भगवद गीता अध्याय 18 ( मोक्षसंन्यासयोग ) bhagwat geeta adhyay 18 in marathi

भगवद गीता अध्याय 18

भगवद गीता अध्याय 18 श्लोक 1,2

भगवद-गीता-अध्या-18-श्लोक-1-2

भगवद गीता अध्याय 18 श्लोकआणि अर्थ

Table of Contents

                  अर्जुन म्हणाला, हे महाबाहो! हे हृषीकेशा! केशिनिषूदना ! मी संन्यास आणि त्याग यांचे तत्त्व वेगवेगळे जाणू इच्छितो. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, कित्येक पंडित काम्य कर्माच्या त्यागाला संन्यास मानतात, तर दुसरे काही विचारकुशल लोक सर्व कर्मांच्या फळाच्या त्यागाला त्याग म्हणतात. या अठराव्या व शेवटच्या अध्यायात भगवंतांनी सर्व गीतेचे सार सांगितले आहे. म्हणून या अध्यायाला एकाध्यायी गीता असेही म्हटले जाते.

                    संन्यास व त्याग हे दोन विषय स्वतंत्रपणे समजावून घ्यावेत म्हणून अर्जुनाने संन्यास व त्याग समजावून सांगण्याची विनंती केली. तेव्हा भगवंत म्हणाले की. काम्य व निषिद्ध कर्माचा त्याग करणे म्हणजे संन्यास होय, असे कित्येक विद्वान लोक मान्य करतात आणि सर्व कर्माच्या फळांचा त्याग करणे याला त्याग, असे मान्य करतात. सकाम यज्ञाचा त्याग केला पाहिजे.

भगवद गीता अध्याय 18 श्लोक 3,4

भगवद-गीता-अध्याय-18-श्लोक-3-4

भगवद गीता अध्याय 18 श्लोकआणि अर्थ

              कित्येक विद्वान असे म्हणतात की, सर्व कर्मे दोषयुक्त आहेत म्हणून ती टाकणे योग्य होय आणि दुसरे विद्वान असे म्हणतात की, यज्ञ, दान आणि तप रूप कर्मे टाकणे योग्य नाही. हे पुरुषश्रेष्ठ अर्जुना ! संन्यास आणि त्याग या दोहोंपैकी प्रथम त्यागाच्या बाबतीत माझा निर्णय ऐक, कारण त्याग सात्त्विक, राजस व तामस या भेदांमुळे तीन प्रकारचा सांगितला गेला आहे.

              भगवंत पुढे सांगतात की, सर्वकर्मफलत्याग याचा अर्थ सर्वच कर्मे दोषयुक्त आहेत व ती सर्व टाकली पाहिजेत असे नव्हे; कारण मनुष्य देह आहे तोपर्यंत काही ना काही कर्म हे करावेच लागते. कर्म हे टाळता येत नाही. यज्ञ, तप, दानरूप कर्मे टाळून चालणार नाहीत. नित्य व नैमित्तिक कर्मे करावीत. काम्य व निषिद्ध कर्मे टाळावीत. त्यांचा त्याग करावा. संन्यास व त्याग समजावून सांगताना भगवंत प्रथम त्यागाचे महत्त्व सांगत आहेत.

               त्याग तीन प्रकारचा असतो. सात्त्विकत्याग, राजसत्याग व तामसत्याग होय. या तीन प्रकारच्या त्यागामध्ये सात्त्विकत्याग अतिशय महत्त्वाचा आहे. सात्त्विकत्याग श्रेष्ठ आहे. असा सात्त्विकत्याग आचरणात आणावा, असे भगवंत सांगत आहेत.

भगवद गीता अध्याय 18 श्लोक 5,6

भगवद-गीता-अध्याय-18-श्लोक-5-6

               यज्ञ, दान आणि तप रूप कर्म टाकणे योग्य नाही. उलट ते अवश्य केले पाहिजे; कारण यज्ञ, दान व तप ही तीनही कर्मे बुद्धिमान माणसांना पवित्र करणारी आहेत. म्हणून हे पार्था! ही यज्ञ, दान व तप रूप कर्मे तसेच इतरही सर्व कर्तव्य कर्मे आसक्ती आणि फळांचा त्याग करून अवश्य केली पाहिजेत. हे माझे निश्चित असे उत्तम मत आहे.

             सर्वकर्मत्याग शक्य नाही हे सांगताना भगवंत म्हणतात की, मनुष्य जन्माला आला की, त्याला कोणते ना कोणते तरी कर्म करावेच लागते. कर्म टाळता येत नाही. दैनंदिन कर्मे ही करावीच लागतात. म्हणून यज्ञ, तप व दान ही तीन कर्मे अवश्य करावीत, कारण ही तीन कर्मे बुद्धिमान माणसाला पवित्र करणारी आहेत.

               म्हणून आसक्ती व फलाशा सोडून सर्व कर्तव्यकर्मे अवश्य करावीत. मानवाच्या कल्याणाकरिता होणाऱ्या कोणत्याही यज्ञकर्माचा त्याग करू नये. जर विहित कर्माचा त्याग केला तर ते तामस कर्म समजावे. जे कर्म भगवंतासाठी केले जाते, ते सात्विक कर्म होय.

भगवद गीता अध्याय 18 श्लोक 7,8

भगवद-गीता-अध्याय-18-श्लोक-7-8

               निषिद्ध आणि काम्य कर्मांचा तर स्वरूपतः त्याग करणे योग्यच आहे; परंतु नियत कर्मांचा स्वरूपतः त्याग योग्य नाही. म्हणून मोहाने त्याचा त्याग करणे याला तामस त्याग म्हटले आहे. जे काही कर्म आहे, ते दुःखरूपच आहे, असे समजून जर कोणी शारीरिक त्रासाच्या भीतीने कर्तव्य कर्मे सोडून देईल, तर त्याला असा राजस त्याग करून त्यागाचे फळ कोणत्याही प्रकारे मिळत नाही.

                कर्तव्य कर्मे मनुष्याला अतिशय महत्त्वाची आहेत. त्याचा त्याग करणे योग्य नाही. कर्म हे दुःखकारक आहे असे समजून जर कोणी त्याचा त्याग करील तर ते योग्य नाही, कारण नियत कर्माचा किंवा कर्तव्य कर्माचा त्याग करणे हे तामस त्यागाचे लक्षण समजले जाते.

               अर्जुनाने भगवंतांना संन्यास व त्याग यातील फरक विचारला तेव्हा भगवंत म्हणाले की, काम्य कर्माचा त्याग म्हणजे संन्यास व सर्वकर्मफलत्याग म्हणजे त्याग. कोणत्याही माणसाकडून पूर्णपणे सर्व कर्मांचा त्याग केला जाणे शक्य नाही. सर्व कर्माच्या त्यागापेक्षा निःसंगपणे यज्ञ-तप-दान कर्म आचरणे उत्तम आहे. निषिद्ध आणि काम्य कर्मांचा त्याग करणे योग्यच आहे.

भगवद गीता अध्याय 18 श्लोक 9,10

भगवद-गीता-अध्याय-18-श्लोक-9-10

               हे अर्जुना ! जे शास्त्रविहित कर्म करणे कर्तव्य आहे, या भावनेने आसक्ती आणि फळ यांचा त्याग करून केले जाते, तोच सात्त्विक त्याग मानला गेला आहे. जो मनुष्य कुशल नसलेल्या कर्मांचा द्वेष करीत नाही आणि कुशल कर्मांत आसक्त होत नाही, तो शुद्ध सत्त्वगुणी पुरुष संशयरहित ज्ञानी व खरा त्यागी होय.

              सात्त्विक त्यागाचे महत्त्व सांगताना भगवंत म्हणतात की, ज्यावेळी मनुष्य नियत कर्म करायला हवे म्हणून करतो आणि आसक्ती व फलाशा सोडून देतो, त्यावेळी त्याचा त्याग सात्त्विक समजला जातो. सत्त्वगुणात स्थित असलेला त्यागी मनुष्य अशुभ कर्माचा द्वेष करीत नाही किंवा शुभ कर्मात आसक्त राहत नाही.

               अशा मनुष्याला कर्माबद्दल काहीच संशय नसतो. नियत कर्म कर्तव्याच्या भावनेने केले पाहिजे. कोणतेही विहित कर्म भगवंताला अर्पण करावे म्हणजे ते शुद्ध होते. दुसऱ्याचा द्वेष करणे, त्याला पीडा देणे, त्याचे मन दुखविणे व त्याच्या कर्मांना दोष देणे हे त्यागी व ज्ञानी मनुष्याचे काम नाही, जो कर्तव्याच्या क्लेशदायक परिणामांना भीत नाही, योग्य ठिकाणी व योग्य वेळी जो कर्तव्य कर्म करतो, तो खरा ज्ञानी व त्यागी समजला पाहिजे.

भगवद गीता अध्याय 18 श्लोक 11,12

भगवद-गीता-अध्याय-18-श्लोक-11-12

                कारण शरीरधारी कोणत्याही माणसाकडून पूर्णपणे सर्व कर्मांचा त्याग केला जाणे शक्य नाही. म्हणून जो कर्मफळाचा त्यागी आहे, तोच त्यागी आहे, असे म्हटले जाते. कर्मफळाचा त्याग न करणाऱ्या मनुष्यांना कर्माचे बरे, वाईट व मिश्र असे तीन प्रकारचे फळ मेल्यानंतर जरूर मिळते; परंतु कर्मफळाचा त्याग करणाऱ्या मनुष्यांना कर्माचे फळ कधीही मिळत नाही.

                भगवंत म्हणतात की, देहधारी मनुष्याला सर्व कर्मांचा त्याग करणे कधीच शक्य नाही. म्हणून त्याने कर्मफळाचा त्याग करावा. अशा कर्मफळाचा त्याग म्हणजे खरा त्याग होय. अशा माणसाला त्यागी म्हणावे. सात्त्विक त्यागाचे फळ चांगले असते. राजस त्यागाचे फळ मिश्र स्वरूपाचे असते. तामस त्यागाचे फळ वाईट असते.

              जो कर्मफळाचा त्याग करतो अशा मनुष्याला कर्माचे फळ मिळत नाही; पण जो कर्मफलाचा त्याग करीत नाही त्या मनुष्याला त्याच्या कर्माप्रमाणे इष्ट, मिश्र व अनिष्ट फळ त्याच्या मृत्यूनंतर नक्की मिळते. जो फलाशा धरीत नाही तो मुक्त होतो.

भगवद गीता अध्याय 18 श्लोक 13,14

भगवद-गीता-अध्याय-18-श्लोक-13-14

               हे महाबाहो अर्जुना ! सर्व कर्मांच्या सिद्धींची ही पाच कारणे, कर्मांचा शेवट करण्याचा उपाय सांगणाऱ्या सांख्यशास्त्रात सांगितली गेली आहेत, ती तू माझ्याकडून नीट समजून घे. कर्म पूर्ण होण्यासाठी अधिष्ठान, कर्ता, निरनिराळ्या प्रकारची करणे, अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या क्रिया आणि तसेच पाचवे कारण दैव आहे.

             भगवंत म्हणतात की, जे सांख्यशास्त्र प्रसिद्ध शास्त्र आहे, त्या शास्त्रात कर्माचा शेवट करणाऱ्या कर्माच्या सिद्धीची पाच कारणे सांगितली आहेत. अधिष्ठान, कर्ता, करण, प्रयत्न व दैव अशा पाच घटकांनी कर्माची सिद्धी होते. त्यातून इष्ट, अनिष्ट, मिश्र अशी तीन प्रकारची फळे मिळतात.

              जर केलेल्या कोणत्याही कर्माचे काही ना काही तरी फळ मिळतेच, तर मग ज्याने फलाशा सोडली आहे त्याला सुख-दुःखाचे फळ का नाही मिळत? भगवंत म्हणतात की, अधिष्ठान म्हणजे शरीर, आत्मा हा कर्ता, करण म्हणजे कर्माची साधने ती म्हणजे इंद्रिये, क्रिया म्हणजे प्रयत्न व परमात्मइच्छा म्हणजे दैव या पाच कारणांवर कर्माचे फळ अवलंबून असते.

भगवद गीता अध्याय 18 श्लोक 15,16

भगवद-गीता-अध्याय-18-श्लोक-15-16

                मनुष्य मन, वाणी आणि शरीर यांनी शास्त्राला अनुसरून किंवा त्याविरुद्ध कोणतेही कर्म करतो, त्याची ही पाचही कारणे असतात; परंतु असे असूनही जो मनुष्य अशुद्ध बुद्धीमुळे कर्मे पूर्ण होण्यामध्ये केवळ आणि शुद्धस्वरूप आत्म्याला कर्ता समजतो, तो मलिन बुद्धीचा अज्ञानी खरे काय ते जाणत नाही.

                 कोणतेही कर्म वाणीने, मनाने अथवा शरीराने यापैकी एक अथवा मिश्र घटकांनी केले जाते. त्या कर्माची सिद्धी अधिष्ठान, कर्ता, करण, प्रयत्न व दैव या पाच घटकांनी केली जाते. प्रत्येक जीवात परमात्मा वास करीत असतो. जो मनुष्य कर्म करताना परमात्म्याला पाहत नाही, तो मात्र स्वतःलाच कर्ता मानीत असतो.

                  शास्त्रात दिलेल्या आदेशानुसार योग्य कार्य केले जाते. शास्त्राचा आदेश न जुमानता अयोग्य कार्य हे केलेले असते; पण जे काही कार्य झालेले असते त्याच्या पूर्ततेसाठी हे पाच घटक लागतात. मग त्याचे इष्ट, मिश्र वा अनिष्ट फळ फलाशा करणाऱ्यास त्याच्या मृत्यूनंतरप्राप्त होते. त्यानुसार त्याला सुख किंवा दुःख प्राप्त होते.

भगवद गीता अध्याय 18 श्लोक 17,18

भगवद गीता अध्याय 18 श्लोक 17,18

              ज्या माणसाच्या अंतःकरणात मी कर्ता आहे, असा भाव नसतो, तसेच ज्याची बुद्धी सांसारिक पदार्थांत आणि कर्मांत लिप्त होत नाही, तो माणूस या सर्व लोकांना मारूनही वास्तविक तो मारत नाही आणि त्याला पापही लागत नाही. ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय या तीन प्रकारच्या कर्माच्या प्रेरणा आहेत. आणि कर्ता, करण तसेच क्रिया हे तीन प्रकारचे कर्मसंग्रह आहेत.

                 भगवंत म्हणतात की, जो मिथ्या अहंकाराने प्रेरित नाही, जो मी कर्ता आहे असे मानीत नाही, ज्याची बुद्धी बंधनात सापडलेली नाही, संसारात व कर्मात अडकलेली नाही तो जगातील मनुष्यांना मारूनदेखील मारेकरी होत नाही. तसेच त्याला पापही लागत नाही. तसेच तो कर्माने बांधलाही जात नाही. कोणत्याही कर्माला तीन प्रकारच्या प्रेरणा असतात. त्या म्हणजे ज्ञाता, ज्ञान व ज्ञेय होय. तसेच इंद्रिय, कर्म आणि कर्ता हे तीन कर्माचे घटक आहेत. कर्म करण्यापूर्वी काही तरी प्रेरणा होत असते. कर्म प्रत्यक्ष घडण्यापूर्वी ज्या निर्णयाप्रत आपण पोहोचतो, ते कर्माचेच सूक्ष्मरूप असते. त्यानंतर कर्माचे रूपांतर क्रियेत होते.

भगवद गीता अध्याय 18 श्लोक 19,20

भगवद-गीता-अध्याय-18-श्लोक-19-20

                 गुणांची संख्या सांगणाऱ्या शास्त्रात ज्ञान, कर्म आणि कर्ता हे गुणांच्या भेदाने तीन-तीन प्रकारचेच सांगितले आहेत. तेही तू माझ्याकडून नीट ऐक. ज्या ज्ञानामुळे माणूस निरनिराळ्या सर्व भूतांमध्ये एक अविनाशी परमात्मभाव विभागरहित समभावाने भरून राहिला आहे, असे पाहतो, ते ज्ञान तू सात्विक आहे, असे जाण.

                 प्रकृतीच्या सत्त्व, रज, तम या तीन गुणांना अनुसरून ज्ञान, कर्म आणि कर्ता यांचे तीन प्रकार आहेत. सत्त्वगुण प्रकाशमय आहे. रजोगुण भौतिकवादी आहे. तमोगुण आळस व प्रमाद उत्पन्न करणारा आहे. सत्त्वगुणातही जीव बद्धच असतो.

                त्यामुळे हे तीनही गुण मुक्तिदायक नाहीत. जो मनुष्य प्रत्येक प्राण्यात (पशू, पक्षी, कीटक, वनस्पती. कोणताही जीव) एकच आत्मतत्त्व असते किंवा परमात्मा वास करतो हे जाणतो तो खरा सात्त्विक ज्ञानी होय. सर्व प्राण्यांना त्यांच्या पूर्वकर्मानुसार जरी वेगवेगळे देह प्राप्त झाले असले तरी सर्वांमध्ये एकच आत्मतत्त्व असते. हा अविनाशी परमात्मा विभागरहित समभावाने राहत असतो ही जाणीव होणे यालाच भगवंत ज्ञान असे म्हणतात. आत्मज्ञान हे ज्ञान व वैश्विक ज्ञान किंवा जड प्रकृतीचे ज्ञान म्हणजे विज्ञान होय.

भगवद गीता अध्याय 18 श्लोक 21,22

भगवद-गीता-अध्याय-18-श्लोक-21-22

                  परंतु, ज्या ज्ञानाने मनुष्य सर्व भूतांमध्ये भिन्न भिन्न प्रकारांचे अनेक भाव वेगवेगळे जाणतो, ते ज्ञान तू राजस जाण; परंतु जे ज्ञान एका कार्यरूपी शरीरातच पूर्णासारखे आसक्त असते, तसेच जे युक्तिशून्य, तात्विक अर्थाने रहित आणि तुच्छ असते, ते तामस म्हटले गेले आहे.

            आता भगवंत राजस ज्ञान व तामस ज्ञान म्हणजे काय, हे समजावून सांगत आहेत. भगवंत म्हणतात की, ज्या ज्ञानामुळे एखादा मनुष्य वेगवेगळ्या शरीरात वेगवेगळे परमात्मे पाहतो ते ज्ञान राजस ज्ञान आहे असे समजावे. प्रकृती म्हणजे क्षेत्र व क्षेत्रज्ञ म्हणजे परमात्मा. शरीर नष्ट झाले की, आत्माही नष्ट होतो, असे समजणे म्हणजे राजस ज्ञान होय. ज्याला धन हेच ईश्वर आहे असे वाटते, ज्याचे ज्ञान देहापुरतेच मर्यादित असते, आहार, निद्रा, भय व मैथुन एवढ्यापुरतेच पशूप्रमाणे ज्याचे ज्ञान मर्यादित आहे, अशा ज्ञानाला तमोगुणी ज्ञान असे म्हटले जाते.

                ज्याला फक्त शरीर हेच सर्वस्व वाटते. शरीरालाच सुखसोयी पुरविणे हेच कर्म वाटते. ऐषाराम, आळस, निद्रा, क्षणैक सुख हेच ज्याला सुख वाटते ते ज्ञान तामस ज्ञान होय. तामस ज्ञान हे केव्हाही वाईटच असते. सात्त्विक ज्ञान उत्तम असते.

भगवद गीता अध्याय 18 श्लोक 23,24

भगवद-गीता-अध्याय-18-श्लोक-23-24

               जे कर्म शास्त्रविधीने नेमून दिलेले असून कर्तेपणाचा अभिमान न बाळगता फळाची इच्छा न करणाऱ्या माणसाने राग व द्वेष सोडून केलेले असते, ते सात्त्विक म्हटले जाते; परंतु जे कर्म अतिशय परिश्रमपूर्वक तसेच भोगांची इच्छा करणाऱ्या किंवा अहंकार बाळगणाऱ्या माणसाकडून केले जाते, ते राजस म्हटले गेले आहे.

               सात्विक कर्म व राजस कर्माविषयी भगवंत म्हणतात की, जे कर्म विहित आहे, जे कर्म नियत आहे, जे कर्म नैमित्तिक आहे, जे कर्म शास्त्रविहित आहे, जे कर्म कर्तेपणाचा अभिमान न बाळगता केलेले आहे, जे कर्म फलाशा न करता केलेले आहे, जे कर्म राग व द्वेष न ठेवता केलेले आहे अशा कर्मास सात्त्विक कर्म असे म्हणतात. जे कर्म फलाशा ठेवून केलेले आहे, जे कर्म सकाम केलेले आहे, जे कर्म भोगाची इच्छा ठेवून केलेले आहे, जे कर्म अतिकष्ट देऊन केलेले आहे, जे कर्म अहंकार बाळगून केलेले आहे अशा कर्मास राजस कर्म असे म्हणतात.

            तामस व राजस कमर्मापेक्षा सात्त्विक कर्म श्रेष्ठ समजले जाते. यज्ञ म्हणजे कर्म होय. भगवंतासाठी जे जे कर्म केले जाते ते ते सर्व कर्म सात्त्विकच असते. कर्म ईश्वरार्पण करावे.

भगवद गीता अध्याय 18 श्लोक 25,26

भगवद गीता अध्याय 18 श्लोक 25,26

                जे कर्म परिणाम, हानी, हिंसा आणि सामर्थ्य यांचा विचार न करता केवळ अज्ञानाने केले जाते, ते तामस होते. जो कर्ता आसक्ती न बाळगणारा, मी, माझें न म्हणणारा, धैर्य व उत्साहाने युक्त, कार्य सिद्ध होवो वा न होवो, त्याविषयी हर्ष, शोकादी विकारांनी रहित असलेला असतो, तो सात्त्विक म्हटला जातो.

                  तामस कर्माविषयी भगवंत म्हणतात की, जे कर्म मोहाने केले जाते, जे कर्म शास्त्राला सोडून केले जाते, जे कर्म भावी परिणामांची पर्वा न करता केले जाते, जे कर्म हिंसायुक्त असे केले जाते, जे कर्म दुसऱ्याला त्रास देण्यासाठी केले जाते. जे कर्म स्वतःची कुवत न पाहता केले जाते, जे कर्म अज्ञानाने केले जाते, त्याला तामस कर्म असे म्हणतात. आता भगवंत सात्त्विक कर्ता म्हणजे काय हे सांगत आहेत.

                जो कर्ता आपले कर्म प्राकृतिक गुणांचा भंग न करता करतो, जो कर्ता आपले कर्म मिथ्या अहंकाराविना करतो, जो आपले कर्म उत्साहाने व निश्चयाने करतो, यशापयाशाने विचलित न होता, मी माझे न म्हणता जो आपले कर्म करतो, त्याला सात्त्विक कर्ता असे म्हणतात. राजस व तामस कात्यपिक्षा सात्त्विक कर्ता श्रेष्ठ असतो, कारण त्याला फळाची अपेक्षा नसते.

भगवद गीता अध्याय 18 श्लोक 27,28

भगवद-गीता-अध्याय-18-श्लोक-27-28

भगवद गीता अध्याय 18 श्लोकआणि अर्थ

              जो कर्ता आसक्ती असलेला, कर्मांच्या फळांची इच्छा बाळगणारा, लोभी, इतरांना पीडा देण्याचा स्वभाव असलेला, अशुद्ध आचरणाचा आणि हर्ष-शोक यांनी युक्त असतो, तो राजस म्हटला जातो. जो कर्ता अयुक्त, अशिक्षित, घमेंडखोर, धूर्त, दुसऱ्यांची जीवन-वृत्ती नाहीशी करणारा, शोक करणारा, आळशी आणि दीर्घसूत्री असतो, तो तामस म्हटला जातो.

               राजस कर्ता व तामस कर्ता याविषयी भगवंत म्हणतात की, जो कर्ता आपले कर्म फळाच्या आसक्तीने करतो, ज्याच्या मनात आसक्ती आहे, जो लोभी आहे, ज्याचा स्वभाव इतरांना पीडा देण्याचा आहे, ज्याचे आचरण अशुद्ध आहे, जो सतत हर्षाने उतावीळ होतो व दुःखाने व्याकूळ होतो, त्याला रजोगुणी कर्ता असे म्हटले जाते. सर्वसामान्य प्रापंचिक माणसाला घरदार, जमीनजुमला, पत्नी मुले, धन- दौलत याविषयी आसक्ती असते. तो लोभी बनतो. तो राजस कर्ता असतो. जो कर्ता अशिक्षित, अज्ञानी, घमेंडखोर आहे, अभिमानी आहे, गर्विष्ठ आहे, जो धूर्त आहे, आपमतलबी आहे, स्वार्थी आहे, जो शोक करतो, जो आळशी आहे तो तामस कर्ता होय.

भगवद गीता अध्याय 18 श्लोक 29,30

भगवद-गीता-अध्याय-18-श्लोक-29-30

                हे धनंजया! आता बुद्धीचे व धृतीचेही गुणांनुसार तीन प्रकारचे भेद माझ्याकडून पूर्णपणे विभागपूर्वक सांगितले जात आहेत, ते तू ऐक. हे पार्था! जी बुद्धी प्रवृत्तिमार्ग व निवृत्तिमार्ग, कर्तव्य व अकर्तव्य, भय व अभय तसेच बंधन व मोक्ष यथार्थपणे जाणते, ती सात्त्विक बुद्धी होय.

               ज्ञान, कर्म व कर्ता (ज्ञान, ज्ञेय, ज्ञाता) यांचे गुणांनुसार तीन प्रकार पाहिल्यावर भगवंत आता बुद्धी व धृतीचे (निश्चय) गुणांनुसार तीन तीन प्रकार सांगत आहेत. जी बुद्धी प्रवृत्तिमार्ग कोणता व निवृत्तिमार्ग कोणता हे जाणते, जी बुद्धी कोणते कर्तव्य आहे व कोणते कर्तव्य नाही हे जाणते, तसेच जी बुद्धी भय-अभय व बंधन आणि मोक्ष यातील फरक जाणते, त्या बुद्धीला सात्विक बुद्धी, असे म्हणतात.

                 शास्त्राच्या नियमानुसार जी कर्मे केली जातात, त्यांना प्रवृत्ती असे म्हणतात आणि जी कर्मे शास्त्र विचारात न घेता केली जातात, त्यांना निषिद्ध कर्मे असे म्हणतात. अशी निषिद्ध कर्मे करू नयेत. जी बुद्धी सारासार विचार करू शकते ती सात्त्विक बुद्धी होय. राजस व तामस बुद्धीपेक्षा सात्त्विक बुद्धी उत्तम असते. ज्याला शास्त्र नियमांचे ज्ञान नाही तो मनुष्य कर्मफलाने बांधला जातो.

भगवद गीता अध्याय 18 श्लोक 31,32

भगवद गीता अध्याय 18 श्लोक 31,32

              हे पार्था! मनुष्य ज्या बुद्धीमुळे धर्म व अधर्म, तसेच कर्तव्य व अकर्तव्य यथायोग्य रीतीने जाणत नाही, ती बुद्धी राजसी होय. हे पार्था! तमोगुणाने व्यापलेली जी बुद्धी अधर्मालाही हा धर्म आहे असे मानते, तसेच याच रीतीने इतर सर्व पदार्थांनाही विपरीत मानते, ती बुद्धी तामसी होय.

              राजस बुद्धी आणि तामस बुद्धी याचे विवेचन करताना भगवंत म्हणतात की, ज्या बुद्धीमुळे धर्म म्हणजे काय व अधर्म म्हणजे काय हे जाणले जात नाही, ज्या बुद्धीमुळे कर्तव्य कोणते करावे व कोणते करू नये हे समजत नाही, अशा बुद्धीला राजस बुद्धी असे म्हणतात. ज्या बुद्धीने तमोगुण वृद्धिंगत होतो, ज्या बुद्धीने अधर्म हा धर्म समजला जातो व धर्म हा अधर्म समाजाला जातो, ज्या बुद्धीने भ्रम आणि अंधःकार यांची वाढ होते, जी बुद्धी सतत विपरीत कार्य करते, अशा बुद्धीला तामस बुद्धी असे म्हणतात.

             राजस व तामस बुद्धीपेक्षा सात्त्विक बुद्धी श्रेष्ठ असते. तामसिक बुद्धी सदैव विपरीत दृष्टीने कार्य करीत असते. जो खरोखर धर्म नाही त्याचा धर्म म्हणून स्वीकार केला जातो व जो खरेच धर्म आहे त्याचा धिःकार केला जातो. तामसी लोकांना सत्य हे असत्य वाटते.

भगवद गीता अध्याय 18 श्लोक 33,34,35

भगवद गीता अध्याय 18 श्लोक 33,34,35

भगवद गीता अध्याय 18 श्लोकआणि अर्थ

               हे पार्था! ज्या अव्यभिचारिणी धारणशक्तीने मनुष्य ध्यानयोगाने मन, प्राण व इंद्रिये यांच्या क्रिया धारण करीत असतो, ती धारणा सात्त्विक होय; परंतु हे पार्था! फळाची इच्छा असलेला मनुष्य अती आसक्तीमुळे ज्या धारणशक्तीने धर्म, अर्थ व काम यांना धारण करतो, ती धारणा राजसी होय. हे पार्था! दुष्ट बुद्धीचा मनुष्य ज्या धारणशक्तीमुळे झोप, भीती, काळजी, दुःख आणि उन्मत्तपणाही सोडत नाही, अर्थात धारण करून राहतो, ती धारणा तामसी होय.

               भगवंत धारणा किंवा निश्चय याचे गुणांनुसार प्रकार सांगत आहेत. जेव्हा मनुष्य मन, प्राण व इंद्रिये याद्वारे होणारी कर्मे परमात्म्याच्या ठिकाणी एकाग्र करून स्थिर होतो, तो निर्धार सात्त्विक होय. जो फळाची अपेक्षा करून कर्म करतो ती धृती राजस होय. जो झोप, भीती, दुःख यांना जवळ करतो तो तामसी धारणेचा होय.

भगवद गीता अध्याय 18 श्लोक 36,37

भगवद-गीता-अध्याय-18-श्लोक-36-37

               हे भरतर्षभा! आता तीन प्रकारचे सुखही तू माझ्याकडून ऐक. ज्या सुखात साधक भजन, ध्यान आणि सेवा इत्यादींच्या अभ्यासाने रमतो आणि ज्यामुळे त्याचे दुःख नाहीसे होते, जे आरंभी जरी विषाप्रमाणे वाटले, तरी परिणामी अमृताप्रमाणे असते, ते परमात्मविषयक बुद्धीच्या प्रसादाने उत्पन्न होणारे सुख सात्त्विक म्हटले गेले आहे.

               सुखाचेही गुणांनुसार सात्त्विक सुख, राजस सख व तामस सुख असे तीन प्रकार पडतात. सात्त्विक सुखाचे वर्णन भगवंत करतात. ते म्हणतात की, जो मनुष्य भगवंताचे भजन, कीर्तन, नामस्मरण, चिंतन यात रमतो व त्यातच सुख मानतो, जो मनुष्य स्वस्वरूपाचे ध्यान करतो, धारणा करतो, समाधी लावतो व तेच अंतिम सुख आहे असे मानतो, जो मनुष्य ईश्वरसेवा, रुग्णसेवा, दलितसेवा, समाजसेवा, देशसेवा यातच सुख मानतो, त्याचे दुःख नाहीसे होते. हे करताना प्रथम तो कष्टी होतो. प्रत्येक कर्म प्रथम त्याला विषाप्रमाणे वाटते. नंतर तेच कर्म सुखदायक होते.

भगवद गीता अध्याय 18 श्लोक 38,39,40

भगवद-गीता-अध्याय-18-श्लोक-38-39-40

भगवद गीता अध्याय 18 श्लोकआणि अर्थ

            जे सुख विषय आणि इंद्रिये यांच्या संयोगाने उत्पन्न होते, ते प्रथम भोगताना अमृतासारखे वाटत असले तरी परिणामी विषासारखे असते म्हणून ते सुख राजस म्हटले गेले आहे. जे सुख भोगकाळी आणि परिणामीही आत्म्याला मोह पाडणारे असते, ते झोप, आळस व प्रमाद यांपासून उत्पन्न झालेले सुख तामस म्हटले आहे.

              पृथ्वीवर, आकाशात किंवा देवांत तसेच यांच्याशिवाय इतरत्र कोठेही असा कोणताच प्राणी किंवा पदार्थ नाही की, जो प्रकृतीपासून उत्पन्न झालेल्या या तीन गुणांनी रहित असेल. इंद्रिय भोगाना जे क्षणैक विषयसुख प्राप्त होते, ते राजस सुख होय. जे सुख आत्म्याला मोहवश करते व आळस आणि प्रमाद यापासून प्राप्त होते ते तामस सुख होय.

भगवद गीता अध्याय 18 श्लोक 41,42,43

भगवद-गीता-अध्याय-18-श्लोक-41-42-43

भगवद गीता अध्याय 18 श्लोकआणि अर्थ

                  हे परंतपा! ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र यांची कर्मे स्वभावतः उत्पन्न झालेल्या गुणांमुळे निरनिराळी केली गेली आहेत. अंतःकरणाचा निग्रह, इंद्रियांवर ताबा ठेवणे, धर्मासाठी कष्ट सहन करणे, अंतर्बाह्य शुद्ध राहणे, दुसऱ्यांच्या अपराधांना क्षमा करणे,

               मन, इंद्रिये व शरीर सरळ राखणे, वेद, शास्त्र, ईश्वर व परलोक इत्यादींवर विश्वास ठेवणे, वेदशास्त्रांचे अध्ययन-अध्यापन करणे आणि परमात्मत्तत्त्वाचा अनुभव घेणे, ही सर्वच्या सर्व ब्राह्मणाची स्वाभाविक कर्मे आहेत. शौर्य, तेज, धैर्य, चातुर्य, युद्धातून पलायन न करणे, दान देणे आणि स्वामिभाव ही सर्वच्या सर्व क्षत्रियांची स्वाभाविक कर्मे आहेत.

भगवद गीता अध्याय 18 श्लोक 44,45,46

भगवद गीता अध्याय 18 श्लोक 44,45,46

भगवद गीता अध्याय 18 श्लोकआणि अर्थ

                  शेती, गोपालन आणि क्रय-विक्रयरूप सत्य व्यवहार ही वैश्याची स्वाभाविक कर्मे आहेत. तसेच सर्व वर्णांची सेवा करणे हे शूद्राचेही स्वाभाविक कर्म आहे. आपापल्या स्वाभाविक कर्मांत तत्पर असलेल्या मनुष्यास भगवत्‌प्राप्तिरूप परमसिद्धीचा लाभ होतो.

                  आपल्या स्वाभाविक कर्मात रत असलेला मनुष्य ज्या रीतीने कर्म करून परमसिद्धीला प्राप्त होतो, ती रीत तू ऐक. ज्या परमेश्वरापासून सर्व प्राण्यांची उत्पत्ती झाली आहे आणि ज्याने हे सर्व जग व्यापले आहे, त्या परमेश्वराची आपल्या स्वाभाविक कर्मांनी पूजा करून मनुष्य परमसिद्धी मिळवितो. भगवंतांनी कर्मानुसार समाजात ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र असे चार वर्ण निर्माण केले. त्याचे वर्णन भगवंत करतात.

भगवद गीता अध्याय 18 श्लोक 47,48

भगवद-गीता-अध्याय-18-श्लोक-47-48

                  उत्तम प्रकारे आचरिलेल्या दुसऱ्याच्या धर्मापेक्षा वैगुण्य असलेलाही आपला धर्म श्रेष्ठ आहे, कारण स्वभावाने नेमून दिलेले स्वधर्मरूप कर्म करणाऱ्या माणसाला पाप लागत नाही. म्हणूनच हे कौंतेया! सदोष असले तरीही स्वाभाविक कर्म सोडून देऊ नये; कारण धुराने जसा अग्नी, तशी सर्व कर्मे कोणत्या ना कोणत्या दोषाने युक्त असतात. स्वधर्म म्हणजे स्वकर्म.

              पूर्वकर्मानुसार आपल्या वाट्याला आलेला धर्म व कर्म आपण आनंदाने स्वीकारले पाहिजेत, असे भगवंत म्हणतात. जरी त्या धर्मात व कर्मात काही तृटी असल्या तरी आपण दुर्लक्ष करावे, कारण काही झाले तरी आपला धर्म श्रेष्ठच असतो. कारण, स्वधर्माचरण करताना पाप लागत नाही. म्हणून स्वकर्मावर सात्त्विक श्रद्धा ठेवून निष्काम भावनेने कर्म करावे.

               अग्नी जरी शुद्ध असला तरी धुरामुळे त्याला दोष प्राप्त होतो, तसे सर्व कर्मांना काही ना काही दोष असतोच. म्हणून कर्माचा त्याग करू नये. धर्माचा त्याग करू नये, कर्मफळाचा त्याग जरूर करावा. धूर असला तरी अग्नी पवित्रच असतो, तसाच स्वधर्म पवित्र समजावा.

भगवद गीता अध्याय 18 श्लोक 49,50

भगवद-गीता-अध्याय-18-श्लोक-49-50

भगवद गीता अध्याय 18 श्लोकआणि अर्थ

                सर्वत्र आसक्तिरहित बुद्धी असलेला, निःस्पृह आणि अंतःकरण जिंकलेला मनुष्य सांख्ययोगाने त्या श्रेष्ठ नैष्कर्म्यसिद्धीला प्राप्त होतो. हे कौंतेया! जी ज्ञानयोगाची अंतिम स्थिती आहे, त्या नैष्कर्म्यसिद्धीला ज्या रीतीने प्राप्त होऊन मनुष्य ब्रह्माला प्राप्त होतो, ती रीत थोडक्यात तू माझ्याकडून समजून घे.

                  जीव हा भगवंताचा अंश आहे म्हणून जीवाने केलेल्या कर्मफलाचा उपभोग भगवंतानेच घ्यायला हवा, अशी भावना होणे यालाच संन्यास असे म्हणतात. कर्म करताना मनुष्य भगवंतासाठीच जर कर्म करीत असेल तर तो मनुष्य निश्चितपणे सुखीच असतो. प्रपंच करतानाही जर मनुष्याने अनन्य भक्तीने ईश्वरसेवा केली तर त्याला मुक्ती ताबडतोब मिळते. त्याला संन्यास घेण्याची गरज नाही. बुद्धी मात्र आसक्तिरहित हवी. तो मनुष्य निःस्पृह हवा. त्याने स्वतःचे अंतःकरण जिंकलेले हवे.

               मग त्या बुद्धिवादी मनुष्याला नैष्कर्म्यसिद्धी प्राप्त होते. आता नैष्कर्म्यसिद्धी प्राप्त झाल्यानंतर तो मनुष्य ब्रह्मस्थितीला कसा प्राप्त होतो, हे आता भगवंत अर्जुनाला सांगत आहेत; कारण हीच ज्ञानयोगाची अंतिम स्थिती आहे.

भगवद गीता अध्याय 18 श्लोक 51,52,53

भगवद-गीता-अध्याय-18-श्लोक-51-52-53

भगवद गीता अध्याय 18 श्लोकआणि अर्थ

                    विशुद्ध बुद्धीने युक्त, हलके, सात्त्विक आणि नियमित भोजन घेणारा, शब्दादी विषयांचा त्याग करून, एकांतात शुद्ध ठिकाणी राहणारा, सात्विक धारणाशक्तीने अंतःकरण व इंद्रिये यांच्यावर संयम ठेवून, मन, वाणी आणि शरीर ताब्यात ठेवणारा, राग-द्वेष पूर्णपणे नाहीसे करून चांगल्या प्रकारे दृढ वैराग्याचा आश्रय घेणारा, अहंकार, बळ, घमेंड, कामना, क्रोध, संग्रहवृत्ती यांचा त्याग करून नेहमी ध्यानयोगात तत्पर असणारा, ममतारहित व शांतियुक्त पुरुष सच्चिदानंदघन ब्रह्मामध्ये एकरूप होऊन राहण्यास पात्र होतो.

                  मनुष्य बुद्धीने सत्त्वगुणी झाला की, त्याच्या ताब्यात इंद्रिये वमन येते. तो आसक्ती आणि द्वेष यातून मुक्त होतो. तो एकांतप्रिय होतो. मौनात राहतो. मर्यादित, हलका व सात्त्विक आहार घेतो. त्याचे राग व द्वेष नाहीसे होतात. ब्रह्मावस्था होण्यास पात्र होतो.

भगवद गीता अध्याय 18 श्लोक 54,55

भगवद गीता अध्याय 18 श्लोक 54,55

भगवद गीता अध्याय 18 श्लोकआणि अर्थ

                  मग तो सच्चिदानंदघन ब्रह्मात तद्रूप झालेला प्रसन्न चित्ताचा योगी कशाबद्दलही शोक करीत नाही आणि कशाचीही इच्छा करीत नाही. असा सर्व प्राण्यांच्या ठिकाणी समभाव बाळगणारा योगी माझ्या पराभक्तीला प्राप्त होतो. त्या पराभक्तीच्या योगाने तो मज परमात्म्याला मी जो आणि जसा आहे, अगदी बरोबर तसाच तत्त्वतः जाणतो, तसेच त्या भक्तीने मला तत्त्वतः जाणून त्याचवेळी माझ्यात प्रविष्ट होतो.

                 ब्रह्मभूत अवस्था प्राप्त झाली की मग त्या मनुष्याला तत्काळ परब्रह्माचा साक्षात्कार होतो आणि तो पूर्णपणे आनंदी होतो. सच्चिदानंदात तो डुलत राहतो. त्याचा शोक पूर्णपणे नाहीसा झालेला असतो. त्याला कशाची आकांक्षा राहिलेली नसते. तो सर्व प्राणिमात्रांबरोबर समभाव ठेवतो. ब्रह्माशी एकरूप झाल्याशिवाय भगवंताची सेवा करता येत नाही. मग तो ईश्वरसेवा करीत करीत ईश्वराशी एकरूप होतो. त्याला पुनर्जन्म नाही. जन्म-मृत्युच्या फेऱ्यातून त्याची सुटका होते.

भगवद गीता अध्याय 18 श्लोक 56,57,58

भगवद-गीता-अध्याय-18-श्लोक-56-57-58

भगवद गीता अध्याय 18 श्लोकआणि अर्थ

                माझ्या आश्रयाने राहणारा कर्मयोगी सर्व कर्मे नेहमी करीत असला तरी माझ्या कृपेने सनातन अविनाशी परमपदाला प्राप्त होतो. सर्व कर्मे मनाने माझ्या ठिकाणी अर्पण करून तसेच समबुद्धिरूप योगाचा अवलंब करून मत्परायण आणि निरंतर माझ्या ठिकाणी चित्त असलेला हो. वर सांगितल्याप्रमाणे माझ्या ठिकाणी चित्त ठेवल्याने तू माझ्या कृपेने सर्व संकटांतून सहजच पार होशील आणि जर अहंकारामुळे माझे सांगणे न ऐकशील, तर नष्ट होशील अर्थात परमार्थाला मुकशील.

                    भगवंताच्या आश्रयाने राहायचे म्हणजे काय करायचे, तर सर्व कमें भगवंतासाठीच करायची आणि ती भगवंताला अर्पण करायची. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत सतत भगवंताचे नामस्मरण करावे म्हणजे सर्व संकटे नाहीशी होतात.

भगवद गीता अध्याय 18 श्लोक 59,60,61

भगवद-गीता-अध्याय-18-श्लोक-59-60-61

भगवद गीता अध्याय 18 श्लोकआणि अर्थ

                तू अहंकार धरून मी युद्ध करणार नाही, असे मानतोस, तो तुझा निश्चय व्यर्थ आहे; कारण तुझा स्वभाव तुला जबरदस्तीने युद्ध करावयास लावील. हे कौंतेया! जे कर्म तू मोहामुळे करू इच्छित नाहीस, तेही आपल्या पूर्वकृत स्वाभाविक कर्माने बद्ध असल्यामुळे पराधीन होऊन करशील. हे अर्जुना ! अंतर्यामी परमेश्वर आपल्या मायेने शरीररूपी यंत्रावर आरूढ झालेल्या सर्व प्राण्यांना त्यांच्या कर्मानुसार फिरवीत सर्व प्राण्यांच्या हृदयात राहिला आहे.

               भगवंत अर्जुनाला म्हणतात की, तू अहंकारापोटी व मोहापोटी युद्ध करत नाहीस; पण तुझा मोह दूर होताच तू युद्धाला तयार होशील. परमात्मा भगवंत प्रत्येक प्राण्याच्या शरीरात वास करीत आहेत. म्हणून प्रत्येक मनुष्याने विवेकबुद्धीने भगवंतांच्या मार्गदर्शनानुसार कर्म करावे, म्हणजे कर्तेपण भगवंताला द्यावे.

भगवद गीता अध्याय 18 श्लोक 62,63,64

भगवद गीता अध्याय 18 श्लोक 62,63,64

                   हे भारता! तू सर्व प्रकारे त्या परमेश्वरालाच शरण जा. त्या परमात्म्याच्या कृपेनेच तुला परमशांती आणि सनातन परमधाम मिळेल. अशा प्रकारे हे गोपनीयाहूनही अतिगोपनीय ज्ञान मी तुला सांगितले. आता तू या रहस्यमय ज्ञानाचा संपूर्णपणे चांगला विचार करून मग जसे तुला आवडेल तसे कर. सर्व गोपनीयांहून अतिगोपनीय माझे परम रहस्ययुक्त वचन तू पुन्हा ऐक. तू माझा अत्यंत आवडता आहेस म्हणून हे परम हितकारक वचन मी तुला सांगणार आहे.

                भगवंतांनी प्रथम अर्जुनाला ब्रह्मज्ञान, नंतर परमात्मज्ञान सांगितले. आता भगवंत अर्जुनाला शरणागत होण्यास सांगत आहेत.

भगवद गीता अध्याय 18 श्लोक 65,66,67

भगवद-गीता-अध्याय-18-श्लोक-65-66-67

                   तू माझ्या ठिकाणी मन ठेव. माझा भक्त हो. माझे पूजन कर आणि मला नमस्कार कर. असे केले असता तू मलाच येऊन मिळशील, हे मी तुला सत्य प्रतिज्ञापूर्वक सांगतो; कारण तू माझा अत्यंत आवडता आहेस. सर्व धर्म म्हणजे सर्व कर्तव्यकर्मे मला अर्पण करून तू केवळ सर्वशक्तिमान, सर्वाधार अशा मला परमेश्वरालाच शरण ये.

                   मी तुला सर्व पापांपासून सोडवीन. तू शोक करू नकोस. हा गीतारूप रहस्यमय उपदेश कधीही तप न करणाऱ्या माणसाला सांगू नये. तसेच भक्तिहीन माणसाला आणि ऐकण्याची इच्छा नसणाऱ्यालाही सांगू नये. त्याचप्रमाणे माझ्यामध्ये दोष पाहणाऱ्याला तर कधीही सांगू नये. भगवंत अर्जुनाला शरणागतीचे महत्त्व सांगत आहेत.

भगवद गीता अध्याय 18 श्लोक 68,69,70

भगवद-गीता-अध्याय-18-श्लोक-68-69-70

                  जो पुरुष माझ्या ठिकाणी परम प्रेम ठेवून हे परम रहस्ययुक्त गीताशास्त्र माझ्या भक्तांना सांगेल, तो मलाच प्राप्त होईल, यात मुळीच शंका नाही. माझे अत्यंत प्रिय कार्य करणारा त्याच्याहून अधिक मनुष्यांत कोणीही नाही. तसेच पृथ्वीवर त्याच्याहून अधिक मला प्रिय दुसरा कोणी भविष्यकाळी होणारही नाही. जो पुरुष आम्हा दोघांच्या धर्ममय संवादरूप या गीताशास्त्राचे अध्ययन करील, त्याच्याकडूनही मी ज्ञानयज्ञाने पूजित होईन, असे माझे मत आहे.

                  शेवटी भगवंत म्हणतात की, जो कोणी हे गीताशास्त्र भक्तांना सांगेल, त्याला मोक्षप्राप्ती होईल यात शंकाच नाही; कारण हे अत्यंत पवित्र व पुण्यकार्य आहे. गीताशास्त्रातील ज्ञान श्रेष्ठ आहे.

भगवद गीता अध्याय 18 श्लोक 71,72,73

भगवद-गीता-अध्याय-18-श्लोक-71-72-73

                 जो मनुष्य श्रद्धायुक्त होऊन दोषदृष्टी न ठेवता या गीताशास्त्राचे श्रवण करील, तोही पापांपासून मुक्त होऊन पुण्यकर्मे करणाऱ्यांच्या श्रेष्ठ लोकांना प्राप्त होईल. हे पार्था! हे गीताशास्त्र तू एकाग्र चित्ताने ऐकलेस का? आणि हे धनंजया ! तुझा अज्ञानातून उत्पन्न झालेला मोह नाहीसा झाला का? अर्जुन म्हणाला, हे अच्युता! आपल्या कृपेने माझा मोह नाहीसा झाला आणि मला स्मृती प्राप्त झाली. आता मी संशयरहित होऊन राहिलो आहे. म्हणून मी आपल्या आज्ञेचे पालन करीन.

                  जो भक्त अत्यंत श्रद्धेने हे गीताशास्त्र ऐकेल, तो पापमुक्त होईल. अर्जुनही भगवंतांना शरण गेला. त्याचे अज्ञान नाहीसे झाले. त्याला स्मृती प्राप्त झाली. अर्जुन निर्मोह होऊन युद्धास तयार झाला.

भगवद गीता अध्याय 18 श्लोक 74,75,76

भगवद गीता अध्याय 18 श्लोक 74,75,76

                   संजय म्हणाला, अशा प्रकारे मी श्रीवासुदेव आणि महात्मा पार्थ यांचा हा अद्भुत रहस्यमय रोमांचकारक संवाद ऐकला. श्री व्यासांच्या कृपेने दिव्यदृष्टी मिळवून मी हा परम गोपनीय योग अर्जुनाला सांगत असताना स्वतः योगेश्वर भगवान श्रीकृष्णांकडून प्रत्यक्ष ऐकला आहे. हे महाराज ! भगवान केशव आणि अर्जुन यांचा हा रहस्यमय, कल्याणकारक आणि अद्भुत संवाद पुन्हा पुन्हा आठवून मी वारंवार आनंदित होत आहे.

                श्री व्यास महर्षीनी संजयला दिव्यदृष्टी दिल्यामुळे कुरुक्षेत्रावर घडलेले सर्व वृत्त संजय, धृतराष्ट्राला जसेच्या तसे वर्णन करून सांगत होता. संजय म्हणाला की, भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेला अत्यंत गोपनीय, रहस्यमय, कल्याणकारक, अद्भुत संवादरूपी गीतायोग मी प्रत्यक्ष ऐकला आहे. तो संवाद आठवून मी वारंवार आनंदित होत आहे.

भगवद गीता अध्याय 18 श्लोक 77,78

भगवद-गीता-अध्याय-18-श्लोक-77-78

                    हे महाराज! श्रीहरीचे ते अत्यंत अलौकिक रूपही वरचेवर आठवून माझ्या मनाला खूप आश्चर्य वाटत आहे आणि मी वारंवार हर्षपुलकित होत आहे. जेथे योगेश्वर भगवान श्रीकृष्ण आहेत आणि जेथे गांडीव धनुष्य धारण करणारा पार्थ आहे, तेथेच श्री, विजय, विभूती आणि अचल नीती आहे, असे माझे मत आहे. संजय धृतराष्ट्रास सांगतो की, भगवान श्रीकृष्णाचे विराटरूप व चतुर्भुजरूप वरचेवर आठवून मला खूप आश्चर्य वाटत आहे. तसेच मला अत्यानंदही होत आहे.

               संजय आता स्वतःचे मत धृतराष्ट्रास सांगत आहे. संजय म्हणतो की, जेथे जेथे भगवंत आहेत तेथे तेथे गांडीव धनुष्य घेतलेला अर्जुन आहे. तेथे लक्ष्मी, विजय, भगवंतांच्या विभूती व नीतिमत्ता आहे असे माझे स्पष्ट मत आहे. भगवद्गीता म्हणजे नैतिकतेचा सर्वश्रेष्ठ उपदेश आहे. ज्ञान, कर्म, ध्यान व भक्ती या चार मार्गांनी भगवंताला प्राप्त करता येते. या चार मार्गात भक्तियोग हा सोपा व सर्वश्रेष्ठ मार्ग आहे असे, भगवंत म्हणतात. भगवंताला शरण जावे हा भक्तीचा सारांश आहे.

               हे परमसत्य आहे. श्रीमद्भगवद्गीतारूपी उपनिषद तथा ब्रह्मविद्या आणि योगशास्त्राविषयी मोक्षसंन्यासयोग नावाचा हा अठरावा अध्याय समाप्त झाला.

Leave a Comment