बालपण आणि शिक्षण
राजीव गांधी चा जन्म २० ऑगस्ट १९४४ रोजी मुंबईच्या शिरोडकर नर्सिंग होममध्ये झाला. त्या वेळी नेहरूजी स्वातंत्र्य चळवळीत होते. म्हणून इंदिरा गांधी, त्यांच्या आत्या कृष्णा हरीसिंग यांच्या मुंबईच्या घरी राहिल्या होत्या. त्यांचे पती फिरोज गांधीसुद्धा मुंबईतच होते. आजी कमला नेहरूंच्या नावानुरूप नातवाचे नाव असावे, या नेहरूंच्या इच्छेवरून मुलाचे नाव ‘राजीवरत्न’ गांधी ठेवले गेले.
Table of Contents
Toggleऑगस्ट १९४७ पर्यंत इंदिराजी फिरोज गांधींबरोबर लखनौला राहिल्या. स्वातंत्र्यानंतर पं. नेहरू पंतप्रधान झाल्यावर, त्या तीन मूर्ती भवनमध्ये, सर्व व्यवस्थापनासाठी राजीव व संजय या दोन्ही मुलांसह पं. नेहरूंबरोबर राहिल्या.
वयाच्या सहाव्या वर्षी राजीवना दिल्लीच्या ‘सेंट कोलंबस स्कूलमध्ये घातले. इ. स. १९५५ मध्ये राजीवना डून स्कूलमध्ये घातले. राजीवनी कधीही शाळेत शिस्तभंग केला नाही. सन १९६० मध्ये राजीवनी सीनिअर केंब्रिज पास केले. त्याच वेळी ९ सप्टेंबर १९६० रोजी फिरोज गांधींना दुसरा हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला.
राजीव गांधी विवाह
सीनिअर केंब्रिजनंतर राजीवना इंग्लंडला शिकायला ठेवले. तिथे खर्च चालवण्यासाठी सुट्टीमध्ये राजीव काम करत असत. लहानपणापासूनच त्यांचे पायलट बनण्याचे स्वप्न होते.
लंडनच्या इम्पिरियल कॉलेजमध्ये यांत्रिक अभियांत्रिकीचे प्रशिक्षण राजीवनी सुरू केले. याच काळात राजीवजींची सोनिया माइनो यांच्याशी भेट झाली. दोघांनीही एकमेकांना पसंत केले. नंतर घरच्यांच्या संमतीने दि. २५ फेब्रुवारी १९६८ रोजी दोघांचा विवाह झाला.
संसद सदस्य
राजीवजी २० वर्षांचे असताना २७ मे १९६४ रोजी पं. नेहरूंचे निधन झाले होते. लाल बहादूर शास्त्री पंतप्रधान झाले होते व इंदिरा गांधी सूचना व प्रसारण मंत्री बनल्या होत्या. जानेवारी १९८० मध्ये मध्यावधी निवडणुका होऊन इंदिराजींच्या नेतृत्वाखाली सरकार बनवले गेले.
इ. स. १९८० मध्ये संजय गांधी बांचा विमान अपघातात मृत्यू झाला होता. त्यानंतर राजीवनी राजकारणात यावे म्हणून सातत्याने त्यांच्यावर दबाव टाकला गेला. शेवटी १७ ऑगस्ट १९८२ रोजी राजीवनी संसद सदस्य म्हणून निवड झाल्यावर संसद सदस्यत्वाची शपथ घेतली
'दि अगस्टो सीजर सॉन्डिनो ऑर्डर'
त्या वेळी युवा पंतप्रधान राजीवनी देशाला एकविसाव्या शतकाकडे नेण्यासाठी कंबर कसली. देशोत्थानाचे कार्यक्रम, नवीन विज्ञानप्रणाली सुरू केली. कॉम्प्युटरचा वापर, उपयोग, उत्पादन व निर्यातही सुरू झाली. समाजकल्याण कार्य, ग्रामीण उद्योगधंदे सुरू केले.
मागास वर्गाकडे विशेष लक्ष पुरवले. दि. १६ सप्टेंबर १९८६ ला निकारागुआचे राष्ट्रपती डॅनियल ओर्टेगा यांनी दिल्लीला येऊन आपल्या देशाचा सर्वोच्च पुरस्कार ‘दि अगस्टो सीजर सॉन्डिनो ऑर्डर’ त्यांना प्रदान केला.
'बिआँड वॉर अवॉर्ड'
राजीवनी आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगवेगळ्या देशांत संबंध वाढविणे आणि विश्वशांतीच्या दृष्टीने प्रयत्न केले. परिणामतः इ. स. १९८५ मध्ये संयुक्त राष्ट्र संघ समारंभात झालेल्या कॉन्फरन्समध्ये ‘बिआँड वॉर अवॉर्ड’ देऊन राजीवींचा सन्मान केला.
शेजारच्या देशांशी बंधुत्वाचे संबंध
राजीवजींना शेजारच्या देशांशी बंधुत्वाचे संबंध हवे होते. म्हणून त्यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधान बेनजीर भुट्टोंच्याबरोबर भेट घेऊन भारत-पाकिस्तानमध्ये असलेले तणावपूर्ण संबंध कमी करण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे श्रीलंकेमधला लिट्टेचा आतंकवाद संपवण्याच्या दृष्टीने तेथील राष्ट्रपती जयवर्धने यांच्या आवाहनानुसार भारतीय सैन्य पाठविले.
पण हाच निर्णय त्यांच्या जिवावर बेतला. १९ फेब्रुवारी १९८१ च्या दिल्ली येथील बोट क्लबवर राजीवजींनी किसान रॅलीचे आयोजन केले होते. यासाठी सुमारे ५० लाखांची उपस्थिती होती असे म्हणतात.
राजकारणामध्ये सक्रीय
राजीवजींनी विमानसेवेचा राजीनामा देऊन लखनौच्या अमेठी लोकसभा क्षेत्रात निवडणुकीसाठी नामांकन पत्र भरले. १७ जून १९८१ ला बहुमताने निवडून येऊन लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. आता त्यांनी राजकारणामध्ये सक्रीय भाग घेतला. २८ जूनला चीनच्या विदेशमंत्र्यांच्या निमंत्रणावरून चीन देशाचा दौरा केला.
ब्रिटनच्या युवराज चार्ल्सच्या विवाहाला उपस्थित राहण्यासाठी २८ जुलै रोजी ब्रिटनचा दौरा केला. काँग्रेसचे (इं) महासचिव राजीव गांधी झाले. त्या वेळी काँग्रेसमध्ये अनेक सुधारणा केल्या. उत्तर प्रदेशात कित्येक वर्षे चालत आलेला नेतृत्वाचा विवाद समाप्त केला. बंगलोरमधल्या युवा काँग्रेसच्या अधिवेशनात राजीवजींना नेता म्हणून निवडले.
राजीव गांधी पंतप्रधान
३१ ऑक्टोबर १९८४ ला इंदिरा गांधींची हत्या त्यांच्या अंगरक्षकाने सकाळी ९ वाजता केली. तेव्हा राजीवजी प्रणव मुखर्जीबरोबर बंगालच्या दौऱ्यावर होते. ते त्वरित परतले. तत्कालीन राष्ट्रपती ज्ञानी झैलसिंग यांनी अत्यंत विचारपूर्वक निर्णय घेऊन त्याच दिवशी संध्याकाळी राष्ट्रपती भवनात राजीवजींना पंतप्रधानपदाची व गोपनीयतेची शपथ दिली. १२ नोव्हेंबर १९८४ ला पंतप्रधान राजीव गांधींनी राष्ट्राला उद्देशून भाषण केले.
४० वर्षाचे तरुण पंतप्रधान भारताला मिळाले होते. एका नव्या युगाची ही सुरुवात होती. त्यांनी ताबडतोब १९८४ मध्ये आठव्या लोकसभा निवडणुकीची घोषणा केली. निवडणूक प्रचारासाठी तुफानी वेगाने भारतभर दौरा केला. मागील सर्व निवडणुकांच्या तुलनेत प्रचंड बहुमताने जनतेने राजीवजींना पंतप्रधानपदावर बसविले.
राजीव गांधींनी संपूर्ण भारतदर्शन
पंतप्रधान झाल्यावर सर्व भारतीयांच्या समस्या जाणून घेण्यासाठी राजीव गांधींनी संपूर्ण भारतदर्शन कार्यक्रम आयोजिला. १२ जुलै १९८५ ला मध्य प्रदेशातील झाबुआ नामक एका सामान्य गावातून हा दौरा सुरू केला. नंतर ओरिसा, केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, लक्षद्वीप, अरुणाचल व मिझोरामपर्यंत सर्व राज्ये पादाक्रांत केली.
या यात्रेत हेलिकॉप्टरपासून लहान-मोठ्या सर्व साधनांचा वापर केला. पायीसुद्धा प्रवास केला. या प्रवासात त्यांच्याबरोबर सोनिया गांधी व सरकारी साहाय्यक आणि स्थानिय अधिकारी होते.
रक्तरंजित लढा
जुलै १९८३ ते मे १९८७ या काळात श्रीलंकेत चालू असलेल्या रक्तरंजित लढ्यामुळे सुमारे १५ लाख शरणार्थी भारतात आश्रयाला आले. त्या वेळी २९ जुलै १९८७ ला कोलंबो येथे राष्ट्रपती जयवर्धने व राजीव गांधी यांच्यात
समझौता करार होऊन त्यावर सह्या झाल्या आणि भारत-श्रीलंका यांच्यातील गैरसमज दूर झाले.
राजीव गांधी घातक हल्ला
३० जुलै १९८७ रोजी भारतात परत येताना कोलंबो विमानतळावर राजीवजींच्या सन्मानार्थ नौसैनिकांकडून ‘गार्ड ऑफ ऑनर’ देताना एका नौसैनिकाने त्यांच्यावर घातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण सुदैवाने तो विफल झाला.
त्यातून पंतप्रधान राजीव गांधी वाचले. या आधीही २ ऑक्टोबर १९८६ रोजी म. गांधींच्या समाधीदर्शनाला गेले होते तेव्हा झाडीतून आलेल्या बंदुकीच्या गोळीने त्यांचा प्राण घेण्याचा प्रयत्न केला. पण तोही फसला व हल्लेखोर पकडला गेला.
राजीव गांधींची हत्या
यानंतर बोफोर्स-दलाली प्रकरणात विश्वनाथ प्रतापसिंग राजकीय मंचावर प्रकटले. तेव्हा राजीव गांर्धीच्या प्रतिमेला विश्वस्तरावर तडा गेला. नवव्या लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेस (इं.) चा पराजय झाला. त्यानंतर राजकीय पटलावर अशी चक्रे फिरली की लोकसभा दुभंगली. पुन्हा निवडणुकीच्या घोषणा झाल्या.
या वेळी निवडणूक प्रचारासाठी राजीव गांधी दि. २१ मे १९९१ रोजी पैरुम्बुदूर नामक दक्षिणेच्या एका लहानशा गावात पोहोचले. तिथे आधीच हजर असलेल्या लिट्टेच्या आत्मघाती दलातील लोकांनी राजीव गांधींची हत्या केली. भारताच्या तरुण युवा पंतप्रधानाचा अंत झाला.
राजीव गांधी 'भारतरत्न'
दि. ७ जुलै १९९१ रोजी भारत सरकारने राजीव गांधींना मरणोत्तर भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘भारतरत्न’ देऊन गौरविले.
'इंदिरा गांधी शांती व विकास-९१ पुरस्कार'
मे १९९२ मध्ये ‘इंदिरा गांधी शांती, निरस्त्रीकरण आणि विकास-९१ पुरस्कार’ देऊनही राजीवजींचा सन्मान केला गेला.
Rajiv Gandhi Biography in English
Rajiv Gandhi was born on 20 August 1944 in Shirodkar Nursing Home, Mumbai. At that time Nehruji was in the freedom movement. So Indira Gandhi stayed at her maternal grandmother Krishna Harisingh’s house in Mumbai. Her husband Feroze Gandhi was also in Mumbai. According to Nehru’s wish that the grandson should be named after his grandmother Kamala Nehru, the son was named ‘Rajivaratna’ Gandhi.
Indiraji stayed with Feroze Gandhi in Lucknow till August 1947. After independence Pt. After Nehru became Prime Minister, in those three Murti Bhavans, Pt. Rajiv and Sanjay, along with both their sons, were in charge of all the management. Stayed with Nehru.
At the age of six, Rajiv was admitted to St. Columbus School in Delhi. etc. S. In 1955, Rajiv was admitted to Doon School. Rajeev never misbehaved in school. In 1960, Rajeev passed Senior Cambridge. At the same time Feroze Gandhi suffered a second heart attack on 9 September 1960 and died of it. After Sr. Cambridge, Rajiv was sent to study in England. Rajiv used to work there during vacations to manage the expenses.
He dreamed of becoming a pilot since childhood. Rajiv began his mechanical engineering training at Imperial College, London. It was during this time that Rajeev met Sonia Maino. Both liked each other. Later with the consent of the family. They got married on 25 February 1968.
On May 27, 1964 when Rajivji was 20 years old, Pt. Nehru had passed away. Lal Bahadur Shastri became the Prime Minister and Indira Gandhi became the Minister of Information and Broadcasting. Mid-term elections were held in January 1980 and a government was formed under the leadership of Indiraji. etc. S. Sanjay Gandhi died in a plane crash in 1980. After that Rajiv was continuously pressured to enter politics. Finally, on 17 August 1982, Rajiv took the oath of office after being elected as a Member of Parliament.
At that time, the young Prime Minister Rajiv was determined to take the country to the twenty-first century. Nationalization programs, new science system started. Use, utilization, production and export of computers also started. Social welfare work, rural industries were started. Special attention was given to the backward classes. d. On September 16, 1986, the President of Nicaragua, Daniel Ortega, came to Delhi and awarded him the highest award of his country, ‘The Augusto Cesare Sondino Order’. Rajiv made efforts at the international level to promote relations between different countries and for world peace. As a result S. In 1985, Rajiv Gandhi was honored with the ‘Beyond War Award’ at a conference held at the United Nations.
Rajivji wanted brotherly relations with neighboring countries. So he tried to ease the strained relations between India and Pakistan by meeting with the Prime Minister of Pakistan, Benazir Bhutto. Similarly, in order to end the terrorism of LTTE in Sri Lanka, Indian troops were sent as per the appeal of the President Jayawardene there. But this decision cost him his life. On February 19, 1981, Rajivji organized a Kisan Rally at the Boat Club in Delhi. It is said that around 50 lakhs were present for this.
Rajeevji resigned from the aviation service and filed his nomination papers for the election in the Amethi Lok Sabha constituency of Lucknow. On 17 June 1981 by a majority
He was elected and took oath as a member of the Lok Sabha. Now he took an active part in politics. Visited China on June 28 at the invitation of the Chinese Foreign Minister. Visited Britain on July 28 to attend the wedding of Britain’s Prince Charles. Rajiv Gandhi became the General Secretary of the Congress (Ing). At that time many reforms were made in the Congress. Ended years of leadership disputes in Uttar Pradesh. Rajivji was elected as the leader in the Youth Congress session in Bangalore.
On 31 October 1984, Indira Gandhi was assassinated by her bodyguard at 9 am. At that time, Rajivji was on a tour of Bengal with Pranab Mukherjee. They immediately returned. The then President Gyani Zailsingh took a very thoughtful decision and administered the oath of secrecy and Prime Ministership to Rajivji in Rashtrapati Bhavan on the same day evening. On November 12, 1984, Prime Minister Rajiv Gandhi addressed the nation.
India got a 40-year-old prime minister. This was the beginning of a new era. He immediately announced the eighth Lok Sabha elections in 1984. Toured across India at a whirlwind pace for election campaigning. Compared to all the previous elections, the people installed Rajivji as the Prime Minister with a huge majority.
After becoming the Prime Minister, Rajiv Gandhi organized the entire Bharat Darshan program to know the problems of all Indians. The tour started on July 12, 1985 from an ordinary village called Jhabua in Madhya Pradesh. Later all the states like Orissa, Kerala, Karnataka, Maharashtra, Gujarat, Rajasthan, Lakshadweep, Arunachal and Mizoram were invaded. In this yatra, all the tools from helicopters to small and big were used. He also traveled on foot. He was accompanied by Sonia Gandhi and government aides and local officials on this journey.
From July 1983 to May 1987, about 1.5 million refugees sought refuge in India due to the ongoing bloody conflict in Sri Lanka. At that time on July 29, 1987 in Colombo between President Jayawardena and Rajiv Gandhi
A settlement agreement was signed and the misunderstanding between India and Sri Lanka was resolved.
The next day on July 30, 1987, while returning to India, Rajivji was being given a ‘guard of honor’ by marines at the Colombo airport when a marine tried to fatally attack him. But luckily he failed. Prime Minister Rajiv Gandhi survived it. Even before this, on 2 October 1986, Mr. While visiting Gandhi’s mausoleum, a gun shot from the bush tried to kill him. But he was also deceived and the assailant was caught.
After this, Vishwanath Pratap Singh appeared on the political stage in the Bofors-brokering case. Then Rajiv Gandhi’s image was shattered globally. Congress (Eng.) was defeated in the ninth Lok Sabha elections. After that, such cycles turned on the political stage that the Lok Sabha was divided. Elections were announced again.
Rajiv Gandhi reached a small southern village called Parumbudur on May 21, 1991 for election campaign. LTTE suicide squad members who were already present there killed Rajiv Gandhi. India’s young prime minister has passed away.
On 7 July 1991, the Government of India honored Rajiv Gandhi posthumously with India’s highest civilian award ‘Bharat Ratna’. Later in May 1992, Rajivji was also honored with the ‘Indira Gandhi Peace, Disarmament and Development-91 Award’.
राजीव गांधी अंतरराष्ट्रीय स्टेडियम
राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, सामान्यतः उप्पल स्टेडियम म्हणून ओळखले जाते, हे हैदराबाद, तेलंगणा, भारतातील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम आहे. हे हैदराबाद क्रिकेट असोसिएशन (HCA) च्या मालकीचे आणि चालवले जाते. हे हैदराबाद क्रिकेट संघ आणि हैदराबाद महिला क्रिकेट संघाचे घरचे मैदान आहे.
उप्पलच्या पूर्वेकडील उपनगरात स्थित, त्याची आसन क्षमता 55,000 आहे आणि ती 15 एकर जमिनीवर पसरलेली आहे. हे आयपीएल संघ सनरायझर्स हैदराबादचे होम ग्राउंड म्हणून काम करते. 28 जानेवारी 2024 पर्यंत, 6 कसोटी, 10 एकदिवसीय सामने आणि 3 T20 सामने आयोजित केले आहेत. या स्टेडियममध्ये 2017 IPL च्या फायनल आणि 2019 IPL च्या फायनलचे आयोजन करण्यात आले होते. या स्टेडियमने 2023 क्रिकेट विश्वचषकादरम्यान ऑक्टोबर 2023 मध्ये पहिला ICC कार्यक्रम आयोजित केला होता.
Rajiv Gandhi International Cricket Stadium History
2003 मध्ये, नवीन स्टेडियमचा प्रस्ताव एचसीएने तत्कालीन आंध्र प्रदेश सरकारला सादर केला होता[ , ज्याचे अध्यक्ष एन. चंद्राबाबू नायडू होते. हा प्रस्ताव त्वरीत मंजूर करण्यात आला आणि HCA ला त्यासाठी बजेट वाटप करण्यात आले. उप्पल येथील प्रकल्पासाठी योग्य असलेल्या जमिनीचा मोठा तुकडाही सरकारने ओळखला.
स्टेडियमच्या शीर्षकाचा खुला लिलाव झाल्यानंतर प्रकल्पासाठी बहुतेक निधी आला. विसाका इंडस्ट्रीज लिमिटेडने ₹65,00,00,000 च्या बोली किंमतीसह लिलाव जिंकला. ₹43,00,00,000 ची रक्कम आगाऊ दिली गेली आणि 2004 मध्ये स्टेडियमला “विशाखा आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम” असे नाव देण्यात आले.
2005 पर्यंत जेव्हा बहुतेक स्टेडियम बांधले गेले तेव्हा ते भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना आयोजित करण्यास तयार होते. तथापि, आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वाय.एस. राजशेखर रेड्डी (तेलंगणा वेगळे होण्यापूर्वी) यांनी भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या स्मरणार्थ स्टेडियमचे नाव बदलून राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम असे करण्याचा निर्णय घेतला.
या निर्णयानंतर, HCA ला विशाखा इंडस्ट्रीजला स्टेडियमचे नंतरचे कोणतेही नामकरण किंवा स्टेडियमशी विशाखाचे नाव जोडले जाणार नाही अशा कराराच्या कलमांनुसार कराराच्या किंमतीच्या सहा पट पैसे देणे आवश्यक होते. तथापि, HCA, सरकारच्या काही वाटाघाटीनंतर, ₹43,00,00,000 ची रक्कम, म्हणजे फक्त कराराची किंमत देऊन सुटका झाली.
टोकांना पॅव्हेलियन एंड आणि नॉर्थ एंड अशी नावे आहेत. व्हीव्हीएस लक्ष्मणच्या निवृत्तीवर, एचसीएने नॉर्थ एंडला त्यांच्या नावाने दिग्गज म्हणून सन्मानित करण्याचा निर्णय घेतला.
राजीव गांधी किसान न्याय योजना
भारतामध्ये, छत्तीसगड सरकारने सादर केलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी 5700 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती, ज्याद्वारे माजी पंतप्रधान राजीव यांच्या हुतात्मा दिनी 21 मे 2020 रोजी राजीव गांधी किसान न्याय योजना सुरू करण्यात आली होती.
जे शेतकरी राजीव गांधी किसान न्याय योजनेचे लाभार्थी आहेत छत्तीसगडमध्ये एकूण लागवडीयोग्य जमीन 46.77 लाख हेक्टर आहे. राज्याची ७०% लोकसंख्या शेतीमध्ये गुंतलेली आहे आणि सुमारे ३७.४६ लाख शेतकरी कुटुंबे आहेत. या योजनेचा उद्देश पीक उत्पादनाला प्रोत्साहन देणे आणि कृषी क्षेत्र वाढवणे हा आहे. योजनेंतर्गत 5750 कोटी रुपयांची रक्कम चार हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आली.
राज्यातील 19 लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होत आहे. योजनेच्या सुरुवातीच्या वर्षात भात, मका आणि ऊस (रब्बी) पिकांचा समावेश करण्यात आला होता. 2020-21 मध्ये कडधान्य आणि तेलबिया पिकांचाही समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. छत्तीसगड सरकारने राजीव गांधी किसान न्याय योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यातील भूमिहीन शेतमजुरांचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
या योजनेंतर्गत आगामी खरीप हंगामाच्या तयारीसाठी 17 ऑक्टोबर 2022 रोजी शेतकऱ्यांना 1745 कोटी रुपये मिळाले. राज्यातील 23.99 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये इनपुट सबसिडी म्हणून ही रक्कम थेट हस्तांतरित करण्यात आली. यामध्ये खरीप हंगामातील मुख्य पीक धान घेणारे शेतकरी, इतर खरीप पिके घेणारे, धानाच्या जागी इतर पिके घेणारे आणि झाडे लावणारे शेतकरी यांचा समावेश आहे.
योजनेचे उद्दिष्ट
राजीव गांधी किसान न्याय योजना भूपेश बघेल यांच्या नेतृत्वाखालील छत्तीसगड सरकारने छत्तीसगडमधील शेतकऱ्यांना पीक उत्पादनासाठी प्रोत्साहित करण्याच्या आणि कृषी क्षेत्रामध्ये वाढ करण्याच्या उद्देशाने सुरू केली होती. देशातील शेतकऱ्यांसाठी ही एक मोठी योजना आहे.
- शेतकऱ्यांची सुलभ आणि सोयीस्कर नोंदणी,
- विविध योजनांसाठी शेतकऱ्यांना एकदाच नोंदणी करावी लागेल.
- योजनांची अंमलबजावणी, व्यवस्थापन आणि पर्यवेक्षण सुलभता,
- अचूक आणि जलद डेटा संपादन आणि
मूळ लाभार्थीचे हित जपण्यासाठी आणि लाभार्थ्यांची दुप्पट टाळणे.
FAQ
राजीव गांधी याचा जन्म कधी झाला?
राजीव गांधी याचा जन्म २० ऑगस्ट १९४४ रोजी मुंबईच्या शिरोडकर नर्सिंग होममध्ये झाला.
राजीव गांधी याचा मृत्यू कधी झाला?
राजीव गांधी याचा मृत्यू दि. २१ मे १९९१ झाला .
राजीव गांधी यांना भारतरत्न पुरस्कार कधी मिळाला?
राजीव गांधी यांना भारतरत्न पुरस्कार दि. ७ जुलै १९९१ रोजी मिळाला .
राजीव गांधीं यांना किती मुले आहेत ?
राजीव आणि सोनिया यांना दोन मुले आहेत, मुलगा राहुल गांधी यांचा जन्म 1970 मध्ये झाला आणि मुलगी प्रियांका गांधी यांचा जन्म 1972 मध्ये झाला.
राजीव गांधींचा मृत्यू कसा झाला?
निवडणूक प्रचारासाठी राजीव गांधी दि. २१ मे १९९१ रोजी पैरुम्बुदूर नामक दक्षिणेच्या एका लहानशा गावात पोहोचले. तिथे आधीच हजर असलेल्या लिट्टेच्या आत्मघाती दलातील लोकांनी राजीव गांधींची हत्या केली. भारताच्या तरुण युवा पंतप्रधानाचा अंत झाला.