जे आर डी टाटा
पारसी वडील रतनजी (आर. डी. टाटा) व आई सुजेन ऊर्फ ‘सूनी’ (म्हणजे पारसीमध्ये ‘सोन्याने बनलेली’) यांच्या पोटी दि. २९ जुलै १९०४ रोजी जहांगीर रतनजी दादाभाई टाटा (जे आर डी टाटा) यांचा जन्म झाला, म्हणून त्यांचे प्रारंभिक जीवन अर्धे पॅरिस व अर्धे मुंबईमध्ये गेले. यांचे पूर्वज इराणमधून भारतात धर्मांधतेला कंटाळून मुसलमानी धर्म स्वीकारायचा नाही म्हणून गुजरातमध्ये नवसारीला आले. जहांगीरचे चुलते (काका) जमशेदजी नौशेरवानजी टाटा हे अत्यंत दूरदृष्टीचे होते. त्यांनीच भारतात औद्योगिक क्रांतीचा पाया घातला.
इस्पात कारखान्याच्या स्थापनेची योजना बनवून दहा वर्षांत भारतातील ब्रिटिश सरकारला पंधराशे मैल लांबीचे रेल्वे रूळ बनवून दिले. ज्यावरून ब्रिटिश सरकारने मेसोपोटामियाला सैनिक व युद्ध सामग्री पाठवली होती. याच जमशेदजींनी इ. स. १८८७ मध्ये ‘टाटा अँड सन्सची’ स्थापना केली होती. दोराबजी, नौरोजी, रतनजी हे त्यांतील भागीदार होते
असा औद्योगिक वारसा लाभलेले जहांगीर टाटा होते. इ. स. १९१४ च्या पहिल्या महायुद्धाच्या काळात त्यांच्या आई आजारी पडल्या. म्हणून हवापालटासाठी त्यांना आईबरोबर जपानच्या याकोहामा शहरात दोन वर्षांपर्यंत राहावे लागले.
तिथे जेसुईट बॉय स्कूलमध्ये ते गेले. वयाच्या पंधराव्या वर्षांपर्यंत त्यांच्या शिक्षणाची गाडी नीट सुरू झाली नव्हती. मग त्यांना पॅरिसमधल्या एका उत्तम अशा पब्लिक स्कूलमध्ये घातले. आईच्या मृत्यूनंतर इंग्लंडच्या एका शाळेत ते गेले. इंग्लंडमध्ये इंजिनिअरिंग शिकून ते भारतात परतले व टाटा उद्योगसमूहात दाखल झाले.
इ. स. १९२६ मध्ये जमशेदजींचे वडील रतनजी यांचा फ्रान्समध्ये मृत्यू झाला. या वेळी जमशेदजी जमशेदपूर येथील इस्पात कारखान्यात वेगवेगळ्या झाला. या प्रशिक्षण घेत होते. म्हणून मृत्यूच्या वेळी त्यांना भेटू शकले विभागात आता वयाच्या केवळ बाविसाव्या वर्षी ते टाटा कुटुंबाचे प्रमुख व नाहीत अँड सन्स’चे संचालक झाले. त्या वेळी खूप मोठे कर्ज कंपनीवर होते. वडिलांचे फार मोठे ऋण त्यांना फेडायचे होते. यासाठी २२ वर्षांच्या तरुण वयातच ते एक प्रौढ, विचारी, भारदस्त व्यक्तिमत्त्वाचे झाले.
वडिलांनी त्यांच्यासाठी ३०००/- रु. महिना वेतन निश्चित केले होते; त्याऐवजी त्यांनी स्वतःसाठी कंपनीची आर्थिक स्थिती बघून रु. ७५०/- वेतन स्वीकारले. कर्जफेडीसाठी मुंबईतील घर, गणेश किंड तथा हार्डलॉट (पॅरिस) येथील मालमत्ता इत्यादी स्थावर जंगम संपत्ती विकावी लागली.
दि. १५ ऑगस्ट १९३० रोजी जे. आर. डीं.चा विवाह थेली (थेलम्मा) नावाच्या युवतीशी झाला. त्याचवर्षी त्यांनी टाटा एअर लाइन्स सेवेचा शुभारंभ केला.
जे आर डी टाटा ना विमान चालविण्याची भारी हौस होती. विमान चालविण्याचे प्रशिक्षण घेऊन लायसन्स मिळविल्यानंतर त्यांनी लंडनमध्ये एक विमान खरेदी केले. परिस्थितीला खंबीरपणे तोंड देण्याची तयारी, त्वरित निर्णय घेण्याची क्षमता, एखाद्या कुशल घोडस्वाराप्रमाणे हातांची स्थिरता, संयमी स्वभाव हे सर्व गुण विमानचालकाकडे असले पाहिजेत असे जे आर डी टाटा चे मत होते. म्हणूनच त्यांनी १९ नोव्हेंबर १९२९ ला आगा खान यांनी दिलेले आव्हान स्वीकारले आणि ५०० पौंडाचा पुरस्कार मिळविला. घोषणा होती एकटी व्यक्ती, पहिल्यांदा, भारतातून इंग्लंडला वा इंग्लंडमधून भारतात विमानाने प्रवास करून येईल त्या व्यक्तीला ५०० पौंडाचे बक्षीस दिले जाणार होते. जे. आर. डीं.नी ३ मे १९३० रोजी कराचीहून विमान उडवून हा पुरस्कार मिळविला.
जे आर डी टाटा नम्रपणे कबूल करतात की, टाटा घराण्याचा विकास हे त्यांचे उद्दिष्ट आणि यामुळेच भारत एका औद्योगिक शक्तीच्या रूपाने वर आला. तसेच भारताच्या नागरी विमान सेवेच्या इतिहासावर काही प्रमाणात का असेना त्यांचा लहानसा ठसा उमटला. यामुळेच तर त्यांनी भारताच्या स्वातंत्र्य
लक्ष्यात प्रत्यक्ष भाग घेतला नाही. त्यांचे म्हणणे होते भारताला लवकरात लवकर स्वातंत्र्य मिळावे. त्यासाठी त्यांच्यावर जी महत्त्वाची जबाबदारी आहे, ती लवकरात लवकर पार पाडणे हेच देशाच्या हिताचे आहे. म्हणून जे आर डी टाटा नी सर्वांच्या सहकार्याने आणि टाटा परिवाराचे अनेक सदस्य व टाटा उद्या की। संलग्न सर्व व्यक्तींना एका कुटुंबामध्ये गुंफले.
करण्याच्या रूपातली पहिली विमानसेवा कराचीहन सुरू झाली. ते विमान स्वतःजे आर डी टाटा नी उडवले. त्या वेळी अनेक अडचणी, अडथळे पार करून, धैर्याने परिस्थिती नी तोंड देऊन विमानोड्डाण करावे लागे. त्यात मिळकतही फार कमी होती.
टाटा एअर लाइन्सची सुरुवात इ. स. १९३३ मध्ये झाली. या वेळी प्रवासी वाहतूक सुरू झाली होती. त्यामुळे मिळकतीमध्ये काही प्रमाणात वाढ झाली. इतर कंपन्यांच्या तुलनेत विमान कंपनीकडून फायदा होत नव्हता. तरीही भविष्यातील विमानयुगाचा विचार करून जे आर डी टाटा नी त्या दिशेने विमानसेवेत अनेक सुधारणा केल्या. उदा. हवाई परिचारकांच्या जागी त्यांनी हवाईसुंदरींची नेमणूक सुरू केली. एअर इंडियाचा प्रारंभ इ. स. १९४८ मध्ये झाला.जे आर डी टाटा त्याचे अध्यक्ष होते. त्यानंतर विमान सेवेमध्ये खूपच विस्तार झाला.
जे. आर. डी.ना तीन वेळा ‘टाटा सन्स’चे अध्यक्ष निवडले गेले. त्या वेळेपर्यंत टाटा उद्योगात इस्पात, विमानसेवा, वीज उत्पादन, विमा कंपनी, सिमेंट, तेल, साबण, कापड उद्योग हे सर्व उद्योग सामील झाले होते. जे. आर. डीं.च्या मते, भारताला जास्त आवश्यकता असलेले देशहिताचे उद्योग टाटा उद्योगात समाविष्ट होतील. त्यापासून किती लाभ होतो हे पाहून नव्हे. सर्व उत्पादनांचा स्तर सारख्याच उच्च प्रमाणात ठेवण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असे.
जानेवारी १९४४ मध्ये भारताच्या आर्थिक विकासाच्या योजनेचा एक दस्तऐवज प्रकाशित झाला. ही योजना ‘टाटा-बिर्ला अथवा मुंबई योजना’ म्हणून ओळखली जाते. यात इतर विशेषज्ञांबरोबरच जे. आर. डी.चा सर्वाधिक महत्त्वपूर्ण भाग होता.
विदेश भ्रमणासाठी जर्मनीला गेलेल्या भारतीय सदस्यांत जे. आर. डी. एक होते. १९६२ च्या चीन व १९६५ च्या पाकिस्तान बरोबरच्या युद्धाच्या वेळी सर्व प्रकारचे सहकार्य भारतातील उद्योगपतींतर्फे देण्याचा प्रस्ताव जे. आर. डॉ.नी भारत सरकारला दिला. तसेच राष्ट्रीय आपत्तीच्या वेळी ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय कोषाची’ स्थापना करण्याचा सल्ला पं. नेहरूंना दिला.
जे आर डी टाटा ना अनेक पुरस्कार, सन्मान व अधिकारपदे दिली गेली. भारत सरकारने १९५४ मध्ये पद्मविभूषण उपाधी दिली. तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राधाकृष्णन् यांनी ‘एअर कमोडोर’ या मानद पदावर नियुक्त केले. इ. स. १९७८ मध्ये आंतरराष्ट्रीय नागरिक उड्डयन संस्थेने ‘एडवर्ड बार्नर’ सन्मान दिला. इ. स. १९८८ मध्ये वैशिष्ट्यपूर्ण वायुयान सेवेमध्ये ‘गुगल हेईम मेडल’ आणि १९८९ मध्ये मानवसेवेसाठी ‘दादाभाई नौरोजी’ सन्मान दिला. स्कीइंगमध्ये दक्षतेसाठी दुसरा सर्वोच्च सन्मान ‘केंवायसब्रांज’ प्रदान केला. देशाच्या कुटुंब नियोजनाला प्रोत्साहन दिले. म्हणून सप्टेंबर १९९२ मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या ‘पॉप्युलेश अॅवॉर्डसाठी’ निवड झाली. १९५१ मध्येच पं. नेहरूंना त्यांनी भारतातील कुटुंब नियोजनासाठी योजना राबविण्याचा सल्ला दिला होता. पण पं. नेहरू मात्र जास्त लोकसंख्या म्हणजे शक्तिशाली राष्ट्र मानत होते. २६ जानेवारी १९९२ रोजी तत्कालीन राष्ट्रपती श्री. आर. वेंकटरमण यांनी जहांगीर रतनजी दादाभाई टाटा यांना ‘भारतरत्न’ उपाधीने विभूषित केले.
जे. आर. डीं.ना आपण भारतीय असण्याबरोबरच पारशी आहोत याचा अभिमान होता. धर्मांधता निर्माण करणाऱ्या धार्मिक समजुती, धर्म-पुरोहितांवर त्यांचा विश्वास नव्हता. अरविंद आश्रमावर स्नेह होता. पण धार्मिक सभा बोलावण्यापेक्षा कठोर परिश्रमांवर त्यांचा जास्त विश्वास होता. श्रमपरिहारासाठी दरवर्षी जे. आर. डी. स्वित्झर्लंडला जात असत. तसेच १९९३ मध्येही गेले.
२९ नोव्हेंबर १९९३ रोजी जहांगीर रतनजी दादाभाई टाटा म्हणजेच जे. आर. डी. टाटा हे तहहयात प्रयत्नांनी झगडणारे कर्मठ उद्योगपती, अखेरचे गाढ निद्राधीन झाले. त्यांचा मृत्यू भारत सरकारने राष्ट्रीय शोक दिवस म्हणून घोषित केला.