कर्मसंन्यासयोग
Table of Contents
Toggleभगवद गीता अध्याय 5 श्लोक 1,2
भगवद गीता अध्याय 5 श्लोकआणि अर्थ
अर्जुन म्हणाला, हे कृष्णा ! तुम्ही कर्मे टाकण्याची आणि फिरून कर्मयोगाची प्रशंसा करता, तेव्हा या दोहोंपैकी माझ्यासाठी अगदी निश्चित कल्याणकारक जे एक साधन असेल, ते सांगा. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, कर्मसंन्यास आणि कर्मयोग हे दोन्हीही परमकल्याण करणारेच आहेत; परंतु या दोहोतही संन्यासाहून कर्मयोग साधण्यास सोपा असल्याने श्रेष्ठ आहे.
दुसऱ्या अध्यायात भगवंतांनी अर्जुनाला जीवात्मा व देहबंधन यांचे प्राथमिक ज्ञान दिले. ज्ञानयोगद्वारा कर्मबंधनातून कशी सुटका होते हे सांगितले. तिसऱ्या अध्यायात ज्ञानी माणसाला कोणतेही कर्म करायचे शिल्लक राहत नाही, असे सांगितले. चौथ्या अध्यायात सर्व यज्ञांचे ज्ञानात रूपांतर होते, असे सांगितले. चौथ्या अध्यायाच्या शेवटी भगवंत म्हणतात की, तू ज्ञानी हो. आता कर्मसंन्यास आणि कर्मयोग दोन्हीत श्रेष्ठ काय, असा प्रश्न अर्जुनाला पडला आहे.
भगवद गीता अध्याय 5 श्लोक 3,4
भगवद गीता अध्याय 5 श्लोकआणि अर्थ
हे अर्जुना! जो मनुष्य कोणाचा द्वेष करीत नाही आणि कशाची अपेक्षा करीत नाही, तो कर्मयोगी संन्यासी समजावा, कारण राग-द्वेष इत्यादी द्वंद्वांनी रहित असलेला मनुष्य सुखाने संसारबंधनातून मुक्त होतो. वर सांगितलेले संन्यास आणि कर्मयोग वेगवेगळी फळे देणारे आहेत, असे मूर्ख लोक म्हणतात, पंडित नव्हेत. दोहोंपैकी एकाच्या ठिकाणीसुद्धा उत्तम प्रकारे स्थित असलेला मनुष्य दोहोंचे फलस्वरूप असलेल्या परमात्म्याला प्राप्त होतो.
जीवात्मा म्हणजे शरीर नव्हे. आपल्या स्वरूपाचे ज्ञान होणे म्हणजे कर्मसंन्यास होय. या सृष्टीतील प्रत्येक वस्तू भगवंताच्या मालकीची आहे, आपल्या नाही, हे एकदा समजले की, मग मनुष्य कोणाचा द्वेष करीत नाही आणि त्याला कशाची अपेक्षाही राहत नाही. मग कर्म केले तरी तो संन्यासीच होय, कारण तो द्वंद्वातीत होतो. त्याचे चित्त शुद्ध होते. तो संसारबंधनातून मुक्त होतो. कर्मसंन्यास व कर्मयोग दोन्हीही सारखेच फळ देणारे आहेत; पण सर्वसामान्य माणसाला कर्मयोग हा कर्मसंन्यासापेक्षा सोपा आहे. कर्मयोग हा श्रेष्ठ समजला जातो. असा भक्त परमात्म्याला प्राप्त होतो.
भगवद गीता अध्याय 5 श्लोक 5,6
भगवद गीता अध्याय 5 श्लोकआणि अर्थ
ज्ञानयोग्यांना जे परमधाम प्राप्त होते, तेच कर्मयोग्यांनाही प्राप्त होते. म्हणून जो मनुष्य ज्ञानयोग आणि कर्मयोग हे फळाच्या दृष्टीने एकच आहेत, असे पाहतो, तोच खऱ्या अर्थाने पाहतो. परंतु हे अर्जुना! कर्मयोगाशिवाय मन, इंद्रिये व शरीर यांच्याकडून होणाऱ्या सर्व कर्मांच्या बाबतीत कर्तेपणाचा त्याग होणे कठीण आहे. आणि भगवत्स्वरूपाचे चिंतन करणारा कर्मयोगी परब्रह्म परमात्म्याला फार लवकर प्राप्त होतो.
कर्माशिवाय नुसते ज्ञान असून उपयोगी नाही व ज्ञानाशिवाय कर्म व्यर्थ असते. म्हणून ज्ञानयोग व कर्मयोग यांचे फळ सारखेच असते; पण मन, इंद्रिये, शरीर यांच्याकडून होणाऱ्या सर्व कर्मांचा त्याग करणे वाटते तितके सोपे नसते. त्यासाठी ती इंद्रिये ईश्वरचिंतनाकडे लावणे महत्त्वाचे ठरते. असा कर्मयोगी अत्यंत श्रेष्ठ समजला जातो.
सर्वसामान्य मनुष्य कर्मयोगाचा अवलंब करून ज्ञानयोगापेक्षा लवकर ब्रह्माच्या अंकित होतो. मायावादी संन्यास म्हणजे सांख्ययोगाचा संन्यास, तर वैष्णव संन्यास म्हणजे कर्मयोगाचा संन्यास होय. वैष्णव संन्यास हा श्रेष्ठ आहे.
भगवद गीता अध्याय 5 श्लोक 7
भगवद गीता अध्याय 5 श्लोकआणि अर्थ
ज्याचे मन स्वतःच्या ताब्यात आहे, जो इंद्रियनिग्रही आणि शुद्ध अंत करणाचा आहे, तसेच सर्व सजीवांचा आत्मरूप परमात्माच ज्याचा आत्मा आहे, असा कर्मयोगी कर्मे करूनही अलिप्त राहतो.
जो अंतःकरणाने शुद्ध असतो, त्याचे मन ताब्यात असते, ज्याचे मन ताब्यात असते, त्याची इंद्रिये तो सांगेल त्याप्रमाणे कर्मे करतात, कारण ती त्याला वश असतात. ज्याला इंद्रिये वश असतात, त्याचे चित्त भगवंतचरणी स्थिर असते. भक्तीशिवाय त्याची इंद्रिये इतर कोणत्याही गोष्टीस प्रवृत्त होत नाहीत.
ईश्चराला अर्पण केल्याशिवाय तो अन्न खात नाही, पाणी पीत नाही. ईश्वर भक्तीशिवाय तो काहीही ऐकत नाही. भगवंताशिवाय त्याला काहीही दिसत नाही. तो कोणाचेही मन दुखावत नाही. सर्व सजीवांचा आत्मा त्याला स्वतःचा आत्मा वाटतो. त्याचे प्रत्येक कर्म सकाम नसून निष्काम असते. म्हणून भगवंतासाठी केलेले प्रत्येक कर्म हे अकर्म होते.
तो कर्म करीत असूनही त्याला करायचे असे काही राहतच नाही. म्हणून भगवंत अर्जुनाला म्हणतात की, आत्मा अमर असतो. तो शस्त्राने मरत नाही, अग्नीने जळत नाही. शरीर जीर्ण झाले की, तो फक्त शरीर बदलतो. त्यामुळे तू भगवंताला स्मरून ते कर्म भगवंताला अर्पण कर. त्या कर्माचे कर्तेपण आपोआप माझ्याकडे येईल. तू युद्ध केलेस तर ते तुझ्या क्षात्रधर्म पालनासाठी आहे.
भगवद गीता अध्याय 5 श्लोक 8,9
भगवद गीता अध्याय 5 श्लोकआणि अर्थ
सांख्ययोगी तत्त्ववेत्त्याने पाहत असता, ऐकत असता, स्पर्श करीत असता, बास घेत असता, भोजन करीत असता, चालत असता, झोपत असता, श्वासोच्छ्रास करीत असता, बोलत असता, तसेच डोळ्यांनी उघडझाप करीत असतानाही सर्व इंद्रिये आपापल्या विषयांत वावरत आहेत, असे समजून निःसंशय असे मानावे की, मी काहीच करीत नाही. कोणतेही कर्म मुख्यत्वे पाच गोष्टींवर अवलंबून असते.
कर्ता, कर्म, क्रिया, अधिष्ठान व दैव या त्या पाच गोष्टी आहेत. आता ईश्वराचे जे सेवक आहेत, त्यांना त्यांच्या खऱ्या स्वरूपाची जाणीव असते. त्यामुळे पाहणे, ऐकणे, स्पर्श करणे, वास घेणे, भोजन करणे, उठणे, बसणे, चालणे, झोपणे, श्वासोच्छवास करणे, बोलणे, देणे, घेणे, डोळ्यांनी उघडझाप करणे, विचार करणे या सर्व क्रिया जर ते ज्ञानी भक्त भगवंतासाठी करीत असतील तर कोणतीच कर्मे ते करीत नाहीत, असे नक्की समजावे. ईश्वराचे सेवक म्हणजे भक्त होय. मग तो फार मोठा पंडित असला पाहिजे असे नाही
भगवद गीता अध्याय 5 श्लोक 10,11
भगवद गीता अध्याय 5 श्लोकआणि अर्थ
जो पुरुष सर्व कर्मे परमात्म्याला अर्पण करून आणि आसक्ती सोडून करतो, तो पुरुष पाण्यातील कमलपत्राप्रमाणे पापाने लिप्त होत नाही. कर्मयोगी ममत्वबुद्धी सोडून केवळ अंतःकरणाच्या शुद्धीसाठी इंद्रिये, मन, बुद्धी आणि शरीर यांच्याद्वारे आसक्ती सोडून कर्म करतात.
भगवंताला जेव्हा कर्मे अर्पण करायची असतात तेव्हा ती विचारपूर्वक अर्पण केली जातात. अशा कर्मांना सदाचार कर्मे किंवा सत्कर्मे असे म्हणतात. सर्व कर्मे भगवंताला अर्पण करायची ठरवल्यावर मनुष्य आपोआपच सदाचारी बनतो. मग ती कर्मे आपोआपच आसक्तिविरहित होतात. त्यात ममत्व मुळीच नसते. ती कर्मे पूर्णपणे शुद्ध असतात.
मग ती कर्मे मनाची असोत की बुद्धीची असोत, इंद्रियांची असोत की शरीराची असोत, ती सर्व पुण्यकर्मेच होतात. अशी कर्मे केली काय अन् नाही केली काय, सारखीच असतात. म्हणून अशा कर्माना अकर्मे, असेही म्हणतात. असा कर्मयोग भगवंताला भावतो. तो आपल्यावर कृपा करतो. तो आपाल्याला जन्म-मृत्युच्या फेऱ्यातून वाचवतो. आपणास मुक्ती देतो. आपणास ब्रह्माचा आनंद बहाल करतो. भगवंत भावाचा भुकेला आहे.
भगवद गीता अध्याय 5 श्लोक 12,13
भगवद गीता अध्याय 5 श्लोकआणि अर्थ
कर्मयोगी कर्मांच्या फळांचा त्याग करून भगवत्प्राप्ती रूप शांतीला प्राप्त होतो. आणि कामना असलेला पुरुष कामनांच्या प्रेरणेमुळे फळांत आसक्त होऊन बाद होतो. अंतःकरण ज्याच्या ताब्यात आहे, असा सांख्ययोगाचे आचरण करणादा पुरुष कोणतेही कर्म करणारा किंवा करविणारा न होताच नऊ दरवाजांच्या शरीररूपी घरात सर्व काँचा मनाने त्याग करून आनंदाने सच्चिदानंदघन परमात्म्याच्या स्वस्थान स्थित राहतो.
मानवी देहाला नगराची उपमा दिली, तर देहरूपी नगराला नऊ प्रवेशद्वारे आहेत. ढोन डोळे, दोन कान, दोन नाकपुड्या, एक मुख, एक पायू (गुद्), व एक उपास्य (जननेंद्रिय). अशा या नगरात आत्मा राजासारखा राहत असतो. मानव हा ईश्वराचा अंश असल्यामुळे त्या आत्म्यात ईश्वरदेखील नांदत असतो.
जो खरोखर भगवद्भक्त आहे त्याचे अंतःकरण ताब्यात असते. तो ज्ञानमार्गाने व भक्ती मागनि जाणारा असतो. तो निष्काम कर्मे करतो. त्याची सर्व कर्मे ईश्वरार्पण होतात. म्हणजेच तो मनाने अकर्ता होतो व आनंदाने परब्रह्माचा उपभोग घेत असतो; पण जो विषय कामनांची इच्छा करतो, विषयभोगात अडकतो, तो जीवनात दुःखे प्राप्त करतो
भगवद गीता अध्याय 5 श्लोक 14,15
भगवद गीता अध्याय 5 श्लोकआणि अर्थ
परमेश्वर मनुष्यांचे कर्तेपण, कर्मे आणि कर्मफलांशी संयोग उत्पन्न करीत नाही, तर प्रकृतीच खेळ करीत असते. सर्वव्यापी परमेश्वरही कोणाचेही पापकर्म किंवा पुण्यकर्म स्वतःकडे घेत नाही; परंतु अज्ञानाने ज्ञान झाकले गेले आहे. त्यामुळे सर्व अज्ञानी लोक मोहित होतात.
जीवात्म्यास अनित्य शरीर किंवा निवासस्थान प्राप्त होते. त्यामुळे त्यास विविध कर्मे करावी लागतात, व त्याचे फळ म्हणून त्याला सुख किंवा दुःख भोगावे लागते. त्यामुळे कर्ता, कर्म, व फळ भगवंत निर्माण करीत नाही. ज्या प्रकृतीत हा देह निर्माण झाला, ती प्रकृतीच हा सारा खेळ निर्माण करीत असते.
पाप किंवा पुण्य भगवंत निर्माण करीत नाही. ज्याच्या त्याच्या कर्मानुसार त्याला ते प्राप्त होत असते. अज्ञानाच्या आवरणामुळे ज्ञान झाकून जाते. आरशावर धूळ बसली तर चेहरा दिसत नाही; पण धूळ झटकताच चेहरा स्पष्ट दिसतो. त्याप्रमाणे अज्ञान दूर होताच ज्ञानाची झळाळी दिसू लागते. जोपर्यंत जीव या देहात राहतो, तोपर्यंत त्याला देहाचे स्वामी आहोत असे वाटते. खरे म्हणजे तो देहाचा स्वामी नाही, नियंता नाही.
भगवद गीता अध्याय 5 श्लोक 16,17
भगवद गीता अध्याय 5 श्लोकआणि अर्थ
परंतु, ज्यांचे ते अज्ञान परमात्मज्ञानाने नाहीसे झाले आहे, त्यांचे ते ज्ञान सूर्याप्रमाणे त्या सच्चिदानंदघन परमात्म्याला प्रकाशित करते. ज्यांचे मन व बुद्धी तद्रूप झालेली आहे आणि सच्चिदानंदघन परमात्म्यातच ज्यांचे नित्य ऐक्य झाले आहे, असे ईश्वरपरायण पुरुष ज्ञानाने पापरहित होऊन परमगतीला प्राप्त होतात.
ज्याप्रमाणे सूर्य उगवताच अंध:कार नाहीसा होतो व सारे जग प्रकाशाने न्हाऊन निघते, त्याप्रमाणे ज्ञानसूर्य उगवताच अज्ञानरूपी अंध:कार नाहीसा होतो. ज्या घरात जीव राहतो ते त्याच्या मालकीचे घर नसून ते घर भाड्याचे आहे, अशी जाणीव होणे म्हणजे ज्ञान होय. एखादा पाहुणा जसा घरात अलिप्तपणे राहतो त्याप्रमाणे माणसाने संसारात राहिले पाहिजे.
वैदिक शास्त्रात परमात्म तत्त्वाला ब्रह्म, परमात्मा किंवा भगवंत असे म्हणतात. ज्याचे मन, बुद्धी, निष्ठा व आश्रय भगवंतापाशी आहे, त्याची सर्व पापे धुऊन जातात, व ते जीवात्मे परमगती प्राप्त करून घेतात. त्या जीवांची सर्व बंधनांतून मुक्तता होते, त्याने केलेले कर्म हे कर्मच राहत नाही, ते अकर्म होते, निष्काम कर्म होते, तो ब्रह्मानंद प्राशन करतो.
भगवद गीता अध्याय 5 श्लोक 18,19
भगवद गीता अध्याय 5 श्लोकआणि अर्थ
ते ज्ञानी पुरुष विद्या व विनय यांनी युक्त असलेल्या ब्राह्मण, गाय, हत्ती, कुत्रा, आणि चांडाळ या सर्वांना समदृष्टीनेच पाहतात. ज्यांचे मन समभावात स्थिर झाले आहे, त्यांनी या जन्मीच संपूर्ण संसार जिंकला; कारण सच्चिदानंदघन परमात्मा निर्दोष आणि सम आहे. म्हणून ते सच्चिदानंदघन परमात्म्यातच स्थिर असतात.
ब्राह्मण आणि चांडाळ ही मानव जातीचीच दोन्ही रूपे आहेत. एकाकडे ज्ञान आहे, तर दुसऱ्याकडे ज्ञानाचा अभाव आहे. एक ब्रह्म जाणतो, तर दुसरा भोग भोगतो. एक पुण्यकर्म करतो, तर दुसरा पापकर्म करतो. असे असले तरी परमात्मा मात्र दोन्हीतही वास करतो. गाय, हत्ती आणि कुत्रा तिघेही प्रामाणिक, सेवक व परोपकारी असले तरी तिघेही पशू आहेत.
तरीसुद्धा परमात्मा तिघांच्या ठिकाणी सारख्याच समभावाने राहतो, कारण परमात्मा हा सम व निर्दोष आहे. तो सच्चिदानंद आहे, आनंदघन आहे. हे जे लोक जाणतात ते ज्ञानी असतात. ते विद्यमान असतात. ते विनयी असतात. त्यांचे मन समभावात स्थिर असते. ते लोक संसार व परमात्मा जिंकतात.
भगवद गीता अध्याय 5 श्लोक 20,21
भगवद गीता अध्याय 5 श्लोकआणि अर्थ
जो पुरुष प्रिय वस्तू मिळाली असता आनंदित होत नाही आणि अप्रिय वस्तू प्राप्त झाली असता उद्विप्न होत नाही, तो स्थिरबुद्धी असलेला, संशयरहित ब्रह्मवेत्ता पुरुष सच्चिदानंदघन परब्रह्म परमात्म्यात ऐक्यभावाने नित्य स्थित असतो. ज्याच्या अंतःकरणाला बाहेरील विषयांची आसक्ती नसते, असा साधक आत्म्यात असलेल्या ध्यानामुळे मिळणाऱ्या सात्त्विक आनंदाला प्राप्त होतो. त्यानंतर तो सच्चिदानंदघन परब्रह्म परमात्म्याच्या ध्यानरूप योगात ऐक्यभावाने स्थिती असलेला पुरुष अक्षय आनंदाचा अनुभव घेतो.
या श्लोकांत आत्मसाक्षात्कारी पुरुषांची लक्षणे सांगितली आहेत. स्थिरबुद्धी चे वर्णन करताना भगवंत म्हणतात की, प्रिय वस्तू मिळाली तरी ज्याला आनंद होत नाही व अप्रिय वस्तू मिळाली तरी दुःख होत नाही, ज्याला विषयभोगांची आसक्ती नाही, जो सुख-दुःखात समभावाने राहतो, जो निष्काम कर्म करतो, ज्याला फळाची अपेक्षा नाही, त्याला स्थिरबुद्धी असे म्हणतात. असा स्थिरबुद्धी असलेला मनुष्य सदैव परमात्म्यात स्थित असतो. आनंदानुभव घेतो.
भगवद गीता अध्याय 5 श्लोक 22,23
भगवद गीता अध्याय 5 श्लोकआणि अर्थ
जे हे इंद्रिय आणि विषय यांच्या संयोगाने उत्पन्न होणारे सर्व भोग आहेत, ते जरी विषयी पुरुषांना सुखरूप वाटत असले, तरी तेही दुःखालाच कारण होणारे आणि अनित्य आहेत. म्हणून हे अर्जुना! बुद्धिमान विवेकी पुरुष त्यात रमत नाहीत. जो साधक या मनुष्य शरीरात शरीर पडण्याआधीच काम-क्रोध यांमुळे उत्पन्न होणारा आवेग सहन करण्यास समर्थ होतो, तोच योगी होय आणि तोच सुखी होय.
मानवी शरीराला पाच कर्मेंद्रिये, पाच ज्ञानेंद्रिये ही बाह्य इंद्रिये व मन, बुद्धी, आत्मा व अंतःकरण ही अंतरेंद्रिये असतात. प्रत्येक इंद्रियाचे विषयभोग वेगवेगळे असतात. वाणी, क्रोध, मन, उदर, जननेंन्द्रिय, जिव्हा यांचे जोर अधिक असतात. वासना अतृप्त राहिल्या की, क्रोध निर्माण होतो.
क्रोध निर्माण झाला की, चित्त, नेत्र व छाती क्षुब्ध होतात. म्हणून ज्ञानी लोक राग, जीभ, भूक, मन व इंद्रियसुख यावर नियंत्रण ठेवतात. आपले शरीरच जर अनित्य आहे, तर इंद्रियसुखदेखील अनित्यच असते. त्यामुळे ते दुःखाला कारण होते. म्हणून विवेकी लोक यात पडत नाहीत. काम व क्रोध यांचा आवेग सहन करण्यास शिकले पाहिजे. त्यालाच खरे सुख मिळते.
भगवद गीता अध्याय 5 श्लोक 24,25
भगवद गीता अध्याय 5 श्लोकआणि अर्थ
जो पुरुष अंतरात्म्यातच सुखी, आत्म्यातच रमणारा आणि आत्म्यातच ज्ञान मिळालेला असतो, तो सच्चिदानंदधन परब्रह्म परमात्म्यासह ऐक्यभावाला ग्राम शालेला सांख्ययोगी शांत ब्रह्माला प्राप्त होतो. ज्यांचे सर्व पाप नष्ट झाले आहे, ज्यांचे सर्व संशय ज्ञानामुळे फिटले आहेत, जे सजीवमात्रांच्या कल्याणार आहे, आहेत आणि ज्यांचे जिंकलेले मन निश्चलपणे परमात्म्यात स्थिर असते, ते ब्रह्मवार शांत ब्रह्माला प्राप्त होतात. ज्याला शाश्वत सुख कशात आहे हे कळते व जो त्याप्रमाणे आचरण करतो, त्याला ज्ञानी किंवा पंडित, असे म्हणतात, असा सांख्ययोगी शांत ब्रह्माला प्राप्त करून घेतो. त्याची सर्व कर्मे अकर्मे झालेली असतात.
त्याची सर्व पापे नष्ट झालेली असतात. तो अंतरात्म्यातच नित्यानंदाचा अनुभव घेत असतो. त्याची इंद्रिये व मन त्याच्या ताब्यात असतात. त्याला स्वतःसाठी काहीच करायचे राहिलेले नसते. तो जगाच्या काल्याणाचाच विचार करीत असतो. त्याचे मन परमात्म्यात स्थिर असते. जगाचे कल्याण, व्हावे अशीच त्याची भावना असते. असा ब्रह्मवेत्ता ब्रह्म प्राप्त करून घेतो.
भगवद गीता अध्याय 5 श्लोक 26
भगवद गीता अध्याय 5 श्लोकआणि अर्थ
काम, क्रोध मावळलेले, मन जिंकलेले, परब्रह्म परमात्म्याचा घेतलेले के ज्ञानी पुरुष असतात, त्यांच्या सर्व बाजूंनी शांत परब्रह्म परमात्माच परिपूर्ण भरलेला असतो. साक्षात्कार करूर
दर्शन, ध्यान आणि स्पर्श यायोगे मासा, कासव आणि पक्षी आपापल्या पिल्लांचे पोषण करीत असतात. मासा आपल्या पिलांकडे फक्त पाहण्याशिवाय काहीच करू शकत नाही. कासव जमिनीवर अंडी घालते; पण स्वतः पाण्यात राहते. केवळ ध्यान करून पिलांचा जन्म होतो. पक्षी केवळ चोचीने अन्न भरवून पिलांचे पोषण करतात; पण मनुष्य मात्र मुलाबाळांचे पोषण करण्यासाठी किती खटाटोप करतो. थोडा जरी प्रयत्न भगवत्प्राप्तीसाठी केला तरी किती तरी आनंद भगवंताला होईल.
भगवंत भावाचा भुकेला आहे. त्यासाठी प्रपंच आड येत नाही. काम, क्रोध आणि मन यावर विजय मिळविता आला पाहिजे. अज्ञान दूर केले पाहिजे. मग परब्रह्माची प्राप्ती झालीच म्हणून समजा. सारी द्वंद्वे नाहीशी झालीच म्हणून समजा. नित्य व शाश्वत आनंदाचा लाभ झालाच म्हणून समजा; पण हे करण्यासाठी मनापासून कष्ट करण्याची तयारी पाहिजे. ईश्वरावर अढळ श्रद्धा पाहिजे. शरणागती पाहिजे. निष्काम कर्म करण्याची तयारी पाहिजे. ईश्वर कर्ता मानले पाहिजे. विषयांची आसक्ती कमी झाली पाहिजे. हे सर्व करणे सोपे दिसत नसले तरी अवघड मात्र नाही.
भगवद गीता अध्याय 5 श्लोक 27,28
भगवद गीता अध्याय 5 श्लोकआणि अर्थ
बाहेरच्या विषयभोगांचे चिंतन न करता ते बाहेरच ठेवून, दृष्टी भुवयांच्या मध्यभागी स्थिर करून तसेच नाकातून वाहणारे प्राण व अपान वायू सम करून, ज्याने इंद्रिये, मन व बुद्धी जिंकली आहेत, असा मोक्षतत्पर मुनी इच्छा, भय आणि क्रोध यांनी रहित झाला की, तो सदोदित मुक्तच असतो.
योगधारणेचा अभ्यास करून साधक कसा ब्रह्म प्राप्ती करून घेतो, याचे पूर्ण विश्लेषण पुढील सहाव्या ध्यानयोग या अध्यायात केले आहे. त्या अध्यायात प्रवेश करण्यापूर्वी त्याची सुरुवात म्हणून वरील श्लोकांद्वारे भगवंत म्हणतात की, अष्टांग योगाची आठ अंगे आहेत. (यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान व समाधी) प्रत्याहाराद्वारे शब्द, रूप, रस, स्पर्श व गंध या विषयांचा नाश केला पाहिजे.
प्राण व अपान (श्वास व उच्छ्रास) यांची गती सम ठेवावी. दृष्टी भुवयांच्या मध्यभागी स्थिर करावी किंवा नासिकाग्रावर केंद्रित करावी. डोळे अर्धोन्मीलित असावेत. डोळे पूर्ण झाकले तर झोप लागेल. पूर्ण उघडे ठेवले तर विषयांकडे लक्ष जाईल. विषयाचे चिंतन न करता मन, बुद्धी व इंद्रिये ताब्यात ठेवावीत. असा योगी मुक्ती प्राप्त करतो.