बालपण आणि शिक्षण
नेल्सन मंडेलांचा जन्म दि. १८ जुलै १९१८ ला दक्षिण आफ्रिकेतील ट्रांसकायीमधील अमटाटा गावातील एका टाम्बू कबिल्यातील सामान्य शेतकरी कुटुंबात झाला. वडील हॅनरी नेल्सन एक सरळ साधे अशिक्षित व्यक्ती होते. इ. स. १९३० मध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यावेळी बालक नेल्सन बारा वर्षांचा होता.
Table of Contents
Toggleआता हा नेल्सन कबिल्याचे मुखिया डेविड यांच्याकडे आला. तेथेच त्याचे शिक्षण झाले. आफ्रिका विद्यापीठातून त्याने कला शाखेत बी. ए. ची डिग्री घेतली.
राष्ट्रीयत्वाची भावना
लहानपणापासूनच राष्ट्रीयत्वाची भावना त्यांच्यात भरलेली होती. कबिल्याचा प्रमुख आपल्या मंत्र्यांच्या सल्ल्याने कायद्याचं राज्य कसं चालवतो हे त्याने जाणलं होतं.
पूर्ण स्वातंत्र्य होतं. हिरवंगार जंगल, सेना, कायदा सगळं स्वतःचं होतं. या स्वातंत्र्याला राखण्यासाठी पूर्वजांनी दिलेला लढा त्यांना माहीत होता. गोरे विदेशी कसे शत्रू बनून राहिले आहेत हे नेल्सनला माहीत होते.
१६ -२३ वर्षी
१६ वर्षीय ‘युवक’ नेल्सन मंडेलाची सुन्नत कबिल्याच्या रिवाजानुसार वाशी नदीतटावर केली गेली. त्यांना कबिल्याच्या पंचायतीत सामील करून घेतले.
नेल्सनच्या वयाच्या तेविसाच्या वर्षी कबिल्याचा मुखिया डेविडने त्याचे लग्न करायचे ठरविले. पण ती मुलगी पत्नी म्हणून नेल्सनला पसंत नव्हती.
नोकरी
शेवटी तो आपला पुतण्या मितरायाला घेऊन जोहान्सबर्गला पळून जोहान्सबर्गला क्राउन कंपनीत त्याने नोकरी केली. नंतर प्रॉपर्टी डीलिंगच्या कार्यालयात महिना दोन पौंड च कमिशनवर क्लार्कचे काम मिळाले.
एक वर्षानंतर विटकिन, साइडल्स्की अँड एडिलमॅन’ नावाच्या एका अॅटर्नी फर्ममध्ये काम मिळाले. ही गोन्ऱ्यांची फर्म होती. तेथेच नेल्सनला अनुभव आला की, कागार स्वप्नातसुद्धा आपला अहंकार विसरू शकत नाहीत. जोहान्सबर्गमध्ये नेल्सनचा परिचय सर्वप्रथम वॉल्टर सिसुलूंशी झाला होता.
यूथ लीगची स्थापना
इ. स. १९४४ मध्ये नेल्सन मंडेला आफ्रिकी राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य झाले. त्यांनी सिसुलू, ऑलिवर टॉमबो, ऍटन लँबेदी व इतर उत्साही तरुणांबरोबर यूथ लीगची स्थापना केली.
त्यांचे उद्दिष्ट आफ्रिकनांचा विकास व स्वातंत्र्य हे होते. इ. स. १९४३ मध्ये आफ्रिकी राष्ट्रीय काँग्रेसच्या संमेलनावेळी नेल्सन मंडेलाला युवा संघाचा महासचिव नियुक्त केले.
इ. स. १९४८ मध्ये वर्णभेदाच्या पायावर आफ्रिकेत सरकार बनले. ही शासनप्रणाली तर गुलामीपेक्षाही भयंकर होती. पण वर्षभरातच नेल्सन व त्याच्या साथीदारांना सविनय कायदेभंगासारखे कार्यक्रम राबवून आफ्रिका राष्ट्रीय काँग्रेसला ताकदवान बनविले.
२६ जून १९५० ला 'विरोध दिवस'
इ. स. १९५० मध्ये मे दिनाच्या दिवशी १८ शांत प्रदर्शनकारींना पोलिसांनी गोळ्या घालून मारले. त्या वेळी आफ्रिकी राष्ट्रीय काँग्रेसने संपूर्ण देशात ‘काम बंद‘ची घोषणा केली.
२६ जून १९५० ला ‘विरोध दिवस’ मानला. वर्णभेदासारख्या माणुसकीला काळिमा फासणाऱ्या नियमांविरुद्ध विशेष चळवळ चालवली. यात भारतीयांनीही त्यांना सहकार्य दिले. यावेळी ८५०० जणांना अटक केली गेली
आफ्रिकी राष्ट्रीय काँग्रेसच्या ट्रांसवाल शाखेचा अध्यक्ष
इ. स. १९५२ मध्ये ‘अवज्ञा अभियानात’ भाग घेण्याच्या आरोपावरून नेल्सन मंडेलाला अटक करून मार्शल स्क्वायरला दिले. त्याच दरम्यान नेल्सनला आफ्रिकी राष्ट्रीय काँग्रेसच्या ट्रांसवाल शाखेचा अध्यक्ष निवडले. नेल्सनची वाढती लोकप्रियता गोऱ्यांना खटकत होती.
डिसेंबर १९५२ मध्ये नेल्सनने जोहान्सबर्गच्या बाहेर न जाणे व कोणत्याही सार्वजनिक सभेत भाग न घेण्याचा नियम त्याला लावला. तेव्हा तिथेच नेल्सनने शोषित व पीडितांची वकिली सुरू करून वर्णभेद नीतीवर समूळ प्रहार केले.
स्वातंत्र्याची मागणी
२६ जून १९५५ ला क्लिप टाउनमध्ये काँग्रेसबरोबर आफ्रिकेमधील सर्व जातीजमातीच्या सुमारे तीन हजार लोकांनी स्वातंत्र्याची मागणी करणारे पत्र तयार केले. त्याचा नेता नेल्सनच होता.
'राजद्रोहाचा' खटला
५ सप्टेंबर १९५६ ला सकाळीच १५६ कार्यकर्त्यांना त्यांच्या घरातूनच अटक केली. त्यात नेल्सन व त्याचे साथीदार लुटली, ऑलिवर, टॉमबो, वाल्टर सिसुलूसुद्धा होते. ‘राजद्रोहाचा‘ खटला होता पण अपराध सिद्ध न झाल्यामुळे त्यांना सोडून दिले.
विवाह
नेल्सन मंडेलाचा विवाह ट्रांसकायीचे मंत्री कोलम्बस माडिकिजेलाची मुलगी नोम्जामो बैनी माडिकिजेलाबरोबर १९५८ मध्ये झाला. तीही नेल्सनच्याबरोबर लढ्यात नेहमीच होती.
आंदोलन
गोरे सरकार ३१ मे १९६१ ला गणतंत्र दिवस साजरा करण्याच्या तयारीत होते. तेव्हा नेल्सनने प्रधानमंत्री डॉ. फेयर फुटना पत्र लिहून निषेध नोंदविला व ही स्थिती बदलली नाही तर २९ मेला पूर्ण देशात आंदोलन पुकारण्याचा इशारा दिला. गोऱ्या सरकारने अटकसत्र सुरू केले. मंडेला भूमिगत झाले. ७८ टक्के हरताळ यशस्वी झाला. जनतेत असंतोष धुमसत होता. १६ डिसेंबर १९६१ एकाच वेळी सर्व सरकारी ठिकाणांवर विध्वंसक कारवाई केली गेली. नेल्सन
भूमिगत राहून आंदोलन चालवत होते. पोलीस त्यांना हातही लावू शकले नाहीत. इ. स. १९६२ मध्ये पॅन आफ्रिकी मंचावर अचानक प्रकट होऊन मंडेलांनी घोषणा दिली आणि तसेच अंतर्धान पावले. पोलीस काहीच करू शकले नाहीत. भूमिगत राहूनच नेल्सननी लंडन व अल्जेरियाचा दौरा केला. तिथल्या पुढाऱ्यांना भेटले.
कठोर कैद
. ५ ऑगस्ट १९६२ ला परत देशात आले. त्याचवेळी कोणी गद्दाराने त्यांना पकडून दिले. मग इ. स. १९६१ मध्ये झालेल्या सर्वव्यापी हरताळासाठी जनतेला भडकावण्याच्या अपराधासाठी ५ वर्षांच्या कठोर कैदेची शिक्षा नेल्सनला दिली गेली. जून १९६४ मध्ये प्रिटोरिया जेलमधून लंडन विद्यापीठातून कायद्याची परीक्षा नेल्सननी दिली होती. त्यांना बंदी बनवून रॉवेन द्वीपला पाठविले. तिथे अती कष्टाची कामे व कमीत कमी अन्न अशा प्रकारे खूप वेदना त्यांना दिल्या गेल्या. पण तरीही त्यांनी हार मानली नाही.
'जवाहरलाल नेहरू आंतरराष्ट्रीय सद्भावना पुरस्कार
इ. स. १९७९ मध्ये नेल्सन मंडेलांना भारत सरकारद्वारा ‘जवाहरलाल नेहरू आंतरराष्ट्रीय सद्भावना पुरस्कार’ देऊन सन्मान केला. तेव्हा त्यांच्या पत्नीने भारतात येऊन तो पुरस्कार स्वीकारला. इ. स. १९८६ मध्ये स्वीडिश ट्रेड युनियन संघाद्वारे ‘आंतरराष्ट्रीय शांती एवं स्वतंत्रता पुरस्कार’ दिला गेला.
नेल्सन मंडेला-राष्ट्रपती पद
त्यांची पत्नी विनीलाही १२ मे १९६९ रोजी अटक केली. नेल्सन मंडेलांनी २७ वर्षांच्या कैदेमध्ये क्रूर यातना सहन केल्या. पण कधीही हार मानली नाही. शेवटी ११ फेब्रुवारी १९९० ला नेल्सन मंडेलांना गोऱ्या सरकारने कैदेतून मुक्त केले. १० मे १९९४ ला नेल्सन मंडेलांनी राष्ट्रपतीपद ग्रहण केले.
नेल्सन मंडेला केवळ दक्षिण आफ्रिकेच्या मुक्ती संग्रामाचेच नाही तर संपूर्ण जगातील स्वातंत्र्य व दलितोद्धारप्रेमींचे श्रद्धेय बनले आहेत. ते स्वदेश, जातीचे प्रेम, संघर्ष, बलिदान इ. गुणांचे प्रतीक आहेत. एका सामान्य अशिक्षित कबिल्यात राहून स्वतःची कर्मठता, दृढ संकल्प शक्ती, संघर्ष, स्वाभिमान, निर्भीडपणा व अदम्य साहस या गुणांनी दक्षिण आफ्रिकेच्या मुक्तीसंग्रामाचे जनक बनले , जगातील मानवासाठी एक प्रेरणास्रोत आहे.
नेल्सन मंडेला-'भारतरत्न'
इ. स. १९९० मध्ये २७ वर्षांच्या प्रदीर्घ कैदेतून सुटल्यावर जेव्हा नेल्सन मंडेला भारतात आले तेव्हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारतरत्न’ त्यांना देऊन गौरविले.
नेल्सन मंडेला-मृत्यू
मंडेला यांचे फुफ्फुसाच्या संसर्गामुळे 5 डिसेंबर 2013 रोजी हॉटन, जोहान्सबर्ग येथील त्यांच्या घरी निधन झाले. मृत्यूसमयी ते ९५ वर्षांचे होते आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब त्यांच्यासोबत होते. त्यांच्या मृत्यूची घोषणा राष्ट्राध्यक्ष जेकब झुमा यांनी केली.
Nelson Mandela Summary in English
Nelson Mandela was born on Born on 18 July 1918 in a simple farming family of a Tambu clan in the village of Amtata in Transkai, South Africa. Father Henry Nelson was a simple uneducated person. etc. S. He died in 1930. At that time the child Nelson was twelve years old.
Now this Nelson came to David, the head of the clan. He was educated there. He received his B.A in Arts from Africa University. A. Degree taken. He was imbued with the feeling of nationalism from his childhood. He knew how the head of the clan, with the advice of his ministers, administered the rule of law. There was complete freedom. The green forest, the army, the law were all his own. He knew the struggle of his forefathers to maintain this freedom. Nelson knew how white foreigners remained enemies.
16-year-old ‘youth’ Nelson Mandela was circumcised on the banks of the Vashi river according to tribal custom. He was included in the panchayat of the clan. When Nelson was twenty-three years old, David, the head of the clan, decided to marry him. But Nelson did not like that girl as a wife. Finally he fled to Johannesburg with his nephew Mitraya.
He worked in Crown Company in Johannesburg. Later, he got a job as a clerk in a property dealing office on a commission of two pounds a month. A year later, he got a job at an attorney firm called Witkin, Sidelsky & Edelman. It was a firm of fools. It was there that Nelson experienced that Kagars cannot forget their ego even in their dreams. Nelson was first introduced to Walter Sisulu in Johannesburg.
etc. S. In 1944, Nelson Mandela became a member of the African National Congress. He founded the Youth League with Sisulu, Oliver Tombo, Aten Lambedi and other enthusiastic youths. His aim was the development and freedom of Africans. etc. S. In 1943, Nelson Mandela was appointed as the General Secretary of the Youth League at the African National Congress.
etc. S. In 1948, a government was formed in Africa on the basis of apartheid. This system of government was worse than slavery. But within a year, Nelson and his comrades had strengthened the African National Congress by implementing a program of civil disobedience.
etc. S. On May Day 1950, 18 peaceful protesters were shot dead by the police. At that time, the African National Congress announced a nationwide ‘work stop’. 26th June 1950 was considered as ‘Protest Day’. A special movement was launched against the dehumanizing laws like apartheid. Indians also supported him in this. At this time 8500 people were arrested.
etc. S. In 1952, Nelson Mandela was arrested and handed over to Marshal Squire on charges of taking part in the ‘Operation of Disobedience’. Meanwhile, Nelson was elected president of the Transvaal branch of the African National Congress. Nelson’s growing popularity was disconcerting to the whites.
In December 1952, Nelson ordered him not to leave Johannesburg and not to attend any public meetings. It was there that Nelson began to advocate for the oppressed and the victims and attacked the apartheid policy.
On June 26, 1955, about three thousand people from all ethnic groups in Africa wrote a letter demanding independence with the Congress in Klip Town. Its leader was Nelson.
On the morning of September 5, 1956, 156 activists were arrested from their homes. It included Nelson and his accomplices Lutli, Oliver, Tombo, Walter Sisulu. He was tried for ‘sedition’ but was released as the guilt was not proven. Now Nelson Mandela was married in 1958 to Nomjamo Baini Madikizela, daughter of Transkayi Minister Columbus Madikizela. She too was always in the fight with Nelson.
The White government was preparing to celebrate Republic Day on 31st May 1961. Then Nelson Prime Minister Dr. Fair Futna wrote a letter protesting and warned to call a nationwide strike on May 29 if this situation did not change. The white government started the detention session. Mandela went underground. 78 percent strike was successful. Dissatisfaction was simmering among the people.
On December 16, 1961, all the government places were destroyed simultaneously. Nelson went underground and ran the agitation. The police could not touch them. etc. S. Appearing suddenly on the pan-African stage in 1962, Mandela proclaimed and also embodied. The police could not do anything. Nelson visited London and Algeria while staying underground. Met the leaders there.
He came back to the country on August 5, 1962. At the same time, some traitor caught them. Then etc. S. Nelson was sentenced to 5 years rigorous imprisonment for the crime of public incitement for the general strike of 1961. In June 1964, Nelson passed his law exam from the University of London from Pretoria Jail. They were banned and sent to Rowan Island. There they were subjected to a lot of pain with hard work and minimal food. But still they did not give up.
FAQ-मराठी
नेल्सन मंडेला यांना भारतरत्न कधी मिळाला ?
नेल्सन मंडेला यांना भारतरत्न इ. स. १९९० मिळाला .
नेल्सन मंडेला यांचा मृत्यू कधी झाला ?
नेल्सन मंडेला यांचा मृत्यू 5 डिसेंबर 2013 रोजी झाला .
नेल्सन मंडेला यांचा जन्म कधी व कुठे झाला ?
नेल्सन मंडेलांचा जन्म दि. १८ जुलै १९१८ ला दक्षिण आफ्रिकेतील ट्रांसकायीमधील अमटाटा गावातील एका टाम्बू कबिल्यातील सामान्य शेतकरी कुटुंबात झाला.
नेल्सन मंडेला यांच्या आत्मचरित्राचे नाव काय आहे?
नेल्सन मंडेला यांच्या आत्मचरित्राचे नाव लाँग वॉक टू फ्रीडम आहे .
नेल्सन मंडेला यांनी इतरांना कशी प्रेरणा दिली?
नेल्सन मंडेला केवळ दक्षिण आफ्रिकेच्या मुक्ती संग्रामाचेच नाही तर संपूर्ण जगातील स्वातंत्र्य व दलितोद्धारप्रेमींचे श्रद्धेय बनले आहेत. ते स्वदेश, जातीचे प्रेम, संघर्ष, बलिदान इ. गुणांचे प्रतीक आहेत. एका सामान्य अशिक्षित कबिल्यात राहून स्वतःची कर्मठता, दृढ संकल्प शक्ती, संघर्ष, स्वाभिमान, निर्भीडपणा व अदम्य साहस या गुणांनी दक्षिण आफ्रिकेच्या मुक्तीसंग्रामाचे जनक बनले , जगातील मानवासाठी एक प्रेरणास्रोत आहे.