गुलजारीलाल नंदा
Table of Contents
Toggleबालपण आणि शिक्षण
पाकिस्तानमधील सियालकोट जिल्ह्यातील गढ़थूल नावाच्या एका गावात दि. ४ जुलै १८९८ रोजी गुलजारीलाल नंदा यांचा जन्म झाला. पंजाबी कुटुंबातील वडील बुलाकीराम पूँछच्या शाळेमध्ये शिक्षक होते. आईचे नाव श्रीमती ईश्वरी देवी होते.
नंदा यांचे प्राथमिक शिक्षण आजोळी झाले व दहावी इयत्ता पूर्ण केल्यानंतर लाहोरच्या फोरमन ख्रिश्चियन तथा आग्रा कॉलेजमधून एम. ए. करून अलाहाबाद विद्यापीठात प्रवेश घेतला. तिथे अर्थशास्त्रात एम. ए. केल्यावर ‘कामगार आंदोलनाच्या इतिहासावर’ प्रबंध लेखनासाठी संशोधन सुरू केले. यासाठी अनेक ठिकाणी भेटी देऊन दौरे काढून काम करावे लागले.
गुलजारीलाल नंदा - लग्न
फेब्रुवारी १९१६ मध्ये लक्ष्मी देवीबरोबर त्यांचे लग्न झाले. या त्यांच्या पत्नीननेच जीवनात पुढे जाण्याची प्रेरणा त्यांना दिली. त्यांना दोन मुलगे व एक मुलगी होती.
गुलजारीलाल नंदा गांधीजींबरोबर भेट
इ. स. १९२१ मध्ये नंदाजी त्यांच्या ‘कामगार आंदोलनाच्या इतिहासावरील’ प्रबंधासाठी मुंबईमध्ये आले, तेव्हा त्यांची भेट गांधीजींबरोबर झाली. ही भेट त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरली. मुंबईमध्येच त्यांची अर्थशास्त्राचा प्रोफेसर म्हणून राष्ट्रीय विद्यापीठात नेमणूक झाली. त्या वेळी भारतामधील औद्योगिक समस्या विचित्र प्रकारच्या होत्या. आतापर्यंत देशात असे कोणतेच मजूर संघटन नव्हते जे कामगारांसाठी संघर्ष करील. गांधीजींना स्वातंत्र्यसंग्रामात श्रमिक वर्गाचा महत्त्वपूर्ण सहभाग हवा होता. यासाठी नंदाजी कार्यप्रवृत्त झाले.
अखिल भारतीय ग्रामोद्योग संघाची स्थापना
इ. स. १९२५ मध्ये गांधीजींनी चरखा संघाची स्थापना केली. इ. स. १९३४ मध्ये गांधीजींच्या आंदोलनाची तीव्रता वाढली. तेव्हा अखिल भारतीय ग्रामोद्योग संघाची स्थापना केली. इ. स. १९३५ मध्ये गुलजारीलाल नंदांनी खादीच्या आर्थिक व दार्शनिक दृष्टिकोणावर प्रकाश टाकणारा आपला शोध-प्रबंध ‘सम आस्पेक्टस् ऑफ खादी’ नावाच्या शीर्षकाने लिहून काँग्रेस अधिवेशनात प्रस्तुत केला. खादी आंदोलनात नंदाजींचा हा प्रबंध फार महत्त्वाचा मानला जातो.
स्वातंत्र्यानंतरसुद्धा खादीविषयी धोरणांच्या संदर्भात हा प्रबंध एक मार्गदर्शक दस्तऐवज सिद्ध झालेला आहे. अलाहाबाद विद्यापीठाचे प्रोफेसर स्टेलनी जीवेन्स जेव्हा गांधीजींना भेटले होते, तेव्हा त्यांनी सांगितले होते की नंदाजींना मजूर आंदोलनाचा इतिहास लिहिण्यापासून परावृत्त करावे. इतके त्या प्रबंधाचे महत्त्व भारताच्या औद्योगिक क्षेत्रात आहे.
गुलजारीलाल नंदा यांना देवदूत मानत
गांधीजींच्या मार्गदर्शनानुसार गुलजारीलाल नंदांनी आपले जीवन अहमदाबादच्या कामगारांना संघटित करण्यासाठी वाहून टाकले. त्या काळात अहमदाबादच्या कारखान्यांमध्ये वेगवेगळ्या धर्मांचे, हरिजन व मागासलेल्या जातीजमातींचे जवळजवळ पन्नास हजार मजूर कार्यरत होते. नंदाजींनी मिल मालक व कामगारांमध्ये सौहार्दाचे वातावरण निर्माण करून त्यांच्यातील मतभेद कोणाच्याही मध्यस्थीशिवाय सोडविले. याचा परिणाम म्हणून कारखाने व कपडा उद्योगाचा विकास झाला आणि कामगारांचे उत्पन्नही वाढले.
हरताळाच्या काळातील कामगारांची दैन्यावस्था पाहून नंदाजींचे हृदय हेलावले. त्यांना १९२५- २६ मध्ये मिळालेली मोडकीतोडकी सायकल घेऊन ते मजूर वस्त्यांमधून त्यांच्याशी सहानुभूतीने वागत-बोलत फिरायचे. मुंबईच्या झोपडपट्ट्यांमधून स्लम एरियातून नंदाजींनी खूपच कार्य केले. म्हणून कामगार त्यांना आपला उपकारकर्ता व देवदूत मानत असत. त्यांची मोडकी-तोडकी सायकल आजसुद्धा अहमदाबादच्या कामगार संघटनेच्या कार्यालयात ठेवलेली आहे.
गुलजारीलाल नंदा-संसदीय सचिव
गुलजारीलाल नंदांना इ. स. १९३७-३९ पर्यंत संसदीय सचिव म्हणून नियुक्त केले. तेव्हा त्यांच्यावर कामगारांसंबंधीच्या कामाची जबाबदारी सोपविली. या त्यांच्या अनुभवांचा लाभ पुढेसुद्धा कामगारांसंबंधी धोरण ठरविताना होत होता.
इ. स. १९४६ मध्ये जेव्हा स्वातंत्र्य आंदोलनात भाग घेतल्याबद्दल इंग्रज सरकारने नंदाजींना कैद केले, तेव्हा अहमदाबादच्या मजुरांनी भूक- हरताळ सुरू केला होता. जेव्हा त्यांना समजले नंदाजी ठीक आहेत तेव्हाच त्यांनी पुन्हा काम सुरू केले.
गुलजारीलाल नंदा-लेबर व हाउसिंग मंत्री
इ. स. १९४६ ते ५० या काळात मुंबई विधानसभेमध्ये नंदाजी राज्याचे लेबर व हाउसिंग मंत्री बनले. या कार्यकाळात त्यांनी विधानसभेत ‘श्रमिक विवाद बिल’ व दुसऱ्या औद्योगिक बिलांना योग्य प्रकारे प्रस्तुत करून पास करून घेतले. त्यांनी केंद्र सरकारमध्येही हे बिल पारित केले. हेच बिल पुढे भारताच्या श्रमनीतीचा मार्गदर्शक दस्तऐवज बनले.
गुलजारीलाल नंदा-अध्यक्ष
इ. स. १९४७ मध्ये नंदाजींनी आपल्या सहयोगींबरोबर भारतीय राष्ट्रीय ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना केली. ते त्याचे अध्यक्ष होते. देशातल्या श्रम आंदोलनाचे ते नेतृत्व करीत राहिले. इ. स. १९४७ मध्ये भारत सरकारचा प्रतिनिधी म्हणून ‘आंतरराष्ट्रीय लेबर कॉन्फरन्समध्ये’ भाग घ्यायला जिनेव्हाला गेले.
भारत युवक समाजाची स्थापना
इ. स. १९५१ मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळात नंदाजी योजना मंत्री व सिंचाई तथा विद्युतमंत्री म्हणून सामील झाले. त्या वेळी सिंचाई व विद्युतसंबंधी अनेक विकास योजना सुरू केल्या. योजना मंत्री म्हणून पंचवार्षिक योजनेच्या यशस्वितेसाठी ‘भारत सेवक समाजाची’ स्थापना केली. या योजनेद्वारा देशाला खूपच फायदा झाला. भारत युवक समाजाचीही त्यांनी स्थापना केली.
योजना मंत्री व श्रममंत्री पद
इ. स. १९५२ मध्ये गुलजारीलाल नंदा मुंबईतून पहिल्यांदा निवडणूक जिंकून लोकसभेत गेले. इ. स. १९५५ मध्ये सिंगापूरला आयोजित कोलंबो योजनेच्या परामर्शदाता समितीत त्यांनी प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व केले.
इ. स. १९५७ च्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर योजना मंत्री व श्रममंत्री पद भूषविले. या वेळी त्यांनी खूपच महत्त्वपूर्ण कार्य करून बऱ्याच सुधारणा केल्या. १९६२ मध्ये ‘काँग्रेस फोरम फॉर सोशॅलिस्ट एक्सन’ची स्थापना केली.
गुलजारीलाल नंदा-गृहमंत्री
१९६३ मध्ये गुलजारीलाल नंदा गृहमंत्री झाले. नंदाजींना फार मोठे यश मिळाले, जेव्हा त्यांनी गृहमंत्री असताना प्रत्येक स्तरावरील भ्रष्टाचाराच्या समस्येवरील निराकरणाकडे लक्ष पुरविले व राज्यांमध्ये सतर्कता आयोग स्थापन केले. गृहमंत्री पदावर असताना गो-हत्या विरोधी आंदोलनाच्या वेळी त्यांनी ११ नोव्हेंबरला राजीनामा दिला.
'नवजीवन संघाची' स्थापना
नंदाजींनी युवक, श्रमिक, ऐच्छिक सेवा संस्था व देशाच्या शांतिपूर्ण बदलाशी संबंधित अशा ‘नवजीवन संघाची’ स्थापना केली.
गुलजारीलाल नंदा-पंतप्रधान
पं. नेहरूंच्या मृत्यूनंतर गुलजारीलाल नंदा कार्यवाहक पंतप्रधान झाले. २७ मे ते ११ जून १९६४ व ११ जानेवारी ते २४ जानेवारी १९६४ या कार्यकाळात ते भारताचे पंतप्रधान होते. फेब्रुवारी १९७७ मध्ये इंदिराजींच्या काळात ते रेल्वेमंत्री झाले. मात्र जेव्हा इ. स. १९७५ मध्ये इंदिराजींनी आणीबाणी जाहीर केली, तेव्हा २७ जून १९७५ व २१ जानेवारी १९७६ ला अत्यंत कडक शब्दांत इंदिरा गांधींना ३ पत्रे लिहून आपत्कालीन स्थितीचा विरोध केला आणि हे सर्व असह्य होऊन काँग्रेसचाच राजीनामा दिला.
'भारत साधु समाजाची' स्थापना
यानंतरही नंदाजी अनेक सामाजिक, धार्मिक व आध्यात्मिक कार्य करीतच होते. कुरूक्षेत्राचा विकास हे एक यातील महत्त्वाचे काम होते. भारतातील लाखो साधु-संतांना भारत देशाच्या विकासकार्यात सामील करून घेण्यासाठी त्यांनी ‘भारत साधु समाजाची’ स्थापना केली.
भाड्याचे घर
नंदाजींचे आयुष्य हे साधेपणा, त्याग व तपस्येचे ज्वलंत उदाहरण आहे. सरकारकडून मिळालेला बंगला, कार इत्यादी सुविधा नाकारून दक्षिण दिल्लीमध्ये दोन खोल्यांचे घर भाड्याने घेऊन त्यात राहत असत.
भारतरत्न
या त्यागमूर्ती स्वतंत्रता सेनानीला भारत सरकारने इ. स. १९९७ मध्ये भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘भारतरत्न’ देऊन सन्मानित केले.
मृत्यु
श्री. गुलजारीलाल नंदा यांनी आपले उर्वरित आयुष्य अहमदाबादमध्ये आपल्या मुलीच्या घरी व्यतीत केले आणि १५ जानेवारी १९९८ रोजी हे प्रदीर्घ आयुष्य संपवून अनंतात विलीन झाले.
gulzarilal nanda information in english
In a village named Garthul in Sialkot district of Pakistan, d. Guljarilal Nanda was born on 4th July 1898. Father Bulakiram from a Punjabi family was a teacher in Poonch’s school. Mother’s name was Mrs. Ishwari Devi.
Nanda’s primary education was in Ajoli and after completing his 10th standard, he completed M.Sc. from Forman Christian College, Lahore and Agra College. A. He took admission in Allahabad University. There M. in economics. A. After that I started research for writing thesis on ‘History of Labor Movement’. For this, I had to visit many places and work on tours.
He got married to Lakshmi Devi in February 1916. It was his wife who inspired him to move forward in life. They had two sons and one daughter.
. S. In 1921, when Nandaji came to Bombay for his thesis on ‘History of Labor Movement’, he met Gandhiji. This meeting turned his life around. He was appointed as Professor of Economics in the National University in Mumbai. Industrial problems in India at that time were of a peculiar kind. Till now there was no labor organization in the country which would fight for workers. Gandhiji wanted significant participation of the working class in the freedom struggle. Nandaji was motivated for this.
etc. S. In 1925, Gandhiji founded the Charkha Sangh. etc. S. In 1934, Gandhiji’s agitation intensified. Then Akhil Bharatiya Gramodyog Sangh was established. etc. S. In 1935, Guljarilal Nanda presented his thesis entitled ‘Some Aspects of Khadi’, highlighting the economic and philosophical aspects of Khadi, in the Congress session. This thesis of Nandaji is considered very important in Khadi movement. This treatise has proved to be a guiding document regarding policies on Khadi even after independence. When Professor Stelney Jeevens of Allahabad University met Gandhiji, he said that Nandaji should be discouraged from writing the history of the labor movement. That thesis is so important in the industrial sector of India.
Under Gandhiji’s guidance, Guljarilal Nanda devoted his life to organizing the workers of Ahmedabad. At that time almost fifty thousand laborers of different religions, Harijans and backward castes were working in the factories of Ahmedabad. Nandaji created an atmosphere of harmony between the mill owners and workers and resolved their differences without anyone’s intervention. As a result of this, factories and textile industries developed and the income of workers also increased. Nandaji’s heart sank when he saw the misery of the workers during the hartal period.
He used to take a broken bicycle which he got in 1925-26 and used to travel through the laborer settlements talking to them sympathetically. Nandaji did a lot of work from the slum areas of Mumbai. So the workers used to consider him as their benefactor and angel. Even today, his modki-todki bicycle is kept in the office of the labor union in Ahmedabad.
Guljarilal Nanda etc. S. Appointed Parliamentary Secretary from 1937-39. Then he was entrusted with the work related to workers. Their experiences were also benefited in deciding labor policies.
etc. S. In 1946, when Nandaji was imprisoned by the British government for his participation in the freedom movement, the workers of Ahmedabad started a hunger strike. He resumed work only when he realized that Nandaji was fine. etc. S. From 1946 to 1950, Nandaji became the State Labor and Housing Minister in the Bombay Legislative Assembly. During this tenure, he got the ‘Labour Disputes Bill’ and other industrial bills passed in the Legislative Assembly. He also passed this bill in the central government. This bill later became the guiding document of India’s labor policy. etc. S. In 1947, Nandaji founded the Indian National Trade Union Congress with his associates. He was its president. He continued to lead the labor movement in the country. etc. S. In 1947, he went to Geneva to participate in the ‘International Labor Conference’ as a representative of the Government of India.
etc. S. In 1951, Nandaji joined the Union Cabinet as Minister for Planning and Minister for Irrigation and Power. At that time many development schemes related to irrigation and electricity were started. As Planning Minister, he established ‘Bharat Sevak Samaj’ for the success of Five Year Plan. The country benefited a lot from this scheme. He also founded the Bharat Youth Society.
etc. S. In 1952, Guljarilal Nanda went to the Lok Sabha after winning the first election from Mumbai. etc. S. In 1955, he led the delegation in the Consultative Committee of the Colombo Plan held in Singapore. etc. S. After the 1957 general elections, he held the posts of Planning Minister and Labor Minister. During this time he did a lot of important work and made many improvements.
In 1962 ‘Congress Forum for Socialist Action’ was established. Guljarilal Nanda became the Home Minister in 1963. Nandaji achieved great success when he, as Home Minister, addressed the problem of corruption at every level and set up vigilance commissions in the states. He resigned on November 11 during the anti-cow slaughter agitation while serving as Home Minister.
Nandaji founded ‘Navajeevan Sangh’ which was concerned with youth, labor, voluntary service organizations and peaceful change of the country.
Pt. After Nehru’s death, Guljarilal Nanda became the acting Prime Minister. He was the Prime Minister of India from 27 May to 11 June 1964 and 11 January to 24 January 1964. He became the Railway Minister in February 1977 during Indiraji’s tenure. But when S. In 1975, when Indiraji declared Emergency, he wrote 3 letters to Indira Gandhi in very strong words on 27 June 1975 and 21 January 1976 opposing the Emergency and resigned from the Congress.
Even after this, Nandaji continued to do many social, religious and spiritual works. Development of Kurukshetra was one of the important tasks. He established ‘Bharat Sadhu Samaj’ to involve lakhs of sadhus and saints of India in the development of India. Nandaji’s life is a shining example of simplicity, sacrifice and austerity. They used to live in a two-room house in South Delhi, refusing the facilities of bungalow, car etc. provided by the government.
This martyred freedom fighter was awarded by the Government of India. S. In 1997, India’s highest civilian award ‘Bharat Ratna’ was awarded.
Mr. Guljarilal Nanda spent the rest of his life at his daughter’s house in Ahmedabad and on 15 January 1998 ended this long life and merged with Anant.
FAQ : People also ask
गुलजारी लाल नंदा यांची मुले किती ?
गुलजारी लाल नंदा यांना दोन मुलगे व एक मुलगी होती.
गुलजारीलाल नंदा यांना भारतरत्न कधी मिळाला ?
गुलजारीलाल नंदा यांना भारतरत्न इ. स. १९९७ मिळाला .
भारताचे पहिले कार्यवाहक पंतप्रधान कोण होते?
भारताचे पहिले कार्यवाहक पंतप्रधान श्री. गुलजारीलाल नंदा होते .
गुलझारीलाल नंदा यांनी राजीनामा का दिला?
पं. नेहरूंच्या मृत्यूनंतर गुलजारीलाल नंदा कार्यवाहक पंतप्रधान झाले. २७ मे ते ११ जून १९६४ व ११ जानेवारी ते २४ जानेवारी १९६४ या कार्यकाळात ते भारताचे पंतप्रधान होते. फेब्रुवारी १९७७ मध्ये इंदिराजींच्या काळात ते रेल्वेमंत्री झाले. मात्र जेव्हा इ. स. १९७५ मध्ये इंदिराजींनी आणीबाणी जाहीर केली, तेव्हा २७ जून १९७५ व २१ जानेवारी १९७६ ला अत्यंत कडक शब्दांत इंदिरा गांधींना ३ पत्रे लिहून आपत्कालीन स्थितीचा विरोध केला आणि हे सर्व असह्य होऊन काँग्रेसचाच राजीनामा दिला.
गुलझारीलाल नंदा यांचा मृत्यु कधी झाला ?
गुलझारीलाल नंदा यांचा मृत्यु १५ जानेवारी १९९८ रोजी झाला.
गुलजारीलाल नंदा कार्यवाहक पंतप्रधान काळ किती होता ?
पं. नेहरूंच्या मृत्यूनंतर गुलजारीलाल नंदा कार्यवाहक पंतप्रधान झाले. २७ मे ते ११ जून १९६४ व ११ जानेवारी ते २४ जानेवारी १९६४ या कार्यकाळात ते भारताचे पंतप्रधान होते.
गुलजारी लाल नंदा के अंतिम दिन
श्री. गुलजारीलाल नंदा यांनी आपले उर्वरित आयुष्य अहमदाबादमध्ये आपल्या मुलीच्या घरी व्यतीत केले आणि १५ जानेवारी १९९८ रोजी हे प्रदीर्घ आयुष्य संपवून अनंतात विलीन झाले.
गुलजारी लाल नंदा के बाद प्रधानमंत्री कौन बना
गुलजारी लाल नंदा के बाद प्रधानमंत्री लाल बहादूर शास्त्री बना
गुलजारी लाल नंदा का जन्म कब और कहां हुआ था?
पाकिस्तान के सियालकोट जिले के गरथुल नामक गाँव में, डी. गुलजारीलाल नंदा का जन्म 4 जुलाई 1898 को हुआ था
गुलजारी लाल नंदा का जन्म कब हुआ था ?
गुलजारी लाल नंदा का जन्म दि. ४ जुलै १८९८ हुआ था