डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन
बालपण आणि कॉलेज शिक्षण
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांचा जन्म ५ सप्टेंबर १८८८ रोजी तिरुतणी नावाच्या गावात एका सामान्य ब्राह्मण कुटुंबात झाला, पौरोहित्य करणारे त्यांचे बडील श्री. बीरस्वामी उच्या हे शिक्षकही होते. त्यांच्या पूर्वजांचा संबंध सर्वपल्ली नामक गावाशी होता. म्हणूनच तेथील क्षेत्रीय परंपरेनुसार ‘सर्वपल्ली त्याच्या नावासोबत जोडले गेले. त्यांचे प्राथमिक शिक्षण तिरुत्तणी आणि तिरुपतीच्या खिश्चन मिशनरी पाठशाळेत झाले.
Table of Contents
Toggleतेव्हापासून त्याच्या मनात धर्माचे बीज अकुरले होते. या पवित्र तीर्थक्षेत्री खेळलेला, शिकलेला हा बालक जगातील एक महान दार्शनिक, विचारवंत आणि भारताचा राष्ट्रपती होईल, हे कोणाच्या स्वप्नातही आले नसेल.
वयाच्या बाराव्या वर्षांपर्यंतचे शिक्षण त्यांच्या वडिलांनी त्यांना जन्मगावातच स्वतः दिले. एफ.ए. पर्यंतचे शिक्षण वेल्लोरला आणि नंतर ख्रिश्चन कॉलेजमध्ये झाले. यामुळे त्यांना ख्रिश्चन धर्माचे व बायबलचे चांगलेच आकलन झाले होते. कारण या ख्रिश्चन संस्थांमधील अभ्यासामध्ये हिंदू विद्यार्थ्यांच्या मनात हिंदू धर्माविषयी फारच वेगवेगळ्या धारणा उत्पन्न केल्या जात होत्या.
त्यातूनच हिंदू धर्माला सर्वव्यापी बनविण्याची भावना त्यांच्या मनात अंकुरली. शिवाय स्वामी विवेकानंदांच्या भाषणांचाही परिणाम होताच. म्हणूनच हिंदू धर्माविषयी प्रेरणा स्फूरण पावून त्यांचा अभिमान जागा झाला.
डॉ. राधाकृष्णन् यांचे कुटुंब निर्धन नव्हते, तरीही कॉलेजचे शिक्षण आर्थिकदृष्ट्या कठीण होते म्हणून त्यांना शिकवण्याही कराव्या लागत होत्या.
इ. स. १९०७ मध्ये त्यांनी चेन्नईच्या कॉलेजमधून पदवी मिळवली व १९०९ मध्ये मद्रास विश्वविद्यालयातून दर्शनशास्त्रामध्ये एम. ए. (ऑनर्स) केले.
अतिशय बुद्धिमान राधाकृष्णन् यांची स्मरणशक्ती खूपच तीव्र होती आणि स्वतःच्या वाचनाचे व आकलनाचे सतत चिंतन व मनन करण्याची त्यांची पद्धत होती. त्यांचे मोठे दोन गुण होते; ते म्हणजे संयम व न रागावणे. त्याना कधी राग येतच नसे.
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन वयाचा २१ वर्षी
वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी त्यांना मद्रास प्रेसिडेंसी कॉलेजमध्ये दर्शन विभागाच्या प्राध्यापक पदावर नियुक्त केले गेले. त्या काळात त्यांनी अनेक भाषणे आणि देशी-विदेशी पत्र-पत्रिकामधून विद्वत्तापूर्ण लेख लिहिण्यास सुरुवात केली. परिणामतः परदेशांतही त्यांची कीर्ती पसरली.
डॉ. राधाकृष्णन यांनी स्वतः पीएच.डी. केली नव्हती; पण विश्वभरातील मान्यवर विश्वविद्यालयांनी त्यांना ‘डॉक्टरेट’ बहाल केली होती. स्वच्छ पांढरे शुभ्र धोतर, बंद गळ्याचा लांब कोट आणि पगडी अशा पांढऱ्याशुभ्र पोशाखात जेव्हा ते दर्शन शास्त्रावर कोणत्याही प्रकारच्या नोट्सच्या मदतीशिवाय अतिशय अस्खलित इग्रजीमध्ये गहन तत्त्वज्ञानाचे सुलभ विवेचन करत असत,
त्या वेळी श्रोते मंत्रमुग्ध होऊन विषयाच्या प्रवाहात आकंठ स्नानाचा अनुभव घेत. ते समाधान काय वर्णावे। जगभरातील विद्यार्थ्यांनी डॉ. राधाकृष्णन्ना प्रेम आणि आदरच दिला.

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन १९०८ ते १९४७
लेखन
इ. स. १९०८ ते १९४८ पर्यंत डॉ. राधाकृष्णन् यांचे लेखनकार्य निर्वेधचालू होते. त्यांनी धर्म, दर्शन, तसेच पूर्व व पश्चिमेच्या धर्मांशी संबंधित अशा अनेक महत्त्वपूर्ण ग्रंथाची रचना केली. त्यांनी संपादित केलेल्या आणि लिहिलेल्या ग्रंथांची संख्या १५० पेक्षाही जास्त होती. गीता, धम्मपद, ब्रह्मसूत्र इत्यादी ग्रथाबरोबरच गांधी, भारत आणि चीन, आत्मकथा, शिक्षण, राजनीती, शांतता व युद्ध आदीसंबंधी त्यांनी भरपूर लेखन केले.
‘दि फिलोसॉफी ऑफ रवींद्रनाथ टागोर’ हे त्यांचे सर्वांत पहिले पुस्तक. विश्वकवी रवींद्रनाथ टागोर यांनी डॉ राधाकृष्णन् यांची या लेखनकार्याबद्दल मुक्त कंठाने प्रशंसा करताना म्हटले होते की, ‘असं दिसतंय की, माझे तत्त्वज्ञान माझ्यापेक्षा तुम्हालाच जास्त चांगले उमगले आहे.
लोकमान्य टिळकसुद्धा त्यांच्या लेखनाने खूपच प्रभावित झाले होते. म्हणूनच ‘गीता रहस्या’मध्ये डॉ. राधाकृष्णन् यांच्या लेखनातील विधानेही त्यांनी उद्धृत केली होती. तात्पर्य, डॉ. राधाकृष्णन याची ख्याती सर्वदूर बाऱ्याच्या वेगाने पसरली होती.
‘इंडियन फिलॉसॉफी’ हे त्यांचे दोन खंडांत असलेले पुस्तक जगभर प्रसिद्ध झाले होते. असेच प्रत्येक पुस्तक महत्त्वाचे होते. कितीही गंभीर, जटिल विषय असला तरी त्यांच्या लेखणीतून उतरताना तो सहज, सुलभ आणि सुबोध होत असे, हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य होते.
तत्त्वज्ञानासारखा जटिल विषय इंग्रजीमधून मांडण्याची त्यांची शैली, भाषा, उच्चारण या प्रत्येक गोष्टीमधून असे प्रतीत होत असे की, हा माणूस गेली कित्येक वर्षे इंग्लंडमधल्या ऑक्सफर्ड वा केंब्रिज युनिव्हर्सिटीमधून पदव्या घेऊन आलेला आहे. एवढेच नव्हे, तर प्रत्यक्ष इंग्रजांनाही त्यांना समजून घेताना शब्दकोशाचा आधार घ्यावा लागे. असाच त्यांच्या बोलण्याचा आणि लेखनाचा ढंग ओजस्वी, विद्वत्ताप्रचूर आणि जादूई होता.
डॉ. राधाकृष्णन् हे भारतीय संस्कृतीच्या संस्कारात उपजलेलं कमळ होतं. कुठल्याही शिक्षणासाठी ते कधीच परदेशात गेले नाहीत; परंतु स्वतःच्या व्यासंगी चिंतनाने त्यांनी भारतीयांना आणि सगळ्या जगाला आपल्या दार्शनिक, शैक्षणिक, वैचारिक आणि राजनैतिक रूपाने पूर्णपणे मोहून टाकले होते. ते ज्या ज्या ठिकाणी गेले, ज्या ज्या पदावर राहिले, त्या प्रत्येक क्षेत्राला त्यांनी उजळून चमत्कृत बनविले.
डॉ. राधाकृष्णन प्राध्यापक पदावर
इ. स. १९१८ मध्ये म्हैसूर विद्यापीठाने राधाकृष्णन् यांची तत्त्वज्ञानाच्या प्राध्यापक पदावर नियुक्ती केली. तसेच कलकत्ता विद्यापीठातील सर आशुतोष मुखर्जी यांनीही डॉ. राधाकृष्णन् या तत्त्वज्ञानी तरुणाचे कर्तृत्व जाणले होते. म्हणूनच त्यांना कलकत्ता विद्यापीठात दर्शनशास्त्राच्या प्राध्यापकपदाचा सन्मान दिला. इ. स. १९२६ मध्ये ब्रिटिश साम्राज्यातील विद्यापीठांचे संमेलन भरवले गेले. त्यात त्यांना कलकत्ता विद्यापीठाचे प्रतिनिधी म्हणून पाठविले.
त्यानंतर कलकत्ता विद्यापीठाचे प्रतिनिधी म्हणून अमेरिकेमध्ये हॉर्वर्ड युनिव्हर्सिटीत होणाऱ्या ‘फिलॉसॉफी काँग्रेस’मध्ये ते सहभागी झाले, अमेरिकी जनतेवर त्याच्या भाषणांची चांगलीच मोहर उमटली. अमेरिकनना तर बाटले की, जणू स्वामी विवेकानंदच पुन्हा राधाकृष्णन् यांच्या रूपात अवतरले आहेत.
आंध्र विद्यापीठाची स्थापना इ. स. १९२६ मध्ये झाली होती. तिथेही सिनेटच्या अनुमोदनाने इ. स. १९३१ मध्ये ते कुलपती झाले. डॉ. राधाकृष्णन्नी आपल्या अथक प्रयत्नांनी इथे प्रयोगशाळा, विद्यार्थी वसतिगृह, ग्रंथालय आणि विद्यालय भवन काही काळातच निर्मिले, कोणतेही कार्य ते अत्यंत बेगाने आणि दक्षतेने पार पाडत असत. त्यामुळे पाहणारे दिड्यूढ होऊन जात. या कार्यकाळातसुद्धा त्यांच्याकडे कलकत्ता विद्यापीठातील तत्वज्ञानाचे प्रोफेसर पद होतेच, शिवाय ते परदेशांतही भाषणासाठी जातच राहिले.
त्याच वेळी ऑक्सफर्ड विद्यापीठातही डॉ. राधाकृष्णन् प्रोफेसर होते. सहा महिने ते इंग्लंडमध्ये राहत; तर सहा महिने कलकत्त्याला. वाराणसीच्या हिंदू विश्वविद्यायलाचे पं. मालवीयजी स्वतःच्या प्रकृती-अस्वास्थ्यामुळे संस्थेच्या काळजीत होते.
शेवटी त्याच्या विनतीला मान देऊन डॉ. राधाकृष्णन् वाराणसीच्या या हिंदू विश्वविद्यालयाचे कुलपती झाले; पण त्यांनी या पदासाठी वेतन घेण्यास नकार दिला. कारण त्यांच्या मते ही राष्ट्रीय संस्था होती. अशा प्रकारे एकाच वेळी डॉ. राधाकृष्णन् हे कलकत्ता, काशी आणि ऑक्सफर्ड तीनही विद्यापीठांचे कामकाज पाहू लागले. शेवटी नाइलाजाने इ. स. १९४० मध्ये त्यानी कलकत्ता विद्यापीठाच्या पदाचा राजीनामा दिला.
डॉ. राधाकृष्णन् व गांधीजींची भेट इ. स. १९३८ मध्ये सेवाग्राम येथे झाली होती
शिक्षक का म्हणतात
डॉ राधाकृष्णन यांनी आपल्या आयुष्याची चाळीस वर्षे शिक्षण क्षेत्रात घालविली, म्हणूनच त्याना सर्वच जण ‘शिक्षक’ म्हणतात. तरीही शिक्षण, लेखन, व्यवस्थापन, राजनीती, शासन या सर्वच क्षेत्रांत आपल्या प्रतिभेची उत्तुंग भरारी त्यानी दाखविली होती.
तत्त्वज्ञान शास्त्राच्या व्याख्यात्याला शिक्षकापासून वेगळे केले जाऊ शकत नाही. आपला विषय प्रभावशाली भाषेत मांडण्याची त्याच्यात अभूतपूर्व क्षमता होती त्यासाठी त्यांनी सलग १२- १८ तास अशा पद्धतीने अध्ययन केले होते.
डॉ राधाकृष्णन अध्यक्ष पद
इ. स. १९४७ च्या स्वातंत्र्यानंतर शिक्षणमंत्री मौलाना आजाद यांनी स्वतंत्र भारतातील उच्च शिक्षणाच्या नवीन व्यवस्थेसाठी एका आयोगाबी स्थापना केली. या आयोगाचे अध्यक्ष म्हणून १९४८ मध्ये डॉ. राधाकृष्णानयाची नियुक्ती झाली, अनुदान आयोगाची स्थापना याच आयोगाच्या शिफारशीनुसार झाली.
शिक्षणमहर्षींच्या रूपात डॉ राधाकृष्णन यानी कित्येक राष्ट्रीय, आशियाई तथा आतरराष्ट्रीय समेलनांचे अध्यक्षपद भूषविले काशीमध्ये भरलेले पहिले आशियाई शिक्षण संमेलन, लखनौमध्ये संपन्न झालेले अधिवेशन (१९३७- ३८) दोन्ही ठिकाणी तेच अध्यक्ष होते त्याच प्रकारे आधीचा राष्ट्रसघ आणि आताच्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या युनेस्कोसारख्या कित्येक समितींच्या द्वारे डॉ. राधाकृष्णन यांनी आंतरराष्ट्रीय बौद्धिक सहयोग, विश्वशांती आणि विश्वबंधुत्वासाठी खूपच कार्य केले.
युनेस्कोचे अधिवेशन त्यांच्याच प्रयत्नानी नवी दिल्ली येथे झाले होते. त्यामुळेच विज्ञान भवनाला आजचे स्वरूप प्राप्त झाले. जिथे आज अधिकतर आंतरराष्ट्रीय संमेलने होत असतात.
डॉ. राधाकृष्णन उपराष्ट्रपती
भारताचे संविधान तयार झाल्यावर १९५२ मध्ये जेव्हा पहिल्या निवडणुका झाल्या, तेव्हा डॉ राधाकृष्णन्, हे बिनविरोध पहिले उपराष्ट्रपती म्हणून निवडले गेले. उपराष्ट्रपतीच राज्यसभेचा अध्यक्ष असतो. उपराष्ट्रपती पदाबरोबरच ते दिल्ली विद्यापीठाचे कुलपती आणि साहित्य अकादमीचे उपाध्यक्षही झाले.
सुरुवातीला राज्यसभा अनावश्यक ठरविली गेली होती; पण राज्यसभेचे प्रथम अध्यक्ष या नात्याने पहिल्या दहा वर्षांतच त्यांनी तिची उपयोगिता सिद्ध करून दाखवली.
राज्यसभेचे अध्यक्ष या नात्याने त्याचा राजनीतीशी सरळ संबध होता. त्यावरही त्यांनी दार्शनिक म्हणून नवीन मुलामा चढविला आणि राजनैतिक समस्यांवर जे मत व्यक्त केले व ज्या व्याख्या दिल्या, त्याही त्याच्या व्यासंगानुरूप नावीन्याने भारलेल्या होत्या. या काळात त्यानी परदेश वाऱ्याही केल्या.
या आधीही ते अनेक वेळा परदेशांत गेले होते; पण आता ते एका दार्शनिक राजनीतिज्ञाच्या रूपात विश्वबंधुत्व आणि भारताची तटस्थ नीती या विषयांच्या व्याख्यात्याच्या रूपात जात होते. राजनीतिज्ञ असूनही भारताच्या सांस्कृतिक दूताचे काम ते करत होते आणि विश्वातील त्रस्त मानवाला आश्वस्त करत होते.
डॉ. राधाकृष्णन हे राष्ट्रपती
इ. स. १९६१ मध्ये डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या आजारपणात आणि त्यांच्या मॉस्को प्रवासकाळात डॉ. राधाकृष्णन् हे राष्ट्रपतिपदावर होते. तरीही त्यांनी राष्ट्रपती पदाचे वेतन घेतले नाही की, आपले निवासस्थान बदलले नाही.
डॉ. राजेंद्र प्रसाद याच्यानंतर इ. स. १९६२ मध्ये जेव्हा ते राष्ट्रपती झाले तेव्हाही दहा हजार मासिक वेतनाच्या जागी रु. अडीच हजार घेणेच त्यांनी पसंत केले. हा त्यांचा त्याग, ही साधी राहणी आणि उच्च विचारसरणी भारतासाठी एक समर्पक उदाहरण घालून गेली. असे त्यांचे एक-एक कार्य त्यांना ‘भारतरत्न’ सिद्ध करत होते.
भारतरत्न
ज्यांचा साऱ्या विश्वात आदर केला जातो, अशा व्यक्तीचा भारताला अत्यंत अभिमान आहे. हे भारताचेच नाही तर साऱ्या विश्वाचे रत्न आहेत,
महान दार्शनिक आणि संस्कृतीच्या व्याख्यात्याच्या रूपात राधाकृष्यान यांना सन्मानावर सन्मान मिळत गेले, तरीही त्यांची शांत प्रकृती आणि एकूणच व्यक्तिमत्त्वातील माधुर्य अमिट राहिले.
सर्वांगीण व्यक्तित्वाचे धनी, परमसत्तेचे उपासक, भारतीय संस्कृतीचे व्याख्याता अशा विश्वाच्या या महान तत्त्ववेत्त्याला इ. स. १९५४ मध्ये भारत सरकारने ‘भारतरत्न‘ या सर्वोच्च उपाधीने विभूषित करून पदक प्रदान केले.
'शिक्षकदिन' '
आयुष्याची चाळीस वर्षे शिक्षणक्षेत्रात व्यतीत केलेल्या या शिक्षकाचा जन्म दिवस ‘५ सप्टेंबर’ हा आज संपूर्ण भारतात ‘शिक्षकदिन’ म्हणून आदराने साजरा केला जातो.
सूर्याचा अस्त झाला
जवळजवळ एक वर्षाच्या प्रकृती अस्वास्थ्यानंतर १७ एप्रिल १९७५ रोजी रात्री १२ वाजून ४५ मिनिटांनी चेन्नईच्या एका नर्सिंग होममध्ये सपूर्ण विश्वात भारतीय तत्त्वज्ञानाची आभा पसरविणाऱ्या या सूर्याचा अस्त झाला
FAQ
- स्वातंत्र्य भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते?
भारताचे संविधान तयार झाल्यावर १९५२ मध्ये जेव्हा पहिल्या निवडणुका झाल्या, तेव्हा डॉ राधाकृष्णन्, हे बिनविरोध पहिले उपराष्ट्रपती म्हणून निवडले गेले.
- सर्वपल्ली ‘ हे नाव कसे जोडले गेले ?
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म ५ सप्टेंबर १८८८ रोजी तिरुतणी नावाच्या गावात एका सामान्य ब्राह्मण कुटुंबात झाला, पौरोहित्य करणारे त्यांचे वडील श्री. बीरस्वामी उच्या हे शिक्षकही होते. त्यांच्या पूर्वजांचा संबंध सर्वपल्ली नामक गावाशी होता. म्हणूनच तेथील क्षेत्रीय परंपरेनुसार ‘सर्वपल्ली त्याच्या नावासोबत जोडले गेले.
- शिक्षक दिन 5 सप्टेंबरला का साजरा केला जातो ?
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी आयुष्याची चाळीस वर्षे शिक्षणक्षेत्रात व्यतीत केलेल्या या शिक्षकाचा जन्म दिवस ‘५ सप्टेंबर’ हा आज संपूर्ण भारतात ‘शिक्षकदिन’ म्हणून आदराने साजरा केला जातो.
- शिक्षक दिवस का महत्व मराठी?
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी आयुष्याची चाळीस वर्षे शिक्षणक्षेत्रात व्यतीत केलेल्या या शिक्षकाचा जन्म दिवस ‘५ सप्टेंबर’ हा आज संपूर्ण भारतात ‘शिक्षकदिन’ म्हणून आदराने साजरा केला जातो.
- 5 सप्टेंबर बद्दल काय खास आहे?
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी आयुष्याची चाळीस वर्षे शिक्षणक्षेत्रात व्यतीत केलेल्या या शिक्षकाचा जन्म दिवस ‘५ सप्टेंबर’ हा आज संपूर्ण भारतात ‘शिक्षकदिन’ म्हणून आदराने साजरा केला जातो
- शिक्षक दिन किती तारखेला असतो?
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन या शिक्षकाचा जन्म दिवस ‘५ सप्टेंबर’ हा आज संपूर्ण भारतात ‘शिक्षकदिन’ म्हणून आदराने साजरा केला जातो
- स्वातंत्र्य भारताचे पहिले राज्यसभेचचे अध्यक्ष कोण होते?
भारताचे संविधान तयार झाल्यावर १९५२ मध्ये जेव्हा पहिल्या निवडणुका झाल्या, तेव्हा डॉ राधाकृष्णन्, हे बिनविरोध पहिले उपराष्ट्रपती म्हणून निवडले गेले. उपराष्ट्रपतीच राज्यसभेचा अध्यक्ष असतो.