भगवद गीता अध्याय 14 ( गुणत्रयविभागयोग ) bhagwat geeta adhyay 14 in marathi

भगवद गीता अध्याय 14

भगवद गीता अध्याय 14 श्लोक 1

भगवद-गीता-अध्याय-14-श्लोक-1

भगवद गीता अध्याय 14 श्लोकआणि अर्थ

Table of Contents

                  भगवान श्रीकृष्ण म्हणाले, ज्ञानातीलही अतिइत्तम ते परमज्ञान मी तुला पुन्हा सांगतो की, जे जाणल्याने सर्व मुनिजन या संसारातून मुक्त होऊन परमसिद्धी पावले आहेत.

                तेराव्या अध्यायात भगवंतांनी सांगितले आहे की, विनम्र भावाने जर ज्ञानाची उपासना केली तर मनुष्य भौतिक व्यापातून मुक्त होतो. ज्या गुणांच्या आधारे मनुष्य भौतिक जगात गुरफटून जातो, त्या गुणांचे वर्णन भगवंत या अध्यायात करतात. ते गुण कोणते? ते गुण कसे कार्य करतात? मानवाला ते कसे बद्ध करतात? ते मानवाला कसे मुक्त करतात? याचे वर्णन या अध्यायात आले आहे.

                    आतापर्यंत भगवंतांनी जे काही ज्ञान दिले त्यापेक्षाही हे ज्ञान अधिक श्रेष्ठ आहे, असे भगवंतांचे म्हणणे आहे. अनेक श्रेष्ठ ऋषी-मुनींनी हे ज्ञान प्राप्त करून मोक्ष प्राप्त केला आहे व त्यांनी वैकुंठलोकी स्थान मिळविले आहे. जे प्रकृती व तिचे विकार यापासून सुटतात, ते परब्रह्म परमात्म्याला प्राप्त होतात. त्यांना ज्ञानी म्हणतात. मोक्ष लाभला की, पुनर्जन्म नाही.

                त्रिगुणात्मक प्रकृतीचे सत्त्व-रज-तम हे गुण अविनाशी आत्म्याला शरीरात बांधून ठेवतात. या अध्यायातून मिळणारे ज्ञान अत्यंत उपयोगी असे आहे. त्याचा लाभ अर्जुनाने घ्यावा, असे भगवंतांना मनापासून वाटते.

भगवद गीता अध्याय 14 श्लोक 2

भगवद गीता अध्याय 14 श्लोक 2

भगवद गीता अध्याय 14 श्लोकआणि अर्थ

                  हे ज्ञान धारण करून माझ्या स्वरूपाला प्राप्त झालेले पुरुष सृष्टीच्या आरंभी पुन्हा जन्माला येत नाहीत आणि प्रलयकाळीही व्याकुळ होत नाहीत या सामान्यतः कोणतेही ज्ञान हे सत्त्व, रज, तम यापैकी कोणत्या तरी एका गुणाने किंवा

                 दोन गुणांनी अथवा तीनही गुणांनी दूषित झालेले असते; पण दिव्यज्ञान हे कोणत्याच गुणांनी प्रदूषित झालेले नसते. असे दिव्य ज्ञान प्राप्त झालेला मनुष्य भगवंताला प्राप्त होतो. म्हणजेच त्याची या जन्म-मृत्यूच्या चक्रातून कायमची सुटका होते. असा पुरुष सृष्टीच्या आरंभी जन्माला येत नाही. तसेच प्रलयकाळी तो जन्म नसल्याने व्याकूळ होत नाही.

                    यासाठी साधकाला आध्यात्मिक गुण जोपासण्याची अत्यंत गरज आहे. असे गुण आत्मसात केले की, मग निष्काम कर्म करून व फलाशेचा त्याग करून स्वकर्म स्वधर्मात पालटता येते. मग चित्तशुद्धी होते. इंद्रिय संयमन करता येते. मग मन व बुद्धी स्थिर होते. मन व बुद्धी स्थिर झाली की, निदिध्यास प्राप्त होतो. निदिध्यासाने आत्मसाक्षात्कार होतो. आत्मसाक्षात्कार झाला की, मग मोक्ष प्राप्त होतो.

                तो भक्त भगवंतस्वरूप होतो. त्याला वैकुंठप्राप्ती होते. असे हे त्रिगुणांचे ज्ञान म्हणजे सर्व ज्ञानांचा राजा आहे. आतापर्यंत अशा अनेक ऋषी, मुनी, संत, साधू, सद्गुरू, भक्त, बैरागी, योगीजन यांनी हे ज्ञान प्राप्त करून घेऊन मुक्ती मिळविली आहे. असे हे ज्ञान पवित्र आहे.

भगवद गीता अध्याय 14 श्लोक 3

भगवद गीता अध्याय 14 श्लोक 3

भगवद गीता अध्याय 14 श्लोकआणि अर्थ

                  हे भारता ! माझी महत्ब्रह्मरूप मूळ प्रकृती संपूर्ण भूतांची योनी म्हणजे गर्भधारणा करण्याचे स्थान आहे आणि मी त्या योनीच्या ठिकाणी चेतन समुदायरूप गर्भाची स्थापना करतो. त्या जड-चेतन संयोगाने सर्व भूतांची उत्पत्ती होते.

                 भगवंत या श्लोकात सृष्टिविस्ताराचे वर्णन करीत आहेत. भगवंत म्हणतात की, क्षेत्र (शरीर) व क्षेत्रज्ञ (आत्मा) यांच्या संयोगाने प्राणिमात्रांची उत्पत्ती होते. ही उत्पत्ती भगवंतांमुळेच शक्य आहे. भौतिक प्रकृती व जीव यांचा संयोग भगवंत घडवून आणतात.

                  महत्तत्त्व हे सर्व सृष्टीचे कारण आहे. या परमतत्त्वामध्ये सत्त्व, रज, तम या तीन गुणांचा समावेश असतो. या परमतत्त्वालाच काही लोक ब्रह्म असे म्हणतात. महत्ब्रह्मरूप अशी जी मूळ प्रकृती हेच गर्भधारण करण्याचे ठिकाण आहे. त्यालाच योनी असे म्हणतात. त्या योनीच्या ठिकाणी भगवंत चेतन समुदायरूप गर्भाची स्थापना करतात. त्या जड-चेतन संयोगाने सर्व भूतांची उत्पत्ती होते. तसेच अनेक ब्रह्मांडांची उत्पत्ती होते. आकाश, बल, तेज, वायू, इ. सर्व मिळून चोवीस तत्त्वांचा भौतिक शक्तींमध्ये समावेश होतो. यालाच भौतिक प्रकृती असे म्हणतात.

              या अपरा प्रकृतीच्या पलीकडे परा प्रकृती आहे. त्या जीवाची उत्पत्ती भगवंतांमुळेच शक्य आहे. भौतिक प्रकृती ही जीवांच्या जन्माचे कारण नाही तर भगवंतांच्या इच्छेनुसार जीवाची निर्मिती होते. गतकर्मानुसार योनी व शरीर प्राप्त होते.

भगवद गीता अध्याय 14 श्लोक 4

भगवद-गीता-अध्याय-14-श्लोक-4

भगवद गीता अध्याय 14 श्लोकआणि अर्थ

                हे कौंतेया ! नाना प्रकारच्या सर्व जातीत जितके शरीरधारी प्राणी उत्पन्न होतात, त्या सर्वांचा गर्भ धारण करणारी माता प्रकृती आहे आणि बीज स्थापन करणारा पिता मी आहे.

                 भगवंतांनी या श्लोकात असे म्हटले आहे की, सर्व प्राणिमात्रांचे पिता स्वतः भगवंत आहेत. प्राणिमात्र म्हणजे अपरा प्रकृती व परा प्रकृती यांचा संयोग होय. या सृष्टीमध्ये अनेक प्रकारच्या योनी आहेत. त्या सर्व योनींमध्ये अनेक प्रकारचे प्राणिमात्र आहेत. या सर्व प्राणिमात्रांचा गर्भ धारण करणारी मूळ माता ही मूळ प्रकृती असून बीज स्थापन करणारा पिता स्वतः भगवंत आहेत. त्या त्या योनीतील नर व मादी अर्थात पिता व माता हे केवळ निमित्तमात्र आहेत. त्यामुळे प्रत्येक प्राणिमात्राच्या पूर्वकर्मानुसार कोणत्या योनीत कोणाला जन्म घालवायचा हे स्वतः भगवंत ठरवितात व त्या त्या जन्माप्रमाणे त्या प्राणिमात्राला सुख व दुःखे भोगावी लागतात.

               म्हणून या मनुष्य योनीतच जास्तीत जास्त पुण्यकर्म करून भगवंतप्राप्ती करून घेणे महत्त्वाचे आहे. इतर योनीमध्ये हे शक्य नाही, कारण त्यांची विचारक्षमता विकसित झालेली नसते. त्यांचा मेंदू पूर्ण विकसित झालेला नसतो. त्यामुळे त्यांना दिव्य ज्ञानप्राप्ती करता येत नाही. आपला जो मूळ पिता आहे त्याला शरण जाऊन आपण जास्तीत जास्त ज्ञानप्राप्ती करून घेतली पाहिजे.

भगवद गीता अध्याय 14 श्लोक 5

भगवद-गीता-अध्याय-14-श्लोक-5

भगवद गीता अध्याय 14 श्लोकआणि अर्थ

             हे महाबाहो ! सत्त्वगुण, रजोगुण आणि तमोगुण हे प्रकृतीपासून उत्पन्न झालेले तिन्ही गुण अविनाशी जीवात्म्याला शरीरात बांधून ठेवतात.

               वास्तविक जीवात्मा हा दिव्य आहे. त्याला भोतिक प्रकृतीशी काहीच देणे-घेणे नसते; परंतु भौतिक प्रकृतीपासून निर्माण झालेले सत्त्व, रज व तम हे त्रिगुण अविनाशी जीवात्म्याला शरीरात बांधून ठेवतात. त्यामुळे इच्छा नसली तरी जीवात्म्याला त्रिगुणांच्या वर्चस्वाखाली राहावेच लागते. पूर्वकर्मानुसार प्राप्त झालेली सुख-दुःखे भोगावीच लागतात. प्रकृतीच्या विविध रूपानुसार प्राणिमात्राला विविध शरीरे प्राप्त होतात.

              त्यामुळे त्या जीवात्म्याला त्या शरीरधर्मानुसार विविध कर्मे करावी लागतात व त्यामुळे तो सुख-दुःखाला कारणीभूत होतो. हे त्रिगुण या प्राणिमात्रावर अशी काही जादू करतात की, त्यायोगे प्राणिमात्र या मायारूपी भौतिक जगात गुरफटून जातो. याचेच रहस्य भगवंतांनी या अध्यायात सविस्तरपणे सांगितले आहे.

              सत्त्वगुणाचे वैशिष्ट्य काय? तो कसा ओळखावा? रजोगुण आपला प्रभाव कसा दाखवतो? तमोगुण म्हणजे काय? कोणता गुण चांगला ? कोणता वाईट? या सर्वांचे ज्ञान आपणास या अध्यायात पाहावयास मिळते. अविनाशी आत्मा मात्र या त्रिगुणांच्या प्रभावाला बळी पडतो. शरीराला प्राप्त झालेल्या गुणप्रभावामुळे सुख व दुःख भोगतो, यातना सहन करतो, क्लेश सहन करतो, त्रास सहन करतो.

भगवद गीता अध्याय 14 श्लोक 6

भगवद-गीता-अध्याय-14-श्लोक-6

भगवद गीता अध्याय 14 श्लोकआणि अर्थ

                  हे निष्पापा! त्या तीन गुणांमधील सत्त्वगुण निर्मळ असल्यामुळे प्रकाश उत्पन्न करणारा आणि विकाररहित आहे. तो सुखासंबंधीच्या आणि ज्ञानासंबंधीच्या अभिमानाने बांधतो.

                   भगवंतांनी त्रिगुणांपैकी पहिला जो सत्त्वगुण याचे वर्णन करण्यास सुरुवात केली आहे. भगवंत म्हणतात की, सत्त्वगुण हा निर्मळ आहे. सत्त्वगुण हा ज्ञानप्रकाश निर्माण करणारा आहे. तो विकाररहित आहे; पण तो ज्ञान व सुख यांच्या अभिमानाद्वारे बद्ध करतो. सत्त्वगुण प्रकाशमय आहे. तो जीवात्म्याला ज्ञानाभिमानाने बांधतो. सत्त्व म्हणजे सुख. देहात चेतना व जीवशक्ती सत्त्वाने वाढते.

                 सात्त्विक आचरणामुळे स्वर्ग लाभतो. सात्त्विक कर्मामुळे ज्ञान प्राप्त होते. सत्त्वगुण उत्तम असतो. सत्वगुणाचा विकास केल्यामुळे असा मनुष्य इतरांपेक्षा सुज्ञ किंवा बुद्धिमान होतो. भौतिक ज्ञानामध्ये प्रगती करावी, अशी जाणीव त्याला होते. त्याला दुःख त्या मानाने कमी प्राप्त होते. ब्रह्माचा अभ्यास करणारा ब्राह्मण हा सत्त्वगुणात स्थिर असतो.

                  सत्त्वगुणी मनुष्य पापकर्माच्या फळापासून मुक्त असतो. सत्त्वगुण म्हणजे अधिक ज्ञान व अधिक सुख असते. सत्त्वगुणी माणसाला ज्ञानाचा व सुखाचा अभिमान होतो व आपण इतरांपेक्षा अधिक श्रेष्ठ आहोत, अशी अहंकारी भावना त्याच्या मनात निर्माण होते. त्यांना मोक्षप्राप्ती वा वैकुंठप्राप्ती होत नाही.

भगवद गीता अध्याय 14 श्लोक 7

भगवद गीता अध्याय 14 श्लोक 7

भगवद गीता अध्याय 14 श्लोकआणि अर्थ

                हे कौंतेया! रागरूप रजोगुण इच्छा आणि आसक्ती यांपासून उत्पन्न झालेला आहे, असे समंज. तो या जीवात्म्याला कर्मांच्या आणि त्यांच्या फळांच्या संबंधाने बांधतो.

                  रजोगुणाविषयी भगवंत म्हणतात की, इच्छा आणि आसक्ती यापासून रागरूप धारण केलेला रजोगुण उत्पन्न होतो, जो कर्म व कर्मफळ यांच्या संबंधाने बद्ध होतो. रजोगुण कामना व आसक्तिमय आहे. तो जीवात्म्याला कर्म व कर्मफलाने बांधतो. रज म्हणजे कर्म. त्याने लोभ, लालसा व अशांती वाढते. जन्मबंधन वाढते. दुःख प्राप्त होते.

                 रजोगुण मध्यम असतो. रजोगुणाचे लक्षण म्हणजे स्त्री व पुरुष यामधील आकर्षण होय. या गुणाच्या बुद्धीने भौतिक सुखोपभोग घेण्याची लालसा उत्पन्न होते. इंद्रियसुख घेण्याची इच्छा निर्माण होते. रजोगुणी मनुष्याला मान, सन्मान, सत्ता, स्त्रीसुख, संपत्ती, धनदौलत, बंगला, गाडी यांचे आकर्षण असते. समाजाकडून व देशाकडून त्याला मानसन्मान मिळावा अशी अपेक्षा असते. या सर्व गोष्टी प्राप्त करण्यासाठी त्याला अतिशय प्रयत्न करावे लागतात. तो कर्मफळावर आसक्त असतो. त्यामुळे तो त्यातच बद्ध होतो.

                 कुटुंब, समाज, देश यांचे रक्षण करणे, त्यांना समृद्ध करणे, प्रतिष्ठा व मानसन्मान प्राप्त करणे यासाठी त्याला कर्म करावे लागते. म्हणूनच जगातील बहुतांश लोक रजोगुणीच असतात. पूर्वी सत्त्वगुण हा अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जाई. रजोगुण मध्यम समजला जातो.

भगवद गीता अध्याय 14 श्लोक 8

भगवद गीता अध्याय 14 श्लोक 8

भगवद गीता अध्याय 14 श्लोकआणि अर्थ 

             हे भारता ! सर्व देहाभिमानी पुरुषांना मोह पाडणारा तमोगुण अज्ञानापासून उत्पन्न झालेला आहे, असे समज. तो या जीवात्म्याला प्रमाद, आळस आणि निद्रा यांनी बांधतो.

                 तमोगुण हा बद्ध लोकांचा विशिष्ट गुण आहे. तमोगुणाच्या प्रभावामुळे मनुष्य वस्तूला यथार्थपणे जाणू शकत नाही. तमोगुण हा सत्त्वगुणाच्या अगदी विपरीत असतो. सत्त्वगुणामध्ये मनुष्य ज्ञानाचा आधार घेऊन सारासार विचार करू शकतो. तमोगुणामुळे मनुष्य अज्ञानामुळे भ्रांत होतो. तमोगुणी मनुष्य योग्य अयोग्य जाणू शकत नाही.

                त्यामुळे त्याची प्रगती होण्याऐवजी अधोगतीच होते. आपला मृत्यू, तसेच आपल्या मुलाबाळांचा मृत्यू निश्चित होणार आहे, हे माहीत असूनही तो अनीतीने, स्वार्थबुद्धीने, लोभापोटी नको इतके धन गोळा करीत असतो. याला प्रमाद म्हणतात. असे लोक आध्यात्मिक प्रगती करताना आळशी होतात. सत्कर्म करण्याऐवजी ते भरपूर झोप घेताना दिसतात. या सर्व गोष्टी ते अज्ञानाने करीत असतात, याची जाणीवही त्यांना नसते. तमोगुणी लोकांचा मनावर ताबा नसल्यामुळे ते काम व क्रोध यांना जवळ करतात.

               त्यांची बुद्धी भ्रष्ट झाल्यामुळे त्यांचा इंद्रियांवर ताबा नसतो. त्यामुळे ते शास्त्रविहित कर्मे न करता काम्य व निषिद्ध कर्मेच करताना दिसतात. धनसंचय, स्त्रीसुख, सत्ता मदिरासेवन, जुगार, भांडणतंटा, चोरी, लबाडी, खून, मारामारी इ. गोष्टींमध्ये तमोगुणी लोक रस घेतात. त्यामुळे ते दुःख भोगतात.

भगवद गीता अध्याय 14 श्लोक 9

भगवद-गीता-अध्याय-14-श्लोक-9

भगवद गीता अध्याय 14 श्लोकआणि अर्थ

                  हे भारता! सत्त्वगुण सुखाला, रजोगुण कर्माला तसेच तमोगुण ज्ञानाला झाकून प्रमाद करण्यालाही प्रवृत्त करतात. सत्त्वगुणी माणसे हा आपले सात्त्विक कर्म, दानधर्म, यज्ञयाग, देवपूजा, चिंतन-मनन, श्रवण, कीर्तन, अभ्यास यामध्ये व्यस्त असतात. ते दुसऱ्यांची सेवा करतात, मदत करतात, ते इतरांचे हित साधतात. तत्त्वज्ञानी, अध्यात्मवादी, योगी, वैज्ञानिक, शिक्षणतज्ज्ञ इ, प्रकारचे लोक सत्त्वगुणी असतात. रजोगुणी लोक सकाम कर्मे करतात.

                 धनसंचयं करतात. स्वतःचे व समाजाचे रक्षण करतात. सत्तेचा उपभोग घेतात. कौटुंबिक सुखात रमतात. दानधर्मासाठी मंदिरे, दवाखाने यासाठी धनाचा वापर करतात. राजे, संस्थानिक, व्यापारी, कृषिवल इ. प्रकारचे लोक रजोगुणी असतात.

                   तमोगुण माणसाचे ज्ञान झाकून टाकतो. विविध अनैतिक कर्मांमुळे तमोगुणी स्वतः तर दुःखी होतोच, पण तो आपल्याबरोबर इतरांनाही दुःखाच्या खाईत लोटतो. त्यांच्या देहात राक्षसी वृत्तीचा अवगुण असतो. त्यामुळे तो प्रमाद, आळस व झोप यांना प्राधान्य देतो. तो मन मानेल तसा व्यवहार करतो. सारासार विचार तो मुळीच करीत नाही. तमोगुण कमी करण्यासाठी निष्काम कर्म करण्याची अत्यंत गरज असते. त्यासाठी इंद्रियजय अत्यंत महत्त्वाचा आहे. इंद्रियजय करण्यासाठी अभ्यास व वैराग्य यांची अत्यंत गरज असते. इंद्रिये ताब्यात आली की, मन ताब्यात येते. मग तमोगुण कमी होतो.

भगवद गीता अध्याय 14 श्लोक 10

भगवद गीता अध्याय 14 श्लोक 10

  भगवद गीता अध्याय 14 श्लोकआणि अर्थ

              हे भारता! रजोगुण आणि तमोगुण यांना दडपून सत्त्वगुण वाढतो. सत्त्वगुण आणि तमोगुण यांना दडपून रजोगुण वाढतो. तसेच सत्त्वगुण आणि रजोगुण यांना दडपून तमोगुण वाढतो.

                  या विश्वातील माया त्रिगुणांनी व्यापली आहे. मनुष्य आणि भगवंत यामध्ये त्रिगुणात्मक मायेचा समुद्र असतो. मनुष्याने हा भवसागर पार केला तरच भगवंत भेटतो. मायेचा मोह मनुष्याला भवसागर पार करू देत नाही. योगी योगभ्रष्ट होतो. भक्त संसार मोहात अडकतो. अनेक जण आपले अंतिम ध्येयच विसरून जातात व संसारचक्रात अडकतात. सत्त्वगुणाची जोपासना करायची असेल तर रजोगुण व तमोगुण बाजूला सारले पाहिजेत.

               जेव्हा रजोगुण प्रबळ होतो, तेव्हा सत्त्वगुण व तमोगुण यांचा पाडाव होतो. तमोगुण उफाळून वर येतो, तेव्हा सत्त्वगुण व रजोगुण दडपले जातात. असे उद्रेक सतत सुरूच असतात. खरा भक्त हे त्रिगुण पार करून जातो आणि भगवंतस्वरूप होतो. विशिष्ट कार्याच्या अवस्थेवरून एखादा मनुष्य कोणत्या गुणाचा आहे हे ठरविता येते.

             एवढेच नव्हे, तर आत्मपरीक्षण करूनसुद्धा आपण कोणत्या गुणधर्माचे आहोत हे ओळखता येते व त्यानुसार प्रयत्नाने व चिकाटीने सत्त्वगुणाची वाढ करता येते व तमोगुणाचे व रजोगुणाचे दमन करता येते. अष्टांग योगाचा यासाठी खूप उपयोग होऊ शकतो. चित्तशुद्धीसाठी सत्त्वगुण फार महत्त्वाचा आहे. तमोगुण नाहीसा करणे हेच योगाचे काम आहे.

भगवद गीता अध्याय 14 श्लोक 11

भगवद गीता अध्याय 14 श्लोक 11

भगवद गीता अध्याय 14 श्लोकआणि अर्थ

               ज्यावेळी या देहात तसेच अंतःकरणात व इंद्रियांत चैतन्य आणि विवेकशक्ती उत्पन्न होते, त्यावेळी असे समजावे की, सत्त्वगुण वाढला आहे. जेव्हा आपल्याला चांगली अनुभूती, शुभ व सात्त्विक तृप्ती निर्माण होते, तसेच आपल्या देहात चैतन्य निर्माण होते, अंतःकरणात विवेकशक्ती निर्माण होते, तसेच इंद्रियांना सत्कर्माची स्फूर्ती येते, अंतःकरणात सद्भावना निर्माण होते, तेव्हा असे समजावे की, आपल्यात सत्त्वगुण वाढला आहे.

                आपल्या देहाला एकूण नऊ द्वारे आहेत. दोन कान, दोन नाकपुड्या, दोन डोळे, तोंड, गुद्, जननेंद्रिय अशी ती नऊ द्वारे आहेत. यातील प्रत्येक दरवाजा जर सत्त्वगुणाने प्रकाशित झाला व त्या सत्त्वगुणाची जाणीव जर देहाला झाली, तर सत्वगुणाची वाढ झाली असे समजावे. प्रत्येक वस्तूची योग्य स्थिती मनुष्याला जाणता येते. सर्व गोष्टी तो योग्य तन्हेने पाहू शकतो. सर्व गोष्टी तो योग्य त-हेने ऐकू शकतो. वस्तूंचा गंध तो योग्य तन्हेने घेऊ शकतो. चव तो घेऊ शकतो. जी वस्तू जशी आहे तशी त्याची अनुभूती होणे हे सत्त्वगुणाचे लक्षण आहे.

                 सत्त्वगुणामुळे चित्तशुद्धी होते. इंद्रियदमन करता येते. आत्मज्ञानाकडे जाण्याचा मार्ग मोकळा होतो. रजोगुण व तमोगुण यांचे दमन करून हा सत्त्वगुण वाढविता येतो. सत्त्वगुण हा रजोगुण व तमोगुण यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहे.

भगवद गीता अध्याय 14 श्लोक 12

भगवद-गीता-अध्याय-14-श्लोक-12

भगवद गीता अध्याय 14 श्लोकआणि अर्थ

               हे भरतर्षभा! रजोगुण वाढल्यावर लोभ, प्रवृत्ती, स्वार्थाने प्रेरित होऊन फळांच्या इच्छेने कर्माचा आरंभ, अशांती आणि विषयभोगांची लालसा ही सर्व उत्पन्न होतात. रजोगुण हा सत्त्वगुण व तमोगुण यांच्यावर मात करून वर उफाळून येतो. जेंव्हा रजोगुणामध्ये वृद्धी होते, तेव्हा स्वार्थ, लोभ, आसक्ती, अहंकार, सकाम कर्म, लालसा ही लक्षणे दिसून येतात.

               तो प्राप्त स्थितीत कधीच समाधानी व संतुष्ट होत नाही. आपली स्थिती आणखी उच्च दर्जाची व्हावी, आपण सामाजिकदृष्ट्या वरच्या दर्जात प्राप्त व्हावे अशी त्याला लालसा निर्माण होते. इंद्रियतृप्ती करण्याकडे तो सदैव प्रयत्नशील असतो. पण विषयतृप्ती कधीच होत नसते, याची त्याला जाणीव नसते. विषयतृप्तीची पूर्तता झाली नाही की मग राग, लोभ, क्रोध, मत्सर यांची वाढ होतच राहते. मग त्याला दुःख प्राप्त होते.

                 रजोगुणी मनुष्य सतत धनसंचय करण्याच्या मागे लागताना दिसतो. मिळालेल्या धनाचा विनियोग तो समाजसुधारणा व नावलौकिकासाठी वापरतो. सत्ता, यश, कीर्ती, नावलौकिक मिळविण्यासाठी तो अहोरात्र झटत असतो. स्वसंरक्षण, कुटुंबसंरक्षण, समाज संरक्षण, देशसंरक्षण हे तो कर्तव्य समजतो. सकाम भावनेने नेहमी कर्म करीत राहतो. क्षत्रिय, राजे, सेनापती, शेतकरी, व्यापारी, राजकारणी, नेते, कलाकार, हे सर्व लोक रजोगुणी असतात. समाजामध्ये रजोगुणी लोक अधिक प्रमाणात दिसून येतात.

भगवद गीता अध्याय 14 श्लोक 13

भगवद गीता अध्याय 14 श्लोक 13

भगवद गीता अध्याय 14 श्लोकआणि अर्थ

                हे कुरुनंदना! तमोगुण वाढल्यावर अंतःकरण व इंद्रिये यांत अंधार, कर्तव्य कर्मात प्रवृत्ती नसणे, व्यर्थ हालचाली आणि झोप इत्यादी अंतःकरणाला मोहित करणाऱ्या वृत्ती ही सर्व उत्पन्न होतात. तमोगुणी मनुष्य शास्त्रविहित कर्मे करीत नाही. तो मनाच्या लहरीप्रमाणे कर्मे करीत असतो. जवळ असलेल्या कार्यक्षमतेचा तो पुरेपूर उपयोग करून घेत नाही. तो जास्ती जास्त वेळ आळस व झोप यामध्ये घालवतो. अंतःकरणात प्रकाश नसेल तर ज्ञानप्राप्ती होत नाही.

             तमोगुण वाढल्यावर अंतःकरण व इंद्रिये यात अंधार पसरतो. मनुष्याला एकूण पाच ज्ञानेंद्रिये आहेत (कान, नाक, डोळे, जीभ व त्वचा). पाच कर्मेंद्रिये आहेत (हात, पाय, मुख, उपास्यव पायू). अकरावे मन हेसुद्धा इंद्रिय मानले जाते. अशा या अकरा इंद्रियांत जर अंधार असेल तर तमोगुण वाढला आहे असे समजावे. मन, बुद्धी, चित्त व अंतःकरण यांना अंतःकरणचतुष्ट्य असे म्हणतात.

               अशा अंतःकरणामध्ये जर अंधार असेल तर तमोगुण वाढला आहे, असे समजावे. जी नित्य कर्मे व नैमित्तिक कर्मे आहेत, जीशास्त्रविहित कर्मे व कर्तव्य कर्मे आहेत, अशा सर्व कर्मांमध्ये जर ती कमें करण्याची प्रवृत्ती नसेल. ती कर्मे करण्याविषयी अनास्था असेल, अनादर असेल, आळस असेल, आणि अतिझोप व व्यर्थ हालचाली होऊ लागल्या तर तमोगुण वाढला आहे, असे समजावे.

भगवद गीता अध्याय 14 श्लोक 14

भगवद-गीता-अध्याय-14-श्लोक-14

भगवद गीता अध्याय 14 श्लोकआणि अर्थ

           जेव्हा हा मनुष्य सत्त्वगुण वाढलेला असताना मरण पावतो, तेव्हा तो उत्तम कर्मे करणाऱ्यांच्या निर्मळ दिव्य स्वर्गादी लोकांत जातो. सत्त्वगुण हा सर्वश्रेष्ठ आहे. जेव्हा मनुष्य सत्त्वगुणात असताना त्याला मृत्यू येतो, तेव्हा तो महर्षीच्या व महान भक्तांच्या उच्चतम योनीत प्राप्त होतो. ब्रह्मलोक (स्वर्ग), विष्णुलोक (वैकुंठ). शिवलोक (कैलास), इंद्रलोक यापैकी पुण्य व पूर्वकर्मानुसार योग्य ठिकाणी जाऊन तो दैवी सुखाचा अनुभव घेतो, उपभोग घेतो.

             लौकिक जगात रजोगुण व तमोगुण यामध्ये अशुद्धता आहे; पण सत्त्वगुणामध्ये मात्र कमालीची शुद्धता असते. सत्त्वगुण अंगी बाणवायचा असेल तर फार कष्ट घ्यावे लागतात. रजोगुण व तमोगुण यांना लागणारे सर्व गुण त्यागावे लागतात. आचरण शुद्ध ठेवावे लागते. निष्काम कर्मे करावी लागतात. सत्कर्मे करावी लागतात. सत्त्वगुण अंगी बाणवायचा असेल तर शास्त्रविहित व कर्तव्य कर्मे करावी लागतात. परोपकार करावा लागतो.

               भगवंतावर पूर्ण श्रद्धा ठेवावी लागते. शरणागती पत्करावी लागते. कर्मातील फलाशा सोडावी लागते. सत्त्वगुण अंगी असेल तर भगवंताची भेट लवकर होऊ शकते. प्रयत्न व चिकाटी यामुळे सत्त्वगुणाची वाढ करता येते. संतसंगती व सद्‌गुरूंचा आशीर्वाद यामुळे सत्त्वगुण अंगी वाढवता येतो.

भगवद गीता अध्याय 14 श्लोक 15

भगवद-गीता-अध्याय-14-श्लोक-15

भगवद गीता अध्याय 14 श्लोकआणि अर्थ

                 रजोगुण वाढलेला असता मरण पावल्यास कर्मांची आसक्ती असणाऱ्या मनुष्यांत जन्मतो. तसेच तमोगुण वाढला असता मेलेला माणूस किडा, पशू, पक्षी इत्यादी मूढ (विवेकशून्य) जातींत जन्मतो.सत्त्वगुणात असताना मृत्यू आला असता स्वर्गादी लोक प्राप्त होतात हे आपण पाहिले. आता रजोगुण प्राप्त झाला असताना जर मृत्यू आला तर त्याचा जन्म कर्माची आसक्ती असणाऱ्या लोकात होतो.

                 एकदा मनुष्य जन्म प्राप्त झाला म्हणजे पुन्हा त्याचे अधःपतन होत नाही, हा गैरसमज आहे. भगवंतांनी स्पष्टच सांगितले आहे की, पुण्यसंचय असेपर्यंत तो मनुष्य स्वर्गादी लोकात दैवी सुखांचा उपभोग घेतो; पण पुण्यसाठा संपताच पूर्वकर्मानुसार तो मनुष्य उच्च वा नीच योनीत जन्म घेतो. म्हणून मनुष्य जन्म प्राप्त झाला असताना सत्त्वगुणात राहण्याचा सतत प्रयत्न करायला हवा. एकदा का ही मनुष्य योनी गेली की, पुन्हा मनुष्य जन्म केव्हा प्राप्त होईल हे सांगता येणार नाही.

               तमोगुणाची वाढ झाली असताना जर एखाद्या मनुष्याला मृत्यू आला तर तो किडा, मुंगी, पशू, पक्षी यासारख्या नीच योनीत जन्माला येतो. अशा नीच योनीला मूढ नीच योनी किंवा विवेकशून्य योनी असे म्हणतात. अशा नीच योनीत आहार, निद्रा, भय आणि मैथुन याशिवाय काहीच करता येत नाही. अध्यात्म तर दूरच. येथे अतिशय दुःख सहन करावे लागते.

भगवद गीता अध्याय 14 श्लोक 16

भगवद-गीता-अध्याय-14-श्लोक-16

भगवद गीता अध्याय 14 श्लोकआणि अर्थ

             श्रेष्ठ (सात्त्विक) कर्माचे सात्त्विक अर्थात सुख, ज्ञान आणि वैराग्य इत्यादी निर्मळ फळ सांगितले आहे. राजस कर्माचे फळ दुःख तसेच तामस कर्माचे फळ अज्ञान सांगितले आहे. त्रिगुणातील प्रत्येक गुणाचे त्याच्या स्वभावधर्मानुसार विशिष्ट कर्मफळ आहे. त्रिगुणात सत्त्वगुण किंवा सत्विक गुण हा सर्वश्रेष्ठ आहे. याच्या कर्माचे फळही उत्तम आहे. सुख, ज्ञान आणि वैराग्य हे त्याचे कर्मफळ आहे.

                 रजोगुण किंवा राजसगुण हा मध्यम प्रतीचा गुण असल्यामुळे त्याचे कर्मफळही दुःख हेच आहे. तमोगुण किंवा तामसी गुण हा कनिष्ठ प्रतीचा गुण आहे. त्याचे कर्मफळ अज्ञान हे आहे. कर्मफलांचा विचार केला तरी सत्त्वगुण किती श्रेष्ठ आहे हे लक्षात येईल.

               सत्त्वगुणाचे सत्कर्म हे पुण्यकर्म असते, तर तमोगुणाचे दुष्कर्म हे पापकर्म असते. सत्वगुणी लोक मोहातून मुक्त होतात त्यामुळे ते सुखी असतात. भौतिक सुखासाठी केलेले कर्म मोहमय असल्यामुळे राजसगुणी लोक दुःखाला कारण होतात. क्षणभंगुर शारीरिक सुख म्हणजे वास्तविक अखंड सुख नव्हे. तमोगुणी मनुष्य हा अज्ञानी असल्यामुळे त्याने केलेले कर्म हे दुःखाला कारणीभूत होते व तो अनंत दुःखयातना भोगत असतो.

             मृत्यूनंतरही त्याला पशू, पक्षी, कीटक इ. नीच योनी प्राप्त होते. प्रत्येक सजीवाची निर्मिती भगवंताने केली असल्यामुळे एखाद्या सजीवाची हत्या केलेली वा एखाद्या सजीवाला मुद्दाम दिलेले क्लेश व दुःख भगवंताला आवडत नाही. त्यामुळे तो दुःखच भोगतो.

भगवद गीता अध्याय 14 श्लोक 17

भगवद गीता अध्याय 14 श्लोक 17

भगवद गीता अध्याय 14 श्लोकआणि अर्थ

             सत्त्वगुणापासून ज्ञान उत्पन्न होते. रजोगुणापासून निःसंशयपणे लोभ आणि तमोगुणापासून प्रमाद आणि मोह उत्पन्न होतात आणि अज्ञानही इत्पन्न होते.

               सत्त्वगुणाचा विकास झाला म्हणजे एखाद्या वस्तूचे यथार्थ व योग्य ज्ञान होते. पण त्याच वस्तूचे अज्ञानी तमोगुणी माणसाला विपरीत ज्ञान होते; एखादी स्त्री सत्त्वगुणी माणसाला मातेसमान दिसेल. तीच स्त्री राजस मनुष्याला पत्नीसमान दिसेल; पण तीच स्त्री तमोगुणी माणसाला मादीप्रमाणे, एखाद्या खेळण्याप्रमाणे दिसेल. सत्त्वगुण समाजात वाढल्यामुळे समाज सुखी व वैभवशाली होतो. विश्वशांती लाभते.

                रजोगुणामुळे लोभ व मोह वाढीस लागतात. त्यामुळे इंद्रियतृप्ती करण्याकडे कल वाढतो. मरेपर्यंत इंद्रियसुखाची कधी तृप्ती होतच नसते. उलट भोगलालसा वाढतच राहते व ती तृप्त करण्यासाठी माणूस दुःखच भोगत राहतो. पैसा व इंद्रियसुखाची साधने असली तरी तो कधीच सुखी नसतो. त्याला मनःशांती लाभत नाही.

              तमोगुणी मनुष्य अज्ञानामुळे दुष्कर्मे करीत असल्यामुळे त्याला दुःखच प्राप्त होते. ते दुःखकमी करण्यासाठी तो व्यसनांच्या आहारी जातो, त्यामुळे मानसिक दुःखाबरोबर शारीरिक दुःखेही त्याला भोगावी लागतात. तमोगुणापासून मनुष्याला मोह निर्माण होतो. प्रमादाची निर्मिती होते, कारण तामसी मनुष्य अज्ञानी असतो. त्याचे अज्ञान आणखी वाढतच जाते. परिणामी तो दुःख भोगतो

भगवद गीता अध्याय 14 श्लोक 18

भगवद गीता अध्याय 14 श्लोक 18

                   सत्त्वगुणात असलेले पुरुष स्वर्गादी उच्च लोकांना जातात. रजोगुणात असलेले पुरुष मध्यलोकात म्हणजे मनुष्यलोकातच राहतात आणि तमोगुणाचे कार्य असलेल्या निद्रा, प्रमाद आणि आळस इत्यादीत रत असलेले तामसी पुरुष अधोगतीला अर्थात कीटक, पशू इत्यादी नीच जातीत तसेच नरकात जातात.

                 त्रिगुणातील सत्त्व, रज व तम या प्रत्येक गुणाचे परिणाम सांगताना भगवंत म्हणतात की, जे सत्त्वगुणी लोक आहेत, ते स्वर्ग, ब्रह्म, इंद्र, शिव, विष्णू इ. उच्चलोकांत प्रवेश करतात व पुण्यसंचय असेपर्यंत सुखाचा उपभोग घेतात. राजस गुणात वावरणारे लोक पृथ्वीलोकात किंवा मनुष्यलोकातच वावरत असतात. याला मध्यलोक असेही म्हणतात.

               असे लोक क्षणैक मानसिक व शारीरिक सुख भोगतात; पण बहुतांश दुःखच भोगत राहतात. सतत निंदा, प्रमाद. आळस आणि झोप यामध्ये रत असणारे तामसी लोक अधोगतीमध्ये असलेल्या कीटक, पशू इ. नीच योनीत जन्माला येतात व अखंड दुःख भोगतात. अशा लोकांस पाताळ किंवा नरकयोनी असे म्हणतात. रजोगुण हे सत्त्वगुण व तमोगुणाचे मिश्रण असते. सत्त्व व तमोगुणी लोक कमी असतात. रजोगुणी लोक अधिक असतात. प्रयत्नाने व चिकाटीने सत्त्वगुणाकडे वाटचाल करता येते. प्रमाद, आळस व निद्रा यामुळे तमोगुण प्राप्त होतो.

भगवद गीता अध्याय 14 श्लोक 19

भगवद-गीता-अध्याय-14-श्लोक-19

              ज्यावेळी द्रष्टा तिन्ही गुणांशिवाय दुसरा कोणीही कर्ता नाही, असे पाहतो आणि तिन्ही गुणांच्या अत्यंत पलीकडे असणाऱ्या सच्चिदानंदघनस्वरूप मला परमात्म्याला तत्त्वतः जाणतो, त्यावेळी तो माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो.

                  सत्त्वगुण हा त्रिगुणांमध्ये जरी उत्तम म्हणून समजला जात असला तरी थोड्या चुकीमुळे मनुष्य खाली सरकून येऊ शकतो व राजस गुणात येऊन पडू शकतो, कारण हा सगळा मायेचा प्रभाव असतो. मायासागर तरून गेल्याशिवाय सच्चिदानंदघनस्वरूप परमात्मा प्राप्त होत नाही. मायासागर तरून जायचे असेल तर मनुष्याला त्रिगुणातीत व्हायला हवे. म्हणजे सत्त्वगुणाच्याही पलीकडे जायला हवे. भगवंत त्रिगुणातीत आहेत.

                तशी आपली स्थिती व्हायला हवी. त्यासाठी परमात्म्याला जाणणे महत्त्वाचे आहे. परमात्म्याला जाणायचे असेल तर चित्तशुद्धी व्हायला हवी. चित्तशुद्धी करायची असेल तर सत्त्वगुण अंगी बाणवायला हवेत. देहाची नऊ द्वारे, जर सत्त्वगुणांनी प्रकाशित झाली असतील तर मग मात्र त्रिगुण गळून पडतात व मनुष्य त्रिगुणातीत होतो. त्रिगुणातीत होणे म्हणजेच परमात्मस्वरूप होणे होय.

              कर्माला कर्तेपण राहत नाही. अकर्तेपण ही अध्यात्माची उच्च पातळी आहे. निष्काम भावनेने फलाशा सोडून कर्म केले की, कर्माचे कर्तेपण आपोआपच भगवंताकडे जाते. त्यामुळे सत्त्वगुणात वृद्धीच होत जाते. अशा वेळी आत्मस्वरूपाचे दर्शन होते.

भगवद गीता अध्याय 14 श्लोक 20

भगवद-गीता-अध्याय-14-श्लोक-20

              हा पुरुष शरीराच्या उत्पत्तीला कारण असलेल्या या तिन्ही गुणांना उल्लंघून जन्म, मृत्यू, वार्धक्य आणि सर्व प्रकारच्या दुःखांपासून मुक्त होऊन परमानंदाला प्राप्त होतो.

                माणसाची अष्टधा प्रकृती ही त्रिगुणात्मक मायेच्या प्रभावाने होते. पूर्वकर्मानुसार त्याला सत्त्व, रज अथवा तम गुण प्राप्त होतो. प्रयत्न, अभ्यास व ज्ञान प्राप्त करून तो तमोगुणातून राजसगुणात व राजसगुणातून सत्त्वगुणात प्रवेश करू शकतो; पण असा मनुष्य प्रदीर्घ प्रयत्नाने माया पार करून जातो व अक्षय, अखंड, एकरस, अविनाशी अशा परमात्म्याला प्राप्त होतो.

                 या ठिकाणी तो परमानंदाला प्राप्त होतो. त्यामुळे त्याची जन्म, वार्धक्य, मृत्यू यापासून सुटका होते. सर्व प्रकारच्या दुःखापासून सुटका होते. यम, नियम, नित्य व नैमित्तिक कर्मे, शास्त्रविहित कर्मे व सत्कर्मे यांचा अंगीकार करून सत्त्वगुणांची वृद्धी करता येते. इंद्रियदमन व निदिध्यास याद्वारे आत्मस्वरुपाकडे पाहता येते. ध्यान, धारणा व समाधीद्वारे परमात्मस्वरूपाकडे जाता येते.

             त्रिगुणातीत झाल्यावर त्याला दुःखाचे कारणच राहात नाही. सुख-दुःख, राग-द्वेष, गरीब-श्रीमंती, आनंद-नैराश्य यासारखी द्वंद्वे राहत नाहीत. मनुष्य सदोदित सच्चिदानंद आनंदघन अशा परमात्म्याला प्राप्त होतो. हजारात एखादाच असा ज्ञानी भक्त असतो. अशा हजारो ज्ञानवंतांमधून एखादाच त्रिगुणातीत होतो व परमात्म्याला जाणतो.

भगवद गीता अध्याय 14 श्लोक 21

भगवद गीता अध्याय 14 श्लोक 21

                  अर्जुन म्हणाला, या तिन्ही गुणांच्या पलीकडे गेलेला पुरुष कोणकोणत्या लक्षणांनी युक्त असतो आणि त्याचे आचरण कशा प्रकारचे असते? तसेच हे प्रभो! मनुष्य कोणत्या उपायाने या तीन गुणांच्या पलीकडे जातो?

                    भगवंतांनी केलेले सत्त्व, रज, तम या त्रिगुणांचे विवेचन ऐकल्यावर व गुणातीताचे महात्म्य ऐकल्यावर अर्जुनापुढे तीन महत्त्वाचे प्रश्न उभे राहिले पहिला प्रश्न म्हणजे त्रीगुणातीताची लक्षणे कोणती आहेत? दुसरा प्रश्न असा की, त्रीगुणातीताचे आचरण कसे असते? त्रिगुणातीत व्हायचे असेल तर ते कशा पद्धतीने होता येते? यावर भगवंत काय उत्तर देतात ते आपण पाहूच, पण अर्जुनाने विचारलेले हे प्रश्न अत्यंत महत्वाचे आहेत.

                   असे प्रश्न खरे तर सर्वसामान्य माणसाला पडलेले प्रश्न आहेत. त्रिगुणातीत झाल्याची खूण माहीत झाल्याशिवाय त्रिगुणातीत होण्याला काहीच अर्थ उरत नाही. त्रिगुणातीत होण्यासाठी कोणती कर्मे करावी लागतात, हेसुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. तो स्वेच्छाचारी असतो की शास्राचारी असतो, हे जाणून घेणे महत्त्वाचे असते. त्रिगुणातीत होण्यासाठी कोणते मार्ग अवलंबवावे लागतात हेही तितकेच महत्त्वाचे आहे. हे सर्व जाणून घेतल्यावर मग योग्याचा मार्ग सुलभ होतो.

भगवद गीता अध्याय 14 श्लोक 22,23,24,25

भगवद-गीता-अध्याय-14-श्लोक-22-23-24-25

                   भगवान म्हणाले, हे पांडवा! जो पुरुष सत्त्वगुणाचे कार्यरूप प्रकाश, रजोगुणाचे प्रवृत्ती आणि तमोगुणाचे मोह हे प्राप्त झाले असता विषाद मानत नाही आणि प्राप्त झाली नाही तरी इच्छा करीत नाही, जो साक्षीरूप राहून गुणांकडून विचलित होतनाही आणि गुणच गुणांत वावरत आहेत, असे समजून जो सच्चिदानंदघन परमात्म्यात एकरूप होतो व त्या स्थितीपासून ढळत नाही,

                जो पुरुष निरंतर आत्मभावात राहून दुःख-सुख समान मानतो, माती, दगड आणि सोने सारखेच मानतो, ज्याला आवडती व नावडती गोष्ट सारखीच वाटते, जो ज्ञानी आहे, जो स्वतःची निंदा, स्तुती, मान, अपमान सारखेच मानतो, ज्याची मित्र व शत्रू याविषयी समान वृत्ती असते, तसेच सर्व कार्यात ज्याला अभिमान नसतो, त्याला गुणातीत म्हणतात.

भगवद गीता अध्याय 14 श्लोक 26

भगवद-गीता-अध्याय-14-श्लोक-26

               आणि जो पुरुष अव्यभिचारी भक्तियोगाने मला निरंतर भजतो, तोसुद्धा या तिन्ही गुणांना पूर्णपणे उल्लंघून सच्चिदानंदघन ब्रह्माला प्राप्त होण्यास योग्य ठरतो.

               अर्जुनाने विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना भगवंत गुणातीताविषयी अधिक माहिती सांगत आहेत. भगवंत म्हणतात की, गुणातीत मनुष्याच्या मनात द्वेषभावना व लालसा नसते. तो सर्वच बाबतीत उदासीन असतो, अलिप्त असतो. तो मानापमान सारखेच मानतो. कोणत्याही गुणाचे प्राबल्य देहात असले तरी तो त्याला जास्त महत्त्व देत नाही. त्याकडे साक्षित्व भावनेने पाहतो.

                 गुणांकडून विचलित होत नाही. गुणच गुणात वावरत आहेत असे समजतो. तो परमात्मस्वरूपात एकरूप होतो. विचलित होत नाही. तो सुख-दुःख समान मानतो. तो माती, दगड आणि सोने सारखेच मानतो. त्याला स्वतःची आवड- निवड अशी काहीच नसते. तो ज्ञानी तर असतोच, शिवाय तो निंदा, स्तुती, मान, अपमान सारखेच मानतो. जो मित्र व शत्रू यांना समान वागणूक देतो.

               सर्व कार्यात त्याला कसलाच अभिमान नसतो. त्यालाच गुणातीत असे संबोधतात. भगवंत पुढे म्हणतात की, जो श्रद्धायुक्त भक्तीने मला निरंतर भजतो, उठल्यापासून झोपेपर्यंत माझे स्मरण करतो, चिंतन करतो, कीर्तन करतो. असा भक्तसुद्धा त्रिगुणातीत होऊन ब्रह्मप्राप्ती करून घेतो.

भगवद गीता अध्याय 14 श्लोक 27

भगवद-गीता-अध्याय-14-श्लोक-27

              कारण त्या अविनाशी परब्रह्माचा, अमृताचा, नित्य धर्माचा आणि अखंड एकरस आनंदाचा आश्रय मी आहे. ब्रह्माचे स्वरूप समजावून सांगताना भगवंत म्हणतात की, ब्रह्म हे अमृत, अव्ययी, अविनाशी, एकरस, शाश्वत व सुखमय आहे. दिव्य साक्षात्काराचा प्रारंभ ब्रह्मापासून होतो व शेवटही ब्रह्मातच होतो. म्हणून ब्रह्माचा आश्रय हे भगवंतच असतात. अशा परमात्म्याची जर प्राप्ती करायची असेल तर मनुष्याने भगवंताची भक्ती मनापासून करायला हवी.

               नवविधा भक्तीपैकी आपल्या प्रकृतीला मानवेल अशी भक्ती करावी. आपली हाक भगवंताला ऐकू गेली पाहिजे. आपली हाक ऐकून भगवंत धावत आला पाहिजे, इतकी आपली भक्ती शुद्ध असावी. प्रत्येक कर्म भगवंताला अर्पण करावे. निष्काम भावनेने कर्म करावे. फलाशा सोडून कर्म करावे. सत्कर्म करावे. दानधर्म करावा. साक्षीभावाने प्रपंच करावा. सतत नामस्मरण करावे. भगवद्स्मरण करावे. भक्तिरसात न्हाऊन निघावे. म्हणजे मग भक्त त्रिगुणातीत होऊ शकतो, स्वस्वरूप पाहू शकतो.

                मग माया तरून गेल्यावर त्याला ब्रह्मप्राप्तीचा आनंद होतो. हा आनंद अमृतासमान असतो, अक्षय असतो, नित्य असतो, शाश्वत असतो. हे परमसत्य आहे. श्रीमद्भगवद्‌गीतारूपी ब्रह्मविद्या आणि योगशास्त्राविषयी गुणत्रयविभागयोग हा चौदावा अध्याय समाप्त झाला.

Leave a Comment