भगवद्गीता मराठी सारांश साध्या व सोप्या भाषात सांगण्यात आली आहे
Table of Contents
Toggle।। अध्याय पहिला ।। (अर्जुन विषादयोग)
या महायुद्धात कोणकोणत्या वीरांशी मला युद्ध करावयाचे आहे हे पाहून समजून घेता यावे म्हणून दोन्ही सैन्यांमध्ये रथ उभा करण्याची आज्ञा अर्जुनाने श्रीकृष्णाला केली. श्रीकृष्णाने रथ दोन्ही सैन्यांच्या मध्ये भीष्म, द्रोण व इतर महारथींच्या समोर उभा केला.
कौरव सैन्याची रचना गरुड पक्ष्याच्या शरीराच्या आकाराची होती. पांडव सैन्याची रचना चक्रव्यूहामध्ये होती. अर्जुनाने शत्रू सैन्यामध्ये आपले सर्व नातेवाईक व नातलग, कुटुंबातील प्रिय व्यक्ती, आप्तेष्ट, भाऊ, चुलतभाऊ, गुरू, आजोबा, मित्र, ओळखीचे पाहिले. या दृश्यामुळे त्याच्या मनात दयेचा आणि करुणेचा पूरच लोटला. सर्व अवयव गलित झाले आहेत.
तोंडाला कोरड पडली आहे शरीराला कप सुटला आहे. अंगावर रोमांच उभे राहिले आहेत. गाडीव धनुष्य गळून पडत आहे. अशी चिंताग्रस्त मनोव्याधी अर्जुनाला झाली होती. अर्जुन म्हणतो की, युद्ध करण्यापेक्षा भीक मागून पोट भरणे मला आवडेल, असे म्हणून अर्जुन शस्त्रास्त्रे टाकून खाली बसला. भगवंत आपणास काहीच का मार्गदर्शन करीत नाहीत अशी क्षणभर शंका अर्जुनाच्या मनात आली असावी.
अर्जुनाचे शारीरिक बल चागले आहे; पण मानसिक बल खचले आहे. याला आत्मज्ञानाचा उपदेश करणे हितावह होईल, असे भगवंतांनी मनोमन जाणले. पहिला अध्याय म्हणजे महाभारत व गीतोपदेश यांना जोडणारा दुवा आहे.
(भगवद्गीता मराठी सारांश मध्ये थोडक्यात माहिती दिली आहे. शोल्क व अर्थ यांची माहिती थोड्या दिवसात प्रकाशित होईल )
।। अध्याय दुसरा ।। (सांख्ययोग)
सांख्य म्हणजे उपयुक्त बुद्धी सांख्ययोग हा बुद्धियोग आहे अर्जुनाच्या विषादामागील भूमिका उदात्त होती त्यामुळे तो विषादही विषादयोग झाला. स्वधर्माचरण करण्यासाठी निश्चयात्मक बुद्धी लागते आत्मतत्त्व जाणण्यासाठी ज्ञानयुक्त बुद्धी लागते, तर कर्मयोग आचरण्यासाठी बुद्धियुक्त ज्ञान लागते अशी सांख्यबुद्धी अर्जुनाची व्हावी म्हणून भगवंतांनी सांख्ययोग सांगितला सांख्ययोगात भगवतानी तीन महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या पहिले म्हणजे स्वधर्माचरण किंवा स्वकर्माचरण समत्व बुद्धीने स्वधर्माचरण करावे, असे भगवत म्हणतात दुसरे म्हणजे आत्मा अमर आहे.
आत्मा अज आहे, नित्य आहे, शाश्वत आहे, पुराण आहे, स्थायू आहे. शरीर गेले तरी आत्मा राहतोच, मग काळजी करण्याचे कारण नाही तिसरी गोष्ट फलत्यागाची होय कर्म करताना फलाशा नको म्हणजे अहकार राहत नाही ज्ञानयोगाचे ब्रह्म निर्गुण निराकार आहे, तर कर्मर्यागाचे ब्रह्म सगुण निराकार आहे स्थितप्रज्ञाची ब्रह्माची व्याख्या सगुण साकार आहे या तिन्हींचा समन्वय म्हणजेच मोक्ष, खरेखुरे ब्रह्म होय .
(भगवद्गीता मराठी सारांश मध्ये थोडक्यात माहिती दिली आहे. शोल्क व अर्थ यांची माहिती थोड्या दिवसात प्रकाशित होईल )
।। अध्याय तिसरा ।। (कर्मयोग)
तिसऱ्या अध्यायात भगवतानी निष्काम कर्मयोगाची थोरवी सांगितली आहे कर्मनिष्ठा निर्माण झाल्याशिवाय ज्ञान नाही, चित्तशुद्धी नाही, इद्रिय सयमन नाही, मन- बुद्धीचे स्थैर्य नाही, निदिध्यास नाही, आत्मसाक्षात्कार नाही, म्हणजेच मोक्ष नाही
कोणताही मनुष्य कर्माशिवाय क्षणमात्र राहू शकत नाही मानवाने नित्य-नैमित्तिक कर्मे करावीत काम्य-निषिद्ध कर्मे टाळावीत स्वकर्म म्हणजे यज्ञकर्म होय स्वकर्म निष्कामपणे आचरले की, ते स्वधर्मात पालटते स्वधर्म आचरण्यात प्रमुख अडथळे म्हणजे काम व क्रोध होय क्रोध कामावाटे जन्मतो म्हणून काम जिंकावा आणि निष्काम कर्म करावे कर्म कसे आचरावे, स्वकर्म स्वधर्मात कसे पालटावे, याचे रहस्य या अध्यायात सांगितले आहे म्हणून याचे नाव, कर्मयोग असे आहे.
काम-क्रोधाचे वसतिस्थान जी इंद्रिये त्याना जिंकून निष्काम कर्म केले तर ते स्वकर्म होते असे स्वकर्म म्हणजेच स्वधर्म होय यालाच निष्काम कर्मयोग असे म्हणतात.
(भगवद्गीता मराठी सारांश मध्ये थोडक्यात माहिती दिली आहे. शोल्क व अर्थ यांची माहिती थोड्या दिवसात प्रकाशित होईल )
।। अध्याय चौथा ।। (ज्ञानकर्म संन्यासयोग)
कर्माला ज्ञानाचे अधिष्ठान व त्यातून निष्काम कर्मसिद्धी असा क्रम असल्यामुळे या अध्यायाला ज्ञानकर्म सन्यासयोग असे नाव आहे याला भगवतानी अव्यय, असे म्हटले आहे, कारण वेदच याला अधिष्ठान आहेत.
कर्माला गुणवत्तेचे अधिष्ठान लागते कर्म (विहित कर्म), विकर्म (निषिद्ध कर्म), अकर्म (नैष्कर्म्य सिद्धी) याचे विवेचन ज्ञानोबानी केले आहे. हे एकदा समजले की, प्रत्येक कर्म हे यज्ञासारखे पवित्र होते यासाठी श्रेष्ठ सद्गुण अगी धारण करावे लागतात. यासाठी विविध उपासना कराव्या लागतात. प्रत्येक कर्म शेवटी ज्ञानातच पालटते आत्मज्ञान मिळविण्यासाठी शरणागती, श्रद्धा, सेवा इ करावे लागते.
कर्माला ज्ञानाचे डोळे लागले की, मानवाचे विहित कर्म कर्मसंन्यासात म्हणजे निष्काम कर्मात पालटते. फलाशा सोडली की, मग निष्काम कर्माद्वारे चित्तशुद्धी, आत्मज्ञान, परमसुखदायी असे ब्रह्म व मोक्षप्राप्ती होते. विनोबांनी या अध्यायाला कर्मयोग-सहकारी-साधना असे नाव दिले आहे, तर ज्ञानेश्वर महाराज याला ब्रह्मार्पणयोग असे म्हणतात.
(भगवद्गीता मराठी सारांश मध्ये थोडक्यात माहिती दिली आहे. शोल्क व अर्थ यांची माहिती थोड्या दिवसात प्रकाशित होईल )
।। अध्याय पाचवा ।। (कर्मसंन्यासयोग)
ज्ञान श्रेष्ठ की कर्म श्रेष्ठ असा प्रश्न अर्जुनास पडला. कर्मसंन्यास म्हणजे कर्माचा संन्यास नव्हे, तर कर्मातील आसक्तीचा व अहंकाराचा संन्यास होय. कर्म करावेच लागते. कर्मातून सुटका नाही. ती कमनिच होते. माणूस मात्र कर्मबंधनात अडकत जातो. अर्जुनाला युद्धासाठी कर्मसंन्यासापेक्षा कर्मयोगच महत्त्वाचा होता. कर्मयोग म्हणजे निष्काम कर्मयोग. तथापि, दोन्ही मार्गांचे फळ एकच म्हणजे मोक्षच असते.
निष्काम कर्मयोगी आसक्ती व संग टाकून चित्तशुद्धीसाठी कर्मे करतो. अशा महात्म्याला आत्मज्ञान होऊन ब्रह्मस्थिती येते. त्यामुळे तो मोक्षास पात्र होतो. प्रत्येक कर्म संन्यासातच म्हणजे अनासक्ती व निष्काम कर्मयोगात पालटते म्हणून या योगाला कर्मसंन्यासयोग असे सार्थ नाव आहे. श्री ज्ञानेश्वर महाराज याला योगगर्भयोग असे म्हणतात, तर विनोबाजी योग आणि संन्यास असे म्हणतात. प्रपंचातली आसक्ती कमी करून मन निःसंग करणे ‘मी’ व ‘माझे’ हे संकल्प नाहीसे होणे म्हणजे कर्मसंन्यासी होणे होय.
(भगवद्गीता मराठी सारांश मध्ये थोडक्यात माहिती दिली आहे. शोल्क व अर्थ यांची माहिती थोड्या दिवसात प्रकाशित होईल )
।। अध्याय सहावा ।। (आत्मसंयमयोग)
सन्यास व योग यात भेद नाही. दोन्हीला मनोविजय व चित्तशुद्धी लागतेच आत्मोद्धारासाठी आपणच आपला उद्धार करावा, कारण आपणच आपले शत्रू व मित्र असतो. यासाठी आत्मसंयम हीच खरी कसोटी आहे. अभ्यास आणि वैराम्य यानी मनाला जिंकता येते, असे भगवत म्हणतात.
योगारूढता आत्मसंयमाने लाभते या मार्गाचा अवलंब प्रवृत्तीत होतो व शेवट निवृत्तीत होतो. यासाठी इंद्रियनिग्रह हवा. इंद्रियनिग्रह म्हणजे आसक्ती टाकून इंद्रियांचे नियमन करणे. त्याने मन ताब्यात येते, अतर्मुख बनते व आपले मूळचे चैतन्यस्वरूप दिसते. मग दुःखादी भावनाच येत नाहीत.
श्री ज्ञानेश्वर महाराज या अध्यायाला अभ्यासयोग किंवा ध्यानयोग असे सबोधतात, तर विनोबाजी यास चित्तवृत्तीनिरोध असे म्हणतात. नावे भिन्न असली तरी मनाला जिंकणे हेच खरे मर्म या अध्यायात सांगून श्रेष्ठ योगी होणे महत्त्वाचे आहे असे सर्वजण सांगतात.
(भगवद्गीता मराठी सारांश मध्ये थोडक्यात माहिती दिली आहे. शोल्क व अर्थ यांची माहिती थोड्या दिवसात प्रकाशित होईल )
।। अध्याय सातवा ।। (ज्ञानविज्ञानयोग)
परमात्म्याची दोन रूपे आहेत. निर्गुण व सगुण. भगवंताचे जे व्यक्त रूप ते विश्व होय. त्यालाच अपरा प्रकृती म्हणतात. ती जड आहे, त्यामागील जे आत्मस्वरूप चैतन्य त्याला परा प्रकृती म्हणतात. यालाच विज्ञान (अपरा प्रकृती) व ज्ञान (परा प्रकृती) म्हणतात.
या अध्यायात भगवंतांनी चौदा रूपे सांगितली आहेत. ती सर्व रूपे व मायारूप प्रकृतीचे त्रिगुण (सत्त्व, रज, तम) परमात्मस्वरुपातूनच निर्माण होतात. ती माया तरून जाता येते; पण प्रापंचिक लोक मायेतच रमतात. पण, आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी व ज्ञानी भगवत्कृपा लाभावी म्हणून प्रयत्न करतात. ज्ञानी हा सर्वश्रेष्ठ होय.
ज्ञान आणि विज्ञान (अव्यक्त, व्यक्त) ही दोन्हीही भगवंताचीच रूपे आहेत हे आत्मज्ञानी जाणतो. प्रपंच म्हणजे विज्ञान. तो सत्य समजणे हे अज्ञान. जाणिवेचा शिरकाव नाही ते ज्ञान. ज्ञानी भक्ताला वैराग्य, सत्संगत, गुरुकृपा, निष्काम कर्म नाभले की, ब्रह्मप्राप्ती होते.
(भगवद्गीता मराठी सारांश मध्ये थोडक्यात माहिती दिली आहे. शोल्क व अर्थ यांची माहिती थोड्या दिवसात प्रकाशित होईल )
।। अध्याय आठवा ।। (अक्षरब्रह्मयोग)
ब्रह्म, अध्यात्म, कर्म, अधिभूत, अधिदैव, अधियज्ञ या सहा संज्ञांचा परामर्श या अध्यायात आहे.
परम अक्षर अविनाशी परमात्मा हेच ब्रह्म ब्रह्माच्या स्थितीला अध्यात्म म्हणतात. भूतांच्या भावांना निर्माण करणारा शास्त्रविहित त्याग (यज्ञ, दान, होम) तेच कर्म होय. नाशवंत वस्तू म्हणजे अधिभूत पुरुष किंवा हिरण्यगर्भ हेच अधिदैव, तर देहात ईश्वर रूपाने राहणारा तोच अधियज्ञ होय
जो अंतकाळी परमात्म्याचे चिंतन करतो, तोच ईश्वरार्पण होतो. परब्रह्म परमात्म्याचे स्वरूप एकाक्षरी ओंकाराचे आहे, अविनाशी आहे, हे जाणून जो जिवतपणी ईश्वराचे चिंतन करतो, श्रद्धेने करतो, निष्काम कर्माने करतो, तोच फक्त मोक्ष किंवा परमपद प्राप्त करतो हे परमपद अक्षर, एकरस, अखड, अविनाशी ब्रह्माचे असल्यामुळे याला अक्षरब्रह्मयोग असे म्हणतात ज्ञानोबामाऊली याला ‘ब्रह्माक्षर निर्देशयोग’ असेही म्हणतात विनोबाजी याला ‘सातत्ययोग’ असे सबोधतात.
(भगवद्गीता मराठी सारांश मध्ये थोडक्यात माहिती दिली आहे. शोल्क व अर्थ यांची माहिती थोड्या दिवसात प्रकाशित होईल )
।। अध्याय नववा ।। (राजविद्याराजगुह्य योग)
राजाविद्या म्हणजे आत्मविद्या, आत्मज्ञान होय राजगुह्य म्हणजे गुह्यातील गुह्य असे गुह्यतम. राजविद्या ही राजगुह्य आहे म्हणजे आत्मविद्या ही सर्वश्रेष्ठ अशी विद्या असून ती गुह्यतम आहे ती अत्यत पवित्र, सर्वोत्तम, धर्मयुक्त, अविनाशी व मोक्षाचे साधन आहे. ती सुखकर व फलदायी आहे. मोक्ष मिळवून देणारी आहे.
परमात्मा हा सर्व सृष्टीचा अधिष्ठाता आहे. त्याला कर्मबधन नाही. तो चैतन्यरूप आहे. जे सकाम भक्ती करतात ते पुण्यक्षय झाला की, जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकतात. जे निष्काम भक्ती करतात त्याना मोक्षप्राप्ती होते. त्यानी दिलेले पत्र, पुष्प, जल, फल भगवंत स्वीकारतात. अशा ज्ञानी भक्ताची सर्व कर्मे ईश्वरार्पण होतात मन ईश्वररूप करणे, त्याचे गुणसंकीर्तन करणे, प्रेम विव्हळ होणे, नमस्कार करणे हीच राजविद्या होय. अशी गुह्यतम राजविद्या या अध्यायात आली आहे. विनोबाजी याला समर्पणयोग असे म्हणतात.
(भगवद्गीता मराठी सारांश मध्ये थोडक्यात माहिती दिली आहे. शोल्क व अर्थ यांची माहिती थोड्या दिवसात प्रकाशित होईल )
।। अध्याय दहावा ।। (विभूती योग)
अध्यायापासून भगवद्गीतेचे उत्तरकांड सुरू होते. या दहाव्या अध्यायात भगवंतांच्या विभूतींचे वर्णन आहे.
विभूती म्हणजे माहात्म्य, भव्यता, ऐश्वर्य, अलौकिक शक्ती होय. खरे म्हणज भगवंताच्या अशा विभूतींनीच सर्व विश्व व्यापले आहे. भगवंतामुळेच सर्व उत्पत्ती, स्थिती व लय होत आहेत.
गीतार्थ सांगताना भगवंतांनी ७ व्या अध्यायात १७ विभूती, ९ व्या अध्यायात ३७ विभूती, १० व्या अध्यायात १२६ विभूती, १५ व्या अध्यायात १३ विभूती अशा एकूण १९३ विभूती सांगितल्या आहेत. माझ्या विभूतींना अत नाही, असे भगवत अर्जुनास सांगतात. जी वस्तू ऐश्वर्य, तेज, शक्ती आणि सत्त्व यांनी युक्त आहे ती भगवंताचीच विभूती होय. अशा अनंत विभूती भगवताच्या योगमात्रेच्या एका अशमात्राने सर्व जगताला धारण करून स्थित आहेत. ईश्वराचे ऐश्वर्य या अध्यायात समजते
पराशर मुनी म्हणतात की, बल, यश, संपत्ती, ज्ञान, सौंदर्य आणि वैराग्य या ऐश्वार्यांनी परिपूर्ण जो पुरुषोत्तम आहे त्याला भगवत म्हणावे. भगवंत सर्वांचे आदिकारण असल्यामुळे भगवताची उत्पत्ती व अवतार साधू, संत, ऋषी, महर्षी, देव-देवता यापैकी कोणीही जाणू शकत नाही. भगवंत सर्व जगाच्या उत्पत्तीचे कारण आहेत. ब्रह्मदेव, शिव, दोन अश्विनीकुमार, चार सनकादिक मुनी, सप्तर्षी, अष्ट वासू, अकरा रुद्र, बारा आदित्य, चौदा मनू, देव-देवता, मानव, दानव अशाप्रकारे सृष्टीतील जीवाची उत्पत्ती झाली.
(भगवद्गीता मराठी सारांश मध्ये थोडक्यात माहिती दिली आहे. शोल्क व अर्थ यांची माहिती थोड्या दिवसात प्रकाशित होईल )
।। अध्याय अकरावा ।। (विश्वरुपदर्शन योग)
केवळ एका अशाने प्रकट झालेल्या भगवंताच्या अनंत विभूती जाणून अर्जुन चकित झाला. भगवंतानी आपल्या अविनाशी विराट स्वरूपाचे दर्शन द्यावे म्हणून अर्जुनाने प्रार्थना केली. अर्जुनास विराट रूप साध्या डोळ्यांनी दिसले नसते म्हणून भगवंतांनी अर्जुनास दिव्यदृष्टी दिली.
तशीच दिव्यदृष्टी संजयास श्री व्यास महर्षीनी दिली. त्यामुळे विराट स्वरूपाचे दर्शन संजयाने धृतराष्ट्रास केले. विश्वरूप म्हणजेच विराट स्वरूप होय.
(भगवद्गीता मराठी सारांश मध्ये थोडक्यात माहिती दिली आहे. शोल्क व अर्थ यांची माहिती थोड्या दिवसात प्रकाशित होईल )
।। अध्याय बारावा ।। (भक्तियोग)
भक्तियोगी हे व्यक्ताची, तर ज्ञानयोगी हे अव्यक्ताची उपासना करतात. सगुण साकाराची उपासना करणारा योगी सर्वोत्तम होय, कारण अव्यक्ताची उपासना क्लेशदायक असते; कारण त्याचा देहाभिमान पूर्णत गेलेला नसतो. सगुणाची उपासना जे अत्यंत अनन्यभावाने करतात त्याचा उद्धार भगवत लगेच करतात.
अभ्यासाहून परोक्ष ज्ञान श्रेष्ठ. परोक्ष ज्ञानाहून ईश्वरध्यान श्रेष्ठ. ईश्वरध्यानाहून कर्मफलत्याग श्रेष्ठ आहे, असे भगवंत म्हणतात. ज्ञानोबांनी भक्तोत्तमाची श्रेष्ठ ३९ लक्षणे सांगितली आहेत. त्याचे गुणसंकीर्तन म्हणजे भक्तांना मिळालेला सुखानंदच आहे. असे भक्त अनन्य भक्तीने ईश्वराचे लाडके होतात. जो अंतर्बाह्य शुद्ध, चतुर, तटस्थ आणि दु खमुक्त आहे, असा कर्तृत्वाचा अभिमान न बाळगणारा माझा भक्त मला प्रिय आहे, असे भगवंत म्हणतात. ज्ञानयोग अव्यक्ताची उपासना करतात.
अव्यक्ताची उपासना क्लेशदायक असते. कारण त्याचा देहाभिमान पूर्णत. गेलेला नसतो. मर्म न जाणता केलेल्या ज्ञानयोगापेक्ष् भक्तियोग श्रेष्ठ. ज्ञानाचे डोळे व भक्तीचे हृदय असेल तर मोक्ष काही दूर नाह असे भगवंत म्हणतात. भाक्तियोगात घेणेही सुखाचे व देणेही सुखाचे अस ज्ञानकांड व भक्तिकांड यांना जोडणारा हा अध्याय आहे. भक्तियोग म्हण भगवंताची प्रेममय सेवाच होय.
(भगवद्गीता मराठी सारांश मध्ये थोडक्यात माहिती दिली आहे. शोल्क व अर्थ यांची माहिती थोड्या दिवसात प्रकाशित होईल )
।। अध्याय तेरावा ।। (क्षेत्र क्षेत्रज्ञ विभागयोग)
क्षेत्र म्हणजे देह वा प्रकृती होय. तो जड, विकारी, नाशवंत व क्षणभंगुर आहे. क्षेत्रज्ञ म्हणजे आत्मा यो नित्य, निर्गुण व अविनाशी आहे. या दोन्हींचे स्वतंत्र रूप विभाग करून सांगितले आहे.
श्री ज्ञानदेव या अध्यायास ‘प्रकृतिपुरुष विवेकयोग’ असे म्हणतात. हे शरीर पंचमहाभूते, पंचज्ञानेंद्रिये, पंचकर्मेंद्रिये, पंचविषय, त्रिगुण, बुद्धी, अहंकार, मन, इच्छा, सुख, दुःख, द्वेष, चेतना, पिंड, धृती, अव्यक्त, श्रुती व संघात या ३६ तत्वांनी तयार होते. या शरीरात पापपुण्य निर्माण होते म्हणून यास क्षेत्र म्हणतात. ज्ञानाची अठरा लक्षणे भगवंतांनी या अध्यायात सांगितली आहेत.
पुरुष हा अभोक्ता, अकर्ता असला तरी गुणमयी प्रकृती त्याला संसार करायला लावते व जग निर्माण होते. सर्व भिन्न पदार्थ एकाच अविनाशी वस्तूपासून तयार झाले आहेत. परा व अपरा प्रकृती, क्षर व अक्षर यांचे ज्ञान होणे महत्त्वाचे आहे म्हणूनच या अध्यायाची योजना केली आहे.
(भगवद्गीता मराठी सारांश मध्ये थोडक्यात माहिती दिली आहे. शोल्क व अर्थ यांची माहिती थोड्या दिवसात प्रकाशित होईल )
।। अध्याय चौदावा ।। (गुणत्रय विभागयोग)
त्रिगुणात्मक प्रकृतीचे सत्त्व-रज-तम हे गुण अविनाशी आत्म्याला शरीरात बाधून ठेवतात. सत्त्वगुण प्रकाशमय आहे. तो विकाररहित आहे. तो जीवात्म्याला ज्ञानाभिमानाने बाधतो. सत्त्व म्हणजे सुख देहात चेतना व जीवशक्ती सत्त्वाने वाढते. स्वर्ग लाभतो. ज्ञान प्राप्त होते.
सत्त्वगुण उत्तम असतो रजोगुण आणि तमोगुण यांना दडपून सत्त्वगुण वाढतो. ज्यावेळी देहात चैतन्य आणि विवेकशक्ती उत्पन्न होते, त्यावेळी सत्त्वगुण वाढतो. जेव्हा मनुष्य सत्त्वगुण वाढला असता मरण पावतो, तेव्हा तो स्वर्गलोकात जातो.
रजोगुण कामना व आसक्तिमय आहे. तो जीवात्म्याला कर्म व कर्मफलाने बांधतो. रज म्हणजे कर्म. त्याने लोभ, लालसा व अशांती वाढते. जन्मबंधन वाढते. दुःख प्राप्त होते. तो रागमय आहे. रजोगुण मध्यम असतो. सत्वगुण आणि तमोगुण यांना दडपून रजोगुण वाढतो. ज्यावेळी देहात लोभ,अशांती आणि विषयभोगांची लालसा उत्पन्न होते, त्यावेळी रजोगुण वाढतो. रजोगुण वाढला असता एखादा मनुष्य मरण पावल्यास तो पुन्हा मनुष्य लोकात जन्मतो
तमोगुण म्हणजे अज्ञान होय. तो जीवात्म्याला प्रमाद, आळस व निद्रेने बांधतो. तम म्हणजे अज्ञान. त्याने प्रमाद-मोह वाढतात. तो देहाभिमान वाढवतो. तो आळशी व निद्रामय आहे. त्याने कनिष्ठ योनी लाभते. अज्ञान प्राप्त होते. तमोगुण अत्यंत वाईट असतो. सत्त्वगुण आणि रजोगुण यांना दडपून तमोगुण वाढतो. तमोगुण वाढला असता एखादा माणूस मरण पावल्यास तो किडा, पशू, पक्षी इ. नीच योनीत जन्मतो. जो त्रिगुणातीत होतो त्यालाच मोक्ष मिळतो. त्याला पुनर्जन्म नाही.
(भगवद्गीता मराठी सारांश मध्ये थोडक्यात माहिती दिली आहे. शोल्क व अर्थ यांची माहिती थोड्या दिवसात प्रकाशित होईल )
।। अध्याय पंधरावा ।। (पुरुषोत्तम योग)
हा अध्याय ज्ञानकांडाचा व महत्त्वाचा अध्याय आहे. पुरुषोत्तम म्हणजे परमात्मा. परमात्म्याला म्हणजेच पुरुषोत्तमाला जाणणे हेच ज्ञान किंवा गुह्यतम पारमार्थिक रहस्य होय. म्हणून हा पुरुषोत्तम योग
अवघी प्रकृती व दृश्य सृष्टी म्हणजे संसाररूपी अश्वत्थ वृक्ष होय. अश्वत्थ वृक्ष म्हणजे पिंपळाचे झाड. अश्वत्थ वृक्ष हा उलटा आहे. म्हणजे मुळे वर व शाखा खाली आहेत. मायेच्या त्रिगुणात्मक पाण्याने हा वृक्ष वाढला आहे. याचे मूळ परमात्मा व पाने वेद आहेत. विविध योनी या शाखा आहेत. अश्वत्थ वृक्षाला वैराग्याच्या शस्त्राने छेदता येते व परमात्म्याचे मूळ शोधता येते. मान-मोह टाकावे लागतात. आसक्ती-द्वंद्व नाहीसे करावे लागते. आपले आत्मस्वरूप शोधले पाहिजे.
अज्ञानामुळे जीवात्मा पंचेंद्रिये व मन यांना अधिष्ठान करून विषयाचे सेवन करतात. आत्मा हा स्वतंत्र आहे हे ज्ञानाने समजते. परमात्मा सर्व चराचराला व्यापून राहिला आहे. क्षर व अक्षर हे दोन पुरुष आहेत. देह हा क्षर, तर आत्मा व परमात्मा हे अक्षर आहेत. ही अनुभूती म्हणजे ज्ञानावस्था होय.
भगवंताच्या शक्तीमुळेच ग्रह, तारे, नक्षत्रे अंतरिक्षात तरंगत राहू शकतात. या शक्तीमुळेच सर्व भूते धारण केली जातात. भगवंत चंद्राचे रूप धारण करून सर्व वनस्पतींचे पोषण करतात. भगवंतच प्राणवायू व अपानवायू आहेत. जीव चर्व्य, चोष्य, लेह्य व पेय अशा चार प्रकारचे अन्न खातो. अन्न पचविणारी शक्ती भगवंत आहेत.
(भगवद्गीता मराठी सारांश मध्ये थोडक्यात माहिती दिली आहे. शोल्क व अर्थ यांची माहिती थोड्या दिवसात प्रकाशित होईल )
।। अध्याय सोळावा ।। (दैवासुरसंपद्विभाग योग)
भगवद्गीता अध्याय सोळावा मध्ये संगितले आहे की या जगात मनुष्य समुदाय दोन प्रकारचे आहेत. एक दैवी प्रकृतीचे आणि दुसरे आसुरी प्रकृतीचे. दैवी व आसुरी संपत्तीविषयी हा अध्याय आहे.
सव्वीस सद्गुण म्हणजे दैवी संपत्ती होय (निर्भयता, सत्त्वशुद्धी, दान, इंद्रियदमन, यज्ञकर्म, वेदाध्ययन, तपस्या, साधेपणा, अहिंसा, सत्य, त्याग इ) दैवी संपत्ती आत्मसात केली की, मोक्ष प्राप्त होतो आत्मकल्याणासाठी दैवी संपत्ती उपयोगी पडते. भगवंत अर्जुनाला म्हणतात की, तू शोक करू नकोस. तू दैवी संपदा घेऊन जन्मला आहेस.
आसुरी संपत्तीची लक्षणे थोडी असली तरी महाभयंकर आहेत (ढोंग, घमेंड, अभिमान, राग, कठोरपणा आणि अज्ञान इ.) आसुरी स्वभावी लोकच्या ठिकाणी अंतर्बाह्य शुद्धी नसते, उत्तम आचरण नसते आणि सत्य भाषणही नसते त्यामुळे हे लोक जन्म-मृत्यूच्या फेऱ्यात पडतात. काम-क्रोध-लोभ य नरकाच्या द्वारातून ते आत जातात व दुःख भोगतात. या अध्यायात दैवी संपत्ती प्राप्त करावी हे सांगितले आहे.
(भगवद्गीता मराठी सारांश मध्ये थोडक्यात माहिती दिली आहे. शोल्क व अर्थ यांची माहिती थोड्या दिवसात प्रकाशित होईल )
।। अध्याय सतरावा ।। (श्रद्धात्रयविभाग योग)
श्रद्धा तीन प्रकारची असते. सात्त्विक, राजस व तामस पूर्वसस्कारानुसार ज्याचे जसे अत करण होते, तशी त्याची श्रद्धा असते. प्रत्येक पुरुष श्रद्धावान असतो यज्ञ (कर्म), तप (अध्ययन), दान (त्याग) या सर्वांचे अधिष्ठान श्रद्धा आहे.
सात्त्विक माणसे देवाची पूजा करतात. सात्त्विक श्रद्धा निर्माण होण्यासाठी सत्त्वयुक्त आहार, यज्ञ, तप, दान केले पाहिजे कायिक, वाचिक व मानसिक या तिन्ही प्रकारच्या तपाला सात्त्विक तप म्हणतात. कर्तव्य या भावनेने जे दान उपकार न करणाऱ्याला दिले जाते, ते दान सात्त्विक होय.
राजस माणसे यक्ष-राक्षसाची पूजा करतात. कडू, आंबट, खारट, फार गरम, तिखट, कोरडे, भोजन राजस असते. दिखाव्यासाठी फलाशेने केलेला यज्ञ राजस असतो. जे तप सत्कार, मान, स्वार्थासाठी केले जाते, ते राजस तप होय. जे दान क्लेशपूर्वक, प्रत्युपकाराच्या हेतूने व फलाशेने दिले जाते, ते दान राजस होय.
तामस माणसे प्रेत व भूतगणांची पूजा करतात. कच्चे, रस नसलेले, दुगंध येणारे, शिळे, उहे भोजन तामस असते. शास्त्राला सोडून, अन्नदान व करता, मंत्राशिवाय, दक्षिणा न देता व श्रद्धा न ठेवता केल्या जाणा-या यज्ञाला तामस यज्ञ असे म्हणतात, जे तप हट्टाने, मन, वाणी आणि शरीर यांना कष्ट देऊन दुसन्यांचे अनिष्ट करण्यासाठी केले जाते, ते तप तामस होय. जे दान सत्काराशिवाय, तिरस्कारपूर्वक, अयोग्य ठिकाणी, अयोग्य काळी आणि कुपात्री दिले जाते, ते दान तामस होय. ‘तत्सत्’ या महामंत्राचा गौरव भगवंतानी केला आहे. परमात्म्याचा साक्षात्कार आत्मज्ञानाने होतो आत्मज्ञान श्रद्धेने प्राप्त होते.
(भगवद्गीता मराठी सारांश मध्ये थोडक्यात माहिती दिली आहे. शोल्क व अर्थ यांची माहिती थोड्या दिवसात प्रकाशित होईल )
।। अध्याय अठरावा ।। (मोक्षसंन्यास योग)
भगवद्गीता अध्याय अठरावा मध्ये संगितले आहे की अंतःकरणात स्वरूपाची जागृती होणे, आपण कोण आहोत याचे ज्ञान होणे, अज्ञानातून मुक्त होणे म्हणजेच मोक्ष. काम्य कर्माचा त्याग म्हणजे संन्यास. व सर्वकर्मफलत्याग म्हणजे त्याग. सर्व कर्माच्या त्यागापेक्षा निःसंगपणे यज्ञ-तप-दान कर्म आचरणे उत्तम आहे, हे रहस्य भगवंतांनी या अध्यायात उलगडून दाखविले. हा अध्याय म्हणजे एकाध्यायी गीताच आहे.
अधिष्ठान, कर्ता, करण, प्रयत्न व दैव अशा पाच घटकांनी कर्माची सिद्धी होते. त्यातून इष्ट-अनिष्ट-मिश्र अशी तीन प्रकारची फळे मिळतात. ज्ञाता- ज्ञान-ज्ञेय अशी त्रिपुटी कर्माची प्रवर्तक आहे. ज्ञान, कर्म, कर्ता, बुद्धी, घृती, सुख हे सात्त्विक-राजस-तामस असे तीन प्रकारचे असते.
अर्जुनाचा मोह सरून तो स्थिर झाला. तो युद्धास तयार झाला. संजय धृतराष्ट्रास म्हणाला, भगवान केशव आणि अर्जुन यांचा हा रहस्यमय कल्याणकारक संवाद आठवून मी वारंवार आनंदित होत आहे.
(भगवद्गीता मराठी सारांश मध्ये थोडक्यात माहिती दिली आहे. शोल्क व अर्थ यांची माहिती थोड्या दिवसात प्रकाशित होईल )
FAQ
भगवद्गीता कोणी लिहिली
भगवद्गीता महर्षि कृष्ण द्वैपायन यांनी लिहिली .
भगवद्गीता मध्ये किती अध्याय आहे ?
भगवद्गीतेत 18 अध्याय आहेत .
भगवद्गीता किती जुनी आहे?
भगवद्गीता 400 ईसापूर्व ते 200 CE च्या दरम्यान कधीतरी लिहिली गेली आहे.
भगवद्गीता पहिला श्लोक कोणता?
भगवद्गीता पहिला श्लोकधृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः । मामकाः पाण्डवाश्चैव किमकुर्वत सञ्जय ।।१.१।। हा आहे
भगवद्गीता मध्ये किती श्लोक आहेत?
भगवद्गीता मध्ये ७०० श्लोक आहेत.