सरदार वल्लभभाई पटेल माहिती sardar vallabhbhai patel information

बालपण आणि शिक्षण

                  सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म दि. ३१ ऑक्टोबर १८७५ रोजी, गुजरात येथील नडियादमधील बोरसद तालुक्यातील करमसद गावात वडील अबेरभाई पटेल व आई श्रीमती लदवा यांच्या पोटी झाला. वडील झबेरभाई हे संयमी, साहसी व वीर पुरुष होते. ते १८५७ च्या स्वातंत्र्य संग्रामात झाशीची राणी लक्ष्मीबाईच्या सैन्यामधून इंग्रजांशी लढले होते. साहस, निडरता हे गुण असे परंपरेनेच वल्लभभाईंमध्ये आले होते. ते लेवा पट्टीदार नामक एका प्रसिद्ध लढवय्या कृषक जमातीशी संबंधित होते.

Table of Contents

                 करमसद या जन्मगावी शालेय शिक्षण झाले. पाचव्या इयत्तेपर्यंत इंग्रजी शिक्षण घेतले. नंतर २२ व्या वर्षी मॅट्रिक परीक्षा पास केली. मग नाडियादमध्ये जिल्हा वकील बनले.

सरदार वल्लभभाई पटेल-विवाह

                   १८९३ मध्ये वयाच्या १८ व्या वर्षी झवेरबाई नावाच्या कन्येशी विवाह झाला. ती मुलगी सच्छील आणि विनम्र होती. त्यानंतर १९१० मध्ये विलायतेला जाऊन त्यांनी बॅरिस्टरी पास केली. कितीही कठीण प्रसंगात ते कायम स्थिरचित्त राहत असत व अत्यंत धीरोदात्तपणे परिस्थितीला तोंड देत.

                 एकदा ते एक खटला चालवत असताना त्यांना पत्नी झवेरबाईच्या मृत्यूची तार मिळाली. ती त्यांनी वाचून तशीच खिशात ठेवली व कोर्टातले काम संपल्यावर मग तिकडे गेले. त्या वेळी त्यांचे वय ३३ वर्षांचे होते. त्यानंतर त्यांनी कधीच पुन्हा विवाह केला नाही. त्या वेळी त्यांची मुलगी मणिबेन पाच वर्षांची होती. तिने वडील वल्लभजींना कधीच आईची उणीव जाणवू दिली नाही. शेवटपर्यंत कौटुंबिक व राजनैतिक पटावर मणिबेनने वडिलांना साथ दिली. तिचे हे योगदान फारच महत्त्वपूर्ण होते.

'असहकार आंदोलन'

                    इ. स. १९१६ मध्ये गांधीजींबरोबर सरदार वल्लभभाई पटेल गोधरामधील बेगार-प्रथा बंद केली. २९ जून १९१७ ला खेडा सत्याग्रह यशस्वी झाल्याचा समारंभ गांधीजींबरोबर साजरा केला. ‘रौलेट अॅक्ट’च्या विरोधात संपूर्ण गुजरातमध्ये ‘असहकार आंदोलन’ मोठ्या प्रमाणावर राबवून यशस्वी केले. इ. स. १९२१ मध्ये वल्लभभाई गुजरात काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष निवडले गेले. त्यानंतर बोरसदचा सत्याग्रह व नागपूरच्या झेंडा सत्याग्रहाचे नेतृत्व त्यांनी केले

वल्लभभाईंना 'सरदार' ही पदवी बहाल

                ‘बारडोलीच्या ऐतिहासिक सत्याग्रहाने’ वल्लभभाईंना ‘सरदार’ ही पदवी बहाल केली. त्यानंतर अनेक सत्याग्रहांत त्यांनी भाग घेतला. त्याबद्दल त्यांना तुरुंगातही जावे लागले. इ. स. १९३१ ला कराचीमध्ये काँग्रेसचे ऐतिहासिक अधिवेशन झाले. त्या वेळी अध्यक्षपदावरून त्यांनी खूपच मर्मस्पर्शी भाषण केले.

अहमदनगर किल्ल्यात नजरकैद

                 ८ ऑगस्ट १९४२ च्या ‘भारत छोडो’ आंदोलनाच्या वेळी इतर नेत्यांबरोबर सरदार पटेलनाही अहमदनगर किल्ल्यात नजरकैद केले. तीन वर्षांनंतर दि. १९ जून १९४५ रोजी ‘सिमला- – कॉन्फरन्ससाठी’ इतर नेत्यांबरोबर सरदार पटेलनाही सोडले.

उप- पंतप्रधान

                    १५ ऑगस्ट १९४७ ला स्वतंत्र भारताचे सरदार वल्लभभाई पटेल उप- पंतप्रधान झाले. त्याच वेळेला गृहखाते व रियासती विभागाचा कार्यभार त्यांच्यावर सोपवला. या पदावरून नवीन स्वतंत्र भारतात त्यांनी क्रांतिकारी परिवर्तन घडविले. भारताच्या इतिहासात स्थायी स्वरूपाची रक्तहीन क्रांतीच घडवून आणली. भारतातील सुमारे ६०० रियासतींचे एकीकरण केले. २१९ लहान संस्थानांना वेगवेगळ्या प्रदेशांत विलीन केले.

सरदार वल्लभभाई पटेल

लोहपुरुष

                   त्या वेळी हैदराबादच्या निजामाने प्रचंड विरोध केला. अनाचार, अत्याचार, कत्लेआम सुरू केले. रझाकारांनी बंड पुकारले. शेवटी जनतेच्या सार्वभौम भारताच्या हितासाठी नाइलाज होऊन वल्लभभाईंनी पोलीस कारवाई केली आणि तीन दिवसांत निजामाच्या सत्तेचा अंत केला.

                    तसेच जुनागढ संस्थानही स्वतंत्र भारतात सामील केले. या प्रमाणे विखुरलेल्या भारतातील तुकड्यांना एकसंध करून सार्वभौम एकसूत्री भारत-प्रजासत्ताक बनवण्याचे काम या महापुरुषाने केले. म्हणूनच त्यांना भारताचे ‘पोलादी पुरुष’/लोहपुरुष म्हटले जाते.

लंडन टाइम्सच्या मतानुसार

                  सरदार वल्लभभाई पटेल बुद्धिमत्ता, प्रयत्न, कूटनीती, निर्भीडता, साहस व लक्ष्य प्राप्त करण्याची जिद्द यामुळेच हे अत्यंत अवघड काम पार पडले. काहींच्या मते जर हे काम सरदार पटेलांच्या हातात नसते तर आज परिस्थिती पूर्णतः भिन्न असती. जसा आज काश्मीरचा प्रश्न प्रलंबित आहे. कारण हे कार्य त्यांच्याकडे नव्हते ना!

               जगाच्या इतिहासातील निवडक महापुरुषांपैकीच सरदार वल्लभभाई पटेल हे एक ठरले; ज्यांनी आपले प्रशासकीय कौशल्य या कार्यात सिद्ध केले. लंडन टाइम्सच्या मतानुसार संस्थानांच्या विलीनीकरणाच्या इतिहासात सरदार पटेलांचे स्थान हे बिस्मार्कच्या समकक्ष किंवा त्याहीपेक्षा वरचे होते.

पाकिस्तानला समज

                     इ. स. १९४९ मध्ये पटेलांची प्रकृती ठीक नव्हती. तरीही १० मार्च १९५० ला ते कलकत्त्याला गेले आणि पूर्व बंगालमधील हिंदूंचे निर्वासित होणे थांबविण्यासाठी पाकिस्तानला समज दिली. त्यामुळे ८ एप्रिल १९५० रोजी पाकिस्तान अल्पसंख्यांक हिंदूचे रक्षण करणे व त्यांची संपत्ती त्यांना परत द्यायला तयार झाले. १७ नोव्हेंबर १९५० रोजी त्यांनी चीनच्या विस्तारवादी धोरणावर कडाडून हल्ला केला आणि तिबेट हडपण्याचा प्रयत्न म्हणजे विश्वशांतीलाच धोका आहे, हे दाखवून दिले.

सरदार वल्लभभाई पटेल-मृत्यू

                     डिसेंबर १९५० मध्ये त्यांच्या आतड्याच्या जुन्या आजाराने पुन्हा उचल खाल्ली. म्हणून त्यांना मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेथेच उपचारादरम्यान पुन्हा दुसऱ्यांदा हृदयविकाराचा झटका आला व त्यातच १५ डिसेंबर १९५० च्या मध्यरात्री त्यांचा स्वर्गवास झाला.

व्हॉइसरॉय लॉर्ड माउंटबॅटन म्हणाले की

                  संपूर्ण देश एका कुशल राज्यकर्त्याला मुकला आणि शोकसागरात बुडाला. त्या वेळचे भारताचे शेवटचे व्हॉइसरॉय लॉर्ड माउंटबॅटन म्हणाले की, ‘सरदार पटेलांची स्मृती भारतीय मानसात अमर राहील.’ सर्वांनीच त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

सरदार वल्लभभाई पटेल-'भारतरत्न'

                       त्यांचा गंभीर चेहरा पाहून वाटायचे की, हे अत्यंत कठोर व निर्दयी आहेत. कर्तव्यपालनाचे वेळी ते तसेच होते. पण इतर वेळी ते अतिशय सहृदयी होते. म्हणून तर ते साऱ्या भारताला एका सूत्रात जोडू शकले. असो.

                            अशा या ‘सरदार वल्लभभाई पटेल’ नावाच्या भारताच्या ‘लोहपुरुषाला’ दि. १३ जुलै १९९१ रोजी भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘भारतरत्न’ मरणोत्तर देऊन भारत सरकारने त्यांच्या कार्याचा यथोचित सन्मानच केला.

सरदार वल्लभभाई पटेल माहिती मराठी

                     भारताच्या राजकीय नेत्यांमध्ये ज्यांना लोहपुरुष म्हणून म्हटले जाते त्या सरदार वल्लभभाई पटेल यांचे नाव सर्व भारतीयांना परिचित आहे. वल्लभभाई पटेल यांचा जन्म ३१ ऑक्टोबर १८७५ रोजी नडियाद (गुजराथ) येथे झाला. त्यांचे वडील श्री. झवेरभाई गुजराथ प्रांताच्या बोरसद गावचे एक सर्वसामानय शेतकरी होते. माता लाडबाई ही एक धर्मपरायण स्त्री होती. संयम, साहस, सहिष्णुता, देशप्रेम हे मातापित्यांचे गुण वल्लभभाईंच्या ठिकाणीही दिसून येत. शेती आणि पशुपालन हा व्यवसाय ज्या ठिकाणी चालत होते, अशा गावात वल्लभभाई पटेलांचा जन्म झाला होता.

                  शेतकऱ्याच्या दुर्दशेमुळे तर फार प्रभावित झाले. बारडोली सत्याग्रहाच्यावेळी त्यांनी भाषणात सांगितले, जगाचा आधार शेतकरी आणि मजूर आहेत. पण सर्वात जास्त जुलूम ते सहन करतात. त्यांचे प्राथमिक शिक्षण घरीच झाले. माध्यमिक शिक्षण नडियाद, पुन्हा बडोद आणि पुन्हा नडियाद अशा ठिकाणी झाले. १८९७ मध्ये ते मॅट्रिक झाले. बालपणापासून त्यांचा स्वभाव निर्भीड होता.

                अन्यायविरुध्द विरोध करणे हा त्यांचा स्वभाव होता. वकिली करु लागले. त्यांना कोणत्याही वकिलाच्या हाताखाली वकिली करायची नव्हती. म्हणून बॅरिस्टरची डिग्री मिळविण्यासाठी ते लंडनला गेले १३ फेब्रुवारी १९९३ ला मुंबईला परत आले. १८ व्या वर्षी त्यांचा विवाह झबेरबाशी झाला. मणिबेन ही मुलगी व डाह्याभाई हा मुलगा अशी दोन अपत्ये झाली.

राजकीय क्षेत्रात कार्य: गुजरातमधील १९१७ सालचा खेडा सत्याग्रह प्रसिध्द आहे. तेथे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची बरीचशी पिके नष्ट झाली. केवळ चार आणे पीक हाताशी आले तर सरकारच्या मते ६ आणे पीक आले आहे आणि शेतकऱ्यांनी कर दिला पाहिजे. पण वल्लभभाईंनी ह्या गोष्टीला विरोध करून शेतकऱ्यांना कर देऊ नका असे सांगितले. १९१९ साली त्यांनी सत्याग्रह पत्रिका काढली बोरसद सत्याग्रह १९२८ साली झाला. १९२४ साली अहमदाबाद म्युनिसिपालिटीचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. १९१८ साली सरकारने शेतकऱ्यांवर जमीन, म्हशी, संपत्ती इ. जप्त करण्याचा आदेश सरकारने दिला होता पण वल्लभभाईंनी चालविले आंदोलन पाहून सरकारने आदेश मागे घेतलाब करही कमी केला.

                  १९३०साली महात्मा गांधीच्या मिठाच्या सत्याग्रहात त्यांनी भाग घेतला. त्यावेळी त्यांना सरकारने अटक केली. ह्यानंतरही ते अनेक वेळा तुरुंगात गेले, २ सप्टेंबर १९४६ साली नेहरुंनी जे तात्पुरते सरकार बनविले होते त्यात त्यांना गृहमंत्रीपद मिळाले. गृहमंत्री झाले. १९४६ I.C.S. आणि I.A.S. च्या ऐवजी I.A.S. परीक्षा सुरु केल्या. स्वातंत्र्यानंतर देशासमोर दोन मोठे प्रश्न होते.

                    भारताच्या विभाजनाची समस्या आणि देशातील संस्थानांचे विलीनीकरण, पण देशातील बरीचशी राज्ये आपले अस्तित्व कायम ठेवण्यासाठी प्रयत्नशील होती. पण वल्लभभाईंनी कडक शब्दात सांगितले, १५ ऑगस्ट १९४७ पर्यंत सर्व संस्थाने ही भारतीय संघात सामील झाली पाहिजे, नाहीतर त्यांना कठोरपणे वागविले जाईल, हैद्राबाद व काश्मीर राज्यांनी याला विरोध केला. १७ सप्टेंबर १९४८ ला शेवटी हैद्राबादाच्या सैन्याने आत्मसमर्पण केले आणि हैद्राबाद भारतात विलिन झाले. पण काश्मीरची समस्या अजून कायम आहे.

                १३ नोव्हेंबर १९४८ ला नागपूर विद्यापीठाने २५ नोव्हेंबर १९४८ ला काशी विद्यापीठाने आणि २७ नोव्हेंबर प्रयाग विद्यापीठाने त्यांना डॉक्टर ऑफ लॉ (डी. लिट) ही पदवी दिली. देशातील ५६२ प्रांतांना एका सूत्रात गोवून अखंड भारत निर्माण केल्यामुळे पटेलांना लोहपुरुष म्हणतात. १२ जुलै १९९१ ला त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार दिला गेला. १५ डिसेंबर १९५० ला हा लोहपुरुष काळाच्या पडद्याआड गेला.

सरदार वल्लभभाई पटेल की जीवनी

sardar vallabhbhai patel in hindi

भारत के राजनीतिक नेताओं में लौह पुरुष के नाम से जाने जाने वाले सरदार वल्लभभाई पटेल का नाम सभी भारतीय जानते हैं। वल्लभभाई पटेल का जन्म 31 अक्टूबर 1875 को नडियाद (गुजरात) में हुआ था। उनके पिता श्री. झवेरभाई गुजरात प्रांत के बोरसद गांव के एक साधारण किसान थे। माता लाडबाई एक धर्मपरायण महिला थीं। धैर्य, साहस, सहनशीलता, देशभक्ति जैसे माता-पिता के गुण वल्लभभाई के यहाँ भी देखे जा सकते हैं। वल्लभभाई पटेल का जन्म एक ऐसे गाँव में हुआ था जहाँ कृषि और पशुपालन किया जाता था।

वह किसान की दुर्दशा से बहुत प्रभावित हुए। बारडोली सत्याग्रह के दौरान अपने भाषण में उन्होंने कहा, दुनिया का आधार किसान और मजदूर हैं। लेकिन सबसे ज्यादा जुल्म वो ही सहते हैं. उन्होंने अपनी प्राथमिक शिक्षा घर पर ही प्राप्त की। माध्यमिक शिक्षा नडियाद में, फिर बड़ोद में और फिर नडियाद में हुई। उन्होंने 1897 में मैट्रिक पास किया। उनका स्वभाव बचपन से ही निडर था।

अन्याय का विरोध करना उनका स्वभाव था। वकालत करने लगे. वह किसी वकील के अधीन वकालत नहीं करना चाहते थे। इसलिए वह अपनी बैरिस्टर की डिग्री लेने के लिए लंदन चले गए और 13 फरवरी 1993 को मुंबई लौट आए। 18 साल की उम्र में उनकी शादी ज़बरबाशी से हुई। उनके दो बच्चे थे, एक बेटी मणिबेन और एक बेटा दह्याभाई।

राजनीतिक क्षेत्र में कार्य: गुजरात में 1917 का ग्राम सत्याग्रह प्रसिद्ध है। वहां भारी बारिश के कारण ज्यादातर किसानों की फसलें बर्बाद हो गईं. यदि फसल का केवल चार आना हाथ में आता है, तो सरकार के अनुसार, छह आने फसल काटी गई है और किसानों को कर का भुगतान करना चाहिए। लेकिन वल्लभभाई ने इसका विरोध किया और किसानों पर कर न लगाने को कहा। 1919 में उन्होंने ‘सत्याग्रह’ पत्रिका का प्रकाशन किया। बोरसाद सत्याग्रह 1928 में हुआ। 1924 में, उन्हें अहमदाबाद नगर पालिका के अध्यक्ष के रूप में चुना गया। 1918 में सरकार ने किसानों को ज़मीन, भैंसें, संपत्ति आदि दी। सरकार ने ज़ब्ती का आदेश दिया था लेकिन वल्लभभाई के नेतृत्व में आंदोलन को देखकर सरकार ने आदेश वापस ले लिया और कर कम कर दिया।

उन्होंने 1930 में महात्मा गांधी के नमक सत्याग्रह में भाग लिया। उसी समय सरकार ने उन्हें गिरफ्तार कर लिया। इसके बाद भी वे कई बार जेल गए, 2 सितंबर 1946 को नेहरू द्वारा गठित प्रोविजनल सरकार में उन्हें गृह मंत्री का पद मिला। गृह मंत्री बने. 1946 आई.सी.एस. और आई.ए.एस. की जगह आई.ए.एस. परीक्षाएं शुरू हो गईं. आजादी के बाद देश के सामने दो बड़े सवाल थे.

भारत के विभाजन और राज्यों के देश में विलय की समस्या थी, लेकिन देश के अधिकांश राज्य अपना अस्तित्व बनाये रखने का प्रयास कर रहे थे। लेकिन वल्लभभाई ने सख्ती से कहा, सभी संस्थाओं को 15 अगस्त 1947 तक भारतीय संघ में शामिल हो जाना चाहिए, अन्यथा उनके साथ कठोरता से निपटा जाएगा, जिसका हैदराबाद और कश्मीर राज्यों ने विरोध किया। 17 सितंबर, 1948 को हैदराबाद की सेनाओं ने अंततः आत्मसमर्पण कर दिया और हैदराबाद का भारत में विलय हो गया। लेकिन कश्मीर की समस्या अभी भी बनी हुई है.

उन्हें 13 नवंबर 1948 को नागपुर विश्वविद्यालय, 25 नवंबर 1948 को काशी विश्वविद्यालय और 27 नवंबर को प्रयाग विश्वविद्यालय द्वारा डॉक्टर ऑफ लॉ (डी.लिट) की उपाधि से सम्मानित किया गया। पटेलों को लौह पुरुष कहा जाता है क्योंकि उन्होंने देश के 562 प्रांतों को एक सूत्र में बांधकर अखंड भारत का निर्माण किया। 12 जुलाई 1991 को उन्हें मरणोपरांत भारत रत्न से सम्मानित किया गया। 15 दिसम्बर 1950 को इस लौह पुरुष का निधन हो गया।

sardar vallabhbhai patel - English

                   All Indians know the name of Sardar Vallabhbhai Patel who is known as Iron Man among the political leaders of India. Vallabhbhai Patel was born on 31 October 1875 at Nadiad (Gujarat). His father Mr. Zaverbhai was an ordinary farmer from Borsad village in Gujarat province. Mata Ladbai was a pious woman. Patience, courage, tolerance, patriotism, qualities of parents can be seen in Vallabhbhai’s place as well. Vallabhbhai Patel was born in a village where agriculture and animal husbandry were practiced.

                He was very impressed by the plight of the farmer. In his speech during the Bardoli Satyagraha, he said, the basis of the world is farmers and labourers. But they bear the most oppression. He received his primary education at home. Secondary education was done at Nadiad, again at Barod and again at Nadiad. He matriculated in 1897. His nature was fearless from childhood.

                 It was his nature to protest against injustice. Began to advocate. He did not want to advocate under any lawyer. So he went to London to get his barrister degree and returned to Mumbai on 13 February 1993. At the age of 18, he got married to Zaberbashi. They had two children, a daughter Maniben and a son Dahyabhai.

                     Work in Political Field: The village satyagraha of 1917 in Gujarat is famous. Due to heavy rain there, most of the farmers’ crops were destroyed. If only four annas of the crop comes in hand, according to the government, six annas of the crop has been harvested and the farmers should pay the tax. But Vallabhbhai opposed this and asked not to tax the farmers. In 1919, he published Satyagraha magazine. Borsad Satyagraha took place in 1928. In 1924, he was elected as the President of Ahmedabad Municipality. In 1918, the government gave farmers land, buffaloes, property etc. The government had ordered confiscation but after seeing the agitation led by Vallabhbhai, the government withdrew the order and reduced the tax.

                 He participated in Mahatma Gandhi’s Salt Satyagraha in 1930. At that time he was arrested by the government. Even after this he went to jail several times, on 2nd September 1946 he got the post of Home Minister in the Provisional Government formed by Nehru. became Home Minister. 1946 I.C.S. and I.A.S. Instead of I.A.S. Exams started. After independence, there were two big questions before the country.

                        The problem of partition of India and merger of states in the country, but most of the states in the country were trying to maintain their existence. But Vallabhbhai said sternly, all the institutions should join the Indian Union by 15 August 1947, or else they would be dealt with harshly, which was opposed by the states of Hyderabad and Kashmir. On September 17, 1948, the forces of Hyderabad finally surrendered and Hyderabad merged with India. But the problem of Kashmir still remains.

                   He was awarded Doctor of Law (D.Litt) degree by Nagpur University on 13th November 1948, Kashi University on 25th November 1948 and Prayag University on 27th November. The Patels are called iron men because they united the 562 provinces of the country in one sutra to create Akhand Bharat. He was posthumously awarded the Bharat Ratna on 12 July 1991. On December 15, 1950, this iron man passed away.

FAQ

सरदार वल्लभभाई पटेल यांनी अखेरचा श्वास कधी घेतला?

सरदार वल्लभभाई पटेल यांनी अखेरचा श्वास १५ डिसेंबर १९५० च्या मध्यरात्री घेतला .

लोहपुरुष कोणाला म्हणतात?

सरदार वल्लभभाई पटेल लोहपुरुष कोणाला म्हणतात.

भारतात किती लोहपुरुष आहेत?

भारतात 11लोहपुरुष आहेत.

वल्लभभाई पटेल यांचा पुतळा किती फूट आहे?

सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा  उंच पुतळा [182 मीटर]597 फूट आहे. 

सरदार वल्लभभाई पटेल जन्म कधी झाला?

सरदार वल्लभभाई पटेल जन्म ३१ ऑक्टोबर १८७५  झाला

सरदार वल्लभभाई पटेल भारतरत्न कधी मिळाला ?

सरदार वल्लभभाई पटेल भारतरत्न दि. १३ जुलै १९९१ रोजी  मिळाला .

सरदार वल्लभभाई पटेल मृत्यु कधी झाला ?

सरदार वल्लभभाई पटेल मृत्यु १५ डिसेंबर १९५० झाला .

सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती कधी असते?

सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती 31ऑक्टोबर 2024  असते.

Leave a Comment