भारतरत्न ‘विषयी
कला, साहित्य, विज्ञान, समाजसेवा, विश्वशांती, मानव-विकास इत्यादी क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आणि त्यासाठी आपले जीवन पणाला लावणाऱ्या भारतीयाला ‘भारतरत्न’ हा पुरस्कार देऊन गौरवायचे, असा निर्णय इ.स. १९५४ मध्ये भारत सरकारतर्फे घेण्यात आला आणि २ जानेवारी १९५४ रोजी भारताच्या राष्ट्रपतींनी त्यावर मान्यतेची मोहर उठवली. भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणून ‘भारतरत्न’ एक अमूल्य सन्मान आहे. इ. सन २०१३ मध्ये वरील क्षेत्रांबरोबरच क्रीडा क्षेत्रातही उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना या पुरस्कारात स्थान देण्यात आले. हा पुरस्कार मरणोत्तरही दिला जाऊ शकतो. या पुरस्काराचे वैशिष्ट्ये व तो देण्यासबंधीचे नियम भारत सरकारच्या राजपत्रात नमूद केले आहेत. bharat ratna information in marathi
पुरस्काराच्या प्राथमिक वैशिष्ट्यांचे स्वरूप पुढीलप्रमाणे
- पुरस्कार एका पदकाच्या स्वरूपाचा असेल आणि त्यास ‘भारतरत्न‘ संबोधले जाईल.
- हे पदक १.३७५ इंच आकाराच्या व्यासाचे असेल आणि दोन्ही बाजूला गोल कडा असतील. पदकाच्या शीर्ष पटलाच्या मध्ये उगवलेला सूर्य असून त्याची किरणे कडेपर्यंत पसरलेली असतील. सूर्यबिंबावर ‘भारतरत्न’ देवनागरी लिपीमध्ये कोरलेले असेल. पदकाच्या खालील कडेवर पुष्पमाला कोरलेली असेल. पदकाच्या मागील बाजूवर मधोमध भारताचे राजचिन्ह कोरले जाईल व त्याच्या खालील बाजूच्या कडेवर ‘सत्यमेव जयते’ देवनागरी लिपीमध्ये कोरले जाईल.
- हे पदक ०.२५ इंच रुंदीच्या पांढऱ्या रंगाच्या फितीमध्ये बांधून पुरस्कृत व्यक्तीच्या गळ्यात घातले जाईल.
- हे पदत राष्ट्रपतींच्या हस्तेच दिले जाईल.
- ‘भारतरत्न’ पुरस्काराने अलंकृत व्यक्तीचे नाव भारत सरकारच्या राजपत्रात प्रकाशित केले जाईल आणि राष्ट्रपतींच्या निर्देशाधीन रजिस्टरमध्ये नोंदवल जाईल
- एखाद्या व्यक्तीला दिले गेलेले पदक काढून घेणे व त्या व्यक्तीचे नाव रजिस्टरमधून कमी करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना असेल. तसेच एकदा काढून घेतलेले पदक पुन्हा त्या व्यक्तीला परत करणे आणि त्याच्या नावाची रजिस्टरमध्ये नोंद करण्याचा आदेश देण्याचा अधिकारही राष्ट्रपतींना राहील.
- जात, व्यावसायिक प्रतिष्ठा, लिंगभेद या कशाचाही परिणाम या पुरस्काराची पात्र व्यक्ती ठरविताना होणार नाही.
- प्रत्येक वेळेला रद्द करण्याची व पुननोंदणी करण्याची प्रक्रिया भारत सरकारच्या राजपत्रात प्रकाशित केली जाईल.
भारतरत्न पुरस्कार
दि. ८ जानेवारी १९५५ रोजी राजपत्रामधून पदकासंबंधी काही नवीन बहन अधिसूचित केले. त्यातील प्रमुख मुद्दे खालीलप्रमाणे
- मा. राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांच्या मुद्रसहित पुरस्कार प्रदान केला जाईल. हे पदक पिंपळाच्या पानाच्या आकाराचे असेल त्याची लांबी २.३१२५ इंच, नंदी १.८७५ इंच व जाडी ०.१२५ इंचाची राहील हे पदक काशाचे बनवले जाईल. याच्या दर्शनी बाजूवर ०६२५ इंच व्यासाच्या सूर्याची प्रतिकृती कोरलेली असेल. त्याची किरणे सूर्याच्या केंद्रापासून ०.३१२५ ते ०.५ इंचापर्यंत चारी बाजूला पसरलेली असतील त्याच्याखाली देवनागरी लिपीमध्ये ‘भारतरत्न’ कोरले असेल मागील बाजूस राजचिन्ह कोरले जाईल. सूर्य व घेरा राष्ट्रपतींनी प्लॅटिनमचा असेल, अक्षरावर बांदीचा मुक्त्तामा असेल.
- २६ जानेवारी १९५७ च्या अधिसूचनेनुसार हे पदक चमकदार काशामध्ये बदलले.
मेडलची आजची स्थिती खालीलप्रमाणे
- ‘भारतरत्न’ मेडल ५.८ सें.मी. लांबीचे, ४७ सें मी रुदीचे आणि ३.१ मि.मी. जाडीचे पिंपळाच्या पानाच्या आकाराचे बनविलेले असते हे कासे धातूचे बनवलेले असते त्याच्या वरील बाजूवर १.६ सें मी व्यासाची सूर्याची आकृती कोरली जाते, ज्याच्या खाली देवनागरी लिपीमध्ये ‘भारतरत्न’ कोरलेले असते.
- मेडलच्या मागील भागावर भारताचे राजचिन्ह (अशोकचक्र) व आदर्श वाक्य कोरले जाते. सूर्य, राजचिन्ह व कडा प्लॅटिनमच्या बनविल्या जातात आणि शब्द चमकदार पितळेचे हे मेडल पाढऱ्या रंगाच्या रिबिनीमध्ये ओवले जाते. कोलकात्याला असलेल्या टाकसाळीत हे मेडल बनवले जाते.
भारतरत्न’ विजेत्याला खालील सुविधा मिळतात
‘VIP’ च्या समकक्ष श्रेणी
प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिन समारंभात सन्माननीय अतिथी
भारतामध्ये कुठेही जाण्यासाठी प्रथम श्रेणीचे मोफत विमान व रेल्वे प्रवास तिकीट
पंतप्रधानाच्या बेतनाएवढे किंवा त्याच्या ५०% एवढे निवृत्ती वेतन.
आवश्यकतेनुसार ‘झेड’ श्रेणीची सुरक्षा
माजी पंतप्रधान, केंद्र सरकारमधील कॅबिनेट स्तराचे मंत्री, लोकसभा व राज्यसभेतील प्रमुख विरोधी पक्षनेता, भारतीय योजना आयोगाचे डेप्युटी चेअरमन आणि राज्यांचे मुख्यमंत्री यांच्या नंतरच्या सातव्या स्थानाच्या दर्जाचा सन्मान ‘भारतरत्न’ विजेत्या व्यक्तीला दिलेला आहे.
‘भारतरत्न’ पुरस्कारासाठी पात्र व्यक्तीचे नाव भारताचे विद्यमान पंतप्रधान राष्ट्रपतींकडे अनुमोदित करतात. या पुरस्काराने सन्मानित व्यक्तींना राष्ट्रपतीच्या हस्ताक्षरातील प्रमाणपत्र आणि मेडल प्रदान केले जाते ‘भारतरत्न’ पुरस्कार सोहळ्यासाठी सर्वसाधारणपणे २३ जानेवारीचा दिवस निश्चित केलेला आहे
सन १९५४ पासून २०१४ पर्यंत एकूण ४६ व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार जाहीर केले गेले यांपैकी ४५ विभूतींना ‘भारत रत्न’ पुरस्काराने सन्मानित केले गेले आहे. सन १९९२ मध्ये ‘भारतरत्न’ पुरस्कारासाठी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती; परंतु त्यांच्या मृत्यूसंबंधी काही अंतर्विरोध, तसेच त्यांच्या परिवारातील काही प्रमुख सदस्याचा विरोध विचारात घेऊन त्यांचे नाव मागे घेण्यात आले तरीही नेताजी खऱ्या अधनि ‘भारतरत्न’ आहेत, हे जाणून त्याचे चरित्र या पुस्तकात समाविष्ट केले आहे.
भारतरत्न पुरस्कारप्राप्त सर्व व्यक्तींचे जीवनचरित्र संक्षिप्त स्वरुपात या ब्लॉग मधून मांडले आहे, जेणेकरून या व्यक्तींनी केलेल्या महान कार्याची लोकांना ओळख होईल आणि उल्लेखनीय कार्य करण्याची प्रेरणादेखील मिळेल
भारतरत्न पुरस्कार मिळालेल्या व्यक्ती
भारतरत्न पुरस्कार मिळालेल्या व्यक्ती
क्र . | भारतरत्न विजेत्याचे नाव | पुरस्कार वर्ष |
1 | चक्रवर्ती राजगोपालाचार्य | १९५४ |
2 | डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन | १९५४ |
3 | डॉ. चंद्रशेखर वेंकटरमण | १९५४ |
4 | पंडित जवाहरलाल नेहरू | १९५५ |
5 | डॉ. भगवान दास | १९५५ |
6 | डॉ. मोक्षगुण्डम विश्वेश्वरैया | १९५५ |
7 | पंडित गोविंद वल्लभ पंत | १९५७ |
8 | महर्षी डॉ. धोंडो केशव कर्वे | १९५८ |
9 | पुरुषोत्तम दास टंडन | १९६१ |
10 | डॉ. विधानचंद्र राय | १९६१ |
12 | डॉ. राजेंद्र प्रसाद | १९६२ |
13 | डॉ. जाकिर हुसैन | १९६३ |
14 | पांडुरंग वामन काणे | १९६३ |
15 | लालबहादूर शास्त्री | १९६६ |
16 | प्रियदर्शिनी इंदिरा गांधी | १९७१ |
17 | वराहगिरी वेंकट गिरी | १९५७५ |
18 | कुमारस्वामी कामराज | १९५६ |
19 | मदर टेरेसा | १९८० |
20 | विनोबा भावे | १९८३ |
21 | खान अब्दुल गफार खान | १९८७ |
22 | मरुदूर गोपालन रामचंद्रन | १९८८ |
23 | डॉ. भीमराव आंबेडकर | १९९० |
24 | नेल्सन मंडेला | १९९० |
25 | मोरारजी देसाई | १९९१ |
26 | सरदार बल्लभभाई पटेल | १९९१ |
27 | राजीव गांधी | १९९१ |
28 | सत्यजित राय | १९९२ |
29 | जे. आर. डी. टाटा | १९९२ |
30 | मौलाना अबुकलाम आजाक | १९९२ |
31 | डॉ. ए.पी.जे. अब्दुल कला | १९९७ |
32 | अरुणा आसफ अली | १९९७ |
33 | गुलजारीलाल नंदा | १९९७ |
34 | चिदम्बरम् सुब्रह्मण्यम् | १९९८ |
35 | एम. एस. सुब्बुलक्ष्मी | १९९८ |
36 | प्रो. अमर्त्य सेन | १९९९ |
37 | जयप्रकाश नारायण | १९९९ |
38 | पंडित रविशंकर | १९९९ |
39 | गोपीनाथ बोरदोलाई | १९९९ |
40 | लता मंगेशकर | २००१ |
41 | उस्ताद बिस्मिल्ला खान | २००१ |
42 | पंडित भीमसेन जोशी | २००९ |
43 | सचिन तेंडुलकर | २०१४ |
44 | चिंतामणी नागेश रामचंद्र राव | २०१४ |
45 | अटल बिहारी वाजपेयी | २०१५ |
46 | पंडित मदन मोहन मालवीय | २०१५ |
47 | प्रणब मुखर्जी | २०१९ |
48 | भूपेन हजारिका | २०१९ |
49 | नानाजी देशमुख | २०१९ |
Bharat ratna Puraskar List Marathi 2024
FAQ
भारतरत्न मिळवणारी पहिली भारतीय व्यक्ती कोण?
भारतरत्न मिळवणारी पहिली भारतीय व्यक्ती चक्रवर्ती राजगोपालाचार्य आहेत . १९५४ ला पुरस्कार मिळाला आणि त्याच वर्षी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन व डॉ. चंद्रशेखर वेंकटरमण यांना पण पुरस्कार मिळाला .
महाराष्ट्रातील किती व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे?
महाराष्ट्रातील ९ व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे
१). १९५८ – धोंडो केशव कर्वे
२).१९६३ – पांडुरंग वामन काने
३). १९८३ – विनोबा भावे
४). १९९० – बाबासाहेब आंबेडकर
५). १९९२ – जे. आर. डी. टाटा
६). २००१ – लता मंगेशकर
७). २००८ – पंडीत भीमसेन जोशी
८). २०१४ – सचिन तेंडुलकर
९). २०१९ – नानाजी देशमुख1
भारतरत्न पुरस्काराची सुरुवात कधी झाली?
भारतरत्न पुरस्काराची १९५४ सुरुवात झाला
भारतरत्न पुरस्कार मिळालेल्या व्यक्ती महिला
भारतरत्न पुरस्कार मिळालेल्या व्यक्ती महिला ५ आहेत त्या पुडीलप्रमाणे
१) इंदिरा गांधी -१९७१
२) मदर तेरेसा -१९८०
३) अरुणा आसफ अली – १९९७
४) एम एस सुब्बुलक्ष्मी – १९९८
५) लता मंगेशकर – २००१
भारतरत्न पुरस्कार मिळालेले आतापर्यंतचे किती पंतप्रधान देण्यात आला
भारतरत्न पुरस्कार मिळालेले आतापर्यंतचे सात पंतप्रधान ते पुढीलप्रमणे
१) पंडित जवाहरलाल नेहरू – १९५५
२) लालबहादूर शास्त्री – १९६६
३) इंदिरा गांधी – १९७१
४) मोरारजी देसाई – १९९१
५) गुलजारी लाल नंदा – १९९७
६) राजीव गांधी – १९९१
७) अटल बिहारी वाजपेयी – २०१५
Hi
खूप भारी माहिती आहे
Thanks you so much