचर भरून इरला आहे. आकाश जसे सर्व चराचर व्यापून राहिले आहे, मोकळ्या मडक्यातसुद्धा ते भरलेले असते. मडके फुटले तरी ते कमी होत नाही की जास्त होत नाही, त्याप्रमाणे परमात्मा सर्व जीवांत भरलेला आहे.

                जीव मृत्यू पावला तरी तो कमी होत नाही की जास्त होत नाही. परमात्मा ब्रह्मदेवाच्या रूपाने जीवांना उत्पन्न करतो किंवा जन्माला घालतो. विष्णुरूपाने धारण-पोषण करतो व शिवरूपाने संहार करतो. भगवंत हेच सर्व जीवांचे उगमस्थान, आश्रयस्थान व विश्रांतिस्थान आहेत.

भगवद गीता अध्याय 13 श्लोक 17

भगवद गीता अध्याय 13 श्लोक 17

भगवद गीता अध्याय 13 श्लोकआणि अर्थ

                ते परब्रह्म ज्योतींची ज्योत आणि मायेच्या अत्यंत पलीकडे म्हटले जाते. तो परमात्मा ज्ञानस्वरूप, जाणण्यास योग्य आणि तत्त्वज्ञानाने प्राप्त होण्याजोगा आहे. तसेच सर्वांच्या हृदयात विशेष रूपाने राहिलेला आहे.

                 भगवंत म्हणतात की, परब्रह्म हे सर्व प्रकाशमान वस्तूंमधील प्रकाशाचे उगमस्थान आहे. सूर्य, चंद्र, तारे, नक्षत्रे यांचा जो प्रकाश आहे त्यांचा उगम परब्रह्म आहे. अध्यात्मामध्ये सूर्य व चंद्र यांची आवशक्यता नसते. गरज असते ती भगवंताच्या तेजाची. भौतिक जगामध्ये भगवंताचे तेज किंवा ब्रह्मज्योत चंद्र, सूर्य, विद्युत, चैतन्य यामधून दिसून येते. परब्रह्माचे ज्ञान हे दिव्यज्ञान असते. भगवंत प्रथम योग्याला हृदयस्थ परमात्म्याचे दर्शन करवितात. भगवंताला जाणल्यानेच जीव जन्म-मरणाच्या पलीकडे जातो.

                  जीवात्मा आणि परमात्या जरी एकाच क्षेत्राचे क्षेत्रज्ञ असले तरी ते एकच नाहीत, ते भिन्न आहेत. परमात्मा हा ज्ञानस्वरूप असल्याने जाणण्याजोगा आहे. तत्त्वज्ञानाने तो साधकाला प्राप्त होऊ शकतो. जीव कोणत्याही योनीतील असो, चांगला-वाईट कसाही असो, लहान-मोठा केवढाही असो, त्या प्रत्येक जीवाच्या हृदयामध्ये परमात्मा भगवंत वास करतात, हे जाणणे व त्याप्रमाणे वागणे म्हणजे ज्ञान होय. परब्रह्म हे मायेच्या पलीकडे असते.

भगवद गीता अध्याय 13 श्लोक 18

भगवद-गीता-अध्याय-13-श्लोक-18

भगवद गीता अध्याय 13 श्लोकआणि अर्थ

             अशाप्रकारे क्षेत्र तसेच ज्ञान आणि जाणण्याजोगे परमात्म्याचे स्वरूप थोडक्यात सांगितले. माझा भक्त हे तत्त्वतः जाणून माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो.

                या अध्यायात भगवंतांनी आतापर्यंत आपणास क्षेत्र (शरीर), ज्ञान व ज्ञेय (जणण्याजोगे परमात्म्याचे स्वरूप) यांचे थोडक्यात वर्णन सांगितले. ज्ञान हे तीन तत्त्वांचे असते. ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञानमार्ग यांच्या एकत्रीकरणाला विज्ञान असे म्हणतात अनन्य भगवद्भक्तांना हे ज्ञान प्राप्त होऊ शकते. इतरांना नाही. भक्तीयोगाला जाणण्याची प्राथमिक पायरी म्हणजेच ज्ञान होय. पहिल्या सहा श्लोकांमध्ये भगवंतांनी क्षेत्र किंवा शरीर यांची माहिती दिली.

                पुढच्या सहा श्लोकांमध्ये क्षेत्रज्ञाच्या ज्ञानमार्गाची माहिती सांगितली. नंतरच्या सहा श्लोकांमध्ये भगवंतांनी आत्मा व परमात्मा या क्षेत्रज्ञांची माहिती सांगितली आहे. क्षेत्र (शरीर). ज्ञाता म्हणजे क्षेत्रज्ञ (आत्मा व परमात्मा), ज्ञेय म्हणजे परमात्म्याला जाणण्याचे स्वरूप. या तीनही गोष्टींचे ज्ञान होणे म्हणजेच विज्ञान प्राप्त होणे होय.

                  जे भगवंतांची अनन्यतेने भक्ती करतात, जे सद्‌गुरूंनी दाखविलेल्या मार्गाने जातात, जे शास्त्राने सांगितलेल्या मार्गाप्रमाणे वागतात, जे वेद व उपनिषदे यांनी सांगितलेल्या तत्त्वांचे आचरण करतात असे भक्त भगवंताला आवडतात. अशा भक्तांचा उद्धार भगवंत करतात. असे भक्त भगवद्स्वरूपाला प्राप्त होतात.

भगवद गीता अध्याय 13 श्लोक 19

भगवद-गीता-अध्याय-13-श्लोक-19

भगवद गीता अध्याय 13 श्लोकआणि अर्थ

                 प्रकृती आणि पुरुष हे दोन्हीही अनादी आहेत, असे तू समज आणि राग-द्वेषादी विकार तसेच त्रिगुणात्मक सर्व पदार्थही प्रकृतीपासूनच उत्पन्न झालेले आहेत, असे समज. ज्ञानप्राप्ती झाल्यावर मनुष्य क्षेत्र (शरीर), क्षेत्रज्ञ (आत्मा व परमात्मा) यांना जाणू शकतो. शरीर हे कार्यक्षेत्र आहे. ते चोवीस तत्त्वांनी बनलेले आहे.

               भौतिक प्रकृतीपासून बनलेले आहे. देह धारण केलेला आणि देहाच्या कार्याचा उपभोग घेणारा जीव म्हणजे पुरुष होय. तो म्हणजेच जीवात्मा होय. जीवात्मा व परमात्मा हे दोन क्षेत्रज्ञ आहेत. ते एकाच जीवात असले तरी दोन्ही भिन्न क्षेत्रज्ञ आहेत. भगवंताच्या त्या दोन भिन्न अभिव्यक्ती आहेत. जीव हे भगवंताचे शक्तितत्त्व आहे, तर परमात्मा हा भगवंताचा अंश आहे.

                 जीव किंवा पुरुष व भौतिक प्रकृती दोन्हीही नित्य आहेत, अनादी आहेत. ते सृष्टीच्या उत्पत्तीच्या आधीही अस्तित्वात होते. प्रकृती आणि पुरुष दोन्हीही भगवंताच्या शक्तीच आहेत. भगवंत जेव्हा सृष्टीची निर्मिती करतात, तेव्हा मरुत तत्त्वापासून निर्मिती करतात.

             जीवाला भगवंताची कर्मे करण्याची, सेवा करण्याची संधी दिली जाते व पुरुषाची निर्मिती होते. हेच सृष्टीचे रहस्य आहे. वास्तविक जीव हा भगवंताचाच अंश आहे; पण विद्रोही स्वभावामुळे त्यांना जीवसृष्टीतच जन्म घ्यावा लागतो. त्रिगुण, सुख-दुःखादी विकार प्रकृतीपासून उत्पन्न होतात

भगवद गीता अध्याय 13 श्लोक 20

भगवद-गीता-अध्याय-13-श्लोक-20

भगवद गीता अध्याय 13 श्लोकआणि अर्थ

                  कार्य व करण यांच्या उत्पत्तीचे कारण प्रकृती म्हटली जाते आणि जीवात्मा सुख-दुःखांच्या भोगण्याला कारण म्हटला जातो.

                भगवंत म्हणतात की, प्रकृती ही सर्व कार्य कारणांना कारणीभूत असते. जीवांच्या चौऱ्याऐंशी लक्ष योनींची उत्पत्ती प्रकृतीमुळे होते. तसेच जीवांचे शरीर व इंद्रिये प्रकृतीपासून निर्माण होतात. इंद्रियसुखांच्या कामनेमुळे जीवांना निरनिराळ्या योनींमध्ये जन्म घ्यावा लागतो. मरणसमयी जीव ज्या गोष्टींची इच्छा करतात त्याप्रमाणे त्यांना जन्म घ्यावा लागतो.

              जे भगवंताचे नामस्मरण करतात, त्यांची भगवंत जन्म-मरणापासून सुटका करतात. त्यांना भगवंत मोक्षप्राप्ती करून देतात. देह प्राप्त झाला की, जीवाला सुख- दुःखे भोगावीच लागतात. शरीराला क्लेश प्राप्त झाले की, जीवात्म्यालादेखील क्लेश भोगावे लागतात. जीवात्मा सुख-दुःखांना कारणीभूत नसून देहच कारणीभूत असतो. देहाच्या मूळ स्थितीमध्ये आनंदच भरलेला असतो. तीच त्याची स्वरूपस्थिती असते. प्रकृतीवर स्वामित्व गाजविण्याच्या इच्छेमुळेच तो या प्रकृतीत वास करतो.

               इंद्रिये ही कामनापूर्ती करण्याची साधने आहेत. जीवाला आपल्या गतजन्मातील इच्छा आणि कर्मानुसार सुखकारक किंवा दुःखकारक परिस्थिती निर्माण होते. इच्छेनुसार प्रकृती त्याला साधने पुरविते आणि जीव त्या सुख-दुःखाला कारणीभूत होतो. जीव प्रकृतीच्या अधीन होतो. सर्पाला सर्पाप्रमाणेच वागावे लागते. मनुष्याचा जन्म प्राप्त झाला तर नितांत भक्ती करून भगवंताची प्राप्ती करावी.

भगवद गीता अध्याय 13 श्लोक 21

भगवद-गीता-अध्याय-13-श्लोक-21

भगवद गीता अध्याय 13 श्लोकआणि अर्थ

                 प्रकृतीत राहिलेला पुरुष प्रकृतीपासून उत्पन्न झालेल्या त्रिगुणात्मक पदार्थांना भोगतो आणि या गुणांची संगतीच या जीवात्म्याला बऱ्या-वाईट योनींत जन्म मिळण्याला कारण आहे.

               भगवंत म्हणतात की, मनुष्य ज्याप्रमाणे वस्त्रे बदलतो त्याप्रमाणे जीव एका देहानंतर दुसऱ्या देहात स्थानांतर करतो. जन्माला आला की, त्या देहाला मृत्यू हा येणारच. पंचत्वातून निर्माण झालेला जीव पंचत्वात विलीन होणारच. प्रकृतीपासून निर्माण झालेला जीव प्रकृतीमध्ये नाश पावणारच. जोपर्यंत हा देह भौतिक प्रकृतीला मोहित झालेला असतो, तोपर्यंत तो अनेक जन्म घेतच राहतो.

               भौतिक प्रकृतीवर स्वामित्व गाजविण्याची त्याची इच्छा प्रबळ असते. ती इच्छा नाहीशी होईपर्यंत त्याला या सृष्टीत राहावेच लागते; पण त्यासाठी त्याला निरनिराळे जन्म घ्यावे लागतात. सत्त्व, रज, तम या त्रिगुणांचा संग जीवाला घडतो व त्याला अनेक जन्म घ्यावे लागतात. फक्त मनुष्य देहातच जीवाला त्रिगुणातीत व्हायची संधी प्राप्त होते. विकारांवर विजय मिळविता येतो. भगवंताची भक्ती करून या योनींच्या चक्रातून सुटका करून घेता येते. मनुष्य योनी ही सर्व योनींमध्ये सर्वश्रेष्ठ योनी आहे, कारण मनुष्याचा मेंदू सर्वाधिक विकसित झाला आहे. कल्पना, विचार, स्मरण इ. शक्ती त्याला प्राप्त झालेल्या आहेत. भक्ताला योगाभ्यासाने ज्ञान प्राप्त होते

भगवद गीता अध्याय 13 श्लोक 22

भगवद-गीता-अध्याय-13-श्लोक-22

भगवद गीता अध्याय 13 श्लोकआणि अर्थ

              या देहात असलेला आत्मा वास्तविक परमात्माच आहे. तोच साक्षी असल्यामुळे उपद्रष्टा आणि खरी संमती देणारा असल्याने अनुमंता, सर्वांचे धारण- पोषण करणारा म्हणून भर्ता, जीवरूपाने भोक्ता, ब्रह्मदेव इत्यादींचाही स्वामी असल्याने महेश्वर आणि शुद्ध सच्चिदानंदघन असल्यामुळे परमात्मा म्हटला जातो.

             परमात्म्याचे वर्णन करताना भगवंत म्हणतात की, माझ्या श्रीकृष्ण रूपातील आत्मा हा परमात्माच आहे. परमात्मा हा काही सामान्य नव्हे. तो पर किंवा दिव्य आहे, अलौकिक आहे. परमात्मा साक्षी आहे. तो उपद्रष्टा आहे. तो खरी संमती देणारा म्हणजेच अनुमंता आहे. परमात्मा हाच सर्व जीवांचे धारण व पोषण करणारा आहे, तो प्रत्येक जीवाच्या ठायी असल्याने जीवाचा भोक्ता आहे. तो ब्रह्मदेवाचा स्वामी असल्याने तो देवांचाही देव म्हणजे महेश्वर आहे. तो सत् आहे, चित् आहे. आनंदघन आहे. म्हणून भगवंताच्या आत्म्याला परमात्मा म्हणतात. जीवात्मा व परमात्मा भिन्न आहेत.

                जीवात्मा फक्त एकट्या क्षेत्राचाच विचार करतो पण परमात्मा सर्व विश्वाचा विचार करतो; जीव हा भुक्त किंवा आश्रित आहे; पण भगवंत हा भोक्ता किंवा पालनकर्ता आहे. प्रत्येक जीव भगवंताचा अंश आहे आणि दोघांचे मित्रत्वाचे संबंध आहेत. जीवाने सर्व वासनायुक्त कर्मांचा त्याग करून श्रद्धा भगवंताकडे लावावी.

भगवद गीता अध्याय 13 श्लोक 23

भगवद-गीता-अध्याय-13-श्लोक-23

भगवद गीता अध्याय 13 श्लोकआणि अर्थ

            अशा रीतीने पुरुषाला आणि गुणांसहित प्रकृतीला जो मनुष्य तत्त्वतः जाणतो, तो सर्व प्रकारे कर्तव्य कर्मे करीत असला तरी पुन्हा जन्माला येत नाही.

                भगवंत म्हणतात की, पुरुष किंवा जीव (जीवात्मा व परमात्मा), भौतिक प्रकृती, त्रिगुण (सत्त्व, रज, तम), त्यांचे परस्पर कार्य किंवा संबंध यांचे जो पुरुष ज्ञान मिळवतो व ते आचरणात आणतो, अशा पुरुषाची किंवा भक्ताची पुनर्जन्मातून सुटका होते. त्याची वर्तमान स्थिती कशीही असली तरी त्याला मोक्षप्राप्ती होते. जीव हा प्रकृतीच्या कचाट्यात सापडला आहे. तो पतित झाला आहे.

               त्याची सुटका केली पाहिजे हे निश्चितपणे जाणणे म्हणजे ज्ञानप्राप्ती होणे होय. संतसमागम, सत्संग, गुरुसानिध्य यामुळे स्वस्वरूप समजते. वेद, उपनिषदे, शास्त्रे यांनी आखून दिलेल्या मार्गाने जाऊन जर साधकाने आत्मोन्नती केली तर भगवंत त्याला काही दूर नाही. सदाचरण, निष्काम कर्म, अनन्य भक्ती यामुळे भक्त भगवंताचा लाडका बनतो. निर्मोह, असंग्रह, विरक्ती यामुळे अंतःकरण, चित्त शुद्ध होते. भगवंतांनी ज्ञानयोग, कर्मयोग, ध्यानयोग व भक्तियोग असे अनेक पर्याय भक्तापुढे ठेवले आहेत.

                आपल्या प्रकृतीला साजेसा पर्याय शोधून जर साधना केली तर भगवंतप्राप्ती निश्चित होते. भक्तियोग हा सर्व साधनांतील अत्यंत सोपे साधन आहे, असे भगवंत म्हणतात. भक्तियोगातसुद्धा भक्तीचे नऊ प्रकार सांगितले आहेत.

भगवद गीता अध्याय 13 श्लोक 24

भगवद-गीता-अध्याय-13-श्लोक-24

भगवद गीता अध्याय 13 श्लोकआणि अर्थ

               त्या परमात्म्याला काही जण शुद्ध झालेल्या सूक्ष्म बुद्धीने ध्यानाच्या योगाने हृदयात पाहतात. दुसरे काही जण ज्ञानयोगाच्या द्वारा आणि इतर कित्ती तरी लोक कर्मयोगाच्या द्वारा पाहतात म्हणजेच प्राप्त करून घेतात. समाजात मुख्यत्वे दोन प्रकारचे लोक आढळतात. एक म्हणजे भगवंत नाही असे मानतात. दुसरे म्हणजे भगवंत आहे असे मानतात. जे नास्तिक लोक असतात त्यातसुद्धा काही लोक म्हणतात की, सृष्टी म्हणजे सर्वेसर्वा काही लोक मंत्रांचा व श्लोकांचा चुकीचा अर्थ लावून भगवंत ही संकल्पनाच खोटी आहे असे मानतात. काही अज्ञानी लोक संशयखोर असतात. ते भगवंताला मानायलाच तयार होत नाहीत.

           अशा सर्व अज्ञानी लोकांना विषयभोगांची लालसा अधिक असते. त्यांना खालच्या योनीत जन्म घ्यावे लागतात. जे आस्तिक लोक असतात, त्या भक्तांचेदेखील चार प्रकार असतात हे आपण मागे पहिले आहे. हे भक्त ज्ञानयोग, ध्यानयोग, कर्मयोग व भक्तियोग अशा चार साधन प्रकारांपैकी एका प्रकारच्या साधनाचा स्वीकार करतात. ज्ञानयोगी जीवाच्या चोवीस तत्त्वांचे पृथ्थःकरण करतात व त्यापलीकडे जाऊन भगवंत प्राप्ती करतात. कर्मयोगी लोक निष्काम कर्म ईश्वराला अर्पण करतात. ध्यानयोगी समाधी अवस्थेत जाऊन भगवंत प्राप्ती करतात. भक्तियोगी अनन्य भक्ती करतात.

भगवद गीता अध्याय 13 श्लोक 25

भगवद-गीता-अध्याय-13-श्लोक-25

भगवद गीता अध्याय 13 श्लोकआणि अर्थ

             परंतु यांखेरीज इतर मंदबुद्धीचे पुरुष आहेत, ते अशाप्रकारे न जाणणारे असतात. ते दुसऱ्यांकडून म्हणजेच तत्त्वज्ञानी पुरुषांकडून ऐकूनच तदनुसार उपासना करतात आणि ते ऐकलेले प्रमाण मानणारे पुरुषसुद्धा मृत्युरूप संसारसागर खात्रीने तरून जातात.

             सध्याच्या धावपळीच्या जगातील लोकांसाठी वरील श्लोक तंतोतंत उपयोगी पडणार आहे. भगवंत म्हणतात की, काही मंदबुद्धी लोक दुसऱ्यांनी उपदेश केला की, त्याप्रमाणे साधना करू लागतात. त्यांना श्रवणभक्ती अधिक प्रिय असते. प्रवचन, कीर्तन, निरुपण, ध्वनिफितींचे श्रवण इ. श्रवणमाध्यमेदेखील त्यांना खूप आवडतात.

          एखादा चांगला अभ्यासू गुरू मिळाला तर त्या साधकाची प्रगती होते; पण एखादा भोंदू साधू भेटला तर मात्र तो चुकीच्या मार्गाने जाऊन अध्यात्मात त्याची अधोगती होऊ शकते. म्हणून सद्‌गुरू भेटणे हीसुद्धा भाग्याची गोष्ट समजली जाते. तोही एक नशिबाचाच भाग आहे. सतत सद्‌गुरूंच्या शोधात राहावे, पण एकदा का सद्‌गुरू भेटले की, त्यांच्या मार्गदर्शनानुसार भक्ती करावी. नेहमी सत्संग ठेवावा.

            नेहमी संतांच्या सहवासात राहावे. सतत नामस्मरण करावे. कलियुगात नामस्मरणाला फार महत्त्व आहे. भक्तांनी अनन्य भक्ती केली की, त्यांना पुनर्जन्म लाभत नाही. त्यांची जन्म-मरणाच्या चक्रातून सुटका होते. असे भगवंतांनी आवर्जून सांगितले आहे.

भगवद गीता अध्याय 13 श्लोक 26

भगवद-गीता-अध्याय-13-श्लोक-26

भगवद गीता अध्याय 13 श्लोकआणि अर्थ

                 हे भरतर्षभा ! जेवढे म्हणून स्थावर जंगम प्राणी उत्पन्न होतात, ते सर्व क्षेत्र व क्षेत्रज्ञ यांच्या संयोगानेच उत्पन्न होतात, असे तू जाण.

                 या श्लोकाद्वारे भगवंतांनी सृष्टीच्या उत्पत्तीचे रहस्य उलगडून दाखविले आहे. भगवंत म्हणतात की, पर्वत, नद्या, समुद्र, जमीन यासारख्या अचर वस्तू व सर्व चर जीव म्हणजेच स्थावर व जंगम वस्तूंची उत्पत्ती ही क्षेत्र व क्षेत्रज्ञ यांच्या संयोगाने होते. म्हणजेच प्रकृती व पुरुष हे घटक अत्यंत महत्त्वाचे आहेत.

                आपण पाहिले की, क्षेत्र म्हणजे शरीर किंवा देह आणि क्षेत्रज्ञ म्हणजे जीवात्मा व परमात्मा होय. सृष्टी किंवा चराचर म्हणजे भौतिक प्रकृती व जीव यांचा संयोग होय. भगवंत हे परा व अपरा प्रकृतीचे नियंता आहेत. म्हणूनच प्रत्येक वस्तूत व जीवमात्रामध्ये भगवंताचा अंश आहे. यालाच परमात्मा असे म्हणतात. वस्तूवस्तूत परमात्मा पाहायला शिकणे हीच खरी भक्ती होय. मनुष्याने स्वतःच्या अंतःकरणातील भगवंत पाहायला शिकावे म्हणजे त्याला दुसऱ्याच्या अंतःकरणातील भगवंत अपोआप पाहता येईल. वृक्ष स्थिर असले तरी सजीव आहेत.

            जीवाशिवाय प्रकृतीला महत्त्व नाही व प्रकृतीशिवाय जीव शक्य नाही म्हणजेच दोन्हीही एकमेकांवर अवलंबून आहेत. याचाच अर्थ असा की, जे जे स्थावर व जंगम प्राणी उत्पन्न होतात, ते क्षेत्र व क्षेत्रज्ञ यांच्या संयोगानेच उत्पन्न होतात.

भगवद गीता अध्याय 13 श्लोक 27

भगवद गीता अध्याय 13 श्लोक 27

भगवद गीता अध्याय 13 श्लोकआणि अर्थ

              जो पुरुष नाशिवंत सर्व चराचर भूतांत परमेश्वर हा अविनाशी व सर्वत्र समभावाने स्थित असलेला पाहतो, तोच खरे पाहतो.

               हे सर्व जग, सृष्टी, चराचर नाशवंत आहे. या नाशवंत जगात सजीव किंवा भूत हे नाशवंतच आहेत. देह किंवा शरीर, शरीराचा स्वामी (जीव) किंवा जीवात्मा, व जीवाचा मित्र किंवा परमात्मा या तीन गोष्टी जो जाणतो तो ज्ञानी समजावा. या नाशवंत देहात जीवात्मा व परमात्मा हे मात्र अक्षय आहेत, अमर आहेत, संजीवन आहेत. जीव हा गावाचा मुख्य आहे अशी कल्पना केली, तर परमात्मा हा चराचराचा मुख्य आहे.

                 चराचरात कुठे काय चालले आहे, याचे ज्ञान परमात्म्याला असते. म्हणून परमात्मा हा परमेश्वर आहे. खरा साधक स्वतःच्या देहातील आत्मा व परमात्मा यांचे संबंध तर जाणतोच, पण सर्व देहांमध्ये जीवात्म्याला साथ देणाऱ्या परमात्म्याला पाहतो. प्रत्येक जीवात आत्म्याला सोबत करणारा परमात्मा असतोच, अशी त्याला खात्री असते. तो खरा यथार्थ ज्ञानी होय. तोच खरा वैज्ञानिक होय. प्रत्येक देहात परमात्मा किंवा भगवंत पाहणे ही अत्यंत पवित्र गोष्ट आहे. आचरणात प्रत्येक बाबतीत पावित्र्य आले की, तो भक्त भगवंताची अनन्य भक्ती करू लागतो. असा भक्त भगवंताला आवडतो. भगवंत अशा भक्ताला आपल्या स्वरूपात सामावून घेतो. त्याला मुक्ती

भगवद गीता अध्याय 13 श्लोक 28

भगवद-गीता-अध्याय-13-श्लोक-28

भगवद गीता अध्याय 13 श्लोकआणि अर्थ

     कारण जो पुरुष सर्वांमध्ये समरूपाने असलेल्या परमेश्वराला समान पाहून आपणच आपला नाश करून घेत नाही, त्यामुळे तो परमगतीला जातो.

ही सर्व सृष्टी भगवंतांनी निर्माण केली आहे, हे एकदा मान्य केले की, श्रद्धेमुळे व अनन्य भक्तीमुळे अंशरूपाने भगवंत प्रत्येक जीवाच्या ठायी वसलेला आहे हे समजायला लागते. हे समजायला लागले की, त्याची अनुभूती यायला लागते. मग चराचरात भगवंत सगळीकडे दिसायला लागतो. वनस्पती, पशू, पक्षी, कीटक, बालक, स्त्री, वृद्ध, अपंग, रुग्ण या सर्वांमध्ये भगवंत स्थित आहे हे भक्त जाणतो व त्याप्रमाणे तो आचरण करतो. वनस्पतींना तो आपले सोयरे मानतो. वाहणाऱ्या झऱ्यातून गीत ऐकतो. पशुपक्ष्यांवर प्रेम करतो. स्त्रियांना मातेसमान मानतो. वृद्ध, अपंग व रुग्णांची सेवा करतो. त्यांना मदत करतो.

                 सर्व प्राणिमात्रांशी समभावाने वागतो. भूतदया दाखवतो. आत्मा हा देहाचा स्वामी असला तरी त्याचे कार्यक्षेत्र देहापुरतेच असते; पण परमात्मा मात्र सर्व चराचराचा स्वामी आहे, ईश्वर आहे. चराचरातील सर्व जीवांचा आदी, मध्य व अंत भगवंतास ठाऊक असतो. भगवंताला जाणणारा भक्त हा आपले जीवन सार्थकी लावतो. अशा जीवाचा नाश होत नाही म्हणजेच त्याला परमगती प्राप्त होते. तो भक्त ईश्वरस्वरूप होतो.

भगवद गीता अध्याय 13 श्लोक 29

भगवद-गीता-अध्याय-13-श्लोक-29

          आणि जो पुरुष सर्व कर्मे सर्व प्रकारे प्रकृतीकडून केली जाणारी आहेत, असे पाहतो आणि आत्मा अकर्ता आहे, असे पाहतो, तोच खरा पाहतो.

                भगवंतांनी ही सृष्टी निर्माण केली. प्रकृती निर्माण केली. सर्वांवर भगवंताचेच नियंत्रण असते. परमात्म्याच्या मार्गदर्शनामुळे प्रकृती जीवांची निर्मिती करते. जीवांची निर्मिती झाली की, त्यांना त्यांच्या इच्छेनुसार कर्म करण्याची मुभा किंवा स्वातंत्र्य भगवंत जीवांना देतो. इंद्रियांद्वारे जीव इच्छेनुसार विषयभोग घेऊ लागतो.

            मन बुद्धीला वश करून इंद्रियांना ताब्यात घेते. मन इंद्रियांद्वारे मन मानेल तसे विषयभोग भोगू लागते. सुख मिळेल म्हणून भोग भोगले जातात; पण क्षणैक सुखामुळे त्याचे समाधान होत नाही. सत्ता, संपत्ती, कुटुंब, चैनीच्या वस्तू यामध्ये सुख आहे, असे वाटते, पण ते क्षणैकच असते. शाश्वत सुख फक्त भगवंतच देऊ शकतात. शाश्वत सुखाचा आनंद न संपणारा असतो. तो सत्चित् स्वरूप असतो. तो प्राप्त करण्यासाठी भक्त सतत प्रयत्न करीत असतो. मनाच्या हव्यासापोटी शरीर जरी बरी-वाईट कर्मे करीत असले तरी आत्मा व परमात्मा मात्र तटस्थ असतात.

          कर्मामुळे होणारे सुख-दुःख या दोन्ही आत्म्यांना भोगावे लागते. यथावकाश देह पडला म्हणजे देह नष्ट होतो; पण जीवात्मा व परमात्मा प्रकृतीने निर्माण केलेल्या दुसऱ्या देहात प्रवेश करतात. जीवात्मा व परमात्मा हे दोन्ही अक्षय आहेत.

भगवद गीता अध्याय 13 श्लोक 30

भगवद-गीता-अध्याय-13-श्लोक-30

               ज्या क्षणी हा पुरुष भूतांचे निरनिराळे भाव एका परमात्म्यातच असलेले आणि त्या परमात्म्यापासूनच सर्व भूतांचा विस्तार आहे, असे पाहतो, त्याच क्षणी तो सच्चिदानंदघन ब्रह्माला प्राप्त होतो.

या अध्यायात सुरुवातीला आपण पहिले की, परमात्म्याच्या इच्छेनुसार व मार्गदर्शनानुसार प्रकृती जीव निर्माण करते व त्यांच्या इच्छेनुसार त्यांना कर्म करण्याची मुभा देते. मन, चित्त, बुद्धी व अंतःकरण यांच्या ठायी एखाद्या विषयासंबंधी विचार सुरू झाला की, जर चित्त शुद्ध नसेल आणि अंतःकरण दूषित असेल तर मन बुद्धीवर ताबा मिळविते. एकदा का बुद्धी भ्रष्ट झाली की, मन आपल्या मनाप्रमाणे इंद्रियांच्या द्वारे शरीरास विषयभोग भोगण्याची सवय लावते; कारण एकदा विषय भोगल्यानंतर तृप्ती होत नसते, कारण विषयापासून मिळणारे सुख हे क्षणभंगुर असते. ते शाश्वत नसते. त्यामुळे मनुष्य वासनेच्या मोहमायेत अडकून राहतो. त्यातून त्याची सुटका होत नाही व तो कायम सुख- दुःखे भोगत राहतो; पण जो अनन्य भक्तीने, सत्संगतीने, सत्कर्माने चित्त शुद्ध करतो, अंतःकरण निर्मळ करतो, बुद्धी स्थिर ठेवून मन ताब्यात ठेवतो, असा भक्त चराचरातील प्रत्येक जीवाकडे समदृष्टीने पाहतो. परमात्म्यापासून विश्वाची उत्पत्ती झाली असे मानतो. प्रत्येक जीवात त्याला परमात्मा दिसतो. असा भक्त परमगतीला प्राप्त होतो.

भगवद गीता अध्याय 13 श्लोक 31

भगवद गीता अध्याय 13 श्लोक 31

                 हे कौंतेया! हा अविनाशी परमात्मा अनादी आणि निर्गुण असल्यामुळे शरीरात राहत असूनही वास्तविक तो काही करीत नाही आणि लिप्त होत नाही.

जीर्ण झालेले वस्त्र टाकून आपण दुसरे वस्त्र परिधान करतो, त्यानमाणे एक नाशवंत देह जीर्ण झाल्यानंतर जीव दुसरा देह स्वीकारतो. पूर्वकर्मात केलेल्या कर्माच्या पाप-पुण्यानुसार त्याला दुसरा देह प्राप्त होतो. मग तो वरच्या किंवा खालच्या योनीत असेल. जीवात असणारे आत्मा व परमात्मा मात्र अविनाशी असतात. ते अनादी असून निर्गुण असतात. ते अव्ययी, दिव्य व शाश्वत असतात. ते अशाश्वत देहात राहतात. देहाची चाललेली सर्व कर्मे तटस्थपणे पाहतात.

          परमात्मा कर्मात भाग घेत नाही. तो काहीच करीत नाही. तो लिप्तही होत नाही. त्याचा नाश होत नाही. कर्मापासून निर्माण होणारे सुख, दुःख, क्लेश त्याला मात्र सहन करावे लागतात; पण त्याबद्दल त्याची काहीच तक्रार नसते. तो मुकाट्याने सर्व सहन करतो. तो स्वतः निर्गुण व निराकार असतो.

             अशा आत्म्याला व परमात्म्याला जाणणे हे प्रत्येक भक्ताचे प्रमुख कर्तव्य असते. असा अनन्य भक्त पशू, पक्षी, लहान, थोर असा भेदभाव मानीत नाही. तो सर्व सजीवांकडे सर्वसमभावाने पाहतो. सर्वांशी प्रेमाने वागतो. सर्वांची ईश्वर समजून सेवा करतो. स्वतःच्या व इतरांच्या देहातील आत्मा व परमात्मा त्याला दिसतो.

भगवद गीता अध्याय 13 श्लोक 32

भगवदगीता अध्याय 13 श्लोक 32

              ज्याप्रमाणे सर्वत्र व्यापलेले आकाश सूक्ष्म असल्या कारणाने लिप्त होत नाही त्याचप्रमाणे देहात सर्वत्र व्यापून असलेला आत्मा निर्गुण असल्या कारणाने देहाच्या गुणांनी लिप्त होत नाही.

              सर्व चराचरात आकाश व्यापून राहिले आहे. अशी एकही मोकळी जागा नाही की, तेथे आकाश नाही. मोकळ्या मडक्यातसुद्धा आकाश व्यापून असते. मडके फुटले तरी आकाश नाहीसे होत नाही. सर्व आसमंत वायूने व्याप्त झाले आहे. पाणी, चिखल, विष्ठा इ. सर्व पदार्थात वायू प्रवेश करतो; परंतु तो कशातही लिप्त होत नाही.

             पाणी आटले तरी तो मूळ स्वरूपात विलीन होतो. चिखल नाहीसा झाला तरी वायू मूळ स्वरूपात विलीन होतो, कारण आकाश किंवा वायू हे सूक्ष्म आहेत. ते सूक्ष्म असल्याने लिप्त होत नाहीत. प्रत्येक देहात आत्मा सर्वत्र व्यापून राहिला आहे. तो निर्गुण आहे, त्यामुळे देहाचा जरी सत्त्व, रज, तम यापैकी कोणताही गुण असला तरी त्यामुळे आत्मा नाहीसा होत नाही, हा महत्वाचा संदेशवरील श्लोकात सांगितला आहे. आत्मा नष्ट होत नाही, कारण तो अतिसूक्ष्म आहे.

              आत्मा नाहीसा होत नाही, कारण तो निर्गुण आहे, निराकार आहे. तो पाहता येत नसला तरी जाणता येतो. तो सगुण नसला तरी त्याची अनुभूती घेता येते. ज्यांनी अनुभूती घेतली, त्यांच्या मार्गाने गेलेल्या साधकालादेखील परमात्म्याची किंवा भगवंताची अनुभूती घेता येते. त्यासाठी मात्र अनन्य भक्ती करायला हवी. देवावर श्रद्धा हवी.

भगवद गीता अध्याय 13 श्लोक 33

भगवद-गीता-अध्याय-13-श्लोक-33

                 हे भारता! ज्याप्रमाणे एकच सूर्य या संपूर्ण ब्रह्मांडाला प्रकाशित करतो, त्याचप्रमाणे एकच आत्मा संपूर्ण क्षेत्राला प्रकाशित करतो. आत्म्याचे विश्लेषण करताना भगवंत अर्जुनाला म्हणतात की, एकच

              सूर्य एका ठिकाणी स्थित असला तरी संपूर्ण ब्रह्मांडाला प्रकाशित करतो. त्याप्रमाणे एकच आत्मा संपूर्ण क्षेत्राला म्हणजेच शरीराला चेतना रूपाने प्रकाशित करतो. आत्म्यामुळे देहाला चैतन्य प्राप्त होते. देहात जर आत्माच नसेल तर त्या देहात चैतन्यच नसते.

           त्या देहाला कलेवर म्हणतात किंवा प्रेत म्हणतात. प्राण किंवा आत्मा निघून गेला की, तो देह लगेच नष्ट होऊ लागतो. आत्म्यामुळे मिळणारी चेतना त्या देहापुरातीच मर्यादित असते; पण परमात्मा मात्र संपूर्ण चराचराला चेतना पुरवितो. सारी सृष्टी चैतन्यमय होते. आत्मा आणि परमात्मा यामध्ये हा महत्त्वाचा फरक आहे. ज्याप्रमाणे सूर्यप्रकाश हा सूर्याच्या अस्तित्वाचे प्रमाण आहे, त्याप्रमाणे चैतन्य हे आत्म्याच्या अस्तित्वाचे प्रमाण आहे.

           आत्म्याने देहत्याग करताच चेतानाही निघून जाते. चेतना ही पदार्थांच्या संयोगाने निर्माण होत नाही, तर ती आत्म्यामुळे निर्माण होते. एका शरीराची चेतना दुसऱ्या शरीराला व्याप्त करू शकत नाही. त्यासाठी आत्म्याची शक्ती कमी पडते. परमात्याची चेतना मात्र एवढी प्रचंड असते की, ती संपूर्ण चराचराला चैतन्य पुरविते. असा फरक जीवचेतना व परमचेतना यात आहे. जीवचेतना जीवापुरती असते, तर परमचेतना विश्वरूप असते.

भगवद गीता अध्याय 13 श्लोक 34

भगवद-गीता-अध्याय-13-श्लोक-34

                अशा प्रकारे क्षेत्र व क्षेत्रज्ञ यांतील भेद तसेच कार्यासह प्रकृतीपासून मुक्त होण्याचा मार्ग ज्ञानदृष्टीने जे पुरुष तत्त्वतः जाणतात, ते महात्मे परब्रह्म परमात्म्याला प्राप्त होतात.

                 या अध्यायामध्ये आठ ते बारा या श्लोकांमध्ये मोक्षमार्गाचे वर्णन आले आहे. या अध्यायामध्ये क्षेत्र, क्षेत्रज्ञ व परमात्मा याचे संबंध यांची माहिती आली आहे. हे गुह्यज्ञान भगवंतांनी अर्जुनास सांगितले आहे. भगवंत अर्जुनाला म्हणतात की, श्रद्धावान मनुष्याने प्रथम श्रवणाने व सत्संगतीने चित्तशुद्धी करावी. आध्यात्मिक गुरू हे आपल्या शिष्याला देहबुद्धीकडून अध्यात्मबुद्धीकडे नेण्यास मदत करतात. मग त्याला चोवीस तत्त्वांनी बनलेल्या जड देहाचे विश्लेषण करता येते. देह स्थूल आहे तर मन व मनोविकार या सूक्ष्म अभिव्यक्ती आहेत.

               या सर्वांच्या पलीकडे आत्मा असतो. आत्म्याहून श्रेष्ठ असा परमात्मा आहे. आत्मा आणि परमात्मा जरी भिन्न असले तरी ते मित्र आहेत. ज्ञानी भक्त आत्मा, परमात्मा व चोवीस तत्त्वांचे विकारासहित विश्लेषण यांची माहिती प्राप्त करून घेतो. त्यांची स्थिती जाणू शकतो. मनन व चिंतन याद्वारे हळूहळू तो अनुभूती घेत पुढे-पुढे वाटचाल करू लागतो. हे परमसत्य आहे. श्रीमद्भगवद्‌गीतारूपी उपनिषद तथा ब्रह्मविद्या आणि योगशास्त्राविषयी क्षेत्रक्षेत्रज्ञविभागयोग हा तेरावा अध्याय समाप्त झाला.

Leave a Comment