भगवद गीता अध्याय 17 श्लोक 1

भगवद गीता अध्याय 17 श्लोकआणि अर्थ
Table of Contents
Toggleअर्जुन म्हणाला, हे श्रीकृष्णा ! जी माणसे शास्त्रविधीला सोडून श्रद्धेने युक्त होऊन देवादिकांचे पूजन करतात, त्यांची मग स्थिती कोणती? सात्त्विक, राजस की तामस ?
अर्जुन मोठा चतुर व हुशार शिष्य आहे. तो भगवंतांना अनेक प्रश्न विचारून जास्तीत जास्त अध्यात्म जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहे. तो भगवंतांना विचारतो की, ज्या लोकांना शास्त्रविचार माहीत नाहीत, जे शास्त्रविधी जाणत नाहीत, पण अतिशय श्रद्धायुक्त अंतःकरणाने देवादिकांचे पूजन करतात, त्यांना सात्त्विक म्हणावे, राजस म्हणावे की तामस म्हणावे, याचा कृपया खुलासा करावा.
अर्जुनाचा हा प्रश्न ऐकून भगवंतांना खूप आनंद झाला; कारण एक तर अर्जुन हा भगवंतांचा लाडका शिष्य, तसेच तो भगवंतांचा सखाही होता. चौथ्या अध्यायात भगवंतांनी सांगितले आहे की, जितेंद्रिय, साधनतत्पर आणि श्रद्धाळू माणूस ज्ञान मिळवतो. आणि ज्ञान प्राप्त झाल्यावर तो तत्काळ परमशांती प्राप्त करतो. आता या अध्यायात भगवंत अर्जुनाला श्रद्धेविषयी अधिक माहिती सांगत आहेत. शास्त्रविधीपेक्षाही श्रद्धा श्रेष्ठ आहे, असे भगवंत म्हणतात. गुरुवचन, शास्त्रवचन आहे तसे निःशंकपणे मान्य करणे म्हणजे श्रद्धा होय.
भगवद गीता अध्याय 17 श्लोक 2

भगवद गीता अध्याय 17 श्लोकआणि अर्थ
भगवान श्रीकृष्ण म्हणाले, मनुष्यांची ती शास्त्रीय संस्कार नसलेली, केवळ स्वभावतः उत्पन्न झालेली श्रद्धा सात्त्विक, राजस व तामस अशा तीन प्रकारचीच असते. ती तू माझ्याकडून ऐक.
भगवंतांना अर्जुनाचा प्रश्न ऐकून खूप आनंद झाला. कोणत्याही गुरूला जर आपल्या शिष्याने प्रश्न विचारला तर आनंदच होतो, कारण त्यानिमित्ताने शिष्याला अधिक ज्ञान देण्याची संधी गुरूला मिळते. भगवंत म्हणाले की, मनुष्यामध्ये स्वभावतः तीन प्रकारची श्रद्धा असते. तीन प्रकारची श्रद्धा म्हणजे सात्त्विक श्रद्धा, राजस श्रद्धा व तामस श्रद्धा होय. पूर्वकर्मानुसार मनुष्याला जो स्वभावधर्म प्राप्त होतो, त्यानुसार त्याला सात्विक, राजस किंवा तामस श्रद्धा प्राप्त होते. जे शास्त्रविधींना जाणतात, पण केवळ आळसामुळे वा सुस्तपणामुळे शास्त्रविधींचे पालन करीत नाहीत, त्यांचे नियंत्रण त्रिगुणामार्फत केले जाते.
जीव हा प्रकृतीशी निगडित असल्यामुळे त्याला प्रकृतीचे स्वभाव प्राप्त होतात. आध्यात्मिक अभ्यासाने मनुष्य तमोगुणातून रजोगुणात व रजोगुणातून सत्त्वगुणात परिवर्तित होऊ शकतो. यासाठी सद्वर्तन, सद्भावना, सवृत्ती यांची जोपासना केली पाहिजे, सत्संगतीचा अंगीकार केला पाहिजे, शास्त्रविधींचे पालन केले पाहिजे, भगवचिंतन केले पाहिजे. सत्त्वगुण अंगी बाणवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
भगवद गीता अध्याय 17 श्लोक 3,4

भगवद गीता अध्याय 17 श्लोकआणि अर्थ
हे भारता ! सर्व माणसांची श्रद्धा त्यांच्या अंतःकरणानुरूप असते. हा पुरुष श्रद्धामय आहे. म्हणून जो पुरुष ज्या श्रद्धेने युक्त आहे, तो स्वतःही तोच आहे, (अर्थात त्या श्रद्धेनुसार त्याचे स्वरूप असते.) सात्त्विक माणसे देवांची पूजा करतात. राजस माणसे यक्ष-राक्षसांची, तसेच इतर तामस माणसे असतात, ती प्रेत व भूतगणांची पूजा करतात.
मनुष्याने प्राप्त केलेल्या गुणानुसार त्याला श्रद्धा प्राप्त होते. सात्त्विक माणसाची श्रद्धा सात्त्विक असते म्हणून तो देव-देवतांची पूजा करतो. राजस माणसाची श्रद्धा राजस असते म्हणून तो यक्ष-राक्षसांची पूजा करतो. तामस माणसाची श्रद्धा तामस असते म्हणून तो प्रेत व भूतगणांची पूजा करतो. कोणताही मनुष्य असला तरी त्याला कोणती ना कोणती तरी श्रद्धा असतेच. ज्ञानमार्गी लोक निर्गुण निराकाराची पूजा करतात.
कर्ममार्गी लोक सगुण निराकाराची पूजा करतात. ध्यानमार्गी लोक निर्गुण साकाराची पूजा करतात, तर भक्तिमार्गी लोक सगुण साकाराची पूजा करतात. जशी श्रद्धा तशी भक्ती असते. जशी श्रद्धा असते तसे त्याचे स्वरूप असते. म्हणून जे श्रद्धावान असतात त्यांना ज्ञानप्राप्ती होते.
भगवद गीता अध्याय 17 श्लोक 5,6

भगवद गीता अध्याय 17 श्लोकआणि अर्थ
जी माणसे शास्त्रविधी सोडून केवळ मनाच्या कल्पनेप्रमाणे घोर तप करतात, तसेच दंभ, अहंकार, कामना, आसक्ती आणि बळाचा अभिमान यांनी युक्त असतात, जे शरीराच्या रूपात असलेल्या भूत समुदायाला आणि अंतःकरणात राहणाऱ्या मलाही कृश करणारे असतात, ते अज्ञानी लोक आसुरी स्वभावाचे आहेत, असे तू जाण.
जे लोक लोभ, मोह आणि आसक्ती यांनी कामांध झालेले आहेत, जे शास्त्रविहित नाही, ते तप करतात. जे लोक दंभ, अहंकार, बलाभिमान व कामना यांनी झपाटलेले असतात. जे अज्ञानी व आसुरी असतात, ते एकप्रकारे भगवंतालाही त्रास देतात. ते परमात्म्यालाही त्रास देतात. आसुरी वृत्तीचे लोक आपल्या मनाप्रमाणे नियम तयार करतात. त्याला ना शास्त्राची संमती असते, ना समाजाची अनुमती असते .
केवळ बळाच्या जोरावर व सत्तेच्या अधिकाराखाली ते आसुरी नियम समाजावर लादतात. त्यामुळे समाज दुखावतो. समाजातील लोकांच्या हृदयात असणारा परमात्माही दुखावला जातो, याची त्या आसुरांना थोडीसुद्धा कल्पना नसते.
भगवद गीता अध्याय 17 श्लोक 7

भगवद गीता अध्याय 17 श्लोकआणि अर्थ
भोजनही सर्वांना आपापल्या प्रकृतीप्रमाणे तीन प्रकारचे प्रिय असते. आणि तसेच यज्ञ, तप व दानही तीन तीन प्रकारची आहेत. त्यांचे हे निरनिराळे भेद तू माझ्याकडून ऐक.
सत्त्व, रज, तम या तीन प्रकृतीच्या लोकांचे भोजनही वेगवेगळ्या तीन प्रकारचे असते. ते यज्ञ म्हणजे कर्म तीन वेगवेगळ्या प्रकारे करतात, त्यांचे तप म्हणजे अध्ययन तीन वेगवेगळ्या प्रकारचे असते. ते दान म्हणजे त्याग तीन वेगवेगळ्या प्रकारे करतात, कारण प्रकृतीवर जसे संस्कार होतात तसे त्यांचे गुणही तयार होत असतात. गवयाचे पोर रडतानाही सुरातच रडते, असे म्हणतात, त्याप्रमाणे जसे पूर्वकर्म असेल व जसे जन्मानंतर संस्कार झाले असतील, त्याप्रमाणे स्वभाव तयार होतो.
जसा स्वभाव असेल तशी श्रद्धा प्राप्त होते. जशी श्रद्धा असेल त्याप्रमाणे आचरण केले जाते. जसे आचरण असेल त्या प्रमाणे कर्मफळ प्राप्त होते. भोजन, यज्ञ, तप, दान या गोष्टी दैनंदिन जीवनात अतिशय महत्त्वाच्या आहेत. ज्याप्रमाणे अध्ययन असेल, त्याग असेल, कर्म असेल त्याप्रमाणे चरितार्थाचे साधन प्राप्त होते.
जसे चरितार्थाचे साधन असेल, त्याप्रमाणे भोजन प्राप्त होते. काही लोक सात्त्विक आहार घेतात, काही लोक राजस आहार घेतात, तर काही लोक तामस आहार घेताना दिसतात. काही लोक शाकाहारी असतात, तर काही लोक मांसाहारी असतात. काही लोक उपवास करतात.
भगवद गीता अध्याय 17 श्लोक 8,9,10

भगवद गीता अध्याय 17 श्लोकआणि अर्थ
आयुष्य, बुद्धी, बळ, आरोग्य, सुख आणि प्रीती वाढविणारे, रसयुक्त, स्निग्ध, स्थिर राहणारे, स्वभावतः मनाला प्रिय वाटणारे असे भोजनाचे पदार्थ सात्विक पुरुषांना प्रिय असतात. कडू, आंबट, खारट, फार गरम, तिखट, कोरडे, जळजळणारे आणि दुःख, काळजी व रोग उत्पन्न करणारे भोजनाचे पदार्थ राजस माणसांना आवडतात. जे भोजन कच्चे, रस नसलेले, दुर्गंध येणारे, शिळे आणि उष्टे असते, तसेच जे अपवित्रही असते, ते भोजन तामसी लोकांना आवडते.
रसयुक्त, सत्त्वयुक्त, स्निग्ध, मधुर, भोजन सात्त्विक असते. कडू, आंबट, खारट, गरम, तिखट, कोरडे, भोजन राजस असते. कच्चे, रस नसलेले, दुर्गंध येणारे, शिळे, उष्टे भोजन तामस असते.
भगवद गीता अध्याय 17 श्लोक 11,12

भगवद गीता अध्याय 17 श्लोकआणि अर्थ
जो शास्त्रविधीने नेमून दिलेला यज्ञ करणे कर्तव्य आहे, असे मनाचे समाधान करून फळाची इच्छा न करणाऱ्या पुरुषांकडून केला जातो, तो सात्विक यज्ञ होय; परंतु हे भरतश्रेष्ठा ! केवळ दिखाव्यासाठी किंवा फळही नजरेसमोर ठेवून जो यज्ञ केला जातो, तो यज्ञ तू राजस समज.
भोजनाचे विविध प्रकार गुण विभागाप्रमाणे सांगितल्यावर आता भगवंत यज्ञाचे विविध प्रकार सांगत आहेत. भगवंत म्हणतात की, सात्त्विक माणसे देवांची पूजा करतात. यज्ञ म्हणजे कर्म. शास्त्रविधीने नेमून दिलेले कर्म करणे हे जे कर्तव्य समजतात व त्याप्रमाणे समाधान वृत्ती ठेवून जे फलाशाविरहित निष्काम कर्म करतात, त्याला सात्विक यज्ञ म्हणतात.
देखाव्यासाठी फलाशेने केलेले कर्म म्हणजे राजस यज्ञ असतो. एखादी शाळा, दवाखाना किंवा देऊळ बांधून आपण समाजाचे सेवक आहोत, याचे प्रदर्शन करणे म्हणजे राजस यज्ञ होय.
भगवद गीता अध्याय 17 श्लोक 13

देवद्विजगुरुप्राज्ञपूजनं शौचमार्जवम् ।
ब्रह्मचर्यमहिंसा च शारीरं तप इच्यते ।।१७-१४।।
शास्त्राला सोडून, अन्नदान न करता, मंत्रांशिवाय, दक्षिणा न देता व श्रद्धा न ठेवता केल्या जाणाऱ्या यज्ञाला तामस यज्ञ असे म्हणतात. देव, ब्राह्मण, गुरू व ज्ञानी यांची पूजा करणे, पावित्र्य, सरळपणा, ब्रह्मचर्य आणि अहिंसा हे शारीरिक तप म्हटले जाते.
भगवान अर्जुनाला म्हणतात की, सात्त्विक व राजस यज्ञ म्हणजे काय हे समजल्यावर तामस यज्ञ म्हणजे काय हे समजले पाहिजे. शास्त्राला सोडून, अन्नदान न करता, मंत्रांशिवाय, दक्षिणा न देता व श्रद्धा न ठेवता केल्या जाणाऱ्या कर्माला तामस यज्ञ असे म्हणतात. सार्वजनिक गणेशोत्सवासाठी वाममार्गाने वर्गणी गोळा करून त्याचा अपहार करणे म्हणजे तामस यज्ञ होय.
तामस यज्ञ म्हणजे एकप्रकारची अश्रद्धाच होय. पुढे भगवंत तप म्हणजे काय हे समजावून सांगत आहेत. शारीरिक तप म्हणजे देव, ब्राह्मण, गुरू व ज्ञानी यांची पूजा, पावित्र्य, सरळपणा, ब्रह्मचर्य आणि अहिंसा या सर्व गोष्टी होय. देवपूजा करणे, ब्राह्मणांचा आदर ठेवणे, गुरूंची सेवा करणे व ज्ञानी लोकांचा सन्मान ठेवणे, तसेच व्यवहारात सरळपणा ठेवणे, ब्रह्मचर्य पालन करणे, कोणत्याही पशूची वा पक्ष्यांची हिंसा न करणे या सर्व गोष्टी शारीरिक तपामध्ये येतात.
भगवद गीता अध्याय 17 श्लोक 15

मनःप्रसादः सौम्यत्वं मौनमात्मविनिग्रहः।
भावसंशुद्धिरित्येतत्तपो मानसमुच्यते ।।१७-१६।।
जे दुसऱ्याला न बोचणारे, प्रिय, हितकारक आणि यथार्थ भाषण असते ते, तसेच वेदशास्त्रांचे पठण व परमेश्वराच्या नामजपाचा अभ्यास, हेच वाणीचे तप म्हटले जाते. मनाची प्रसन्नता, शांत भाव, भगवत्चिंतन करण्याचा स्वभाव, मनाचा निग्रह आणि अंतःकरणातील भावांची पूर्ण पवित्रता हे मनाचे तप म्हटले जाते.
वाणीचे तप सांगताना भगवंत म्हणतात की, सत्य, प्रिय, हितकारक आणि इतरांना क्षुब्ध न करणारे शब्द बोलणे आणि नियमितपणे वेदपठण करणे यांना वाचिक तप किंवा वाणीचे तप असे म्हणतात. मनुष्याने निरर्थक बोलू नये. मनुष्याने असंबद्ध बोलू नये. मनुष्याने अति बडबड करू नये. मनुष्याने कठोर शब्द बोलू नयेत. नेहमी कर्णमधुर बोलावे. नेहमी हळू बोलावे. हीच खरी वाचिक तपस्या आहे.
समाधान, सरळपणा, गांभीर्य, आत्मसंयम आणि भावशुद्धी याला मानसिक तपस्या किंवा मनाचे तप असे म्हणतात. मानसिक तप म्हणजे मनाला इंद्रियतृप्तीपासून बाजूला ठेवणे. ग्रंथपठण, भजन, कीर्तन, यात जास्त वेळ घालविला म्हणजे मन गुंतून राहते. इंद्रियभोगाचे चिंतन केले की, मन अतृप्तच राहते.
भगवद गीता अध्याय 17 श्लोक 17

दातव्यमिति यद्दानं दीयतेऽनुपकारिणे।
देशे काले च पात्रे च तद्ददानं सात्त्विकं स्मृतम् ।।१७-२०।।
जे तप मूर्खतापूर्वक हट्टाने, मन, वाणी आणि शरीर यांना कष्ट देऊन किंवा दुसऱ्यांचे अनिष्ट करण्यासाठी केले जाते, ते तप तामस म्हटले गेले आहे. दान देणे कर्तव्य आहे, या भावनेने जे दान, देश, काल आणि पात्र मिळाली असता उपकार न करणाऱ्याला दिले जाते, ते दान सात्विक म्हटले गेले आहे.
भगवंत पुढे सांगतात की, जे तप हट्टाने, मन, वाणी आणि शरीर यांना कष्ट देऊन दुसऱ्यांचे अनिष्ट करण्यासाठी केले जाते, ते तप तामस होय. अनेक राक्षसी वृत्तीचे लोक देवदेवतांना त्रास देण्यासाठी, मानवजातीला छळण्यासाठी घनघोर तपश्चर्या करीत असत व अमरत्वाचे वर मागून घेत असत. हिरण्यकशियपू, भस्मासुर, इ. अशी अनेक उदाहरणे देता येतील. दुसऱ्याचे अहित करण्यासाठी असे लोक मन, वाणी व शरीर यांचा वापर करतात.
कर्तव्य या भावनेने जे दान उपकार न करणाऱ्याला दिले जाते, ते दान सात्त्विक होय. दान हे तीर्थक्षेत्री द्यावे. चंद्रग्रहण व सूर्यग्रहण असेल त्या दिवशी दान द्यावे. महिन्याच्या शेवटी दान द्यावे. मंदिरात दान द्यावे. ब्राह्मण, वैश्य यांना दान द्यावे. प्रति उपकाराची अपेक्षा न करता दान द्यावे. गरिबास व गरजवंतास दान द्यावे. अपात्रास देऊ नये.
भगवद गीता अध्याय 17 श्लोक 21, 22

अदेशकाले यहानमपात्रेभ्यश्न दीयते।
असत्कृतमवज्ञातं तत्तामसमुदाहृतम् ।।१७-२२।।
परंतु जे दान क्लेशपूर्वक, प्रत्युपकाराच्या हेतूने अथवा फळ नजरेसमोर ठेवून दिले जाते, ते दान राजस म्हटले आहे. जे दान सत्काराशिवाय किंवा तिरस्कारपूर्वक अयोग्य ठिकाणी, अयोग्य काळी आणि कुपात्री दिले जाते, ते दान तामस म्हटले गेले आहे.
तामस दानाविषयी भगवंत म्हणतात की, इच्छा नसताना अतिशय दुःख सहन करून आपण दुसऱ्यावर उपकार करीत आहोत व त्यानेही या उपकाराची परतफेड करावी या उद्देशाने केले जाते व काही तरी हेतू मनात ठेवून, स्वार्थ भावनेने जे दान केले जाते, त्या दानास राजस दान असे म्हणतात. अयोग्य स्थळी, अकाली, अपात्र व्यक्तींना आणि अनादराने तसेच अवहेलनापूर्वक दिल्या जाणाऱ्या दानाला तामस दान असे म्हणतात.
मद्यपान व जुगार याकरिता केलेल्या दानाला तामस दान असे म्हणतात. असे दान लाभदायक तर नसतेच, पण त्यामुळे पापी लोकांना प्रोत्साहन मिळते. जर एखाद्या मनुष्याने योग्य व्यक्तीला, पण अनादराने दान दिले तरीते दान तामसी होय. जर एखादे दान रात्री-अपरात्री, स्मशानात दिले तर ते तामस दान समजतात. जर एखाद्याला रोगट, वांझ, म्हातारी गाय दान दिली तर ते तामस दान होय.
भगवद गीता अध्याय 17 श्लोक 23,24

तस्मादोमित्युदाहृत्य यज्ञदानतपः क्रियाः ।
प्रवर्तन्ते विधानोक्ताः सततं ब्रह्मवादिनाम् ।।१७-२४।।
तत्सत् अशी तीन प्रकारची सच्चिदानंदघन ब्रह्माची नावे सांगितली आहेत. त्यांपासून सृष्टीच्या आरंभी ब्राह्मण, वेद ऑणि यज्ञादी रचले गेले आहेत. म्हणून वेदमंत्रांचा उच्चार करणाऱ्या श्रेष्ठ पुरुषांच्या शास्त्राने सांगितलेल्या यज्ञ, दान व तप रूप क्रियांचा नेहमी या परमात्म्याच्या नावाचा उच्चार करूनच आरंभ होत असतो.
सृष्टीच्या आरंभापासून तत्सत् हे तीन शब्द परमसत्याचा निर्देश करण्यासाठी वापरले जातात. वेदोक्त मंत्राचे उच्चारण करताना आणि परब्रह्माच्या संतुष्टीसाठी यज्ञ करताना या तीन शब्दांचा वापर केला जातो. परमेश्वराची प्राप्ती करण्यासाठी यज्ञ करणारे, तप करणारे व दान करणारे ब्रह्मवादी कोणत्याही कर्माची सुरुवात करताना या परमात्म्याच्या नावाचा उच्चार करूनच आरंभ करतात.
हे ऋग्वेदातून, तत् हे तत्वमसी या शब्दातून व सत् हे सदेव सोम्य यापासून घेतले आहेत म्हणून यज्ञ, तप, दान व आहार यांची सुरुवात तत्सत् या तीन पवित्र शब्दांनी करतात. सृष्टीच्या सुरुवातीला आदिबीज ब्रह्मदेवाने यज्ञ सुरू करताना या मंत्राचा उच्चार केला होता म्हणून हा मंत्र पवित्र आहे.
भगवद गीता अध्याय 17 श्लोक 25

भगवद गीता अध्याय 17 श्लोकआणि अर्थ
तत् या नावाने संबोधिल्या जाणाऱ्या परमात्म्याचेच हे सर्व आहे, या भावनेने फळाची इच्छा न करता नाना प्रकारच्या यज्ञ, तप व दान रूप क्रिया कल्याणाची इच्छा करणाऱ्या पुरुषांकडून केल्या जातात.
परमेश्वराची प्राप्ती करण्यासाठी, फळाची आशा न करता शास्त्रोक्त विधिविधानानुसार यज्ञ, दान व तप करताना तत् या शब्दाचा उपयोग करावा. जे प्राप्त करतो, जे जे उपभोगतो, ते चागवताचे आहे या भावनेने जर आपण वागलो, निष्काम भावनेने जर कर्म केले, फलाशा सोडून जर आपण कर्म केले, जर प्रत्येक कर्म भगवंताला अर्पण केले तर ते कर्म पवित्र होते. अशा कर्माची जबाबदारी मग भगवंत स्वतःकडे घेतात. त्या कार्माचे फळ हे पवित्र होऊन जाते.
साधना करताना मग साधकाची चित्तशुद्धी होते. अभ्यास आणि वैराग्य यामुळे भगवंत प्राप्तीचा निदिध्यास लागतो. निदिध्यासाने आत्मसाक्षात्काराचा मार्ग मोकळा होतो. स्वस्वरूप एकदा प्राप्त झाले की, मग परमात्म दर्शन काही लांब राहत नाही. मोक्ष व मुक्तीचे मार्ग मोकळे होतात. असा भक्त ईश्वरस्वरूप होऊन जातो, एवढी ताकद या तत् या एका शब्दात आहे. तत्हा शब्द मम या शब्दाचा नाश करतो.
हे सर्व माझे नसून हे त्या भगवंताचे आहे अशी शरणागती प्राप्त झाली पाहिजे. मग प्रत्येक कर्म करताना भगवंताचे नाव मुखात येईल
भगवद गीता अध्याय 17 श्लोक 26,27

भगवद गीता अध्याय 17 श्लोकआणि अर्थ
सत् या परमात्म्याच्या नावाचा सत्य भावात आणि श्रेष्ठ भावात प्रयोग केला जातो. तसेच हे पार्था। नावाया कमतिही सत् शब्द योजला जातो. तसेच यज्ञ, तप आणि दान यांमध्ये जीनम्थती अर्थात आस्तिक बुद्धी असते, तिलाही सत् असे म्हणतात आणि त्या परमात्म्यासाठी केलेले कर्म निश्चयाने सत् असे म्हटले जाते.
परमसत्य हे भक्तिमय यज्ञाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. यज्ञकर्त्याला सत् म्हणतात. तसेच परमेश्वरप्राप्तीसाठी केल्या जाणाऱ्या यज्ञ, दान व तप या कर्माना सत् म्हणतात. गर्भधारणेपासून ते मृत्यूर्यंत अनेक सुसंस्कार मनुष्यावर केले जातात. या सर्व संस्कारांचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे मोक्षप्राप्ती होय. अशा सर्व संस्कारांमध्ये तत्सत् या पवित्र मंत्राचा उच्चार करावा असे म्हटले आहे.
भक्ताला दीक्षा देताना, यज्ञोपवीत धारण करताना तत्सत् या मंत्राचा वापर करतात. सर्व यज्ञांचे उद्दिष्ट तत्सत् हेच असते. सर्व कर्मांची परिपूर्णता करण्यासाठी तत्सत् या मंत्राचा वापर होताना दिसतो. हे ब्रह्म आहे आणि तेच अंतिम सत्य आहे किंवा हे अंतिम सत्य आहे आणि तेच ब्रह्म आहे, असे मानले जाते. म्हणून कर्माची सुरुवात सत् काराने करावी.
भगवद गीता अध्याय 17 श्लोक 28

हे पार्था! श्रद्धेशिवाय केलेले हवन, दिलेले दान केलेले तप आणि जे काही केलेले शुभ कार्य असेल, ते सर्व असत् म्हटले जाते. त्यामुळे ते ना इहलोकात फलदायी होते, ना परलोकात.
दायीच्या याचा शेवट करताना भगवंत म्हणतात की, श्रद्धेशिवाय केलेला यज्ञ, होमहवन हे अनित्य किंवा असत्य होय. श्रद्धेशिवाय दिलेले दान, केलेले धर्माचरण है अनित्य किंवा असत्य होय. श्रद्धेशिवाय केलेले तपाचरण, केलेली तपश्चर्या ही अनित्य व असत्य होय. श्रद्धेशिवाय केलेले कोणतेही कर्माचरण, मंत्राचारण, शुभकार्यहे अनित्य किंवा असत्य होय. एवढेच नव्हे, तर ते या जन्मात व पुढील शुभ्भातही फलदायी होत नाही.
अज्ञानामुळे व बद्धावस्थेमुळे रजोगुणी व तामस गुणी लोक श्रद्धेविना भुते, राक्षसगण, यक्ष, पितर यांची पूजा करतात व त्यांना प्रसन्न करून घेण्याचा प्रयत्न करतात. अशा लोकांची सर्व कर्मे अयोग्य असल्याने त्यांना मृत्यूनंतर मनुष्य जन्म किंवा नीच योनी प्राप्त होते. ते पशू, पक्षी वा कीटक अशा कनिष्ठ योनीत जन्म घेऊन दुःख व क्लेश भोगतात. त्यांना सत्य व असत्य यातील भेदच कळत नाही. श्रद्धेशिवाय ज्ञानप्राप्ती होत नाही.
हे परमसत्य आहे. श्रीमद्भगवद्गीतारूपी उपनिषद तथा ब्रह्मविद्या आणि योगशास्त्राविषयी श्रद्धात्रयविभागयोग हा सतरावा अध्याय समाप्त झाला.